पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र

Submitted by सावली on 20 October, 2010 - 07:55

ठाणे महापौर पुरस्कार २०१० राज्यस्तरिय स्पर्धेत स्थापत्यकला विभागात द्वितीय पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र.
हे प्रदर्शन १९ ते २४ ओक्टो. ठाणे कलावैभव , कापुरबावडी येथे भरले आहे.

शिन्जुकू, तोक्यो इथला ककून टॉवर फिशआय लेंसने.
लेंस - १५ मिमी सिग्मा फिशआय
कॅमेरा - Canon 5D MarkII
f /9.0, shutter 1/250 , ISO २००
या संबंधी बातमी लोकसत्तामधे इथे पहा

मुळ टॉवर असा दिसतो

मुळ रिझोल्युशन मधल्या फोटोचा १००% क्रॉप स्वॅच

गुलमोहर: 

टू गूड!!! जबरी फोटो आहे!!
हार्दिक अभिनंदन सावली! Happy

इथे वाचल्यावर फिश आय वर गूगल केलं.. काय नाविन्यपूर्ण फोटोज बघायला मिळाले!

मला सांग, फोटोच्या कडेला आंतरगोल आणि त्या बिल्डींगच्या मधे बर्हीगोल असे दोन्ही इफेक्ट कसे आले?

सहीच आहे फोटो सावली. परत एकदा अभिनंदन.

मला वाटतं परवाच तुझ्याकडे येताना शिंजुकू स्टेशनवरून ही बिल्डिंग बघितली. Happy

सगळ्यांचे मनापासुन आभार Happy
मी पारितोषीक घ्यायला आणी प्रदर्शन बघायलाही जाऊ शकत नसल्याने जरा वाईट वाटत होतं. पण इथल्या पोस्ट बघुन आता छान वाटतय.

@नंद्या हो ही फिश आय असल्याने बिल्डींग वक्राकार वाटताहेत.
@पन्ना मुळात हा टॉवरच कळी / अननसाच्या आकाराचा आहे. त्याचा मधला भाग तसाच बहिर्वक्र आहे. फिश आय मुळे हा आकार जास्त इंटरेस्टींग होतो. मी साध्या लेन्स ने घेतलेला एक फोटो रात्री टाकेन इथे, मग त्या टॉवरचा आकार कसा आहे ते कळेल.
@नीधप हा फोटो २१ मेगापिक्सेल असल्याने मुळ फोटो अपलोड करता येणार नाही. पण जर हव असेल तर मी १००%क्रॉप करुन एक स्वॅच टाकते रात्री. मोठ्या आकारातले प्रिंट (१२x८) प्रदर्शनात बघता येईल.
@गंभीर , भेटण्याकरता मला बहुधा आपलीच अपॉईंटमेंट घ्यावी लागेल Wink
@आडो, हो बरोबर शिंजुकूस्टेशन वरुन ही बिल्डींग दिसते.

एवढ्या छान आकाराच्या टॉवरला आजुबाजूला फार जागा मोकळी हवी होती असं मला नेहेमी वाटतं. नेहेमीच्या कॅमेर्‍याने फोटो घेतला तर आजुबाजुला फार गिचमिड येते. त्या गिचमिडीलाच जरा वेगळं रुप दिलं फिशआय लेन्स ने.
फिशआय लेन्सने बरेच मजेदार फोटोही काढता येतात. हि लेन्स अलिकडेच घेतली असल्याने फार फोटो काढलेले नाहीत. पण काढुन मग लिहिनच त्यावर कधितरी Happy

अभिनंदन सावली Happy असेच अनेक पुरस्कार तुला मिळोत Happy

फोटो झक्कासच Happy

तुझ्या काही खास फोटोज चे माबोवर प्रदर्शन भरव... दिवाळीच्या निमित्ताने Happy

सावली, मस्तच गं .. ! अभिनंदन तुझं.. अशीच सुंदर सुंदर प्रकाशचित्र आम्हाला पहावयास मिळूदेत.

तुझ्या काही खास फोटोज चे माबोवर प्रदर्शन भरव... दिवाळीच्या निमित्ताने>>>>जोरदार अनुमोदन. Happy

अभिनंदन सावली......सर्व माबो करांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन जगभरात कौतुक होवो हिव्ह सदिच्छा

हार्दिक अभिनंदन सावली Happy
तुझ्या काही खास फोटोज चे माबोवर प्रदर्शन भरव... दिवाळीच्या निमित्ताने <<<<<<<<<१०० मोदक Happy

अभिनंदन सावली (दोन दिवस रजा असल्याने, इथे यायला जमलेच नव्हते.)
फोटोग्राफितला असा गुरु आम्हाला लाभला आहे, हे आमचे केवढे भाग्य !

आपल्या वेबसाईटवरील फोटो पाहिले व फोटोग्राफिवीषयीचे लेखही वाचले आहेत. या क्षेत्रातला आपला अभ्यास सखोल आहे. मॉडेल फोटोग्राफी, साईटवर जाऊन इनडोअर आउटडोअर फोटोग्राफी अशी कामे ऑफिसमधे चालू असतात त्यानिमीत्ताने प्रोफेशनल फोटोग्राफर्सशी संपर्क येत राहतो. आपल्या या माहितीचा बर्‍याच वेळा उपयोग होतो.

ठाणे महापौर पुरस्कार २०१० राज्यस्तरिय स्पर्धेत स्थापत्यकला विभागात द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सावली!!!

Pages