अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

हायकोर्टाच्या तिनही न्यायाधीशानीं कोणालाही हारल्यासारख वाटणार नाही अशा पध्दतीने निकाल दिलाय त्याबद्दल त्यांचे आभार.
कॉमनवेल्थ... कलमाडी...आपल्या देशात चाललेल्या घडामोडींबद्दल नव्हे तर उघड उघड चाललेल्या भ्रष्टाचाराचे चर्चे जेंव्हा इतर दुनियेच्या चव्हाट्यावर पोचतात तेंव्हा त्याबद्दल लाज वाटणारच.. अनुमोदन,

निर्णय दिला व जो निर्णय दिला, या दोन्हीबद्दल न्यायालयाचं अभिनंदनच करण योग्य.
<<आपल्यापैकी कोणी यात तज्ञ असल्यास वा या निकालपत्राचा अभ्यास केला असल्यास राम जन्माचे स्थान हेच आहे असे न्यायालयाने कशाच्या आधारे मान्य केले हे सांगू शकेल काय ?>> मी जी तज्ञांची चर्चा ऐकली , त्यावरून मला कळलेला अर्थ असा - कोर्टाने रामाचा जन्म किंवा जन्मस्थळ पुराव्याच्या आधारे मान्य केलेलं नाही; विवाद्य जागेत ज्या ठीकाणी रामाच्या मूर्तीची स्थापना झाली आहे ते ठीकाण रामाचं जन्मस्थळ असल्याच्या श्रद्धेतूनच ती स्थापना झाली आहे, हे कोर्टाने मान्य केलंय ! [ यावरून जर मला कुणी तज्ञ म्हटलं, तर त्याच्यावर मी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा टाकायला मोकळा आहे !]
भुंगाजी,व्यंगचित्र खूप आवडलं.

>>>>. घरमालकाला आपल्या घरात घुसायचे धाडस कोणी करु शकणार नाही इतके ताकदवान व्हायला कोणी बंदी केली होती का??? <<<<
बन्दी????/ Lol Lol Lol
साधनातै, भावना पोचल्या बर का! सान्गुन बघतो मालकान्ना Proud

पण, हा पण जिथे तिथे आडवा येतो ना, त्याच काय करू?
सत्तेचाळीस साली ज्या "मालकान्नी" ताबा घेतला ना तो "इन्डीयाचा" घेतला, हिन्दुस्थानचा घेतलाच नाही! Wink
साहाजिकच, सोरटीसोमनाथप्रमाणे जे काम त्यान्नी लगेचच्यालगेच करायला हवे ते नजरेआड झाले!
आता मालकच असे ढाराढूर्र "अलिप्त" "गुलाबी" विश्वात रमलेले अस्तील तर आवारात गुरेढोरे घुसणारच ना, अन आधी केवळ मान घुसवलेले उण्ट आख्खा तम्बु काबिज करणारच की! त्यात नवल ते काय? ताकदीचा सम्बन्ध येतोच कुठे इथे? Lol
तरी नन्तर त्या मिचमिच्यान्नी थोडस्स टोकून जाग करायचा प्रयत्न केला होता बासस्टात! थोडीश्शी जाग आल्यासारखे वाटले होते, पण ते तेवढेच! पासस्टात्/बहात्तरात तर मालकान्नी नुस्ती कुस बदलली तरी बरेच ढेकूण चिरडले गेले होते, पण तेही तेवढेच्च!
वोटब्यान्केच्या ताटाखालच्या मान्जरान्ना जाग थोडिच्च येऊन चालते?
हे अस बरीच वर्ष चालल, मग मात्र, नन्तरच्या काळात मालकान्ना ज्यान्नी मालक बनवले, त्या जन्तेनेच मालकान्ची कामगिरी अन्गावर घेतली बहुधा......! तशी कायद्यात परवानगी नाही, पण जन्ता बिचारी काय करणार? मुकी बिचारी कुणी हाका...... Proud
असो(च).

