अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

इरिटेट नाही पण तुमच्यासारखा जरा बॅलनस्ड विचार करणारा माणुस हा मुद्दा लावून कसा धरु शकतो ह्याचं आश्चर्य वाटतं.
बरोबर आहे विकु. पोस्ट फॅक्टो लेजिटमसी प्राप्त होईल नाही होतेच, फक्त जर लोकशाही बरोबर दिशेला चालली असेल तर वेळ जातो तसा लेजिटमसी कमी चुकीच्या (less wrong) गोष्टींना दिली जाईल.

>>> पंढरपूरचे विठोबा मंदीर स्तूपावर बांधलेले आहे अशी काही जणांची श्रद्धा आहे. या निकालाचा आधार घेउन ते कोर्टात गेले तर ?

जाऊ देत ना. न्यायालयाला ठरवू देत त्यात काही तथ्य आहे का ते.

>>> आमच्या मंदिरात अस्पृशांना प्रवेश दिला तर पावित्र्य नष्ट होईल अशी आमची श्रद्धा आहे हा मुद्दा घेउन काही देवळाचे लोक कोर्टात गेले तर? slippery slope म्हणतो तो हाच.

घटनेनेच अस्पृश्यतेला बंदी घातलेली आहे. त्यामुळे अशा मुद्द्यावर देवळातील लोकांनाच शिक्षा होईल.

>>> १ श्रद्धेचा आधार घेतल्याने एक अनिष्ट पायंडा पडेल अशी मला भिती वाटते.

घटनेने श्रध्देचा आधार फार पूर्वीपासून घेतलेला आहे. धार्मिक श्रध्देच्या आधारावरच काही कायदे केलेले आहेत.

>>> २ निकालात श्रद्धेचा आधार घेतल्याने ६ डिसे. च्या घटनेला post facto legitimacy प्राप्त करून दिल्यासारखे होईल.

ते कसे काय बुवा? दिलेल्या एकूण निकालांपैकी कोणत्या निकालामुळे ६ डिसें च्या घटनेला post facto legitimacy प्राप्त करून दिल्यासारखे वाटते हे जरा स्पष्ट करा.

जी जागा हिंदू श्रीरामजन्मभूमी आहे असे मानतात तीच श्रीरामजन्मभूमी आहे असा एकच निकाल श्रध्देच्या आधारावर दिला गेल्यासारखा वाटतो. बाकी सर्व निकाल हे साक्षीपुराव्यांवर आधारीत आहेत हे यापूर्वी अनेकवेळा सांगिलते आहे. परंतु पहिले पाढे पंचावन्न या उक्तीनुसार तुम्ही पुन्हापुन्हा (संपूर्ण) निकाल श्रध्देवर दिल्याचे सांगत आहात.

३० सप्टेंबरला दिलेल्या निकालाऐवजी दुसरा कोणता निकाल जास्त उचित ठरला असता असे आपल्याला वाटते? जर याहून अधिक चांगला निकाल देणे शक्य नसल्याचे आपल्याला वाटत असेल तर या निकालाला नाके मुरडू नका.

तरीसुद्धा, "वेताळाने आपला हट्ट सोडला नाही" या चालीवर कुलकर्णी पुन्हापुन्हा न्यायालयाने श्रध्देवर निकाल दिला असे म्हणत आहेत. असो. >>>> प्रचन्ड हसलो Lol Lol Lol

