अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 October, 2010 - 04:23

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे! (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.

पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.

साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.

अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी :

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

भारतात अग्निहोत्र करण्याच्या वेळापत्रकासाठी ही लिंक पहा.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) : आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी :
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium) ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०% moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत.

तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

अग्निहोत्रासंदर्भात शास्त्रीय प्रयोग व निष्कर्ष

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : नशाखोर व्यक्तीवरील उपचार

दुवा : इतर उपयोग

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :

अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : हिमाचल प्रदेशात अग्निहोत्र शेती

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात :

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत

श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी

ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत

दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती

श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत

श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक

भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!

अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी :

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/

--- लेखिका : अरुंधती कुलकर्णी.

(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरेच काही शास्त्र असते एव्हाना सिध्द झाले असते. पण तरीदेखील असे करुन जर योगायोगाने उत्पादन खरेच वाढत असेल तर फार खर्चिक प्रकरण नाही,त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करुन बघावे.प्रयोगाचा थोडा sampal size तरी वाढेल.
मला अशास्त्रीय याकरता वाटते कारण शास्त्राला कुठल्याही भाषेचे बंधन नसते ,इथे संस्कृत श्लोकांचा अट्टाहास का?

नीरजा, गटारी भाजी नाकारणारे "केमिकलच्या अन्तर्भावामुळे" नव्हे तर "गटाराच्या किळसीमुळे" नकार देत अस्तात! <<<
तुलाच जगातली सगळी बुद्धी दिलीये त्यामुळे सगळ्या लोकांच्या मनातलं तुलाच कळणार. माझंच चुकलं तुला काही सांगायचा गाढवपणा केला तो.

वुईथ ड्यु रिस्पेक्ट....
>>>> शास्त्राला कुठल्याही भाषेचे बंधन नसते इथे संस्कृत श्लोकांचा अट्टाहास का?
<<<<<
शास्त्राला भाषेचे बन्धन नस्ते, मान्य, तसेच शिव्याशापान्नाही भाषेचे बन्धन नस्ते! एकदम मान्य!
पण "मन्त्रान्ना" मात्र अस्ते! त्यातुनही "अग्निहोत्र" ही कन्सेप्टच हिन्दू धर्मातील, अर्थातच त्याचे मन्त्र सन्स्कृत मधुनच असणार! अशीच कन्सेप्ट जर पारसी/ज्यु/ख्रिस्ती/मुस्लिम वगैरे धर्मात आधिपासूनच असेल, तर असतील त्यान्चेही मन्त्रतन्त्र! पण आजवर या मायबोली साईटवर तरी ते नजरेस पडलेले नाहीत, दिसल्यास जरुर विचार करू! तोवर "सन्स्कृत " चालवुन घ्याव म्हणतो मी! काय?
दुसरे असे, की "मन्त्र" व ते रिपिटेड (म्हणजे शेकडो वर्षे कोट्यावधी लोकान्नी) पठन करुन निर्माण झालेली/होणारी शक्ती यावर जर विश्वास असेल तरच पुढील विवेचन देण्यात/ऐकण्यात्/समजण्यात गम्मत आहे! नै? तर हिन्दुधर्म वापरित असल्ली सन्स्कृत भाषा सोडून, अन्य धर्मियान्द्या कोणत्याही भाषेत असे सिद्ध मन्त्र असतील तर जरुर इथे माहिती द्या, आम्ही सन्स्कृतच्या जोडीनेच ते मन्त्र देखिल घटवू! Happy
वास्तुशास्त्राबरोबर नै आम्ही फेन्गशुई देखिल वापरतो???? Biggrin

नै ग बै नीरजा, मला नाही ना दिली सगळी बुद्धी देवाने! Sad
पण केमिकलचा अन्तर्भाव हे "बुद्धिवान सुशिक्षितान्चे" कारण ठरू शकते "आम आदमी" चे नाही! असो, सोड तो विषय!

चंपक, माझ्या परिचयातील डॉ. पोळ (फलटण) हे नियमित अग्निहोत्र करतात तसेच अग्निहोत्राच्या राखेचा शेतीसाठीही वापर करतात. त्यांचा व अजून एका शेतकरी बंधूंचा संपर्क क्रमांक मी आपल्या विपुमध्ये देत आहे. आपण भारतातील आपल्या कॉन्टॅक्ट्स मार्फत त्यांच्याशी संवाद साधू शकता किंवा त्यांच्याशी प्रत्यक्षही बोलू शकता. ह्या तंत्रावर अधिक संशोधन झाले किंवा त्यासंबंधी अधिक माहिती लोकांसमोर येऊन त्याचा जर फायदा होणार असेल तर चांगलेच आहे. आज आपल्यासारखे शेतीव्यवसायाच्या उन्नतीसाठी व शेतकर्‍यासाठी प्रयत्न करणारे लोक व्यवस्थित माहिती घेऊन, शहानिशा करून व स्वतः प्रयोग करून जर त्याद्वारे चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणू शकले तर ते स्वागतार्हच आहे.

मला वाटतं, ज्यांना प्रयोग करून बघण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य अग्निहोत्राचा प्रयोग करून बघावा. काय खरे-खोटे, चांगले-वाईट स्वानुभवानेच कळेल! एक मात्र नक्की.... त्याचा तोटा तरी अजिबात नाही.

त्यामुळे असा अग्निहोत्र वगैरे करण्याची गरज संसद, सफदरजंग व जनपथ या ठिकाणीच जास्त आहे.
तुमच्या पुढाकाराने करूयात का?

सामान चांगले शुद्ध न्या.. नाहीतर त्यात भेसळ असायची आणि प्रयोग फसायचा...

( वेबसाइटवर अग्निहोत्राचे फोटो लावले तर येणारे प्रतिसाद जास्त शुद्ध दर्जाचे येतात का? Happy )

आमचे आजोबा करायचे अग्निहोत्र.. नृसिंहवाडी परिसरात श्री काणे बुवा ( कीर्तनकार , मी यांच्या ३ पिढ्या कीर्तन करताना पाहिल्या आहेत.. त्याआधीची कल्पना नाही.) यानी याचा बराच प्रसार केला होता... त्याकाळी संध्याकाळी बहुतेकांच्या घरात अग्निहोत्र व्हायचे. घरात शिस्तीचे वातावरण आपोआपच निर्माण व्हायचे... ... सध्या याचे प्रमाण कमी झालेले आहे.

अरुंधती, नकारात्मक प्रतिक्रीयांवरील तुमचे भाष्य पाहता असे दिसते की याबद्दल विचार करायची तुमची तयारी आहे. अनेकदा मंत्र किंवा काहिही जुने म्हंटले की लगेच लोकांचा कोणता तरी एक अनामिक भाव जागृत होतो. पण एक दोघांनी म्हंटल्याप्रमाणे या मागील जगाचा भौतीक कार्यकारण भाव विसरायला नको. पैसे जर मिळणार असतील तर लोक हात धुवुन (धुऊन?) मागे लागतील. हा 'रिसर्च' त्यांच्याच लॅब मध्ये झाला आहे असे सिद्ध करायला 'कॉरपोरेशन्स' धावतील. हे होते आहे का? त्यापेक्षाही साधे: या अग्निहोत्र वाल्या शेतकर्‍यांच्या किती शेजार्‍यांनी हा प्रकार अवलंबीला आहे? वैज्ञानीक दृष्टीकोन सोपा आहे, प्रयोग तितके सहजासहजी करता येत नाहीत. त्यात सर्व पॅरॅमीटर्स काळजीपुर्वक रित्या पुन्हापुन्हा तपासावे लागतात, एरर अ‍ॅनॅलिसिस करावे लागते. अनेक गोष्टी आहेत ...

माझ्या अर्वाचीन बायबल्सपैकी (उप्स, आय मीन वेदांपैकी) एक आहे XKCD. त्यातील हा तक्ता पहा. (प्रत्येक कार्टुन पाहुन झाल्यावर, व त्याखालील भाष्य वाचल्यावर व त्यावर क्षणभर तरी विचार केल्यावर त्यावर उंदीर हॉवर करायचा असतो - मग अनेकदा थोडे जास्त सखोल भाष्य वाचायला मिळते). Enjoy.

http://xkcd.com/808/

भस्माचा शेतीत वापर म्हणजे हेच का?:

१) प्लाय अ‍ॅश : केमिकल खता बरोबर प्लाय अ‍ॅश वापरल्याने उत्पन्न २६ % पर्यंत वाढले असा दावा आहे.

२) अजून एक विचार : प्लाय अ‍ॅश मधे हेवी मेटल असतात जे वनस्पती शोशून घेतात. माणसांना हेवी मेटल अपायकारक असतात. मग त्याचा खत म्हणुन उपयोग कितपत चांगला?

प्रतिसाद इशारा: मला इतर अनेक विशयांप्रमाणेच शेती मधले वा केमिस्ट्रि मधले काहीही कळत नाही. Happy

अकु: धन्यवाद! माहिती घेतो.

लिम्ब्या: सगळे प्रयोग मीच करित बसलो तर माझा 'भुत्या' होईल! ":)

पेषवा: कळत असेल तरच लिहायचे ठरवले तर अनेक बीबी बंद पडतील! Happy

पण गौर्या तुपात जाळुन जी अ‍ॅश बनते ती फ्लाय अ‍ॅश ह्या सदरात पडते का?

केमिस्ट चंपका ह्याचे उत्तर बेफीकीरीने दिलेस तर क्रमशः तुझ्या डोक्याची२६ एक छकले होतील आणि त्यातून दगडावरील वृद्ध संन्यासी दारू ढोसतील. तेंव्हा विचार करून उत्तर दे! Happy

पेशवा , गोवर्‍या आणि समिधा ज्वलनानंतर उरलेल्या राखेतले आणि फ्लाय अ‍ॅश मधले सगळे कंटेट सेम असतील ह्याबाबत शंका आहे.

पेशवा, तु दिलेल्या दुव्यामधील लोक प्रती हेक्टर १० टन राख वापरत होते! दुसर्या दुव्यातील आर्सेनीक पॉयझनींग चा मुद्द जरी वगळला तरी इतकी राख नक्कीच अग्निहोत्र वाले वापरत नसणार (आणि गोवर्या जाळुन इत्की बनवत असतील तर आपल्या देशाचे नक्कीच कठीण आहे.

अकु,

लेख मस्त आहे. एक ऐकीव बातमी अशी सुद्धा आहे की भोपाळ वायूगळती दुर्घटेनेतून अग्निहोत्र करणारी घर आश्चर्यरित्या वाचली होती. खर खोट माहीत नाही. आर्ट ऑफ लिव्हींग ची टीचर पॅम सांगत होती की अग्निहोत्रा मुळे घराभोवती संरक्षित कवच तयार होत.

प्लिज हलक घ्या बर का.

पेशवा चांगले रिसर्च डॉक्युमेंटस आहेत. अशिच्ग म्हणतो तसा येवढ्या मोठ्या प्रमाणात राख वापरणे भारताला परवडणार नाही . कॉन्सेंट्रेशन्श मध्ये बर्‍यापैकी फरक आहे.

पेशवा, अगदी आजही, आत्ताही, जिथे जिथे चूल वापरली जाते, (माझ्या परसात देखिल वापरायचो दोन वर्षापूर्वीपर्यन्त) तिथे तिथे त्याची राख एक तर दात व भान्डी घासायला व जास्तीची झाडान्खाली टाकुन वापरतात. भातखाचरामधे (विशेषतः किमान पेरणीच्या छोट्या जागेवर तरी) मुद्दामहून शेण्या (रानात पडलेले अनिश्चित आकाराचे वाळके शेण), वाळका झाडोरा यान्चा जाळ करुन जमिन भाजण्यासोबतच, राख मिळवणे या उद्देशाने पिढ्यानपिढ्या करतात! Happy तेव्हा या प्रकारच्या राखेचा शेती साठि उपयोग हे नविन नाही, फक्त त्या जोडिने थोडे मन्त्र म्हणून बघितले व विशिष्ट वस्तुच जळणासाठी वापरल्या तर काय बिघडते??? Proud

काय खरे-खोटे, चांगले-वाईट स्वानुभवानेच कळेल! >>> अहो सगळे स्वानुभावानेच कळणार असेल तर त्याला 'अग्निहोत्राचे मानसशास्त्र' म्हणा, म्हणजे वादच संपला. ही आत्यंतिक सबजेक्टीव्हिटी आहे जी नॅचरल सायन्सेसमधे काही कामाची नाही.
अग्निहोत्रा मुळे घराभोवती संरक्षित कवच तयार होत. >>> माबोवरील काही बीबींवर अग्निहोत्राचे फोटो टाकायला पाहिजेत Proud

>>>> माबोवरील काही बीबींवर अग्निहोत्राचे फोटो टाकायला पाहिजेत
आगावा, तस चालणार नाही, तुला जेवायच असेल तर फोटो बघुन बास होते का? नै ना? मग तसच हे आहे! खरोखर कुणाकडे अग्निहोत्र होऊदे, रोजच्या रोज त्याची कृती वेबक्यामद्वारे ऑनलाईन इथे दिसुदे, मग बघु काय फरक पडतो का! (तुझ्या सारख्या सायन्टिफिक माणसाने प्रत्यक्ष कृती करण्याचे टाळून फोटो वगैरे लावण्याचे सान्गावे हे अजबच्,नै का? Proud )

<<<<<<< Agnihotra and Microbes, A Laboratory Experience
Dr. Arvind D. Mondkar M.Sc; Ph.D (Micro) >>>>>>>

या study मध्ये खुप flaws आहेत..... आणि सगळे conclusions/remarks एकतर्फी आहेत. त्यांनी हे त्यांच ground-breaking research, publish का नाही केले?

<<<<<<< The non-Agnihotra ash was produced with the same ingredients in the same copper vessal as Agnihotra ash. The only difference was the non-Agnihotra ash was not produced at sunrise or sunset, and no mantras were chanted.>>>>>>>>

Non Scientific गोष्टी वर जास्त भर दिलेला दिसतो.......

<<<<<<<<<< अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) >>>>>>>>>>>>>>>>>

पोषक वायु?
वरील सगळे वायु हे प्रकृती साठी फार घातक आणि, long term exposure can cause cancer

लिंब्याभाऊ, माझी सुचना 'सैंटीफिकच' आहे. असं बघा, जिथे प्रत्यक्ष कृती होत आहे (उदा. शेती), तिथे अग्निहोत्र करुनच बघायला पायजे, तिथे फोटू लाउन काय फायदा? पण ज्या बीबींवर नुसतीच बडबड चाल्लीए, कृती शून्य आहे तिथे फक्त फोटू पुरतील, आहे की नाही लॉजिकल? Proud
रच्याकने, हे फोटू माझ्यासारख्या समंधांपासून 'गोड, हळव्या, टचकन पाणी' वगैरे लोकांचे रक्षण करतील

>>>> हे फोटू माझ्यासारख्या समंधांपासून 'गोड, हळव्या, टचकन पाणी' वगैरे लोकांचे रक्षण करतील
<<<<<
असेल, पण त्याकरता देखिल शेकडो वर्षापासून "लिम्बू" वापरतात! Proud
फोटो काय? गेल्या शतकात आले, त्या आधी अन आता नन्तरही लिम्बूच वापरतात समन्धान्पासून रक्षण करायला! काय?

>>>>> <<<<<<< The non-Agnihotra ash was produced with the same ingredients in the same copper vessal as Agnihotra ash. The only difference was the non-Agnihotra ash was not produced at sunrise or sunset, and no mantras were chanted.>>>>>>>>

>>>>>>>>>Non Scientific गोष्टी वर जास्त भर दिलेला दिसतो.......

गणेशभाऊ, मग यात "साईन्टीफिक" गोष्टीन्वर भर द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे सान्गाल का आम्हाला? Happy

अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) >>>>>>>>>>>>>>>>>

पोषक वायु?
वरील सगळे वायु हे प्रकृती साठी फार घातक आणि, long term exposure can cause cancer>> धन्यवाद मला हेच सांगायचे होते.

<<<<<< गणेशभाऊ, मग यात "साईन्टीफिक" गोष्टीन्वर भर द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे सान्गाल का आम्हाला? >>>>

लिंबुभाऊ,
नुस्त्या गोवर्या जाळल्या तरी तेच रिझल्ट मिळतील, त्याला सुर्यास्त, सुर्योदय आणि मंत्राची काही गरज नाही.

अजुन चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर त्या जळालेल्या राखेत थोडा युरीया मिसळा आणि झांडा ना द्या, चांगली वाढ होईल, अगदी तुळशी ला दिले तरी वाढ झपाट्याने होईल.

>>>> नुस्त्या गोवर्या जाळल्या तरी तेच रिझल्ट मिळतील, त्याला सुर्यास्त, सुर्योदय आणि मंत्राची काही गरज नाही.
गरज नाही हे तुम्ही कशावरुन सिद्ध केलेत? किती साईन्टीफिक प्रयोग केलेत? Wink

>>>>> अजुन चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर त्या जळालेल्या राखेत थोडा युरीया मिसळा आणि झांडा ना द्या, चांगली वाढ होईल, अगदी तुळशी ला दिले तरी वाढ झपाट्याने होईल.
युरीयाच तुम्ही कशाला सान्गायला हवे? युरीया वापरणे म्हणजे "साईन्टीफिक" का? Wink
युरीयाच मिसळायचा अस्ता तर अग्निहोत्राचे राखेचे पयोग का केले अस्ते?
परवडत अस्त तर डायरेक्ट बाजारातुन युरीया विकत आणूनच टाकला अस्ता
(परवडत नस्त तर रोजच्यारोज मलमुत्रविसर्जनाद्वारे युरीया दिला अस्ता - ते देखिल लय भारी साईन्टीफिक ठरेल, नै? Proud )

लिंब्याभाउ, तुम्ही वेड पांघरुन बसलाय हे माहिति आहे तरीही सांगतो...
युरीया वापरणे म्हणजे "साईन्टीफिक" का?>>> १००० एकाच जातीची, एका वयाची,जवळजवळ एकसारखी रोपे घेतली, ५०० ना समान प्रमाणात युरिआ दिला, ५०० ना दिला नाही, रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व गोष्टी जसे पाणी,सुर्यप्रकाश इ.इ. सर्व १००० रोपांसाठी समान ठेवल्या. तर प्रयोगाअंती असे दिसून आले की युरिआ दिलेल्या रोपांची वाढ न दिलेल्यांपेक्षा जास्त झाली. पुन्हा 'वाढ जास्त होणे/ न होणे' हे प्रयोग करणार्‍याच्या मनावर अवलंबून नसून; पानांची संख्या, खोडाचा व्यास, इ.इ. मोजता आणि पडताळता येण्याजोग्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे.
असा काही प्रयोग अग्निहोत्राच्या बाबतीत झाला आहे का?
नसेल तर सरळ म्हणा की आमच्या महान संस्कॄतीचा हा भाग आहे म्हणून आम्ही तो करणार, सायंटीफी़क गेले उडत!!

>>>> असा काही प्रयोग अग्निहोत्राच्या बाबतीत झाला आहे का?
अब्बे आगावा, तू पण वेड पान्घरुन पेडगावला निघालाहेस असे वाट्टे,
लेका वरील प्रयोग मीऽऽ केलाऽऽय काऽऽऽ?
ज्याने केलाय त्याला विचार की,
हव तर त्याचा नावपत्ताफोननम्बर अरुन्धतीकडून घे!
अन तस विचारणे अवघड वाटत असेल तर एखाद्या वकिलाकडून नोटीस पाठवुन विचार! Proud

<<<< गरज नाही हे तुम्ही कशावरुन सिद्ध केलेत? किती साईन्टीफिक प्रयोग केलेत? >>>>>>

लिंबुभाऊ,
आम्हला असे प्र्योग करायची गरज नाही. नाहीतरी इकडे आमच्या कडे सुर्योदय फार लवकर होतो आणि सुर्यास्त फार उशीरा.... वरुन भौगोलीक दुर्ष्ट्या latitude / longitude पण भारता पेक्षा वेगळा असेल, त्यामुळे कदाचित रिझल्ट मिळणार नाही.

<<<<< परवडत नस्त तर रोजच्यारोज मलमुत्रविसर्जनाद्वारे युरीया दिला अस्ता - ते देखिल लय भारी साईन्टीफिक ठरेल, नै? >>>>>

तुम्हाला वेळ असेल तर करुन बघा आणि रिझल्ट काय आले ते पण सांगा.

Pages