बिजींग ऑलिंपिक्स २००८

Submitted by मुकुंद on 12 January, 2008 - 00:00

२००८ वर्ष सुरु झाले व माझ्यासारख्या अनेक क्रिडाशौकीनांना साहजीकच दर ४ वर्षांनी येणार्‍या ऑलिंपीक्स स्पर्धेचे वेध लागले. या वर्षीच्या स्पर्धा बैजिंग येथे अजुन जवळ जवळ २०० दिवसात सुरु होतील. त्या निमित्ताने या बीबीवर ऑलिंपीक संदर्भातल्या मनोरंजक आठ्वणी किंवा माहीती टाकता यावी यासाठी हा बीबी सुरु करावासा वाटला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनव बिंद्रा यांना १० मी. नेमबाजी मध्ये सुवर्ण पदक !
हिंदुस्थान ला पहिले वहिले वयैक्तिक सुवर्णपदक !!

चक दे हिंदुस्थान !!!

अभिनंदन बिंद्रा !

ह्याच क्रीडा प्रकारात गगनसिंग यांनी पण बर्‍या पैकी कामगिरी केली होती पण अगदी थोडक्यात त्यांचा अंतिम फेरीतला प्रवेश हुकला.

आज सानिया, पेस-भुपती यांचे सामने होतील. तसेच सायना चा तिसर्‍या फेरीतील सामना असेल. हा सामना जिंकल्यास तिच्याकडुन ही पदकाची अपेक्षा बाळगता येतील.

मोनिकादेवी च्या बाबतीत जे घडले ते खरोखरच दुर्दैवी आहे. भारतीय क्रिडा प्राधिकरणाच्या गलथानपणामुळे तिची इतक्या वर्षाची मेहनत वाया गेली.

मला वाटते हे भारताचे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक आहे... अभिनंदन अभिनव बिंद्रा....

टेनिस डबल्समधे भुपति-पेअसला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे...

हिंदुस्थानची थेट ११ व्या स्थानावर झेप

Athlete Biography
BINDRA Abhinav
IND - India
Profile
Date of Birth: Sep 28 1982 Height(cm/ft in): 173cm / 5'8"
Gender: Male Weight(kg/lbs): 65 kg / 143 lbs
Place of Birth: Dehra Dun (India)
Residence: Chandigarh (India)
Sport: Shooting
Event(s): Men's 10m Air Rifle
-----------------------------------------------------------------------------------
मी मराठी . मी मराठी .. मी मराठी

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

सायना नेहवाल ने तिसरी फेरी जिंकुन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक मारली !
जय हिंदुस्थान !!

महागुरु... ती शेवटच्या ८ मधे .. म्हणजे उप-उपांत्य(क्वार्टरफायनल) फेरीत आली आहे.. त्यात जर जिंकली तर पदक नक्कीच! तिचा कोच म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन.. १९९९ चा ऑल इंग्लंड विजेता.. भारताचा.. पुलेला गोपिचंद आहे!:)

हो, बरोबर. ती उप-उपांत्य फेरीत खेळणार आहे.

उद्घाटन सोहळ्यात स्टाईल मारणार्‍या आणि सरावाचे कारण देणार्‍या सानियाने पहिल्याच फेरीत माघार घेतली. मनगट दुखावले असे कारण असले तरी आम जनतेच्या लेखी ती हात हलवतच परत येणार. आता मनगट दुखावले म्हणजे डबल्स मधे पण कोणी अपेक्षा ठेवणारच नाही.