बायदिवे, जेरुसलेमची काय कथा आहे हो मास्तुरे? त्या व तशाच स्वरुपाच्या अन्य धर्मियान्च्या सर्व जगभर पसरलेल्या स्थळान्ना ऐतिहासिक् स्थानमाहात्म्य आहे ते कागदी (घोड्यान्मुळे) पुराव्यान्मुळे की अजुन कशामुळे?
का फक्त हिन्दुस्थानातील हिन्दुन्च्या धार्मिक स्थळान्बाबतच कागदी (वा अन्य प्रकारचे) पुरावे मागितले जाताहेत? जसे की रामायणात सेतु बान्धला होता म्हणताय? दाखवा पुरावा. सरस्वती नदी अस्तित्वात होती अन लुप्त झालि म्हणताय? दाखवा पुरावा. महाभारतकालिन युद्ध झाले होते म्हणताय? दाखवा पुरावा. सगळ्यात शेवटी, देव आहे म्हणता? दाखवा पुरावा! Proud
मला आपले जस्ट हे प्रश्न पडताहेत बर का! माझ डोक भन्जाळत चाललय याचीच ही निशाणी आहे, नै का? Wink

कालच्या "द एशियन एज" या वर्तमानपत्राचा मुख्य मथळा असा होता कीं अयोध्या वादातील तीनही पक्षकारांची परवां महंत ग्यान दास यांच्या हनुमान गढीत बैठक झाली व त्यात हिंदू व मुस्लीम या दोनही संप्रदायांच्या भावना लक्षात घेऊन मंदिर व मशीद बांधण्याबाबत तोडगा शोधण्यात आला. तपशील अजून ठरायचा आहे. अर्थात, सुन्नी वक्फ बोर्ड व हिंदू महासभा सुप्रीम कोर्टात जाण्याचा बेत जाहीर करत असल्याने याबाबत माध्यमाना आत्ताच काहीही सांगण्यास सर्व पक्षानी असमर्थता दर्शवली.

आजच्या "द एशियन एज"मध्ये तर लखनौच्या बातमीदाराने प्रस्तावित तोडग्याची ढोबळ रुपरेषाही [मंदिर व मशीद दोनही विवाद्य जागेत बांधण्याविषयीं] दिली आहे !

घटनेने श्रध्देचा आधार फार पूर्वीपासून घेतलेला आहे. धार्मिक श्रध्देच्या आधारावरच काही कायदे केलेले आहेत.
अगदी बरोबर आहे...

आणि रामाचा / त्याच्या जन्माचा पुरावा नाही, म्हणून तिथे मंदिर बांधायला नाही म्हणायचे.. तर इतर धर्मियांकडे त्यांचे देव आणि त्यांचे जन्म याचे काय पुरावे आहेत?

आणि रामाचा / त्याच्या जन्माचा पुरावा नाही, म्हणून तिथे मंदिर बांधायला नाही म्हणायचे.. तर इतर धर्मियांकडे त्यांचे देव आणि त्यांचे जन्म याचे काय पुरावे आहेत?
---- जागोसाहेब त्यांच्या बहुतेक जागांच्या मालकीचे वाद नाही आहेत...

याच भावनेचे राजकारण करुन बाबराने तिथे मशिद बांधवली,
मग तुलसीदासने का लिहिले नाही ?>>>>
ती मद्शीद नाहि/न्व्/न्व्हतीकाहीसे आहे ना? म्हनजे मुस्लीम धर्मशास्रानुसार ती बांधण्यात आली नव्हती... पूर्वाभिमुख वास्तू मशिद नसावी कारण मक्केकडे तोन्ड नाही म्हणे.... मग उगीच मशीदच पाडली म्हणून आरडाओरड का ? की या वास्तूबद्दल मुस्लीम धर्माने अमेन्डमेन्ट करून नियमात शिथिलता आणून तिला मशीद म्हणून 'रेग्युलर\' करून घेअले?

मशीदीचे तोन्ड मक्केकडे असणे अपेक्षित नाही. मशीदीत नमाज अदा करताना प्रार्थना करणार्‍याचे तोन्ड मक्केकडे असावे लागते. विजय कुलक्र्णी यांचे म्हणणे रास्तच आहे. चुकीचा पायन्डा धोकादाय्क ठरू शकतो. हे इथे थाम्बेल असे वाटत नाही. भाजपला , विहिप व बाकी इतर संघटनाना सत्तेची गरज लागेल आणि धोरणांवर सत्तेवर येत नाही असे दिसल्यावर वेगवेगळ्या मन्दिरांचे मुद्दे काढून रथयात्रा काढता येतील. वातावरण तापवता येईल. नाहीतरी घोषणा आहेच 'ये तो झांकी है, काशी मथुरा बाकी है...!'
या सगळ्या वादग्रस्त जागांसाठी एक स्वतंत्र खन्डपीठच काढले पाहिजे...

