जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...
२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.
९ सप्टेंबर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे."
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"
७ सप्टेंबर१६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
११ सप्टेंबर१६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.
७ सप्टेंबर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...
शिवरायांनी खांदेरीच्या
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...>> नक्कीच आवडेल वाचायला... :उत्सुकतेने वाट बघणारी बाहुली:
खांदेरीबद्दल खूप कुतूहल आहे.
खांदेरीबद्दल खूप कुतूहल आहे. आता फक्त वादळात सांपडलेल्या मच्छीमार होड्यांच्या संदर्भातच खांदेरीचं नांव वाचनात येतं. तुमच्या विस्तृत पोस्टबरोबर फोटो असणारच ! वाट पहातोय.
लिही रे भटक्या . हे वेळेत
लिही रे भटक्या .
हे वेळेत वाचणार आहे
नक्कीच... आजच्या
नक्कीच... आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी वाचा...
'शिवछत्रपतींच्या आरमाराविषयीची यथार्थ कल्पना देणारा ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा ग्रंथ १६ ऑक्टोबरला प्रसिद्ध होतो आहे..'
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106...
भाऊ... अजून तरी मी स्वतः
भाऊ... अजून तरी मी स्वतः खांदेरीला गेलेलो नाही...
तेंव्हा फोटो नाहीत... लिखाण मात्र नक्की येईल... 
हाय भटक्या.. तुझ्या लिखाणाची
हाय भटक्या.. तुझ्या लिखाणाची वाट पाहतोय.. फोटोही मिळाले तर टाक हं
अजून तरी मी स्वतः खांदेरीला
अजून तरी मी स्वतः खांदेरीला गेलेलो नाही... >> पक्क्या मी सुद्धा गेलेलो नाहीये.. खांदेरी-उंदेरी इथे जाण्यात आता परवानगी काढावी लागते.. तसेच तेवढा परिसर दाखवण्यास बोटवाले अव्वाच्या सव्वा भाव सांगतात.. त्यामुळे तिथे जाणे फार दुर्मिळ झाले आहे.. नेटवरही सध्या वर्तमानकाळात कोणी गेलेल्याचे वाचनात आलेले नाहीये..
बाकी मित्रा लिहीत रहा.. आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत..
शिवरायांनी खांदेरीच्या
शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...>> नक्कीच आवडेल वाचायला...

अनुमोदन !
Gs ने केलेला खांदेरी
Gs ने केलेला खांदेरी
होय रे योगेश... तिकडे जायचे
होय रे योगेश... तिकडे जायचे म्हणजे बरीच नाटके आहेत... कोणी आहे का ओळखीचा असा जो परवानगी काढू शकतो... मी पण बरेच महिने झाले तिकडे जायची संधी शोधतोय. मागे एकदा निनाद बेडेकर यांच्याबरोबर तिकडे जायची संधीहुकली होती.
रोहन माहिती काढू... जानेवरी
रोहन माहिती काढू... जानेवरी मधे आहेस का?
मलादेखिल यायला आवडेल. काहि
मलादेखिल यायला आवडेल. काहि प्लान असला तर सान्गा.
इन्द्रा.. जानेवारीमध्ये मी
इन्द्रा.. जानेवारीमध्ये मी आहे. जमले तर बघ...
अरे रोहन.. मी बराच प्रयत्न
अरे रोहन.. मी बराच प्रयत्न केलाय.. नि अजून सुरु आहे.. बघू.. तिकडे कोणाची तरी ओळख निघायला हवी.. तर काम सोप्पे होईल आपले... आपण जाऊ नक्की... ! (जल्ला कुठ कुठ जायचं बाकी आहे..)
जल्ला कुठ कुठ जायचं बाकी
जल्ला कुठ कुठ जायचं बाकी आहे..
>>>>> जल्ला एवढी मोठी यादी तर पंचवार्षिक योजना करणाऱ्यांची पण नसेल...
कोणी आहे का ओळखीचा असा जो
कोणी आहे का ओळखीचा असा जो परवानगी काढू<< अरे इतकेही अवघड नाहीये तिथे जाणे. फक्त भरती ओहोटी च्या वेळा संभाळाव्या लागतात.
जिएस बरोबर मी पण गेलो होतो, तेव्हा तिथे किनार्यावरिल ऑफिस मधून परवानगी घेतली होती. थळ येथे सकाळी लवकर जाऊन पोहोचावे लागेल.
(No subject)
सचिन... GS सध्या आहे कुठे?
सचिन... GS सध्या आहे कुठे? ट्रेक का बंद केले?
रोहन, यो... २६ जानेवारी
खांदेरी किल्याच्ये आणखी फोटो
खांदेरी किल्याच्ये आणखी फोटो येथे पहा.
मी पण येईन लोक्स. जानेवारीमधे
मी पण येईन लोक्स. जानेवारीमधे
बोलवा नक्की.
इंद्रा,२६जानेवारीला जानार
इंद्रा,२६जानेवारीला जानार असलात तर म्या बी येइन
म्या काय म्हणतो.. जमवूनच
म्या काय म्हणतो.. जमवूनच टाकूया २६ चे...
Done
Done
मी पण तयार ...
मी पण तयार ...:स्मित:
मी पण तय्यार....
मी पण तय्यार....
मी सुद्धा, पण सर्वांना माझ्या
मी सुद्धा, पण सर्वांना माझ्या वाढदिवसानिमित्त ट्रेकला येताना केक व भेटवस्तु घेउन याव्या लागतील... आहे कबुल....
केक व भेटवस्तु <<< नक्कीच
केक व भेटवस्तु <<< नक्कीच गिरी... तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करूयात..
गिरी.... अरे त्याची चिंता
गिरी.... अरे त्याची चिंता नको.. तुला एखादी तोफ गिफ्ट करू तिकडे...
केक व भेटवस्तू परवडतील.. पण
केक व भेटवस्तू परवडतील.. पण आमच्या शुभेच्छा महाग पडणार तूला तेव्हा तयार रहा !
जाणार तूम्ही लोक, आणि
जाणार तूम्ही लोक, आणि उत्सुकता मला !!
खांदेरी आणि उंदेरी अशी जोड नावे घेतात ना नेहमी ?
Pages