जुन्या गाडीची देखभाल कशी करावी?

Submitted by साधना on 7 October, 2010 - 21:25

इथली नवीन गाड्यांबद्दलची माहिती वाचुन ब-याच जणांनी गाड्या घेतल्या असतील Happy

आता त्या घेतलेल्या गाड्यांची काळजी कशी घ्यावी? साधारण किती महिन्याच्या अंतराने सर्विसिंगची आवश्यकता आहे? कंपनीच्या सर्विस सेंटरमध्ये केलेल्या सर्विसिंगच्या वेळेस काय काय केले जाते? बिलात लिहिलेय तेच नक्की केलेय काय हे आपण तपासु शकतो का? कंपनीत न देता ओळखीच्या गॅरेजवाल्याकडुन सर्विसिंग केल्यास काय काय पाहावे? गाडीचे टायर, इंजीनऑइल, ब्रेकऑइल, स्टड्स आणि इतर बदलण्यायोग्य पार्टस साधारण किती किमी नंतर बदलावेत? क्लचप्लेट आणि ब्रेकप्लेटचे आयुष्य ब-यापैकी लांब राहावे यासाठी काय काळजी घ्यावी? इ. इ. गोष्टींची चर्चा अपेक्षित आहे.

तसेच गाडी साधारण किती काळाने बदलावी? (अर्थात खिशाला परवडेल तेव्हाच हे एक उत्तर होऊ शकते Happy ) अगदी नियमीत देखभाल केली तर गाडीचे आयुष्य साधारण किती राहते? इत्यादी बाबींवरही माहिती मिळाली तर बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या भावाने २००४ सप्टेंबरमध्ये अल्टो LXI घेतली. २००८ जानेवारीत त्याने ती मला विकली. गाडी माझ्या ताब्यात आली तेव्हा तिने २०,००० किमी केले होते. आज तिचे रिडींग ८१,००० किमी आहे Happy

मी गाडी भरपुर पिदडली असली तरी तिची नियमीत काळजीही घेते. सर्विसिंगसाठीचा फोन आल्यावर सर्विसिंग करुन घेते. पहिले काही दिवस मारुती सर्विस सेंटरमध्ये सर्विसिंग केली. पण तिथले भाव उच्च आणि सर्विसिंग मात्र तेवढ्या उच्च दर्जाची नाही असे लक्षात आल्यावर एका ओळखीच्या गॅरेजवाल्याकडे सर्विसिंगला द्यायला सुरवात केली. त्याचा अजुनतरी काही वाईट अनुभव नाही. जुलै २००६ च्या प्रलयात मुंबैतल्या लाखो गाड्यांप्रमाणे ही गाडीही टपावरुन पाणी जातेय या अवस्थेत दोन दिवस होती. त्यावेळी आतले खुप भाग बदलावे लागले.

गाडीला मध्यंतरी चालु न होण्याचा रोग लागलेला. बराच काळ प्रॉब्लेम काय आहे तेच समजत नव्हते. मग कळले की इंजीनच्या आसपास असलेली एक वायर लुज होत होती, ती सुटली की गाडी चालु होत नसे. वायर घट्ट करुन घेतली तरी परत परत लुज होत असे. सहा महिन्यापुर्वी हा प्रॉब्लेम आलेला. तेव्हा मेकॅनिकने वायर परत घट्ट करुन दिलीय, त्यानंतर अजुन काही त्रास नाही. हा सोडता इतर काहीही त्रास मला झाला नाहीये. गाडीने ब-याच वेळा लांबचा प्रवास विनातक्रार केलेला आहे.

माझ्या घरचे आता मागे लागलेत की 'गाडी म्हातारी झालीय, आता ही विक आणि नविन घे.' मला हा सल्ला आर्थिकदृष्ट्या लगेच सोप्पा वाटला नाही तरी तसा कठीणही नाहीये. पण एवढी व्यवस्थित चालणारी गाडी केवळ आता तिला ६ वर्षे झालीत, नंतर विकायला गेले तर किंमत मिळ्णार नाही, ८१,००० किमी खुप झालेत व. व. कारणांमुळे विकाविशी वाटत नाही.

