अपघाती अनुभव!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे?" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. "दुसर्‍यावर आपलाभार कधी होता कामा नये.." हे माझं तत्वज्ञान.

आई कायम सांगते, पुढे घडणार्या घटनाची चाहुल आपल्याला मिळतच असते. फक्त ती आपल्याला समजली पाहिजे.

३० एप्रिलला माझ्या मामेबहिणिच्या लग्नाला मी आणि माझे वडील मारुती कारने हुबळीला निघालो. खरंतर दोघानाही सुट्टी नव्हती. पण आयत्यावेळेला मामाचा फोन आला, कसंही करून लग्नाला याच. नेमकं त्याच वेळेला पप्पाच्या बॉसने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याना सुट्टी दिली.. त्यानी माझ्या बॉसला फोने केला. बॉस नेमका मीटिंगला बाहेर. त्याने एका दिवसाचीच सुट्टी दिली. तारीख २९ एप्रिल वेळ दुपारचे साडेअकरा.

बाबा मला घ्यायचा चर्चगेटला आले. आम्ही अजून ईरॉस पोचलो नव्हतो. बॉसचा फोन आला. "देखो, काम बहोत है, जानेसे पहले सोच लो..."

चाहुल समजत असते.....

कायम पीडीमेलो रोडने जाणारे आम्ही त्या दिवशी दादरवरून निघालो... बांद्रयाला तीन वेळेला रस्ता चुकलो. बरोबर रस्ता समजत असताना सुद्धा... वेळ दुपारी साडेबारा..

घरी गेले, हॉतेलमधून जेवण मागवलं. फटाफट पॅकिंग केली. ड्रायव्हर त्याचे सामान आणायला गेला. तो तीन वाजता परत आला. त्याला त्याच्या बाबाकडे घराची चावी द्यायची होती म्हणून दहिसर ईस्टला गेलो. तिथे गाडी चालू होइना. तो म्हणे चावी अडकली. एक्दा दोनदा तीनदा.. तरी चावी फिरेचना. माझा डावा डोळा उडत होता.

चाहुल समजत असते...

मुंबई सोडायला आम्हाला पाच वाजले. ठाणे बेलापूर रोड माझा कायमचा. पण ड्रायव्हरने गाडीकापुरबावडीवरून उजवीकडे घ्यायच्या ऐवजे डावीकडे वळवली. मला हारस्ता माहित आहे असं म्हणत...

प्रत्यक्षात तिथेही दोनदा रस्ता चुकलो. पनवेल गाठायला सात वाजले. तिथे नाश्ता केला. आणि गाडी एक्ष्प्रेस्स हायवेरून भन्नाट सोडली. ड्रायव्हर एकदा शंभरच्या वर गेला. "भय्य्या, शादि कल दोपहर बारा बजे है. धीरे चलाना..." मी त्याला सांगितलं.
"अरे डरते क्यु हो मॅडम, इस रोडपे थोडेही ना मै गाडी ठोकुंगा"
"अच्छा तो किसी और रोडपे ठोकेगा क्या?"

चाहुल समजत असते.

अकराच्या सुमारास सातार्‍याला जेवायला थांबलो. अस्सल सातारी तिखट जेवण होतं...

त्यानंतर मी सरळ झोपले. एकतर रस्ता गुलगुळीत. त्यात समोरून येणारी वाहने नाहीत,

बेळगावनंतर मी जागी झाले. आता आपला एरिया आला होता. वाटेल टोलवाले दक्षिणा मागतच होते. धारवाडनंतर हुबळी एक्झिट आला. तिथे परत टोलवाला. आणि इत्का घाण रस्ता सुरू झाला की ज्याचं नाव ते. त्यात परत सिंगल रोड.

ड्रायव्हरला स्पीड कमी करायला आम्ही सांगतच होतो. झोप आली असेल तर अर्धा तास झोप. "अभि आई गया आपका गाव.."

बाबानी त्याला आधीच सांगितलेलं. "उद्या नवरी या गाडीत बसणर आहे. गाडी स्वछ पूस"

हुबळी चार किलोमीटर वर होतं. मी उठून सर्व सामान नीट केलं. डोळ्यावर चष्नमा चढवला. वेळ पहाटे साडेपाचची.

समोरून एक ट्रक येत होता. दुसरा ट्रक त्याला ओव्हरटेक करत होता. आमच्या ड्रायव्हरने गाडीचा स्पीड कमी करायचा सोडून गाडी सरळ रस्त्याच्या झाली उतरवली. काहीतरी झालं इतकं समजलं. त्याचा कंट्रोल गेला. गाडीने एक पलटी खाल्ली. मी खिडकीला टेकून बसलेले. मी ओरडले. बाबापण. गाडे धडाधडा चालत होती. मी ओरडतच होते. वाटलं.... आता संपलं सर्व. अंगातून वेदना मुंग्यागत उठल्या. कुठलीएतरी काच तुटली होती. माझ्या चष्मा उडाला होता. दहा सेकंद पंधरा सेकंद... आई डोळ्यासमोर दिसायला लागली. आई.. आई... आता काही मला माझी आई दिसत नाही... आई आई.....

ड्याव्हरने हॅन्ड ब्रेक लावून गाडी थांबवली. बाबा गाडीतून खाली उतरले त्याना काहीही झालं नव्हतं ड्रायव्हर पण ठिक होता. अंधारात नीट काही दिसत नव्हतं. माझ्या बाजूचा दरवाजा लॉक झाला होता. मी दुसर्‍या बाजूने खाली उतरले. गाडी खड्ड्यात उभी होती.

सर्वात महत्वाचं म्हणजे मी बाबा आणि ड्रायव्हर तिघंही जिवंत होतो.

माझा खांदा प्रचंड दुखत होता.

===========
क्रमशः

विषय: 
प्रकार: 

नेहमी प्रमाणेच वेगळी कथा! छानच!!!!!!!!
बर्‍याच दिवसानंतर वेळ मिळाला आज असे दिसतेय!
असो पुढचे भाग लवकर येऊ द्यात मॅडम!
अरमान ,रेहान, सरस्वती किंवा दिविश सारखी पात्र असलेली एखादी कथा लिहाल का?
आवर्जून वाट पाहतोय!

नंदिनी, खरच अपघात झाला की काय?

आयला, कथा नाहिये.
खरोखर घडलेला अपघात आहे....

नंदिनी.... काटा आला अंगावर. खरंच दैव बरेचदा आपल्याला संकेत देत असतं. पण आपणच कर्मदरिद्री म्हणुन दुर्लक्ष करतो त्याकडे. असो. लवकर पुर्ण बरी हो.

खरोखर घडलेला अपघात आहे.... >>>>
माफ करा मॅडम, मला वाटल नेहमी प्रमाणेच एक ससपेन्स कथा लिहिताय!

बापरे काय हा चित्त थरारक अनुभव. !!!! काळ्जी घे ग या पुढे.
लिहिलाय मात्र एकदम सही.

चाहुल समजत असते आणि नसतेपण! आता बरी आहेस ना नंदिनी ? काळजी घे.

आता कशी आहेस ग???

[आताच वाचले हे पान म्हणुन ....]

******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू