मेन्दी वपरून निरनिराळ्या मटेरिअल वर प्रयोग करणे नेहेमीच चालु असते त्यात गणेश उत्सवात ठेवलेल्या 'टाकाउतून टिकाउ' च्या निमित्तानी बर्याच टाकाउ वस्तु रंगवायची प्रेरणा मिळाली :).
अता दिवाळी निमित्त वेळ मिळेल तसं एक एक सामान बाहेर काढतेय :).
हा जुना डबा , पेडिक्युअर कोस्मॅटिक किट चा ( (पत्र्यासारखं मटेरिअल आहे.)

रिकामा डबा खूप दिवसापासून अडगळीत पडून होता पण इतका छान आकार आहे म्हणून फेकून दिला नाही,
शेवटी दिवाळी निमित्त एकदाचा बाहेर काढून रंगवायचा मनावर घेतलं :).
डब्याच्या मधे जी पारदर्शक प्लॅस्टिक्/अॅक्रिलिक सारख्या मटेरिअल छोटीशी खिडकी आहे त्यामुळे आत दिवा लावायची आयडिआ सुचली.
वापरलेले टाकाउ मटेरिअल :
जुना डबा
जुने मेंदीचे कोन
फेकून द्यावा लागेल असा जुना रवा
इतर साहित्यः
कोन मधे भरलेले 3D colors, rhinestones, golden acrylic paint, transparent sealer paint, टी लाइट होल्डर.
कृति:
१.डब्याला प्लेन सोनेरी रंग २ कोट्स मधे लावला आणि वाळल्यावर मेन्दी , rhinestones वापरून डिझाइन काढलं.
२.त्या पारदर्शक खिडकीवर पणती रंगवली .
३. मेंदी आणि इतर रंग वाळल्यावर क्राफ्ट सिलर लाऊन वाळायला ठेवलं.
४. वाळल्यावर डब्याच्या आत मधे टि लाइट ठेवला .
त्याची लेव्हल बरोबर त्या पारदर्शक खिडकीवर रंगवलेल्या पणतीच्या ज्योतिला मॅच होईल अशी अॅड्जस्ट केली , खरं तर लेव्हल थोडी अजुन उंच चालली असती, नंतर लक्षात आलं.( लेव्हल मॅच करण्या साठी डब्यात अजुन एक टाकाउ वस्तु अॅड केली, जुना बारिक रवा, जो खराब निघाला होता, रांगोळी किंवा सँड पेन्टिंग सारखा वापर करावा म्हणून ठेवला होता, जो इथे कामी आला.).

५. ही स्टेप काही ठरवली नवह्ती पण सहज जमून गेली:).
काचेचे काही टिलाइट होल्डर दिवाळी निमित्त रंगवले होते, त्यातला सोनेरी रंगवलेला होल्डर या डब्याच्या रंगाशी मॅच करत होता, प्रयोग म्हणून डब्यावर वर उलटा ठेवला ,देवळा सारखा आकार दिसत होता म्हणून हे काँबो आवडल, त्यात पण एक टि लाइट ठेवला 
नंतर हिरव्या-सोनेरी रंगानी रंगवलेले अजुन २ टि लाइट होल्डर सेट म्हणून बाजुला ठेवले:).

