लाल भोपळ्या चा केक

Submitted by सुलेखा on 7 October, 2010 - 20:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३/४ कप मैदा..
१/२ टी स्पुन बेकींग पावडर..
१/२ टी स्पुन मीठ..
३/४ कप लोणी [पातळ करुन घेणे]..[बटरची १ स्टिक ]
१ १/२ कप साखर..[१ कप घेतली तरी चालेल]..
२ टी स्पुन वनीला एक्सट्र्क्ट..
३ अंडी..
१/४ कप कोको पावडर....
१/२ कप भोपळ्याची प्युरी..
३/४ कप अक्रोडाचे तुकडॅ..
१/२ टी स्पुन प्रत्येकी-दालचीनी,लवंग्,जायफळ पुड

क्रमवार पाककृती: 

ओव्हन ३५० सें ग्रे. ला प्रि हीट करणॅ..
केक चे भांडे तेल व मैदा लावुन ग्रिसिंग करुन घेणे..
मैदा +बे.पा +मीठ घालुन एकदा चाळुन घेणे..
मिक्सर मधे लोणी + साखर् त्यानंतर अंडी +वनीला घालुन फिरवुन घ्यावे..
एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढुन त्यात मैदा मिश्रण थोडे थोडे घालुन चमच्याने मिक्स करावे..
आता त्यात भोपळा प्युरी +कोको पावडर+ दालचीनी-लवंग-जायफळ पुड + अक्रोडाचे तुकडे घालुन छान मिक्स करावे..
केक च्या भांड्यात वरील केक मिश्रण ओतावे..
केक ३५ ते ४० मिनिटे बेक करावा..

अधिक टिपा: 

लोणी पातळ करुन घ्यायचे आहे ..
भोपळ्याची प्युरी --१]भोपळ्याचा मोठा तुकडा सालासकट कुकर मध्ये थोडे पाणी घालुन २ शिट्या देवुन वाफवुन घेणे..कुकर नीवला की भोपळ्याचा तुकडा बाहेर काढुन पेपर ने पाणी टिपुन घ्यावे व चमच्याने गर काढुन घ्यावा..
२]भोपळ्याचे २ भाग करुन त्यावर अल्यु.फॉइल गुंडाळुन ओव्हन मध्ये २० मिनिटे बेक करावा..थंड झाल्यावर चमच्याने गर काढुन घ्यावा..
जास्ती चा गर झिपलॉक च्या पिशव्यांमधे १-१ कप प्युरी च्या अंदाजाने भरुन फ्रीजर मधे ठेवावा..२-३ महिने टिकतो..या गराच्या गुळ+कणीक्+चवीपुरते मीठ्+तेलाचे मोहन घालुन गोड पुर्‍या करता येतील..व्हेजी .टिकीया आणि थालीपीठात हा गर घालता येईल..
मुलांना भोपळा खाउ घालायचा एक छान उपाय आहे हा..

माहितीचा स्रोत: 
माझी जिम इन्स्ट्रक्टर मैत्रिण-जॅमी बावर
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भोपळा इतका लहान आणि असा का दिसतोय?? अमेरिकन आहे काय??

आमचा इंडियन प्रचंड मोठा, एका वेळी फक्त पाव किलोच कापुन घेण्यालायक भोपळा चालेल ना??? Proud

इथे खुप मोठे, गर न बियांनी गच्च भरलेले भोपळे मिळतात..चिरणे अवघड असते..इथे फोटो साठी मुद्दाम लहान भोपळा घेतला आहे..

मस्त रेसिपी. भोपळ्यामुळे छान moist होईल केक असं वाटतं आहे. मागे फूड नेटवर्कवर एका गृहिणीने बेबी फूड ( अ‍ॅपलसॉस ) वापरुन 'बेबी केक' दाखवला होता त्याला बक्षिस तर मिळालेच पण नंतर TGIF मध्ये तो केक मेन्यूवर घेतला होता. तेव्हा त्यांनी बेबी फूडमधील पम्पकिन वापरुन किंवा इतर गोडसर प्युरी वापरुनही केक बनवता येईल अशी टिप दिली होती.
अमेरिकेत भोपळ्याची कॅन्ड प्युरी मिळते. ती वापरुन सुद्धा मस्त होईल हा केक.

छान आहे हा प्रकार. भोपळा खाणे आता कमी होत चाललेय आपल्यकडे.
पण छोट्या आकाराचे भोपळे बाजारात आले, तर नक्कीच खप वाढेल,
तसे भारतात आता छोटे भोपळे मिळतात, पण त्याचा गर सपक आगतो,
साल केशरी आणि गर मात्र पिवळा असतो.

छान रेसिपी Happy
इथे खुप मोठे, गर न बियांनी गच्च भरलेले भोपळे मिळतात..चिरणे अवघड असते.. >>> हो ना. भोपळा कापायचा काही आयडिया आहे का?

दीपा,भोपळा कापायला सगळ्यात मोठ्ठी सुरी [सुरा च असतो ग तो] उभी-आडवी चालवावी लागते..दोन भाग कसे बसे चिरले की झाले..मग बिया गर काढुन अल्यु. फॉइल मधे फक्त वरचा गराचा भाग झाकायचा.. ३०० सें ग्रे.वरओव्हन मधे २५ ते ३० मिनिटे बेक करायला ठेवायचा...थंड झाल्यावर गर छान सुटतो.[.नेट वर एकाने आख्खा भोपळा फॉइल मधे गुंडाळून ७-८ तास ओव्हन मधे ठेवला..अन थंड झाल्यावर सिताफळा सारखा सहज फोडला..] माझी दमछाक झाली,.. तरी पण मला पहिला पर्याय बरा वाटला..

भोपळा आणण्याऐवजी बटरनट स्क्वॉश आणा. तांबड्या भोपळ्याचीच चव फक्त नाव आणि रंगरुप वेगळे दिसते. उघडल्यावर भोपळ्यासारखाच दिसतो. चांगले भक्कम सोलाणे असेल तर आधी साल काढून चिरता येतो. असा दिसतो

बटरनट स्कॉश एकदम मस्त. चवीला गोड असतो व काहीच खटपट करावी लागत नाही.

धुवायचा व ४२५ अवन मध्ये अक्खाच १ तास ठेवायचा. मध्येच बाजू पलटायची. बेक झाला की फक्त स्कूप करायचा गर. झाले.
भोपळा आणताना कूठलेही डाग नसलेला, मॅट लूक असलेला घ्यायचा, जितका जुना तितका गोड.
चकचकीत भोपळे नवीन असतात व पाणी ज्यास्त असते.

भोपळ्याची साल काढायची सोप्पी पद्धत.
भोपळा मायक्रोवेव्ह मधे ठेवायचा आणि १५-२५ सेकंद मायक्रो मिड सेटिंगवर चालु करायचा. साल सॉफ्ट होउन पटकन साध्या सुरी ने सुद्धा कापले जाते. एकदा फिरवुन नाही झाले तर परत १०-१२ सेकंद ठेवायचा.

सुलेखा, रेसिपी छान आहे Happy