गजालीकर गटग २५/०९/१० (पुणे) वृत्तांत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

(परतीच्या वाटेवर भावना, निलू ताई आणि जाये ह्यांच्या विनंती वजा हुकुमावरून २५/०९/२०१० रोजी पुणे येथे श्री रवळनाथाच्या कॄपेने पार पडलेल्या ग ट ग चा वॄत्तांत लिहीण्याचा हा किडूक-मिडूक प्रयत्न.)

मला वॄत्तांत लिहीयला जमत नाही पण देवाचे स्मरण करून आणि "व्रुत्तांत-वर्धक वटी" घेऊन लिहीण्यास प्रारंभ करत आहे.

खुप दिवस होणार होणार म्हणून गाजत असलेला गटग २५/०९ रोजी पुणे येथे शैलजा हीच्या घरी यथासांग पार पडला. हा गटग २६/०९ म्हणजेच रविवारी आहे अशी माझी आणि आणखीही एका मायबोलीकराची गोंधळ कम समजूत होती परंतू मॅनेजरांनी योग्य वेळी सर्वांना फोन करून गटग २५/०९ रोजीच आहे ह्यावर योग्य वेळी शिक्कमोर्तब केले आणि पुढचा गोंधळ आणि आमचा उद्धार टळला. त्यातच आणिक एका मायबोलीकराने "गटग शैलूच्या घरी आहे ना मग मी नक्की कुठे यायच" अशी विचारणा केल्याच दुसर्‍या एका मायबोलीकराने आपल आणि त्या मायबोलीकाअच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मला सांगितल.

मी साधारण ११-३० च्या सुमारास शैलजाच्या घराजवळ पोहोचलो. (त्यातही शिवाजीनगर येथे न उतरता कोथरूड येथे उतरलो आणि मग पत्ता विचरात विचारत 'विचारे' कुरीयरने शैलजाच्या घराजवळ पोहोचला हा धांदरट पणा मुद्दाम सांगत नाही). वाटेवर निलू आणि जाये बरोबर " मै यहा तुम कहा" वगैरे वगैरे संवाद फोनवर चालूच होता. घराजवळ पोहोचतो न पोहोचतो तोच मला नेण्यासाठी स्पेशल होंडा फोर वील ड्राईव्ह दिसली. मला गहीवरून आल. पण गहीवर पूर्ण व्हायच्या आधीच जाये ने बाजूच्या बाईकवर बस असा आदेश दिला आणि तो मी पाळला (न पाळून करतो काय बापडा). शैलजाच्या घरी पोहोचतो न पोहोचतो तोच " शैलजा, काही कापयच आहे का" असा योगीचा आवाज कानी पडला. आणि इतके दिवस बँकेत आहे बॅकेत आहे असे सांगणारा योगी नक्की बँकेतच आहे ना असा संशय सर्वांना आला.

घरी पोहोचतो न पोहोचतो तोच शैलजाने फर्मास चहा सर्वांना पाजला. आणि त्याबरोबर मस्त खेकडा भजी सर्वांसमोर ठेवली. भजी बरोबरच " ओळखा पाहू मी कोण ? " हा कार्यक्रम रुपाले, निलू, भावना आणि जाये ह्या सर्वांनी सम्या बरोबर सुरू केला. सम्याने काँफीडेंटली 'निलू हीच रुपाली , आणि रुपाली हीच निलू असे छाती ठोक पणे ठोकून दिले आणि मग जाये हीने " योग्य मायबोली कर ओळखण्याची बुद्धी सम्याला देण्याचे गार्‍हाणे रवळनाथाकडे घातले" सम्यानेही भजी खात खात आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तमाम गजालीकरांना आईस्क्रीम देण्याचे मान्य केले.

जेवणात बांगड्याचे तिकले, चिकन, वांगा बटाटा भाजी , वालीच्या दाण्याची मसाल्याची भाजी, तांदळाची भाकरी असा समस्त गजालीकरांना आवडणारा बेत होता. आणि त्यांनंतर गुलाब्जामून डीप्ड इन केसर पिस्ता आईस्क्रीम असा गोडधोडाचा कार्यक्रम झाला. जेवणानंतर सर्वांनी बसल्या जागेवरच वामकुक्षी पार पाडली. आणि मग उखाण्याचा कार्यक्रम झाला. त्यात मास्तरांनी मस्तरीण बाईंच्या समोरच एक हायटेक उखाणा घेत धमाल उडवून दिली. मी ही मग एक साधेच 'नाव' घेत स्वताचे नाव राखले.

मधेच दबांग ऑफीसर आणि मुन्नी ह्यांनी धमाल उडवली आणि तेंव्हाच " अप्सरा आली" हा आयटम डांस झालाच पाहीजे अशी फर्माईश शैलजाने तमाम गजालीकरांच्या वतीने केली. आणि मग सर्वांच्या विनंतीचा मान राखून परतीच्या प्रवासाच्या आधी लचकत मुरडत अप्सरा प्रकट झाली. सर्वात शेवटी या यादगार दिवसाची आठवण म्हणून समस्त गजालीकरांचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला. त्यावेळी तमाम गजालीकरांनी आपले मुळातलेच हसरे चेहेरे अधिकच हसरे केले.

परतीच्या वाटेवर ही तोषांच्या सेक्रेटरीने उद्या आपणास साप्ताहीक सुटी आहे अशे सांगून मजा उडवून दिली.

हा गटग यशस्वी केल्या बद्दल शैलजा, देसाई मास्तर आणि मास्तरीण बाई, महेश आणि त्यांच्या सौ, सम्या, जाये, निलू ताई, भावना, रुपाली, योगी, आशुतोष ह्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि फोनवर हजर असलेले दिप्या,सुन्या आणि हजर नसलेले इतर मायबोलीकर पुढच्या गटग ला नक्की येतील अशी आशा व्यक्त करत हा गटग व्रुत्तांत संपूर्ण करतो.

****************************************************

विषय: 
प्रकार: 

सकाळीच फोनवर ऐकला वृतांत, आता वाचायचेही भाग्य लाभले.. बाकी जेवणाचा मेन्यु आणि त्यात बांगड्याचे तिकले वाचुन अंमळ वाईट वाटले...

केदार, short n sweet वॄत्तांत Happy
चुलबुल पांडे आणि 'टुन्नी'बाई यांनी गटगला उपस्थित गजालीकरांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडली. Proud

खतरनाक मेनु एकदम. बांगड्याचे तिकलं.. हाय...
सगळे मेनु एकदम मस्तच. वृतांत छान. फिरत फिरत इथे आले व वाचण्यात आले.

अम्या मी काढलय रे तुझी आणि निलिमाचीव. Happy
केदारा मस्त मस्त मस्त!!! Happy
रच्याकने घरी पोचलास कितीला? नीट पोचलास ना? पूर्ण दिवसाचा भिरभिरलेला तू म्हणून !! Happy
येस्स तोषानु.... दबंग पांडे आणि टुन्नी कम सेक्रेटरी बायने मनोरंजनाची बाजू किंचितव खाली पडून दिली नाय. Proud

बिन रंपा सगळेच टुन्न Proud
अम्या, खरा तर दबंग पांडे सोबत मुन्नी होयीच आणि कर्मधर्माने मुन्नीची जबाबदारी जाजुवर येवन पडली तर मुन्नी आणि जाजुची कायेक टोटल लागा नाय. मगे शेवटी 'मु' चा 'टु' के ल्यार नाव नी व्यक्ति एकदम फिट झाला. Proud

केदार.. मस्तच लिहीलयस..तू खरच "विचारे" कुरियर ने आलास का.. ??? Proud

पण कायव म्हणा.. काल सगळ्यांका भेटान मस्तच वाटला एकदम... फुलट्टू धमाल, खादाडमस्ती नि अर्थातच रंगलेल्या गजाली.. ! सगळाच मस्त एकदम...

