भटकंती कट्टा ...

Submitted by सेनापती... on 26 October, 2010 - 06:42

नमस्कार भटक्या दोस्तांनो...

दरवेळी कोणी ना कोणी कुठे ना कुठे ट्रेकला जातच असते. किंवा जावेसे तरी वाटत असते. आपण सर्व उनाडक्या करणाऱ्या भटक्यांनी ह्या पानावर भटकंतीबद्दल गप्पा माराव्या.

एखाद्या जागेबद्दल माहिती विचारावी, माहितीची देवाण घेवाण करावी, शंका विचाराव्यात, नवीन कार्यक्रमांची माहिती द्यावी, एखाद्या ट्रेकला जायचे असेल तर चर्चा येथेच व्हावी...

काय म्हणता?? चला मग ठरवा पटापट कुठे कुठे जायचंय अजून ट्रेकला... Happy

महत्वाची नोंद : इथे फक्त ट्रेक आणि भटकंती विषयी गप्पा मारल्या जाव्यात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे फोन करुन बघा.

ह्यांच्या पायथ्याला आणि गडावर देखील खोल्या आहेत. गडावर जिल्हा परिषदेच्या ३ खोल्या आहेत पण त्यांचे बूकिंङ महाड मधूनच होते. पाचडला देशमूख हॉटेलपण आहे.

उशीरा रिप्लाय देतोय, पण वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणापासून मंदीर परीसरात राहायची बंदी आहे म्हणे. २४ तास एक सुरक्षारक्षक समाधी परीसरात असतो, तो मुक्कामासाठी नाही म्हणू शकतो.. MTDC, Dormetory, शिवाय जि.प. धर्मशाळेत राहायची सोय होऊ शकते.

BTW: रोहन, कधी येणार आहेस परत, एक फक्कड आणि भन्नाट प्लॅन आखुया... (की येऊन गेलायेस Sad ) .. खुप दिवस झाले एखादा वेगळाच आडवाटेचा प्लॅन करून Happy

येउन जाईन आणि कळवनार नाही असे होणार नाही. Happy तारखा नक्की झाल्या की सांगीन.:)

वेगळ्या वाटेने राजगड नाहीतर रायगड करायला आवडेल.

रोहन, झकास.. यायच्या आधी मेसेज टाक.. वेगळ्या वाटेवरचा रायगडचा प्लॅन डोक्यात आहे.. किंवा एक रेंज ट्रेक पण डोक्यात आहे. नक्की करु Happy