वॉटर मार्क

Submitted by अवल on 23 October, 2010 - 11:59

धन्स अ‍ॅडमिन हा धागा "प्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र" या विभागात हलवल्याबद्दल Happy

वॉटर मार्क टाकण्याच्या अनेक जण अनेक पद्धती वापरतात.
मी असा टाकते :
१. फोटोशॉपमध्ये प्रचि उघडते.
२. आता टूल्स बॉक्स मधल्या टेक्स्ट वर कर्सर नेऊन दाबून ठेउन तो थोडा उजवी कडे नेते. आता तिथे मला Horizontal Type Mask Tool हा ऑप्शन दिसतो. तिथे कर्सर नेऊन दाबून ठेवलेला कर्सर आता सोडते.
३. आता मला जेथे वॉ मा टाकायचा त्या ठिकाणी येउन हवा तो फॉन्ट व साइज सिलेक्ट करून नाव टाईप करते.
ज्या क्षणी मी टाईप करायला सुरवात करते तेव्हा स्क्रिन लालसर होतो. हरकत नाही तसेच टाईप करते. आणि एन्टर देते.
४. आता स्क्रिनवर तुटक रेषेत मी टाईप केलेले नाव दिसते .
५. आता मी कन्ट्रोल दाबून जे दाबते.
जर लेअरची खिडकी उघडी असेल तर नवी लेअर तयार झालेली दिसते. नाही दिसली तरी हरकत नसते.
६. आता मी मेनूबार वरच्या Image वर क्लिक करून Adjustment वरून Hue/Saturation हा ऑप्शन क्लिक करते.
आता माझ्या समोर एक नवी खिडकी दिसते.
७. त्या खिडकीतला खालचा Lightness याचा स्क्रोल बार थोडा डावीकडे हलवते.
आता मला माझ्या प्रचि वर माझे नाव दिसू लागते. ते अगदी थोडे दिसेल न दिसेल असा हा स्क्रोल बार मी अ‍ॅडजेस्ट करते.
८. मनाजोगे झाले की ही सर्व फाईल आधी PSD File म्हणून सेव्ह करते.
९. मग तिला JPEG File म्हणून पुन्हा सेव्ह करते.
जर नंतरही मला काही बदल करावेसे वातले तर PSD File उघडून मी बदल करू शकते, अन कोठेही अपलोड करताना JEPG File वापरू शकते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>स्क्रीनशॉट मधे वॉटरमार्क असेल तर तो कसा काढणार. तो तर एकच लेयर येतो ना?>>
बाजारात हाय-एन्ड वॉमा रीमूव्हर्स मिळतात, पण त्याबद्दल इथे माहिती देणे शिष्टसंमत ठरणार नाही Happy

बाजारात हाय-एन्ड वॉमा रीमूव्हर्स मिळतात, पण त्याबद्दल इथे माहिती देणे शिष्टसंमत ठरणार नाही>>>>>बित्तुला मोदक Happy Happy

सही माहिती आहे.
ज्यांच्याकडे फोटोशॉप नाहीये. त्यांच्यासाठी,
१. गूगल पिकासावेबवर(www.picasaweb.google.com) फोटो अपलोड करा.
२. फोटोच्यावर एक एडीट टॅब येईल, ती सरळ तुम्हाला पिकनिक(picnik) या ऑनलाईन फोटो एडीटींग साईटवर घेऊन जाईल.
३. या साईटवर बरेचशी फ्री टूल्स मिळतील. उदा. बॉर्डर, वॉटरमार्क (असे कोणते स्पेशल टूल नाही, पण टेक्स्टच्या प्रॉपर्टीजमध्ये वेगवेगळे एफेक्टस आहेत ते वापरून हवा तो वॉटरमार्क मिळवता येतो.) तसेच फोटो इफेक्टसमध्येही काही इंट्रेस्टींग ऑप्शन्स आहेत.
४. शेवटी सगळे झाले की, फोटो तिथून सरळ पिकासामध्ये सेव्ह करू शकता. अथवा डाऊनलोड करता येतो.

जिप्सी, आरती दोघांनाही मनापासून त्रिवार धन्यवाद. मस्त आणि सोप्या पद्धतीने सांगितलंय!!! हा धागा उपयुक्त असल्याने नवीन माहीती देत राहा... सध्या फोटोशॉपवर काम थांबवल्याने शंका नाहीयेत... पण येईनच माहीती वाचायला...

नीधप तुला खूप माहीती असेलच ना फोटोशॉपच्या टूल्सची... तू तर ज्वेलरी, कॉश्च्युम वगैरे डिझाईनसाठी फोटोशॉपमध्येच वेगवेगळ्या टेक्निक्स वापरत असशील ना Happy टाक ना माहीती प्लीज! Happy वाचायला खूप आवडेल.

मी एक फोटोस्केप नावाचे चकटफू सॉफ्टवेअर वापरते.
कारण एडिटिंग आवडते पण फोटोशॉप जSSरा किचकट वाटते.
आणी माझे एडिटींग बेसिक लेव्हलचेच असते.
ह्यात पण रेड आय रिमुव्हल, क्लोनिंग, मोल रिमुव्हल, फ्रेमींग, वॉटरमार्क इ. ऑपशन्स आहेत.

Pages