शैलू, निलुटाय नि जाजू... गटग यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन Wink नि सहभागी झालेल्या सगळ्या गजालिकरांका धन्यवाद.. ! Happy असाच अधूनमधून भेटत रवा.. हसत खेळत रवा.. Happy

क्षणचित्रे माझ्या नजरेतून :
१. माझी पहिली हजेरी Proud
२. माका अर्जंट काम इला म्हणान जमूचा नाय असा गंडवत गजालिकरांची घेतलेली फिरकी.. Proud
३. सम्या.. खूपजणांका पहिल्यांदाच भेटीत व्हतो म्हणान ह्याचो गजालिकरांनि बकरो बनिवलो.. Proud जितका चुकीचा उत्तर तसा एक भजी बक्षिस.. जल्ला अख्खी डिश खाली झाली पण ह्याका काय ओळखुक जमणा नाय.. Lol शेवटी त्याका मालवणीत्सून गार्‍हाणा घालूक लावला तेव्हा कुठे सोडण्यात इला.. (गार्‍हाण्याचो सिन कसलो कॉमेडी व्हतो.. जाजू फाडफाड बोलीत शिकवत व्हता नि सम्याक एकेक शब्द बोलुक बॉउन्सर जात व्हता.. Lol शेवटी कसाबसा मास्तरांच्या मदतीने गार्‍हाणा म्हटला..) बकरो बनविलो मगे कापूक व्हयोच मा.. म्हणान त्याच्याकडसून एक मोठ्ठा आईसक्रिम पॅक !
४. बाकी धमाल सुरुच व्हती पण त्यात दबांग ऑफीसर नि टुन्नी एकदम जोरात !
५. जेवण : एकसे बढकर एक मेनु.. पण डोळ्यासमोर बांगडे,चिकन नि भाकरी दिसल्यावर मगे माका बाकी कायव दिसूक नाय.. एकीकडे मास्तरांनी आणलेली उसळ पण झकास ! Wink बाकी केदारने मेनुच दिला आसय.. त्यात फक्त रुप्सने आणलेल्या पुपो रवल्या.. खाउक पोटात जागा शिल्लक उराक नाय म्हणान की काय... पण मी परतीच्या प्रवासात फस्त केल्लय.. Proud जेवताना पसरलेली शांतता अस्वस्थ करणारी व्हती.. पण काय करणार...... सगळेजण कॉन्सनट्रेटींग ऑन जबरदस्त जेवण !! Lol
६. महेश आणि मिसेस देशपांडे ह्यांचा उशीराने का होईना पेशवाई थाटात झालेला आगमन Proud
७.उखाणे घेण्याचो प्रोग्रामः 'माका जमूचा नाय.. येणत नाय' अशी नाटका (:P) करत मास्तरांनी शेवटी काय मस्तच नाव घेतला.. Proud केदार बिचारो घामाघूम झालो नाव घेईपर्यंत.. Happy
८. निलुटायची कला : आणलेल्या मेणबत्त्या मस्तच नि सुंदर.. बरेचजणांनी विकत घेतल्या.. त्यातपण गजालिकरांच्या आवडी मिळत्या जुळत्या असल्याने पंचाईत झाली.. Happy माका जेव्हा लागात तेव्हा टायग्या पेशल बनवुन गिफ्ट देतली ह्या ठाउक असल्याने मी काय घेवुक नाय.. Proud पण हॅट्स ऑफ टू निलुटाय.. खूपच छान कला (क्रेडीट गोज टू.. मुलूंडचा लोडशेडिंग Wink )
९. चहापान : सगळ्यांका जेवण नि आईसक्रिम जड झाला म्हणान कोणीच घेवुक नाय.. पण एकीकडे 'आपणा़क व्हयी' म्हणान सम्याने महेश्याक चाय दी असा सांगितला नि आयटीने विचारल्यावर.. "नाय माका पण व्हयी" म्हणाक लागलो Lol
१०.भागोने दिलेल्या शेअर मार्केटच्या टिप्स.. आता गजालीकर पण ला़खांत इंट्रा बिंट्रा खेळतले.. Proud
११. खाण्यात गप्पा करण्यात वेळ कधी गेलो ता कळूकच नाय.. मगे जाउची तयारी.. त्यात माझा समस्त सोसायटीच्या साक्षीने वायच गजालिकरांसाठी झालेलो धावतो पळतो मिनी नटरंग ड्यान्स.
१२. मगे टाटा ! पुन्हा भेटुया म्हणत एकमेकांचे निरोप घेणारे गजालिकर ..
१३. धावते पळते पुणेदर्शन : माका पुणा फिरुचा व्हता पण आधीच उशीर झालेलो त्यात पावसाची सुरवात म्हणान रवलाच.. तरीपण सम्याने माका शनिवारवाडा, दगडुशेठचा गणपती नि तिकडचा सार्वजनिक गणेशोत्सवातलो मंडप नि इतर वाटेत काय पुणे पेशल दिसला ता दाखवला... आधीच मस्त झालेलो गटग नि पुणेभेटीचा शेवट दगडुशेठच्या गणपतीदर्शनाने झाला याबद्दल तुका थँक्स रे ! Happy