>>>> या सगळ्या वादग्रस्त जागांसाठी एक स्वतंत्र खन्डपीठच काढले पाहिजे...
"भारत सरकार" नावाचे खण्डपीठ पुरेसे नाहीये म्हणून का? Wink

भाजपला , विहिप व बाकी इतर संघटनाना सत्तेची गरज लागेल आणि धोरणांवर सत्तेवर येत नाही असे दिसल्यावर वेगवेगळ्या मन्दिरांचे मुद्दे काढून रथयात्रा काढता येतील. वातावरण तापवता येईल. नाहीतरी घोषणा आहेच 'ये तो झांकी है, काशी मथुरा बाकी है...!'
---- काही काळ सर्वांना मुर्ख बनवता येते, सर्व काळ काहींना मुर्ख बनवता येते पण सर्व काळ सर्वांना मुर्ख बनवता येत नाही. भाजपा किंवा समविचारी पुन्हा असे काही करणार नाही असा आशावाद आहे.

आपल्याकडे राष्ट्रहितापेक्षा पक्ष मोठा असतो... मग सत्तेच्या इर्षेने लालसेने प्रश्न निर्माण केले जातात, त्यातिल गुंता गुंत वाढवली जाते, आता २०१० मधे तो सोडवण्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु आहे.

एकंदरीत अयोध्या निकाल हा बर्‍याच लोकांना, स्वागतार्ह व प्रशंसनीय वाटला आहे. एक नवीन इतिहास!

आता याची पुढची पायरी म्हणजे सर्व काश्मीर पाकीस्तानच्या हवाली करणे.

म्हणजे भावनात्मक दृष्ट्या हे म्हणणे म्हणजे फारच धक्कादायक ठरेल. पण गणू म्हणतात त्याप्रमाणे sensible आणि rational होऊन विचार केला तर त्याचे अनेक फायदे लिहीता येतील.

१. सबंध जगात भारताचे अभिनंदन होईल. कारण नाहीतरी साठ वर्षात, रशियाचा व्हेटो आपल्या मागे असूनहि, भारतीय मुत्सद्द्यांना, जगातल्या राष्ट्रांना हे पटवून देता आले नाही की काश्मीर भारताचा आहे.
म्हणजे ना शौर्य ना मुत्सद्देगिरी! उलट त्यापायी उगाच भांडणे, आणि जगाच्या दृष्टीने एक ठपका. आता तर टाईम मासिकाने छापले की भारतीय सैनिक तिथल्या लोकांवर अत्याचार करताहेत. नि भारतीय सरकारतर्फे त्याविरुद्ध एक ब्र नाही! मग लोक टाईमवरच विश्वास ठेवणार!!

२. असे काय आर्थिक उत्पन्न तिथून मिळते आहे भारत सरकारला? कर? खनिज संपत्ति? तेल?
आणि त्यापायी लष्करावर नि इतर गोष्टींवर किती खर्च होतो आहे तिथे?

३. कदाचित् त्यामुळे भारतात व इतर जगात सुद्धा मुसलमानांना भारतीय सरकारबद्दल विश्वास वाढेल. नि शांततेचे संबंध वाढीस लागतील.

तेंव्हा उगाच भावनात्मक बनून, हरलेली लढाई खेळत बसण्यापेक्षा, भविष्य बघावे.

तिथे खर्च होत असलेला वेळ नि पैसा वाचला तर प्रोग्रॅमिंग करून नि कस्टमर सपोर्ट सेंटर चालवून अमेरिकेला मदत होईल नि भारताला आर्थिक मदत मिळवता येईल. जोपर्यांत अमेरिका पैसे देत आहे तोपर्यंत मिळवून घ्या, यूरोपमधून इतक्या सहजासह़जी मिळणार नाहीत.