तिएन्मन स्क्वेअर वर जे घडले त्याबाबत चीनी लोकांना मुळीच वाटत नाही कि काही चुकीचं घडलय म्हणून.. moreover they are asking about the incidents happening in India now.. and you want me to ask them sabout something happend in their country 21 years back??>> नको मॅड्म का त्रास घेता. काल शांतता होती व इथे जीवन सुरळित चालू आहे. We are happy and we have moved on.

>>>> तिएन्मन स्क्वेअर वर जे घडले त्याबाबत चीनी लोकांना मुळीच वाटत नाही कि काही चुकीचं घडलय म्हणून.. <<<<
अगदी अगदी! Happy
तस तर कोणत्याच कम्युनिस्टाला, कम्युनिझम निर्माण झाला यात काही चूकीच घडलय अस वाटत नाही! Proud Biggrin

अहो पण भाडेनियन्त्रण का कुठल्याश्श्या कायद्या अन्तर्गत तर आख्ख घरच शेकड्यानी भाडेकरू बळकावुन बसलेत त्यापुढे हा निकाल म्हणजे काहीच नाही, निदान दोन तृतियान्श तरी तुमच्या पदरात टाकलय ना?
>>>>

मग ह्या लॉगिकने पाक ऑक्युपाईड काश्मीर पाकिस्तानचे होते !!!

पण मुळात हा निकाल फुल्ली पॉलिटिकलच आहे अस नाही का वाट्त. कोणालाच दुखवायच नाही, सगळ्यांनाच चुचकारायच.
पण सगळ्यांना चुचकारण म्हणजे न्याय होत नाही. आणि म्हणुनच याला स्वागतार्ह कसं काय म्हणायच?
प्रगो म्हणतो त्याप्रमाणे मग कोणाच्याही घरात घुसा मग काही वर्षांनी १\३ हिस्सा तुम्हाला....हा न्याय नक्कीच नाही असेल तर फक्त कोणालाही न दुखावण्याचे राजकारणच आहे, आणि एकदाचा निक्काल लावायचा हे तत्व आहे

तिथे मशिद नव्हतीच, बाबरी ढांचा होता तो.

आणि मुळात एकदा तुम्ही ते रामजन्मस्थान आहे हे मान्य केल्यावर मशिदीसाठी तिथे जागा देण्याच कारणच उरत नाही

आणि काल दंगल झाली नाही कारण
१ ] लोक खरच कंटाळलेत
२] दंगल किंवा दहशदवादी हल्ले हे हाय अ‍ॅलर्टच्या काळात कधीच होत नसतात, ते नेहमीच आपण जेव्हा गाफिल असतो तेंव्हाच होतात

असो
न्यायालयानी ते रामजन्मस्थान आहे हे मान्य केल्यामुळे श्रीरामांचे मनःपुर्वक अभिनंदन

मनिषाजी मुस्लीमसमाजाच मतासाठी चांगभल करणार्‍यांना अडचण झाली असती म्हणुन असा निकाला द्यावा लागला हे समजायला हिंदु दुधखुळे नाहीत.

काल सरसंघचालकांनी आवाहन केल्याप्रमाणे जर स्वतःहुन मुस्लीम समाज उर्वरीत १/३ जागा हिंदुंना स्वत:हुन परत करेल तर सामजस्याच ते पहिल पाऊल ठरेल.

आगाऊजी विसरायला हिंदु समाज कायमच तयार असतो. फाळणीच दुखः व त्यात झालेली होरपळ यावर मलम लागलय अस किशनचंद्जी आर्य या सिंधी समाजसेवकान काल सकाळमध्ये लिहलेल वाचल असेलच.

दंगल झाली नाही कारण काहीच ठोस निकाल लागलेला नाही. प्रत्येक पक्षाला आपला विजय झाला असे वाटावे असा निकाल आहे.
आणि दुसरे म्हणजे बातम्यांच्या वाहिन्यांनी थोडा संयम दाखवला, उगीच ठिणग्या टाकण्याचे काम केले नाही.