इति क्षणचित्रे समाप्त.. बाकी माझा काय सांगूचा रवला तर समजान घ्या की "बाकीच्यांका पण लिवुक चान्स दिलय " Proud

योग्या Happy क्षणचित्रा मस्तच.
>>पण डोळ्यासमोर बांगडे,चिकन नि भाकरी दिसल्यावर मगे माका बाकी कायव दिसूक नाय>> यावर प्रचंड अनुमोदन.. शैलूच्या जेवणाक योग्य न्याय फक्त तूच दिलस. Proud

छोटो अन छान वृ Happy केदोबा
योग्या, क्षणचित्रां मस्तच Happy तुया सम्या वांगडाच कित्या गेल्लंस तां कळलो नाय. मियाव थंयसूनच जातंय रे घराक. माकाव दगडूशेठ गणपतीचो दर्शन घेवाक गावलो असतो. Happy
तुजी अप्सरा मस्तच. Happy शैलु फोटु टाक बगया.

रे महेशा.. तुझ्यावांगडा जाउक कायेक प्रॉब्लेम नव्हतो रे.. बस्स मुड इलो म्हणान त्याच्या बाईकवरुन.. Happy नि येत्या कुलंग ट्रेकला त्याचा येवुचा तळ्यात मळ्यात आसय म्हणान वायच बोलुचा पण व्हता.. पण नेक्स्ट टाईम तुझ्या गाडीत्सून हा... Happy

शैलूच्या जेवणाक योग्य न्याय फक्त तूच दिलस. >> व्हय तर.. रात्री पण जेवुक नाय Proud

सुन्या मेल्या............ Angry तू भेट तुका चेचतय बघ. ता कंत्राट जाजुने घेतल्यानच हा मी आसय सोबतीक तिच्या.
लिंबुदा Happy
सुकि ह्यो केदारचो विनय आसा. Proud

केदारा, वृ लिवची जबाबदारी अगदि योग्य माणसाक दिलव बघ Happy बरा लिवलस रे.
<<"व्रुत्तांत-वर्धक वटी" >> हेचो बरोच फायदो झालो Happy
यो, कॅटवॉक नि अप्सरा भन्नाट रे.. काय आमका सुखद धक्को दिलस अगोदर हजेरी लावन.. नाय येवचस कळल्यार टांगारुचो उद्धार झाल्लोच Happy ह्या बरा हा आम्ही पुण्याक जावन गणेशाचा दर्शन नाय करुक पण तु मात्र केलस.
सुनल्या अजिबात बोला नकोस जा.

केदार व्रु मस्त लिवलोस.. Happy
सम्याक पिडुन खुप मज्ज्जा मज्ज्जा इली. Proud
शैलु, टुन्नी अणि दबंगचे खुप खुप आभार Happy

Tunni n Dabang kunala mhatalay?>> हेच्या साठी गटगक येवक होयो Happy
निलगे, माज्या कडसूनय सुन्याक दोssन दे Proud टांगारू मेलो....
रुप्स तुज्या पुपो मस्तच हां Happy

संक्षिप्त पण ठळक नोंदी:-

१) रस्ताभर मेंढपाळांचे कार्यक्रम बघुक गावले.
२) पुण्यातले खास आकर्षण बुरखाधारी मुली बघितल्या.
३) पुणेरीस शिस्तबद्धता पण बघुक मिळाली (१ - ४ची).. Proud
४) सम्याचा बकरा हिट ठरला अणि त्य निमित्ताने त्याका ठाण्यची भजी खाउक मेळली.
५) केदाराक नुकतेच स्वातंत्र्य मिळल्याने तो गटगक येउ शकला हे कळले(जुनमधील तुरुंगवासास एकवर्षपुर्ण) Happy
६) बांगड्याचे तिखले एकदम अप्रतिम.. बनानेवाले के हाथो को चुमना पडेगा Happy
७) चॉकलेट अणि गुलाबजामदेखील सुंदर.. Happy
८) योगल्याची एक झलक माझ्या मोबाईलमध्ये बंद.. Happy Happy Happy
९) पुण्यातुन निघतान पडलेला पाउस, निसर्गरम्या वातावरण, लोणवळाचे धुके अणि रंगलेल्या गजाली.. वो शाम हि कुछ और ही थी.. Blush
१०) महेशा अणि मास्तर सपत्नीक इले म्हणुन विषेश आभार.. माका खुप आवडला. Happy

विषेश लक्षवेधकः-

शैलुचा:- शैलुचे आयोजन, आगत स्वागत सुंदर तसेच "झुलु डान्सदेखील". Happy

टुन्नी आणि दबंगः- पुर्ण प्रवासभर आणि गटगक मनोरंजनाची जबाबदारी उचलल्यामुळे विषेश आभार. Happy

सरतेशेवटी अ‍ॅडमिनचे आयोजनाबद्दल अणि केलेल्या पाठपुराव्यांबद्दल विशेश आभार..

आणि टांगारुंना "टुकटुक" Proud

त.टी :- सुनल्याचा जाहिर त्रिवार निषेध!! निषेध!! निषेध!!

समाप्त.. Happy

मी साधारण ११-३० च्या सुमारास शैलजाच्या घराजवळ पोहोचलो. (त्यातही शिवाजीनगर येथे न उतरता कोथरूड येथे उतरलो आणि मग पत्ता विचरात विचारत 'विचारे' कुरीयरने शैलजाच्या घराजवळ पोहोचला हा धांदरट पणा मुद्दाम सांगत नाही).>>>
एवढं का शोधायला लागलं तुला? 'घराबाहेर (आफ्रिकन)हत्ती पार्क केलेलं घर कुठंय?' असं विचारलं असतं तर कोणीही सांगितलं असतं, हो ना ग शैलजा? Wink Light 1

बाकी मज्जा केलीत ना खूप? Happy

हेहे प्राची! Wink बरोबर आहे तुझं! बघ केदार, येवढा नाय कळूक तुका! Proud
वृत्तांत मस्त लिवल्यात केदारा, योग्या आणि रुपल्या Happy
झुलू डान्स??!! Lol गो, कायपण लिवतस! कोणाक खराच वाटात! Lol

तुम्ही सगळे विनंतीक मान देवन आयल्यात, पाहूणचार गोड मानून घेतल्यात ह्या माकाय खूप बरा वाटला. Happy खूप धमाल केली खरी! Happy परत भेटाया. मी परत एकदा खादाडी आयोजन वगैरे करुक तयार आसय Happy

काकांची प्रकृती कशी? तुमका मिसलव हो काका.