अर्थात हे टिलाइट्स ऑन ऑफ स्विच नी ऑपरेट होणारे आहेत म्हणून बन्द डब्यातत आणि उपड्या ग्लास होल्डर मधेही ज्योत प्रज्वलित आहे :).
हे इतर टि लाइट होल्डर्स
डीजे, अफलातून कलाकारी करता
डीजे,
अफलातून कलाकारी करता तुम्ही
तुमच्या गणेशोत्सवातल्या एकूण एक वस्तू आवडल्या. आता हे पण
डिजे, तुमच्या सर्व कलाकृती
डिजे, तुमच्या सर्व कलाकृती सुंदरच असतात. बुकमार्क, मेणबत्त्या, वॉलहँगिंग सर्वच छान आहे!!यात वापरला जाणारा क्राफ्ट सिलर / सिलर स्प्रे भारतात कुठे मिळू शकतो?? ब्रँड कळला तर बरं होईल. जरा सांगाल का?
अफलातुन केलयस डिजे. खरच, त्या
अफलातुन केलयस डिजे. खरच, त्या जुन्या ड्ब्याचा फोटो दिलायस म्हणुन, नाहितर रंगवल्या नंतर तोच हा आहे हे सांगुन सुध्दा खरं वाटणार नाही. तुम्हारे हाथोमे जादु है.
आहा!! काय सुंदर केले आहे.
आहा!! काय सुंदर केले आहे. त्या डब्याचे रुप कसले सुंदर पालटून टाकले आहे.
सुरेखच!
सुरेखच!
काय भारी कला आहे तुझ्याकडे
काय भारी कला आहे तुझ्याकडे डीजे! मस्त!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
सुंदरच गं. हातात कला तर आहेच
सुंदरच गं. हातात कला तर आहेच पण त्याहीपेक्षा, समोर दिसलेल्या वस्तुंचा नेमका उपयोग काय होउ शकतो या कल्पना डोक्यात येणे महत्त्वाचे.
ही मेंदि पडत नाही का? की त्यात फेविकॉल वगैरे काही टाकलय?
यात वापरला जाणारा क्राफ्ट
यात वापरला जाणारा क्राफ्ट सिलर / सिलर स्प्रे भारतात कुठे मिळू शकतो?? ब्रँड कळला तर बरं होईल. जरा सांगाल का?
मलाही हे जाणुन घ्यायचेय...
एकदम royal.
एकदम royal.
सुंदर!
सुंदर!
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम !
अप्रतिम !
ही मेंदि पडत नाही का? की
ही मेंदि पडत नाही का? की त्यात फेविकॉल वगैरे काही टाकलय?>> डिजे ने वरुन सिलर स्प्रे वापरला आहे त्यामुळे पडत नसावी.
या विकांताला 'मायकेल्स'.
वॉव! कसला भारी दिसतोय हा डबा.
वॉव! कसला भारी दिसतोय हा डबा.
त्या डब्ब्याचे कोण होतास तु?
त्या डब्ब्याचे कोण होतास तु? काय (अप्रतिम)झालास तु!!!!! अस झालय
ग्रेट, लाजवाब, सुंदर, वगैरे वगैरे वगैरे!!!
अ प्र ति म... सुरेख
अ प्र ति म... सुरेख
रोचिन, साधना, भारतात कुठला
रोचिन, साधना,
भारतात कुठला ब्रॅंड माहित नाही , पण इथे मायकेल्स मधे प्रत्येक सरफेस वर लावायचा , ऑलमोस्ट प्रत्येक रंगाच्या ब्रॅन्ड्चा टॉप सिलर मिळातो, तिथेही क्राफ्ट कलर्स जिथे मिळतत तिथेच ग्लॉसी टॉप कोट्स नक्कीच मिळत असतील.
इथे मायकेल्स मधे निरनिराळ्या सरफेस वर लावलेल्या सिलर्/ग्लॉसी प्रोटेक्टिव कोट ची माहिती बघा.
http://www.michaels.com/Finish-your-Project-With-the-Right-Sealer/ae0595...
स्प्रे सगळे फ्लेमेबल असतात त्यामुळे ब्रश नी लावायचे डेको आर्ट, अमेरिकाना अशा कलर्स चे टॉप कोट्स वापरणं जास्तं सेफ आहे.
डिजे, धन्स!! इथे चौकशी करुन
डिजे, धन्स!!
इथे चौकशी करुन बघते!!
अशक्य, अप्रतिम
अशक्य, अप्रतिम
डिजे!! वॉव!! सीरीयसली,
डिजे!! वॉव!! सीरीयसली, कायापालट केला आहेस त्या डब्याचा! अफलातून!!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
वा, अतीशय सुंदर!! तुला
वा, अतीशय सुंदर!! तुला सा.नमस्कार.
Pages