२००० - सिडनी - लिअँडर पेस - कास्य पदक
२००४ - अथेन्स - मेजर राठोड - रौप्य पदक
२००८ - बिजिंग - अभिनव बिंद्रा - सुवर्ण पदक
-------------------------------------------
शुक्रवारी संध्याकाळी इथल्या (डच) एका माणसाशी ऑलिंपिक बद्दल बोलत होतो. तो म्हणाला की भारताला कोणकोणत्या स्पर्धेमध्ये सुवर्ण अपेक्षित आहे. मी म्हणालो, टेनिस डबल्स व झालेच तर नेमबाजी. त्यावर तो म्हणाला की १ बिलियन लोकांच्या देशात एव्हडीच पदके. मी काहितरी थातुर-मातुर कारण देवून त्याला कटवले. आज सकाळी आल्याआल्या त्याने माझे अभिनंदन केले.
-------------------------------------------
ऑलिंपिक मधील तसेच इतर जागतिक स्पर्धांमध्ये मिळणारी पदक संख्या आणि त्या देशाचे अर्थशास्त्रीय निर्देशांक (उदा: जीडीपी, सरासरी उत्पन्न, इतर मॅक्रो-मायक्रो निर्देशांक) ह्यांचा थेट संबंध असतो असे मला वाटते. पीजी करताना हा विषय घेवून थोडासा शोध घेतला होता पण ते मागेच पडले. इथल्या लोकांचे ह्याबद्दल काय मत आहे? गेल्या १५ वर्षात भारताची नक्कीच वेगाने प्रगती झालेली आहे. भारतातून ऑलिंपिक पदक विजेते अधिकाधिक खेळाडू तयार होतील का? की ही पदके केवळ ऍबरेशन आहे?

-------------------------------------------
अर्थशास्त्रीय प्रगती व विविध जागतिक स्पर्धांतील विजय ह्यांच्या उदाहरणादाखल:
दुसर्‍या महायुद्धाच्या आधी जपानने अनेक खेळात (विशेषतः जिम्नॅस्टिकमध्ये अनेक पदके मिळविली होती). दुसरे उदाहरण आजच्या चीनचे.
ह्याला काही अपवाद आहेत, जसे नैसर्गिक जडणघडणीमुळे प्रतिकुल परिस्थितीमधूनही पदक मिळवणारे आफ्रिकन धावपटु (हेली गॅब्रेसेलासी), किंवा साम्यवादी देशांमध्ये खेळाडुंची केलेली अनैसर्गिक प्रगती (७० व ८० च्या दशकातील इस्ट जर्मनीच्या जलतरणपटु महिलांचे पथक हे हार्मोनल ट्रिटमेंटने जवळपास पुरुषी केले होते असे मत व्यक्त केले जाते.)

२००० - सिडनी - लिअँडर पेस - कास्य पदक >>>>>> टण्या, लिअँडर पेस ला अटलांटा मधे १९९६ साली कास्य पदक होते.. तर मल्लेश्वरी ला २००० मधे सिडनी त कास्य पदक होते...

गेल्या ऑलंपिक मधे पदक मिळवलेल्या राजवर्धन राठोड ला डबल ट्रॅप शुटींग मधे अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. Sad
उरल्या सुरल्या पदकाच्या आशा पेस-भुपती आणि सायना नेहवाल वर ....

भारतातून ऑलिंपिक पदक विजेते अधिकाधिक खेळाडू तयार होतील का?

टण्या, माझं वैयक्तिक मत विचारलंस ना तर जोपर्यंत खेळातून राजकारण बाजूला होत नाही तोपर्यंत ही परीस्थिती अशीच राहणार. ऑलिंपिकला निवड झाली तरी खेळाडूंना प्रायोजक मिळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर झगडावे लागते. त्यासाठी ऑलिंपिक समिती काय करते? टेनिस, नौकानयन, नेमबाजी, तिरंदाजी हे खेळ अतिशय खर्चिक आहेत. त्यातल्या त्यात टेनिस आणि ऍथलेटीक्सला आपल्या देशात जरा तरी भाव आहे. बाकी खेळांबद्दल उदासिनता... अश्या खेळांचा सराव, त्यासाठीच फिटनेस टिकवणं, आहार जोपासणं ह्याकडे कुठली समिती जातीने लक्ष घालते?
युनिवर्सिटी लेव्हलला खेळलं की २० मार्क मिळतात, बाकी काय फायदा मिळतो खेळाडूंना.... तुमचा वशिला लागला, कोणी गॉडफादर मिळाला तर नोकर्‍या मिळतात त्या किती टक्के खेळाडूंना? किती खेळाडूंना आजपर्यंत सरकारी कोट्यातून घरं मिळाली आहेत? खेळामुळे फायदा झालेले लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील फार तर... आणि तो फायदा करून देण्यातही काही काही पदाधिकार्‍यांचा मतलब्/स्वार्थ असतोच.