देवबंद या उत्तर प्रदेशातील मुस्लिम संघटनेने 'काश्मीर' हा भारताचाच हिस्सा आहे आणि त्यासाठी भारत सरकारला पाठींबा देण्याबद्दल ठाम विधान केलेय. हे आजच पेपर मधे वाचले.
यामागचं राजकारण काहीही असो. पण कुठल्याही मुस्लिम संघटनेने काश्मीर संदर्भात हा पवित्रा घेतल्याचे मी तरी पहिल्यांदा ऐकलेय.
आणि हे मला स्वागतार्ह वाटले. असो.

>>>. काही काळ सर्वांना मुर्ख बनवता येते, सर्व काळ काहींना मुर्ख बनवता येते पण सर्व काळ सर्वांना मुर्ख बनवता येत नाही. भाजपा किंवा समविचारी पुन्हा असे काही करणार नाही असा आशावाद आहे. <<<<
उदयजी, मुर्खातिमूर्खान्चा विषय काढलाच आहात तर सान्गू पहातो की, हाच नियम लावायचा तर गेल्या काही शे वर्षातील बहुसन्ख्य हिन्दू समाज हा सर्वकाळच "मूर्खच बनलेला" मानला पाहिजे! सध्या भाजपा किन्वा समविचारि लोक आहेत, पूर्वी राणाप्रताप, वा छत्रपती शिवाजीमहाराज वा बाजीराव पेशवा वा छत्रसाल वा असेच कुणी कुणी होते लोकान्ना मूर्ख बनवायला, नै का? Wink

सध्या भाजपा किन्वा समविचारि लोक आहेत, पूर्वी राणाप्रताप, वा छत्रपती शिवाजीमहाराज वा बाजीराव पेशवा वा छत्रसाल वा असेच कुणी कुणी होते लोकान्ना मूर्ख बनवायला, नै का?
---- त्या थोर व्यक्तींना आणि भाजपा ला तुम्ही एकाच रांगेत बसवले :अरेरे:. निव्वळ शब्दांचा खेळ खेळत आहात तुम्ही, या खेळात तुम्हचा कोण हात धरणार? पण मी थोडे धारिष्ट्य करतो.

इतिहासाची चाके विरुद्ध दिशेने फिरवता येणार नाहीत. रामाच्याच जागे बाबत किती घर्षण झाले? किती दुरावा, दंगली, जाळपोळ, न थांबणार्‍या स्फोटांच्या मालिका. आता भजपा चे सरकार ५ - ७ वर्षे केंद्रात सत्तेवर होते... पण या काळात एका चकार शब्दानेही त्यांनी कधी रामाचा उच्चार केला नाही. सत्ता मिळाल्या बरोबर रामाला ५ वर्षांसाठी वनवासात पाठवले. म्हणजे रामावरचे प्रेम बेगडी होते व निव्वळ सत्ता संपादन करणे हाच एकमेव उद्देश होता हे स्पष्ट दिसुन येते. आता तुम्ही म्हणाल पुर्ण बहुमत दिले असते तर...

त्यामुळे ह्याच विचारांनी प्रेरित होऊन पुन्हा लोकांना मुर्ख बनवता येणार नाही हा माझा अगदी सोपा विचार आहे. होतं काय हे हाकाटी देणारे, रथ यात्रा काढणारे Z+ मधे अत्यंत सुरक्षीत असतांत, पण भडकावले गेलेली गरिब जनता रस्त्यावर एकमेकांची डोके फोडत असते... प्रत्येक होणार्‍या दंगलीत पुढील अनेक दंगलींची बिजे पेरलेली असतांत. मला आता देशाला विकास देणारा विचार हवा आहे.

