सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 October, 2010 - 07:12

आजच मला समस आलाय बी एस एन एल कडून... त्यातली माहिती उपयुक्त वाटली म्हणून इथे शेअर करत आहे :

भारतात भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होण्यासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे तुम्हाला पब्लिक सेक्टर, सरकारी कार्यालये, इन्श्युरन्स सेक्टर, पब्लिक सेक्टर बँक्स, ऑटॉनॉमस बॉडीज इ. ठिकाणी आढळलेल्या भ्रष्टाचाराविरुध्द तक्रार नोंदवा.

वेबसाईट : http://cvc.nic.in/welcome_cvc.html

तक्रार नोंदवण्यासाठी लिंक : http://cvc.nic.in/lodgecomp.htm

हिंदीतील माहिती : http://cvc.nic.in/hindi/hindimain.htm

साईटवर अपण नोंदवलेल्या तक्रारीला ट्रॅक करता येते. अर्जात ज्या व्यक्तीविरुध्द तक्रार द्यायची असेल तिचे पूर्ण नाव, पद, खाते व तक्रारीचा तपशील द्यावा लागतो. तसेच तक्रारदारालाही स्वतःचे नाव, पत्ता, फोन नंबर इ. तपशील द्यावे लागतात. अपूर्ण तपशील असल्यास अर्ज ग्राह्य धरला जात नाही.

हेल्पलाईन नंबर : ०११ २३६५१०००

टोल फ्री क्र : १८००११०१८०.

ह्याबद्दल कोणास अधिक माहिती असल्यास ती जरूर शेअर करावी.

धन्यवाद! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु, सोय उत्तम आहे. पण काहि तक्रारदाराला आपला तपशील गुप्त ठेवला जाईल, याची खात्री पटायला हवी. शिवाय काही पदांना कायद्याचे चिलखत आहे, ते काही यामुळे भेदले जात नाही.

धन्यवाद अकु, दिनेशदा ही तक्रार नोंदवताना एक अ‍ॅफिडेव्हीट करायच. ही तक्रार केल्यामुळे माझ्या जिवाला धोका होऊ शकतो. आणि ते अ‍ॅफेडेव्हिट आपल्या विश्वास पात्र व्यक्तीकडे द्यायचे.

माझा अनुभव असा आहे. सर्वात जास्त भित्रे सरकारी नोकर असतात.

माझ्या एका नातेवाईकाने ह्या सुविधेचा उपयोग केला होता.भ्रष्टाचाराविरुद्धच्या त्याम्च्या तक्रारीची चौकशी झाली,पण काही विशेष साध्य झालं नाही.परंतु नंतर घाडगेमामांचा (माझे दूरचे मामा )... त्या विभागाने इतका धसका घेतला होता की नंतर त्यांची कामे पटा पट व्हायला लागली होती. Happy

रच्याकने,त्यांनी शिधावाटप प्रणाली मधील गैरप्रकारांची तक्रार केली होती.

अतिशय वांझोटे आणि प्रसिद्धीलोलुप आहे हे कमिशन. याचे पूर्वीचे प्रमुख एन. विठ्ठल यानी स्वतःची प्रसिद्धी करून घेतली. निष्पन्न शून्य. कारकून दर्जाच्या लोकांच्या मागे लागणारे हे कमिशन.! कोणत्या उच्च पदस्थावर याने कारवाई केली आहे याची जरा उदाहरणे द्याना जरा. (ही जबाबदारी अर्थात अ. कु. यांची नाही :)) . आता म्हणे सीडब्ल्यूजीत याने डोके घातले आहे. बघू य कोणावर काय कारवाई करतात ते....

मला पण आला हा समस. चौकशीचा कोटा पुर्ण करण्यासाठी चाललाय का उद्योग ? भ्रष्टाचार हा शिष्ठाचार आहे. उगाच काय स्विस बॅकेत भारतीयांचे जास्त पैसे आहेत ?

अशा कमिशन्स चा उपयोग सर्वसामान्य माणसाला सरकारी कामांमध्ये जळीस्थळी जी चिरीमिरी द्यावी लागते, आपल्याच हक्काला नाडले जावे लागते त्यासाठी जरी झाला तरी खूप आहे. वर डॉ. कैलास यांनी म्हटल्याप्रमाणे रेशनकार्डसारख्या गोष्टीत जरी तक्रार करता आली तरी बर्‍याचजणांना आपापली कामे मार्गी लावता येतील. यंत्रणा सुधारणे, उच्चपदस्थांवर कारवाई होणे वगैरेची आता अपेक्षाच नाही उरली!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy