नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

Submitted by पाषाणभेद on 30 September, 2010 - 12:28

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

सोडा हातातल्या हाता नाथा आता
हातातल्या हाता

अहो सोडा हातातल्या हाता नाथा
हातातल्या हाता ||धृ||

मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||१||

आले जरी दुरवरूनी
आssआssआssआss
आले जरी मोहीम करूनी
का बळेची ओढता
नाथा आता
सोडा हातातल्या हाता ||२||

सासू सासरे दिर जावा
हंssअंssअंssअंss
सासू सासरे दिर जावा
बोल बोलतील असे एकांती पाहता
नाथा आता
नका....नका
सोडा हातातल्या हाता ||३||

काळ वेळ नाही बरी
लाssलाssलाssलाss
काळ वेळ नाही बरी
वेळ झाली, पुरे करा बाई आता
सांगते जाता जाता
सोडा हातातल्या हाता ||४||

विनवणी माझी तुम्ही ऐका
हंssअंssअंssअंss
विनवणी माझी तुम्ही ऐका
नका मज भेटू एकांती असता
सोडा आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

गुलमोहर: 

आपले मी मराठी.कॉम वरील सदस्य श्री. निल्या यांनी वरील नाट्यगीताला चाल लावली आहे. ती येथे ऐका:

http://mimarathi.net/node/3756#comment-46575

http://www.misalpav.com/node/14678#comment-244350

मुळ तूनळीवरची साखळी ही आहे:

http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&feature

श्री. निल्या यांचे आभार!
http://mimarathi.net/node/3756#comment-46575