हिंदुना एकी नसने हा शापच आहे,आताच बघा ना! दहा वेगवगळी डोकी आपले विचार, सल्ले मांडत आहे, कोणीच हार मानायला तयात नाही, जो तो मीच कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्या इमामंनी सांगीतले की आज चांद दिसणार नाही तर ईद नाही , कोणी ब्र सुध्दा काढत नाही, कोणी हे सुध्दा म्हटले नाही की आम्हाला मस्जिद नको. आम्हाला माहिताय तुम्ही निधर्मी आहात. पण ते तुम्हाला काफीर म्हणनारच, इथे तुम्हाला माहीत आहे हिंदु सहिष्णु आहे काहिही बोला काहीच होणार नाही, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. बोला काहीही बोला श्रीराम नव्ह्ते, पुरावा काय? हॉस्पीटल बांधा, निर्णय चुकीचा, कोठे चुकले हिंदुचे की हे बुध्दिवंत नशिबी आले. श्रीराम, श्रीराम,

>>>> आता भजपा चे सरकार ५ - ७ वर्षे केंद्रात सत्तेवर होते... पण या काळात एका चकार शब्दानेही त्यांनी कधी रामाचा उच्चार केला नाही. सत्ता मिळाल्या बरोबर रामाला ५ वर्षांसाठी वनवासात पाठवले. म्हणजे रामावरचे प्रेम बेगडी होते व निव्वळ सत्ता संपादन करणे हाच एकमेव उद्देश होता हे स्पष्ट दिसुन येते. आता तुम्ही म्हणाल पुर्ण बहुमत दिले असते तर... <<<<<
नै बोवा, मी काय त्या बहुमत दिले अस्ते वगैरे बाता मारणार नाही, काये की लोकशाही हे, जशी प्रजा तसा राजा, काय? असो

तुम्ही उद्ध्रुत करीत असलेला बाकीचा मजकुर मात्र "ज्यान्नी कारसेवा/मन्दिराला विरोध केला" त्यान्चेच तोन्डी आजवर जास्त दिसून आला आहे, हादेखिल "त्यान्च्या" यशस्वी बुद्धिभेदात्मक राजकारणाचाच भाग असे म्हणले तर चूक होणार नाही, नै का? कारण काही शे वर्षान्च्या इतिहासात, समजा ५०० वर्षे धरा सोईपुरती, त्यात भाजपची कुबड्याघेऊन "भोगलेली" ५ वर्षे सत्ता म्हणजे किती टक्के? फक्त एक टक्का कालखण्ड! मान्य की इतिहासाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत, पण बाकी नव्व्याण्णव टक्के कालखण्डात फिरलेली इतिहासाची चक्रे सपशेल दुर्लक्षित करून केवळ एक टक्क्याचे मोजमाप करत बसण्याचे व त्यापायी चक्क "रामाला पुन्हा पाच वर्षे वनवासात" धाडल्याचे नि:ष्कर्ष निर्ढावलेले राजकारणीच काढू शकतील, नै का?
(तुम्ही राजकारणी नाही हे मला माहित आहे/मान्य आहे व वरील वाक्ये तुमच्या आधी मी बर्‍याच "राजकारणी/मिडीयामधे" ऐकली आहेत - सबब, तुमच्या पोस्टमधिल मुद्याला उत्तर देताना, त्यामुद्यान्साठी मी तुम्हाला गृहित धरत नाही - तुमचा अनुल्लेख करतोय असे समजा! Proud )

पेन्डसे गुरुजी म्हणतात हिन्दु सहिष्णु आहेत , ओपन माईन्डेड आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे.दोष नाही.त्यामुळे त्याना दर्जेदार जीवन जगायला मिळते आहे. व्यक्तिस्वातंत्र्यही पुरेसे मिळते. हिन्दू धर्मात कर्मठांपासून तर हिन्दू धर्म न मानणारानाही जागा आहे. तशी ती इस्लाम धर्मात नाही पण त्यामुळे त्या धर्मियांचे जीवनमान कसे झाले आहे. ? राजेश्वर तुम्हाला नागपूरहून निघालेले फतवे सर्वानी बैलासारखे पाळावेत असे तर अपेक्षित नाही ना? तुमचा इस्लाम आवडीचा नसेल पण त्यांची मोडस ऑपरेन्डी निश्चित आवडीची आहे असे दिसते. बुद्धिवन्तांनीच तर प्रबोधन करून पूर्वीच्या "हिन्दू इमामां' पासून समाजाची सुटका केली आहे.