'आणि दुसरे म्हणजे बातम्यांच्या वाहिन्यांनी थोडा संयम दाखवला, उगीच ठिणग्या टाकण्याचे काम केले नाही'' टोटली अग्री

>>पण सगळ्यांना चुचकारण म्हणजे न्याय होत नाही. आणि म्हणुनच याला स्वागतार्ह कसं काय म्हणायच
या वाक्याला प्रचंड अनुमोदन!

२/३ कसं काय मिळणार.
अहो या वेळी लोकांच मन राखण्यासाठी व ते दिल्लीतल्या क्रिडा घोटाळ्यातुन लोकांची मनं दुसरीकडे वळविण्यासाठी रचलेला डाव होता.

बरं रामाचं अस्तित्व कोर्टानी भावनिक आधारावर स्विकारलं आहे.
आता मला सांगा ज्या कोर्टात पुराव्याच्या आधारे निर्णय दिला जातो त्या कार्टाला अचानक या श्रद्धेच्या आधारावर निर्णय देण्याचं कसं काय सुचलं. याच्यात काहीतरी गेम आहे.

आणि हो, जर हिंदुंच्या श्रद्धेला आधार माणुन पुराव्याशिवाय ती जागा हिंदुना देणे म्हणजे चुकच आहे कि.

आणि मुस्लिमांची किमान मशजीद तरी उभी आहे.

खरा पुरावा मुस्लिमांच्या बाजुने असताना हिंदुना गोंजारण्याचे काम श्रद्धाचा आधार खरच न पटण्यासारखं आहे.

आता सुप्रिम कोर्टाततरी पुराव्याच्या आधारे निर्णय येईल हि अपेक्षा.

नाहीच आला तर सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलण्याची दुस-यांदा वेळ आल्यास नवल वाटु नये.

मला निर्णयात एकच गोष्ट खटकली.

कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारे कसं काय आलं?

मला निर्णयात एकच गोष्ट खटकली.
कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारे कसं काय आलं?

खरे तर मलाही हीच गोष्ट खटकली ( judicial overreach) . या निर्णयाने एक अनिष्ट पायंडा पडायची शक्यता आहे. त्या जागेवर एक मोठे रुग्णालय उभारून गरीबांवर मोफत उपचार करावेत ही जावेद अख्तर यांची कल्पना सर्वात छान आहे.

मयुरेशचे म्हणणे १००% पटले..सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अशी शांतता राहील काय, हा प्रश्न आहे..
तसेच मनिषा लिमये यांच्याशीही सहमत. पण सध्याच्या परिस्थितीत हाच निर्णय योग्य आहे असे वाटते. कारण कुठल्याही दंगली आता देशालाही (केवळ जनतेलाच नाही) परवड्णार नाहीत.

त्या जागेवर एक मोठे रुग्णालय उभारून गरीबांवर मोफत उपचार करावेत ही जावेद अख्तर यांची कल्पना सर्वात छान आहे.>> अनुमोदन.

मधुकरजी, भारत हे एक राष्ट्र आहे हा श्रध्देचाच विषय आहे. राष्ट्र भावनेने प्रेरीत झालेल्या लोकांनी एकत्र येउन राष्ट्रनिर्मीती होते असे नागरिक शास्त्र म्हणत.

आपण निकालपत्राची पान जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा एकेका मुद्यावर चर्चा करुयात.

अवांतर : जावेद अख्तर यांचा रुग्णालयाचा मुद्दा वाचुन मनोरंजन झाले. एका सिनेमाची कथा लिहण्याची तयारी चालु आहे अस दिसत आहे. भारतात अनेक रुग्ण रस्त्यावर पडले आहेत आणि हॉस्पीटलला एक इंच ही जागा शिल्लक नाही असा सिन डोळ्यासमोर आला. परस्पर हलवायाच्या घरावर तुळशिपत्र ठेवायचा धंदा सोडा. एखादी पडकी जागा कोणताही वफ्फ बोर्ड देईल का हॉस्पिटल बांधायला ते विचारुन या.

