सोसायटीतले काही...

Submitted by shashank pratapwar on 21 October, 2010 - 10:46

जया. एम. यांची क्षमा मागुन....
http://www.maayboli.com/node/20461

(अतिउत्साहात दिवसा ऑर्केस्ट्रा लावुन दांडीया खेळणार्‍या सोसायटीतल्या बायकांना समर्पीत...)

बावरती सगळ्या बाया
दांडीया खेळतसे डे ला
काकुळता नवरा त्यांचा
उपाशी निघुन गेला

ही वाट पूर्ण नृत्याची
तालाचे आवर्तन फोल
गाण्यात तळमळे फाल्गुनी
सुरांचा कळता झोल

गर्दीत तरंगत पिसा
तोंडात त्याचिया पाणी
फुकटची पटवुन गेला
तो शेजार्‍याची राणी

गॅलरीत बसुन बघताना
पायाला गोळे भरती
दारुत बुडालो अर्धा
बाटली डुचमळे वरती

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

ही वाट पूर्ण नृत्याची
तालाचे आवर्तन फोल
गाण्यात तळमळे फाल्गुनी
सुरांचा कळता झोल

झकास. यावरून एक आठवण आली. कंपनीत नोकरीस असताना असा एक कार्यक्रम स्नेहसंमेलनात आयोजित केला होता. गेस्ट ना उशीर झाला म्हणून लगेच रिपीट केला २ वेळा आणि २र्या दिवशी त्या महिलांच्या कमरा दुखल्या म्हणून त्यांनी खूप शिव्या दिल्या मला. याद दिलीत त्या प्रसंगाची.