वॉटर मार्क

Submitted by अवल on 23 October, 2010 - 11:59

धन्स अ‍ॅडमिन हा धागा "प्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र" या विभागात हलवल्याबद्दल Happy

वॉटर मार्क टाकण्याच्या अनेक जण अनेक पद्धती वापरतात.
मी असा टाकते :
१. फोटोशॉपमध्ये प्रचि उघडते.
२. आता टूल्स बॉक्स मधल्या टेक्स्ट वर कर्सर नेऊन दाबून ठेउन तो थोडा उजवी कडे नेते. आता तिथे मला Horizontal Type Mask Tool हा ऑप्शन दिसतो. तिथे कर्सर नेऊन दाबून ठेवलेला कर्सर आता सोडते.
३. आता मला जेथे वॉ मा टाकायचा त्या ठिकाणी येउन हवा तो फॉन्ट व साइज सिलेक्ट करून नाव टाईप करते.
ज्या क्षणी मी टाईप करायला सुरवात करते तेव्हा स्क्रिन लालसर होतो. हरकत नाही तसेच टाईप करते. आणि एन्टर देते.
४. आता स्क्रिनवर तुटक रेषेत मी टाईप केलेले नाव दिसते .
५. आता मी कन्ट्रोल दाबून जे दाबते.
जर लेअरची खिडकी उघडी असेल तर नवी लेअर तयार झालेली दिसते. नाही दिसली तरी हरकत नसते.
६. आता मी मेनूबार वरच्या Image वर क्लिक करून Adjustment वरून Hue/Saturation हा ऑप्शन क्लिक करते.
आता माझ्या समोर एक नवी खिडकी दिसते.
७. त्या खिडकीतला खालचा Lightness याचा स्क्रोल बार थोडा डावीकडे हलवते.
आता मला माझ्या प्रचि वर माझे नाव दिसू लागते. ते अगदी थोडे दिसेल न दिसेल असा हा स्क्रोल बार मी अ‍ॅडजेस्ट करते.
८. मनाजोगे झाले की ही सर्व फाईल आधी PSD File म्हणून सेव्ह करते.
९. मग तिला JPEG File म्हणून पुन्हा सेव्ह करते.
जर नंतरही मला काही बदल करावेसे वातले तर PSD File उघडून मी बदल करू शकते, अन कोठेही अपलोड करताना JEPG File वापरू शकते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्मी , खरं तर फार कॉम्प्लिकेटेड नाही ये गं. एकदा करून बघ Happy
नाही तर सोपा प्रकार म्हणजे, प्रचिवरचा रंग सिलेक्ट करून टाईप करायचं अन त्याची ओपॅसिटी कमी करायची . पण त्याने छान इफेक्ट नाही येत Happy

मी सरळ नवीन लेयर टाकते फोटोशॉपमधे. आणि त्यावर पेन माउसने सही करते पेन्सिल ऑप्शन घेऊन. मग ओपेसिटी, कलर करेक्शन, साइझ हव्या त्या पद्धतीने अ‍ॅडजस्ट करू शकते.

दुसरं म्हणजे सरळ टेक्स्ट ऑप्शन निवडायचा. चित्रावर जिथे टायपायचंय तिथे कर्सर नेऊन क्लिक करायचं. आपोआप नवीन लेयर तयार होतो. हवं ते टायपायचं आता. मग ओपेसिटी, कलर करेक्शन, साइझ हव्या त्या पद्धतीने अ‍ॅडजस्ट करता येतं.

मास्किंग पेक्षा हे सोपं पडतं. पण मास्किंग इत्यादीचे काही फायदे असतील तर माहित नाही.

मास्किंगचा फायदा इतकाच की मूळ प्रचितलेच रंग त्याचे टेक्चर आपण वापरू शकतो. मर्ज होणे सोपे जाते. जसे एखाद्या प्रचित निसर्गातले विविध रंग, छटा आहेत तर ते मूळ प्रचितले जसेच्या तसे घेता आल्याने प्रचि बघताना मूळ प्रचि डिस्टर्ब होत नाही Happy

वरच्या सहा आणि सात ऐवजी मला अजून दोन पर्याय सापडले Happy
* टूल्स बॉक्स मधले बर्न टूल वापरून टाइप केलेले जरा डार्क करायचे ; किंवा
* टूल्स बॉक्स मधले डॉज टूल वापरून टाइप केलेले जरा फिके करायचे .
तरीही तोच इफेक्ट देता येतो Happy

अतिशय उपयुक्त माहिती.
आरती, एखाद्या प्रचिला बॉर्डर टाकायाची असेल तर ती कशी टाकायची याची पण प्लीज माहिती दे.

छान माहिती, आरती Happy
एखाद्या प्रचिला बॉर्डर टाकायाची असेल तर ती कशी टाकायची याची पण प्लीज माहिती दे.>>>तोष्दा, बॉर्डर फोटोशॉप मध्ये कॅनव्हास साईज वाढवून टाकता येते.
Image --> Canvas Size (Alt Ctrl C)

वॉटरमार्क/कॉपीराईट मार्क टाकताना तो मूळ फोटोपेक्षा भारी वाटता कामा नये Happy नाहीतर फोटोतुन वॉटरमार्क शोधण्याऐवजी वॉटरमार्कमधुन मूळ फोटो शोधावा लागेल :फिदी:. (jokes apart पण प्रचिंच्या मूळ सौंदर्याला धक्का न देणारे वॉटरमार्क असावेत जे प्रचि बघताना डोळ्यांना खुपणार नाहीत.)

मी वॉटरमार्क टाकताना फोटोशॉपमधे एक Action Create करतो. (एक एक फोटो ओपन करून वॉटरमार्क टाकण्याचा कंटाळा दुसरे काय :फिदी:). जे फोटो अपलोड करावयाचे आहेत ते सगळे फोटोशॉपमध्ये एकत्र ओपन करून फक्त Function Key (जी Action सेट करताना दिली होती ती) प्रेस करतो. त्याबद्दल थोडी माहिती आरती यांच्या या लेखाच्या माध्यमातुन step by step.

फोटोशॉपबद्दल जास्त माहिती नाही पण फोटोशॉपची Help File वाचुन वाचुन थोडी फार माहिती मिळवली. Happy त्यामुळे चुभुद्याघ्या आणि याहुन सोप्पे असेल तर अवश्य सांगावे :). काही त्रुटी असतील (असणारच :)) तर जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा

१. फोटोशॉपमध्ये कुठलेही एक प्रचि उघडा.
२. आता विन्डोज मेन्युमध्ये अ‍ॅक्शन मध्ये जा. (Go to --> Windows --> Action (Short key Alt+F9)

३. नविन अ‍ॅक्शनवर क्लिक करा. (Click On New Action
४. आता त्या अ‍ॅक्शनसाठी F1 ते F9 मधील कुठलीही एक कि सेट करा आणि रेकॉर्ड बटन दाबा (Set the Name for Action --> Function Key (Any Keys bet. F1 to F12) and Click on Record Button).
५. आता तुम्ही पाहु शकता कि तुम्ही सेट केलेली अ‍ॅक्शन (दिलेल्या Function Key सहित) रेकॉर्ड होत आहे.
६. आता प्रचिवर तुम्हाला हवे असलेले वॉटरमार्क किंवा कॉपीराईट मार्क टाका किंवा टाईप करा आणि तुम्हाला हवे तेथे सेट करा.
७. नंतर Layer --> Layer Style --> Blending Option वर क्लिक करा.
८. नंतर ऑपेसिटी सेट करून (bet. 1 to 100) ओके बटन दाबा. (Click on Layer --> Layer Style
--> Blending Option and Set the Opacity and press OK.)

९. फोटो कुठे सेव्ह करायचा तो path सेट करा. (Set your saved photos destination by using Save As option.).
१०. तुमच्या requirements प्रमाणे JPEG Option सेट करा. (Set JPEG Option as per your requirements and Press OK. :)).
११. JPEG Option सेव्हवर क्लिक केल्यावर PSD "नो" वर क्लिक करा. (Once you save the JPEG, then close the current image and click No for PSD).
१२. आता तुम्ही पाहु शकतात कि तुमची वॉटरमार्क अ‍ॅक्शन रेकॉर्ड झाली आहे. (Now just click on Stop/Playing Recording).
१३. जे प्रचि तुम्हाला अपलोड करावयाचे आहेत ते सगळे फोटोशॉपमध्ये उघडा आणि फक्त अ‍ॅक्शन कि (जी तुम्ही सेट केली आहेत) ती प्रेस करत रहा Happy आणि पहा वॉटरमार्क तय्यार. (Now open any image/s in Photoshop and simply press the Function Key (which you have set for Action).)

याच अ‍ॅक्शनमध्ये मी Canvas Size वाढवून/सेट करून बॉर्डर दिली आहे.

अशा प्रकारे तुम्ही Horizontal आणि Vertical दोन्ही प्रचिसाठी अ‍ॅक्शन सेट करू शकता. पण यात एकाच प्रकारचा वॉटरमार्क दिसणार. वेगवेगळ्या वॉटरमार्कसाठी वेगवेगळी अ‍ॅक्शन सेट करावी लागेल.

(तळटिपः आयटी क्षेत्रात काम करत असल्याने प्रत्येक उदाहरण हे Screenshot सहित देण्याची सवय लागली आहे. :फिदी:).

अरे वा ! योगेश ये हुई ना बात ! धन्यवाद रे ! मलाही असे स्क्रिन शॉट्स द्यायचे होते, पण मी आय टीतली नसल्याने जरा आळशी पणा केला. Wink
मनापासून धन्स रे Happy

बरेच वर्ष अगदीच बेसिक लेव्हलचे फोटोशॉप वापरतेय पण योगेश म्हणतो ते ऑप्शन्स मी तरी कधी वापरले नाहीत. गरज पडली नाही म्हणून. तसंही मी फोटोशॉप चाचपडत वापरत शिकलेय आणि जेवढं कळलंय ते कामासाठी पुरेसं असल्याने अजून समजून घ्यायच्या भानगडीत पडले नाहीये. त्यामुळे सवय नाही म्हणून असेल पण कॉम्प्लिकेटेड वाटतंय आत्ता तरी.

काही लोकांच्या मते कुठलाही वॉटरमार्क काढून इमेज ढापता येऊ शकते. हे कसं ते मला माहित नाही पण वरच्या सगळ्या पद्धतींपैकी (आरती, मी आणि योगेश) कुठली जास्त सेफ असेल?

मला फोटोशॉप कॉम्प्लिकेटेड वाटतंय !

वॉटरमार्क टाकायचा सर्वात सोपा मार्ग : गूगल पिकासा वापरून !

Basic fixes >> Text (ABC) वापरून फोटोमध्ये हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या रंगात, पारदर्शकपणात व हव्या त्या फाँटमध्ये वॉटरमार्क टाकता येतो.........

हल्ली अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कोणतेही वॉमा बेमालूमपणे समूळ काढता येतात. पण जिथे अपाय आहे तिथे उपायही आहेच! Happy

फार हाय लेव्हलचे फोटोग्राफर्स (म्हणजे नॅशनल जीऑग्राफीचे वगैरे फोटोग्राफर्स ) , मॅग्नमसारख्या अंतरराष्ट्रीय फोटो स्टॉक एजन्सीज डिजिमार्कची सशुल्क सेवा घेतात.