आताच बघा ना! दहा वेगवगळी डोकी आपले विचार, सल्ले मांडत आहे, कोणीच हार मानायला तयात नाही, जो तो मीच कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्या इमामंनी सांगीतले की आज चांद दिसणार नाही तर ईद नाही , कोणी ब्र सुध्दा काढत नाही,>>>>
हिंदू 'भेडचाल' करीत नाहीत, त्यांना एकगठठा मुर्ख बनवता येत नाही, ते स्वतःचे डोके वापरतात, धर्ममार्तंडांना एका पातळीबाहेर महत्व देत नाहीत, शंकराचार्यांना शिक्षा झाली तर सामान्य हिंदू 'पेटून' वगैरे उठत नाही कारण तो कुठल्याही एका व्यक्तीला आपल्या धर्माचा 'प्रतिनिधी' मानत नाही, हिंदू धर्म हा त्यातल्या प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची निदान शक्यता असलेला (संधी असेलच असे नाही), एकाचवेळी सर्वात जुना आणि सर्वात आधुनिक धर्म आहे. हे सगळे त्यातले दोष आहेत काय?

हिन्दू इमामां' पासून समाजाची सुटका केली आहे. हा तुमचा गोड गैरसमज आहे. समाज तुम्ही रसातळाला नेला आहे, काय प्रगती केली तुम्ही भारत म्हणुन? प्राचिन हिंदुच्या ग्रंथाना मातीमोल ठरविले ठरविले अजुन काय,

शंकराचार्यांना शिक्षा झाली तर सामान्य हिंदू 'पेटून' वगैरे उठत नाही
शंकराचार्यांनाच नाही आपल्या घरी येऊन मारले तरी आपण पेटुन उठत नाही, स्वत:चा पळपुटेपणा हे बुध्दिवंत निधर्मांच्या नावावर खपवतात.

राजेश्वरजी, मुद्द्यांना बगल देउ नका, मुस्लिम समाजासारखी झापडबंद वृत्ती बाळगून हिंदूंनी स्वतःचे नुकसान करुन घ्यावे काय? मी उल्लेख केलेल्या गोष्टी आपले दोष आहेत का ते सांगा. मला या 'दोषां'चा अभिमान आहे.
आणि कुठल्या 'रसातळा'ला पोचलो आहोत आपण? हिंदू धर्माच्या सो कॉल्ड 'सनातन' व्हर्जनचे आंधळे पालन करणे म्हणजेच हिंदू असणे काय?

दोष आहे, स्वतंत्र विचार म्हणजे स्वतःचा धर्म किती वाइट हे सिध्द करण्यासाठीच असतो का? दुसरया धर्माबाबत स्वतंत्र विचारांच्या वाटा आपोआप बंद होतात का? हेच तुम्हचे स्वतंत्र विचार का?

राजेश्वरजी, तुमच्या पोस्टवरुन माझी खात्री पटत चालली आहे की एकतर मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळत नाहीए, किंवा त्यावर बोलण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही.
माझ्या पोस्ट्मधे मी हिंदू धर्म वाईट असे कुठे म्हटले आहे, किंवा तसे सूचित केले आहे ते दाखवा. स्वतंत्र विचार करणे, स्वतःच्या बुद्धीने चालणे हे दोष आहेत असा तुमचा दावा असेल तर बोलणेच संपले.
अर्थात झुंडशाही आणि एकगठ्ठा मताचे राजकारण करताना हे 'दोष' फार आड येतात हे खरेच.

