मी आणि माझी कविता.....

Submitted by लाजो on 13 October, 2010 - 00:36

मी आणि माझी कविता....

आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात,
पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात .. Proud

सकाळपासुन डोक्यात गुणगुणतोय टवाळ भुंगा,
हजारएक शब्दांनी घातलाय विशाल दंगा....

हाती घेतली पेन्सिल, समोर ठेवली कोरी वही,
सग़ळ्यात प्रथम पानावर ठोकली 'लाजो' सही....

गझल करावी का? नको, ती बेफिकीरी आपल्यात नाय,
चारोळ्या करायला पब्लिकला प्रतिसादात वाव हाय.... Proud

झुरळं झाल, ढेकुणं झाला, आणि झाली गाय,
आता आपल्याला लिहायला स्पेशल प्राणीच उरला नाय.... Sad

निसर्गावर लिहु? वर्षा की मयुर? कैलास छेदु की पाषाणच भेदु?
नको त्यापेक्षा देवी, आई, सासु, 'ती' या स्त्रीवर्गालाच वंदु.... _/\_

मग म्हंटल एखादी वस्तुस्थितीच मांडुयात,
ज्वलंत काहीतरी लिहुन गंगाधरालाच कोंडुयात....

जाऊदे नकोच, पब्लिक म्हणेल, ही कस्ली आहे आगाऊ,
त्यापेक्षा प्रेमाच्या सुर्यकिरणांचा प्रसन्न प्रकाश फैलावु....

माझ्या लेखनाचा स्पीड बघुन द्रूपालाचीही शक्ती संपली,
नुसत्या शब्दांच्या उल्हासात ही कै च्या कै पडली..... Lol

'लाजो'

डिस्लेमरः यात कुणाच्या नावाचा उल्लेख आला असेल तर तो केवळ योगायोग समजावा. कुणाच्या नावाचा उल्लेख आला नसेल तर तो द्रुपालाचा दोष समजावा व कृपया माझ्यावर रोष येउ न द्यावा. कोणतीही कंपुशाही नाही Happy

'लाजो'

शब्दखुणा: 

कसली काढली आहेस........................ तुझ्या डोक्यातुन ही कवीता म्हणतो आहे मी.

विशालदा Happy तुका स्मितहास्य करयचो योग २४ वेळा येवो Happy तु तुज्या मनाचो मालक होवो Happy तुज्या कडे २ चिमण जीव येवो Happy एक रत्नाकर आणि दुसरो कमलाकर Happy हे माजे तुका आशिष असा Happy

गझल करावी का? नको, ती बेफिकीरी आपल्यात नाय,

ही ओळ वाचून आपली ही 'काहीच्या काही' मधे असण्याची मुळीच आवश्यकता नसलेली कविता अत्यंत आवडली.

मात्र, त्याचा अर्थ असा नाही की इतर ओळी आवडल्य नाहीत. बहुतेक सर्वच ओळी चांगल्या!

मन:पुर्वक अभिनंदन!

-'बेफिकीर

Pages