हो नितीन,
अगदी, पण न्यायपालीका भावनेच्या आधारे निर्णय देत नसते हे ही तितकेच खरे आहे. जर न्यायपालिकेचा हा निर्णय सुप्रिम कोर्टाने जर मान्य केला तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरिल विश्वास उडेल. आणि हे अगदी उघड आहे, न्यायालय फक्त पुराव्याच्या आधारे निर्णय देत असते.

बरं हा देशातील सगळ्यात सेन्सीटिव मुद्दा आहे, लोकांचं नुकसान नको, देशाची बदनामी नको व जगात आपल्या अंतर्गत बाबिंचा तमाशा नको म्हणुन तिघानी आता भांडण सोडुन समान हिश्यात ती जमीन वाटुन घ्या, असली काही कारण देऊन निकाल दिल्यास पटेल.
पण हिंदुंची श्रद्धा त्या जागेशी आहे म्हणुन हिंदुना वाटा देऊया. ही न्यायालयाची भाषा नक्कीच नाहिये.

एखादी पडकी जागा कोणताही वफ्फ बोर्ड देईल का हॉस्पिटल बांधायला ते विचारुन या.>> Biggrin नितीन आज एकदम विनोदी मुड मधे दिसताय.

आणि मुस्लिमांची किमान मशजीद तरी उभी आहे.
खरा पुरावा मुस्लिमांच्या बाजुने असताना हिंदुना गोंजारण्याचे काम श्रद्धाचा आधार खरच न पटण्यासारखं आहे
>>

कुठे आहे पुरावा? ह्यावेळी काहीही बकवास न लिहिता तू लिंक देऊ शकशील काय? किमान पक्षी तू निकाल तरी वाचला आहेस का? वाचला असता तर असे म्हणाला नसतास. त्यात ठळक म्हणलेले आहे की पुरातत्व खात्याने बाबर कालाआधी तिथे हिंदू मंदिर होते हे म्हणलेले आहे. कृपया आपली भावनीक ओकारी दुसर्‍या जागेवर काढावी. तुमचे हिंदूप्रेम सर्वज्ञात आहे.

आणि वर परत हे पण लिहलेस "न्यायालय फक्त पुराव्याच्या आधारे निर्णय देत असते" मग दोन्ही स्टॅन्ड कसे काय बुवा घेउ शकतो तू. हिंदू श्रद्धा बिद्धा बाजूला ठेव, निदान आपल्याच एका मतावर कायम राहा. मागे तू त्या कुठल्याश्या स्तुपबाफवर पण अ रा कुळकर्णी असे नाव तुला चांगले वाटले म्हणून घेतले अन लगेच त्या संयत बाफवर A R Kulakarnee म्हणून गरळ ओकलीस.

ह्या बाफवर लिहायचे असेल तर संयत लिही. अन्यथा लिहू नको.

मला निकाल पटला नाही. कारणे.
१. निकाल न वाटता तो सर्वपक्षीय तोडगा वाटतो. आणि तोडगाच काढायचा तर ६० वर्षे वाट कशाला पाहिली? लगेच का नाही काढला? उगाच इतका वेळ, पैसा आणि १९४९ पासूनच्या दंगली ह्यांचा अपव्यय नसता का टाळता आला? मग असेच करायचे असते तर १९९० मध्येच हिंदू नेते आपण लगेच जोडून मशीद बांधू पण आम्हाला मंदीरही बांधू द्या म्हणत होते ते काय चुकीचे होते. आजही लोकं तेच म्हणत आहेत.

२. कुठल्याही समाजाला न दुखावने हि भुमीका न्यायालयाने घेणे चुकीचे आहे. आधीही एकदा सरकारने ही भुमिका शहाबानो वेळेस घेतली आहे. असे नेहमी करणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया धाब्याबर बसवणे.