सध्या तरी इमेज सेक्युरिटीसाठी डिजिमार्क अग्रगण्य समजली जाते. पण ही ऐट किती दिवस टिकते ते पहायचे. अंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रचि शर्विलक डिजिमार्कवरपण लवकरच संक्रांत आणतील! असो!

वरच्या सगळ्या पद्धतींपैकी (आरती, मी आणि योगेश) कुठली जास्त सेफ असेल>>>>>बित्तुबंगाला अनुमोदन.

निधप, बित्तुबंगा म्हणतो तसंच हल्ली आधुनिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कोणतेही वॉटरमार्क बेमालूमपणे काढता येतात. त्यामुळे सध्यातरी कुठलीहि प्रोसेस सेफ नाही म्हणता येणार. Happy

धन्स अ‍ॅडमिन हा धागा "प्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र" या विभागात हलवल्याबद्दल Happy

तुम्ही लोकांनी संजय पेठेची वेबसाइट बघितलीयेत का? किंवा त्याचे फ्लिकर वरचे फोटो? तिथे फोटोवर राइट क्लिक केल्यावर
This photo is All Rights Reserved
View all sizes: Medium 500
हा मेसेज येतो.
किंवा अजून काही साइटसवर इमेजवरून कर्सर फिरवला की ही इमेज अमुक तमुक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे आणि ढापल्यास अमुक तमुक असं काय काय येतं.
हे काय असतं? आणि काही प्रमाणात तरी याने चोरी थांबू शकते असं वाटतं का?

वॉटर मार्क चा विषय चालू आहे माहितीये पण ही अनुषंगाने माहिती विचारतेय...

>>किंवा अजून काही साइटसवर इमेजवरून कर्सर फिरवला की ही इमेज अमुक तमुक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे आणि ढापल्यास अमुक तमुक असं काय काय येतं.>>

HTML वेबपेजात इमेजसाठी ALT नावाचा एक टॅग असतो, त्यात आपल्याला पहिजे तो मेसेज लिव्हायचा. पाहणा-याने माऊस कर्सर इमेजवर ठेवला की लगेच तो ALT मेसेज स्क्रीनवर उमटतो.

Right-click disabled स्क्रिप्ट्स आता फार जुन्या झाल्या. हल्लीची शाळेतली पोरं सुद्धा आता ते कुलूप लीलया उघडतात. Happy

मृच्छकटिकी शर्विलकी कल्पान्तापर्यंत बरकरार राहणार! Sad

धन्स, नीधप माहितीबद्दल :). अजुनतरी पेठेंची वेबसाईट पाहिली नाही. पण या पद्धतीने फोटो प्रोटेक्ट करू शकतात हे माहिती होते.

आणि काही प्रमाणात तरी याने चोरी थांबू शकते असं वाटतं का?>>>>>मला नाही वाटतं (अर्थात हे माझे मत :)).
फोटो जरी प्रोटेक्टेड असला तरी सुद्धा Screen Shots घेऊन ढापणार्‍याला ते ढापता येतात. आंतरजालावर Screen Shots घेण्याचे हि काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत जे थेट .jpg,.gif,.tiff फॉर्मेटमध्ये फाईल सेव्ह करून देतात (उदा. Snagit).

http://www.flickr.com/photos/sanjay_pethe हे बघ त्याचं फ्लिकर पेज...

बित्तु, मला दुसरी काय बिगारी लेव्हलचं पण कुलूप उघडता येत नाही... Happy

स्क्रीनशॉट मधे वॉटरमार्क असेल तर तो कसा काढणार. तो तर एकच लेयर येतो ना?

स्क्रीनशॉट मधे वॉटरमार्क असेल तर तो कसा काढणार. तो तर एकच लेयर येतो ना?>>>>जर वॉमा तळाशी किंवा बाजुला असतील तर क्रॉप करून नाहीतर फोटोशॉपमध्ये feather टुल वापरून काढु शकतो ना? (चुभुद्याघ्या).

Pages