आला श्रावण श्रावण

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 2 October, 2010 - 13:33

आला श्रावण श्रावण
पावसाची रिमझिम
बरसल्या श्रावण-धारा
जुई झाली चिम्ब चिम्ब
चम्पा चमेली शेवन्ती
चाफा लपे पानोपानी
रंगी बेरंगी गुलाब
ताठ गर्वाने अंगणी
झाले बन तुळशीचे
उभा दारी पारिजात
केतकीचा रंग खुले
नव वधुच्या वेणीत
लाल मेंदी हातावरती
हळ्दीकुंकू लाह्या फुले
झुलताती डोलताती
नागपंचमीचे झुले
फुटे हंडी ग दह्याची
अंगी रोमांच दाटले
असा श्रावण बरसतो
फळे फुले सणा संगे
उन्ह पावसाचा खेळ
नित्य चाले लपाछ्पी
इन्द्रधनुष्याचे सात
रंग रंगले आकाशी

टीपः सगळेच नवीन असल्यामुळे ही कविता पोहोंचेल याची खात्री नाही हा एक फक्त प्रयत्न आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर जमलीय कविता सुरेखा...आवडली...खुप शुभेच्छा !!!

मी अशी करुन वाचली अन जास्तच भावली Happy
---------------------------

आला श्रावण श्रावण
पावसाची रिमझिम
बरसल्या श्रावण-धारा
जुई झाली चिम्ब चिम्ब

चम्पा चमेली शेवन्ती
चाफा लपे पानोपानी
रंगी बेरंगी गुलाब
ताठ गर्वाने अंगणी

झाले बन तुळशीचे
उभा दारी पारिजात
केतकीचा रंग खुले
नव वधुच्या वेणीत

लाल मेंदी हातावरती
हळ्दीकुंकू लाह्या फुले
झुलताती डोलताती
नागपंचमीचे झुले

फुटे हंडी ग दह्याची
अंगी रोमांच दाटले
असा श्रावण बरसतो
फळे फुले सणा संगे

उन्ह पावसाचा खेळ
नित्य चाले लपाछ्पी
इन्द्रधनुष्याचे सात
रंग रंगले आकाशी
----------------------------------

शरदजी, गिरीश कुलकर्णी, अमित्,मानसी वैद्य
माझ्या कवितेला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.विशेषतः सुरेश पाटील यांना खूप धन्यवाद,

छानच आहे. गिरीशजींच्या प्रतिसादातल्या अदृष्य सुचनेवर जरुर विचार करा. पुलेशु Happy

छान.

श्रावणाच सहज सुंदर वर्णन आवडल.

४ ओळींनंतर Space देण्याच्या गिरिशजींच्या सूचनेशी सहमत.

अस केल्याने आशयाला अभिव्यक्त व्हायला 'Space' मिळते Happy