सर्वांना आवाहन,

आपल्याला काय म्हणायच आहे ते स्वतंत्र लेखात लिहावे. चर्चा अयोध्या, काश्मीर आणि हिंदु धर्म अशी फिरत आहे.

लेख मुद्देसुद लिहावा. शक्य झाल्यास त्याला मुद्दा नंबर १,२ लिहावे जेणेकरुन प्रतिवाद मुद्याला धरुन होईल.

हे सर्व लिहीण्याचा उद्देश ज्या कुणाचे मतपरिवर्तन आपण अपेक्षीतो त्यांना मुद्देसुद वाचायला मिळावे.

मला वाटतं मुद्दा एकच आहे - अयोध्या वादातील न्यायालयाचा निकाल हा दोन संप्रदायांत सामंजस्याचं पर्व सुरूं करणारा व म्हणून स्वागतार्ह आहे, की केवळ तो बोटचेपेपणाचाच प्रकार आहे म्हणून निषिद्ध आहे.
दोन्ही बाजूची त्यावर मांडलेली मतं व त्यामागची ठाम मनोभूमिका वाचून <<कुणाचे मतपरिवर्तन आपण अपेक्षीतो >> या भावनेने चर्चा इथं चालू ठेऊन काही निष्पन्न होईल असं मला तरी वाटत नाही. अर्थात, मतदानच घेतलं तर माझं मात्र मत "स्वागतार्ह"च्या बाजूने !

"स्वतंत्र विचार म्हणजे स्वतःचा धर्म किती वाइट हे सिध्द करण्यासाठीच असतो का?"

अर्थातच. स्वतःच्या धर्मात चांगले काय आहे, त्याचा उपयोग आजच्या जीवनात सुद्धा कसा होऊ शकतो, इ. विचार काय कामाचे? त्याने 'स्वतंत्र विचार' सिद्ध होत नाहीत. प्रसिद्धि मिळत नाही! 'माझ्या धर्माबद्दल मला कळकळ वाटते म्हणून मी बोलतो! इतर धर्मांबद्दल मी कशाला बोलू?'
Proud

शिवाय महत्वाचे काय? आपली प्रसिद्धी 'स्वतंत्र विचाराचा(ची)', 'sensible आणि rational' , निधर्मवादी, 'पुरोगामी' अशी व्हावी हे.

त्यासाठी आपण काय लिहितो, हे खरे की खोटे, उपयोगी की निरुपयोगी, याचा विचार नसावा. केवळ विचार करण्याची शक्ति मिळाली आहे तेंव्हा मी माझे विचार मांडतो! मला स्वातंत्र्य आहे.

त्यासाठी नेहेमी टोकाची विधाने करावीत. जसे, 'हिंदू हेच खरे अतिरेकी'. भारतात 'sensible आणि rational' लोक नाहीतच. 'भारतात भारतीय कुणी नाहीतच'!!! 'तुम्ही अमेरिकेतले भारतीय, तुम्हाला काय कळते?' एकदम लोकांचे लक्ष वेधून घेतील अशी विधाने!

याला म्हणतात मायबोलीवरील 'चर्चा' ! Proud Proud Proud

निव्वळ विनोद!! Happy

आणि त्यातहि,
"'हिंदू हेच खरे अतिरेकी'. भारतात 'sensible आणि rational' लोक नाहीतच. 'भारतात भारतीय कुणी नाहीतच'!!! 'तुम्ही अमेरिकेतले भारतीय, तुम्हाला काय कळते?'"

हे सर्व मुद्दे परत परत मांडले जातील. संबंध असो वा नसो. कारण मला फक्त माझी प्रसिद्धी हवी. खरे, खोटे, अर्थपूर्ण, निरर्थक या गोष्टी महत्वाच्या नाहीत! सतत जनतेसमोर नाव असले पाहिजे!!!
मायबोलीवर भरपूर जागा आहे, रिकामी राहिली तरी पैसे पडतातच, म्हणूनच मी लिहीतो.

Proud Proud Proud

Pages