तर मला मार्गदर्शन हवेय की

१. गाडीचे वय झालेय हे कसे ठरवावे?
२. मी बहुतेक २००९ मध्ये एकदा टायर बदललेत. त्याआधी बदललेले का ते माहित नाही. साधारण किती काळाने टायर बदलावे? मी आता मिशेलिनचे ट्युबलेस टायर लावलेत.
३. ४०,०००किमी झाल्यानंतरची सर्विसिंग मारुती सर्विस सेंटरमध्ये केलेली. त्यांनी तेवढे किमी झाल्यावर जे काही आवश्यक असते ते केलेले (मला बिल भरमसाठ दिलेले Happy ). आता गाडी त्यांच्याकडे द्यायची नाहीये, माझ्या गॅरेजवाल्याकडुनच करुन घेईन. तर ८०,००० किमी झाल्यावर काय काय बदलावे?चेक करावे? सर्विसिंगमध्ये काय काय करावयास सांगावे?
४. बॅटरीही दिड वर्षांपुर्वी बदलुन झालीय. ती साधारण किती काळ चालते? तिचे सर्विसिंग कसे करावे?
५. बाहेरची बॉडी व्यवस्थित राहावी यासाठी काय करावे? बाजारात अनेक ऑप्शन्स आहेत त्यातला चांगला कुठला?? वॅक्स कोटींग करुन मिळते ते काही फायद्याचे नाही असे माझे मत झालेय.

लिंबू तुला चांगली माहिती देइल. पण विकू नकोस. ह्यावरच मुलीला गाडी शिकवून लायसन्स घेऊन दे. मग तिच्या आवडीची नवी गाडी घे.

खालील पॉइंट्स
१) व्हील अलाइनमेन्ट चेक कर.
२) स्पेअर पार्टस काही जवळ ठेवावे जसे इलेक्ट्रिकल फ्युजेस, वायरी, फॅन बेल्ट वगैरे,( आजकाल फॅन बेल्ट असतो कीनाही ते माहित नाही पण एकदा एका फीआट चाआ फॅन बेल्ट हायवे वर तुटला होता व ३- ४ तास
रखडावे लागले होते. मोहोळ गावा जवळ. पूर्वी माझ्याकडे चेतक होती तेव्हा क्लच केबल ब्रेक केबल वगैरे एक सेट ठेवत असे डिकीत.

३) टायर व ट्यूब यांची वेगळी तपासणी करून घे. टयूब नीट पाहिजेत.
बाकी विचारून लिहीते ग. मुख्य म्हणजे गाडी चालती राहिली पाहिजे.

कुठलीही वस्तु घेतली की महत्वाची गोष्ट आपण सोईस्कर्रित्या विसरतो ती म्हणजे रेग्युलर मेंटेन्नस. मग ती कार असो किंवा स्कुटर.
कार असेल तर ती रनिंग असो वा नसो किमान ४००० कि.मी. नंतर सर्व्हिंसींग करणे जरुर आहे. सर्व्हिसिंग मध्ये खालील् गोष्टींची देखभाल करतात.
१ इंजिन ऑईल चेंज करणे.
२ एअर फिल्टर साफ करणे.
३ इंजिन ट्युनिंग
४ बॅटरी कनेक्शन्स ग्रीसिंग
५ स्पार्क प्लग साफ करणे
६ ब्रेक टाईट करणे
७ टायर इंटर्चेज करणे ( २०,०००किमी नंतर)
८ व्हिल अलायन्मेंट चेक
९ व्हिल बॅलन्सींग चेक

ही जनरल चेक अप्स आहेत. याखेरीज काही तक्रार असेल तर मेकॅनीक ला सांगून करून घेणे.
वरील काळजी घेतली तर सहसा कार रस्त्यात दगा देत नाही हा माझा १० वर्षांचा अनुभव आहे. याखेरिज गाडीमधे नेहमी एक टॉर्च्,जॅक्,चाकु,दोरी असावी. तसेच फ्यूज चा एक सेट असावा. सगळ्यात विनोद म्हणजे बर्‍याच जणांना टायर पंक्चर झाल्यावर टायर रिप्लेस करता येत नाही. हे गरजेचे आहे.
शिवाय हल्ली टोल फ्री नंबर असतात ते मोबाईल वर सेव्ह करुन ठेवावेत. मी तर कार मेंटेनन्स चे शेड्यूल मोबाईल वर सेव्ह केले आहे. त्या तारखेच्या आसपास मी सर्व्हिस ला टाकतोच. वार्षीक अंदाजे रू १०,००० मेंटेनन्स साठी बाजुला ठेवणे चांगले.

- Mobil 1 engine oil change + filter ( मोबिल १ चे फायदे नंतर सांगीन)
- Clean air-filter
- Brake line bleeding and fluid change.
- Brakes checked & cleaning
- Radiator flush & engine coolant change
- Power steering oil flush & refill
- Fuel filter changing
- Transmission oil flush & change
- Battery servicing
- Wheel Alignment / Balancing

(Source GTO from www.Team-BHP.com)