पण तरीही निकाल लागला ह्यात सुखी आहे. कारण सुप्रिम कोर्टात दावा गेलात तरी उभा राहणार नाही हे सिद्ध आहेच पण उगीच आणखी २० वर्षे अन टेन्शन कायम राहील. असे करण्यापेक्षा पुरातत्व खात्याला प्रमाण मानुन वफ्फ बोर्डाने ती जमीन कमीटीच्या ताब्यात द्यावी, तिथे आता मंदीर उभे करु द्यावे. ह्या बदल्यात मंदीर कमिटीने तेवढी जागा स्वतःच्या पैशाने वफ्फ बोर्डाला विकत घेऊन द्यावी व एक मोठी मशीद बांधून द्यावी. कारण परत सुप्रिमकोर्टाचा निकाल काही वर्षाने लागल्यावर काय होईल हे माहित नाही.

कुठे आहे पुरावा? ह्यावेळी काहीही बकवास न लिहिता तू लिंक देऊ शकशील काय? किमान पक्षी तू निकाल तरी वाचला आहेस का? वाचला असता तर असे म्हणाला नसतास. त्यात ठळक म्हणलेले आहे की पुरातत्व खात्याने बाबर कालाआधी तिथे हिंदू मंदिर होते हे म्हणलेले आहे.>> केदार तिथे हिंदु मंदिर होते हे आजुन सिद्ध झालेलं नाही. तसेच हा निकाल पुरातत्व खात्याच्या आधाराने देण्यात आलेलं नाहिये. सुप्रिम कोर्टात पितळ उघळ पडेलच.

खरे तर मलाही हीच गोष्ट खटकली ( judicial overreach) . या निर्णयाने एक अनिष्ट पायंडा पडायची शक्यता आहे.>>>>>>> विकु, गोष्ट खटकली खरी पण भारताच्या मानानी खुप सुधारणा आहे. राजकीय पक्षांच्या दबावामुळे किंवा भावना दुखावल्या जाऊन होणार्‍या दंगलींच्या भितीनी जरी हा तोडगा काढला गेला असेल तरीही स्वागतार्ह आहे. भारतातून इंग्रज गेल्यानंतर आलेल्या लोकशाही ला अवघे ६० वर्ष पुर्ण झालेली असताना, जर आधी मशिद होती तर आता मशिद बांधू द्या (ते पण देशात हिंदुंची मेजॉरिटी असताना) अशा निकालाची अपेक्षा ठेवणं म्हणजे जरा अतिच होईल. विचारसरणीत इतका बदल व्हायला अजून आपल्याला बरीच वर्ष लागतील पण आता दिलेला निकाल हा त्या बदलाच्या दिशेनी प्रगतीच दाखवतोय.

केदार, तुझी पोस्ट आजिबात पटली नाही. ती रामजन्मभुमी आहे, हा पुरावा असला तरी लगेच इतके वर्ष तिथे असलेली मशिद एकदा लोकशाही आल्यावर जाऊन पाडायची गरज काय होती? राजकीय पक्षांनी त्यांच्या फायद्या करता तिथे जाऊन मुर्खपणा केला. आज हिंदुची इथे मेजॉरिटी आहे म्हणुन रामजन्माच्या वेळेचा दाखला दिला जातोय (हिंदुकडून), मुस्लिम मेजॉरिटी असती तर बाबर च्या वेळेचा दाखला दिला गेला असता (मुस्लिमांकडून), पण मग बरोबर काय आहे?
रीतसर लोकशाही ज्या दिवशी आली तेव्हा सगळं "रिसेट" होतं किंवा व्हायला पाहिजे. शेकडो वर्षांपुर्वी तिथे काय होतं ह्याला काही महत्व नाही. इथून पुढे ज्या जागेवर जे आहे म्हणजे मंदिर किंवा मशीद त्याला कोणी हात लावू नये किंवा लावू शकत नाही.
बाकी, लोकशाही आल्यावर "रिसेट" काही लगेच होत नाही त्याला वेळ लागतो पण हा निकाल एक पाऊल पुढे मात्र नक्कीच आहे.

