मी आणि माझी कविता.....

Submitted by लाजो on 13 October, 2010 - 00:36

मी आणि माझी कविता....

आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात,
पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात .. Proud

सकाळपासुन डोक्यात गुणगुणतोय टवाळ भुंगा,
हजारएक शब्दांनी घातलाय विशाल दंगा....

हाती घेतली पेन्सिल, समोर ठेवली कोरी वही,
सग़ळ्यात प्रथम पानावर ठोकली 'लाजो' सही....

गझल करावी का? नको, ती बेफिकीरी आपल्यात नाय,
चारोळ्या करायला पब्लिकला प्रतिसादात वाव हाय.... Proud

झुरळं झाल, ढेकुणं झाला, आणि झाली गाय,
आता आपल्याला लिहायला स्पेशल प्राणीच उरला नाय.... Sad

निसर्गावर लिहु? वर्षा की मयुर? कैलास छेदु की पाषाणच भेदु?
नको त्यापेक्षा देवी, आई, सासु, 'ती' या स्त्रीवर्गालाच वंदु.... _/\_

मग म्हंटल एखादी वस्तुस्थितीच मांडुयात,
ज्वलंत काहीतरी लिहुन गंगाधरालाच कोंडुयात....

जाऊदे नकोच, पब्लिक म्हणेल, ही कस्ली आहे आगाऊ,
त्यापेक्षा प्रेमाच्या सुर्यकिरणांचा प्रसन्न प्रकाश फैलावु....

माझ्या लेखनाचा स्पीड बघुन द्रूपालाचीही शक्ती संपली,
नुसत्या शब्दांच्या उल्हासात ही कै च्या कै पडली..... Lol

'लाजो'

डिस्लेमरः यात कुणाच्या नावाचा उल्लेख आला असेल तर तो केवळ योगायोग समजावा. कुणाच्या नावाचा उल्लेख आला नसेल तर तो द्रुपालाचा दोष समजावा व कृपया माझ्यावर रोष येउ न द्यावा. कोणतीही कंपुशाही नाही Happy

'लाजो'

शब्दखुणा: 

वर्षे Proud

एक सुचना: इथे फक्त गुलमोहर विभागातील नावांचाच योगायोगाने येणारा उल्लेख अपेक्षित आहे Proud

मला वाटले तु पाषाणभेद आहेस. तु तर कोमल निघालीस Uhoh आता आगाऊपणा न करता अज्ञातवासात जा आणि एका फुलाच्या सावलीत बस.

मोबोच्या नावाचा उल्लेख करुन कविता रचण्याचा हा इथला (माबोचा) पहिलाच प्रयोग यशस्वी आहे. >> ही अशी कंपुशाही Uhoh नाही बॉ करायची. आम्ही पण आमच्या या कवितेला यशस्वीच म्हणणार Proud

http://www.maayboli.com/node/20043

निखिल् Light 1 घे बाबा Happy

>>आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात,
पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात ..

चांगलं छळताय.. Happy

माझ्या लेखनाचा स्पीड बघुन द्रूपालाचीही शक्ती संपली,
नुसत्या शब्दांच्या उल्हासात ही कै च्या कै पडली.....>>>> Lol
डिस्क्लेमरने मी Rofl

Keep it up....................

बर्‍याच महिन्यांनी ही चांगली कैच्याकै वाचली. मी कैच्याकैचा धसका घेतला होता त्यामुळे आधी फिरकले नव्हते. म्हंटलं नेहमीचंच चालू झालं असेल Light 1 तर सुखद धक्का बसला. अजून कुणी झब्बूंच्या नावाखाली या धाग्याची वाट नाही लावलीय Happy

सर्वांचे एकदम मन से आभार Happy

श्री, रबर बँड लाम्बवायच नस्त... ते ताणायच असतं Happy
कथा, कादंबरी, सिनेमा, पाळणा.. हे लांबवायचे असतात Proud (इथे पाळ्णा म्हणजे, लहान बाळाच्या बारश्याला जो गातात ना तो अपेक्षित आहे.. उगाच कोणी भलता अर्थ घेऊ नये) Proud

विरु, तुला स्पेशल धन्यवाद Happy

Pages