हो ना...
निर्णायक सेट मधे ९ गुणांची बढत असूनही हरली.....
वाईट झालं...

Kumar claims 66kg bronze
Updated: 2008-08-20 17:34:42
(BEIJING, August 20) -- India's Sushil Kumar claimed bronze in the Men's Freestyle Wrestling 66 kilogram class on Wednesday, August 20.

Kumar took three periods to beat Leonid Spiridonov of Kazakhstan 2-1, 0-1 and 1-0.

Spiridonov finished fourth in the 66kg weight class in Athens, while Kumar took 14th place.

हिंदुस्थानची ५५ वरुन थेट ४६ व्या स्थानवर झेप.

ऑलिंपिक मधील अजून एक आनंदाची बातमी....
भारताला ६६ kg Wrestling madhe ब्राँझ पदक मिळाले.....
हे वाचा
....
अभिनंदन सुशील कुमार....

सहीच एकदम.... सुशिल कुमारचे हार्दिक अभिनंदन!!
अजुन दोघा जणांकडून पदकाची आशा आहे.

विजेंद्रला किमान ब्राँझ पदक नक्की मिळणार.. त्याने quarter final मध्ये Ecuador च्या Carlos Gongoraला हरवले...

बिजिंग ऑलिंपिक मध्ये सर्वात छोटे पथक नेणार्‍या (४ जण) अफगाणिस्तानने १ कास्य पदक मिळवीले. आपण लोकसंख्येत चिनशी बरोबरी करतो तर ऑलिंपिक स्पर्धेसाठी fund provision मध्ये ऑस्ट्रेलीयाशी बरोबरी करतो. आणि मेडल रेशो ??????????????

विजेंदरला अखेर कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले..
पण एकूण भारताच्या दृष्टीने ह्या ऑलिंपिकमध्ये बरेच काही चांगले घडले...
१ सुवर्ण आणि २ कांस्य पदके..
सायना नेहवाल, जितेंदर कुमार आणि अखिल कुमार ह्यांची उपांत्य पुर्व फेरी पर्यंतची धडक...
ह्यातून पुढच्या ऑलिंपिक साठी अजुन काही चांगले घडो हीच सदिच्छा....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

अभिनंदन विजेंदर कुमार!!

सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन Happy

माझ्या बर्‍याचश्या ऑलिंपिक्स गोष्टी " १०० यिअर्स ऑफ ऑलिंपिक्स ग्लोरी" व " ऑलिंपिआड"या व्हिडिओ संचांवर आधारुन लिहील्या होत्या. त्या संचांच्या थोर निर्मात्याचे...एका दर्दी ऑलिंपिक वेड्याचे आज दु:खद निधन झाले.. त्या बड ग्रिनस्पॅनला माझी आदरपुर्वक श्रद्धांजली...

http://news.yahoo.com/s/ap/20101226/ap_on_sp_ot/us_obit_greenspan

परवा जे.पी. मॉर्गन ह्यांचे लेख वाचून मुकुंदच्या ह्या जुन्या लेखांची आठवण झाली. विकेंडला सगळे लेख पर पहिल्यापासून वाचून काढले.

ज्यांनी जुन्या मायबोलीतले हे लेख वाचले नसतील त्यांनी जरूर वाचावे. अत्यंत स्फुर्तिदायक लेखन आहे !

http://www.maayboli.com/hitguj/messages/46/136244.html

मुकुंद, लंडन ऑलिंपीक जवळ येऊन ठेपलय! त्यानिमित्तने ही मालिका तसेच वेगवेगळ्या खेळातल्या संभाव्य विजेत्यांबद्दल लिहायला सुरूवात करायला हरकत नाही! Happy

Pages