बुवा मी काय झालं ह्यावर अजिबात भाष्य केलेले नाही माझ्या पोस्ट मध्ये. तुला तसे का वाटले हे माहित नाही. मशीद, मंदीर पाडने ह्यावर माझे भाष्य अजिबात नाही. निकालावर आहे.

रीतसर लोकशाही ज्या दिवशी आली तेव्हा सगळं "रिसेट" होतं किंवा व्हायला पाहिजे. >> हे पाहिजे मध्ये आहे. म्हणजे आयडियल. पण दोन्ही बाजू आयडिअल आहेत का बुवा? नाही ना? म्हणून तर घोडं पेंड खात आहे. हे असं, ते तसं असायला पाहिजे नाही, तर "आहे हे असं आहे" हे महत्वाचे आहे. आणि आहे वरुन निकाल दिलेला आहे हे ही खरच आहे.

तुला नेमकं काय पटलं नाही? मधुकरला लिहलेलं की निकाल पटला नाही हे लिहलेलं.मी कारणं दिली आहेत.

शेवटच्या पॅरा मध्ये मंदिर उभे करु द्या लिहीलय त्यावरुन मला वाटलं. उपहासानी लिहीलं असशील तर माझ्या लक्षात नाही आलं.

दोन्ही बाजू आयडियल नाहीत आणि मुख्य म्हणजे हिंदुंची बाजु आयडियल नाही हे लक्षात घेऊन निकाल दिला गेला (पेंड खात का होइना) ह्याला महत्व आहे. त्यात दंगली पण नाही झाल्या. आता लोकं खरच समंजस झालेत की काही वेगळच कारण आहे ह्या शांततेमागे तर माहित नाही.

शेवटच्या पॅरा मध्ये मंदिर उभे करु द्या लिहीलय त्यावरुन मला वाटलं. उपहासानी लिहीलं असशील तर माझ्या लक्षात नाही आलं. >>> उपहासानी नाही मी खरे खरे म्हणतोय. कारण जर प्रश्नच नसेल तर तोडगे, उत्तर, दंगली होणारच नाहीत.
आणि त्याचवेळेस हिंदूनी पैसे देउन जागा देऊन मोठी मशिद बांधावी हे लिहलंय ह्याला अनुल्लेख केला का?

कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारे कसं काय आलं?<<<<<<<<<<<

कोर्टाचा निकाल पुरातत्व खात्याच्या संशोधनाच्या आधारावर आहे.

मी स्वत: तो ढाचा पडण्यापुर्वी तो बघितला आहे. [आणि हे अभाविप च्या माध्यमातुन पाहिल्यामुळे याच दृष्टीने नेमकेपणे पाहिले गेले आहे] त्या घुमटावर आतल्या बाजुने कोरलेली कमळ , स्वस्तीक आणि इतर हिंदु चिन्हे मी स्वतः पाहिली आहेत. , कोणत्याही मशीदीला चार मिनार असतात तसे इथे नव्हते आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा असा जो मला निकालपत्रात कोठेच दिसला नाही ही इमारत मक्केच्या विरुध्द दिशेकडे तोंड करुन उभी होती म्हणुन मुस्लिम समाज तिथे नमाज पढत नव्हता. कारण कोणत्याही मशीदीचे तोंड मक्केकडेच असावे असा संकेत आहे. आणि म्हणुनच ती मशिद नव्हतीच.

आणि कसले पुरावे म्हण्ता???? कुठाय मशिद ???? नव्हतीच हो ती तिथे कधी.
पण हा घ्या मंदिराचा पुरावा......आजही आत्ता या क्षणीही तिथे रामलल्लांचे मंदिर अस्तित्वात आहे.

Pages