अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या

Submitted by पाषाणभेद on 25 September, 2010 - 02:06

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या

अहो कारभारी, हळूहळू होवू द्या, जरा दमानं घ्या
आडकल घास, थोडं पानी प्या, तुमी धिरानं घ्या ||धृ||

पुरणावरनाचं जेवन केलं निगूतीनं
तिखट सार केला मसाला वाटून
आता सारं संपवायचं, नाही म्हनू नका ||१||

कुरडई पापड कढईत तळले
वाटीमधी गुळवणी ताक दिले
हातामधी घेवून सारं तुम्ही कुस्करा ||२||

घाई नका करू जेवतांना
घास चावून घ्या खातांना
आरामात करा सारं, मग मसाला पान खा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नका करू घाई आता जायाची
रात हाये बघा थंडीची
शेकोटी पेटवते उबेची !! रात जरा करू गमतीची

असे टाकले तर? .विचार कर ?

प्रकाश१११ :

नका करू घाई आता जायाची
रात हाये बघा थंडीची
शेकोटी पेटवते उबेची !! रात जरा करू गमतीची

असे टाकले तर? .विचार कर ?

हा प्रतिसाद जास्त आवडला

परकास भौ अन संदिप भौ, रातीला र्‍हावून जायाची इनंती येगळ्या लावनीत आधीच व्हयेल हाय. तिथं पाव्हनं व्हतं आज इथं कारभारी आल्यालं हाय. जरा सबूरीचा मामला हाय. तवा ज्येवान ठिक हाय. आता थंडीच्या मोसमात शेकोटी पेटवीतोच पगा.