तू आणि तुझी/तुझे इस्टेट/पाककला........

Submitted by वर्षा_म on 25 October, 2010 - 10:09

१> तू आणि तुझी इस्टेट........

तू आणि तुझी इस्टेट...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

इस्टेटीच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

शेवटी उपयुक्ततेनुसार प्रेफरंस ठरवायलाच हवा ना !!! Proud

========================================

२> तू आणि तुझी पाककला........

तू आणि तुझी पाककला...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

पाककलेच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

मनाकडे जाण्याचा मार्ग पोटाकडुनच जातो ना!!!!

=========================================

३> तू आणि तुझे हसु ....

तू आणि तुझे हसु ....
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

हसण्याच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

जास्त हसणार्‍यारीला लोक वेडीच समजतात !!!

==========================================

४> तू आणि तुझा मुखचंद्र....

तू आणि तुझा मुखचंद्र...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

असेच केस जात राहिले की पुर्ण चंद्रपण आपोआप मिळेल !!!!

गुलमोहर: 

विश्य्ला... Lol

तू आणि तुझं विडंबन
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

विडंबनाच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

तुझ्या प्रेमात पडल्यावर तुझं विडंबन होईलच..... आपोआप !!!!

@मल्ल्या...

तू आणि तुझा मल्लुपणा....
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

तुझ्या प्रेमात पडल्यावर पडणार्‍याचाही मल्ल्या होइलच..... आपोआप !!!!

(मल्लुपणा : हा पेशल सोलापूरी शब्द आहे, मल्ल्याला कळ्ळा असेलच)

खरेच चिमण , आता बास्स झालं....:)

(अवांतर : मला "तू आणि तुझा पाचकळपणा" असलं काहीतरी सुचतय, विशल्या आवर स्वतःला ) Proud

Rofl Rofl Rofl

वर्षे, विशालदा..मल्ल्या..सगळीच विडंबना तूफान!! Lol

<<<विशल्या... येऊ देत रे तु आणि तुझा पाचकळपणा>>>

नको रे बाबा, चिमण गुरुजी स्वप्नात येवुन छळतील मला Wink

वर्षे, विश्ल्या..मल्ल्या..सगळीच विडंबना तूफान!! Happy

Pages