"माझे मी"पण

Submitted by दाद on 23 September, 2010 - 00:33

"किती नाजुक... सुंदर आहे गं, कानातलं...." माझा स्त्रीसुलभ सौदर्यदृष्टीची प्रतिक्षिप्तं क्रिया!
"काल ना, नवर्‍याशी भांडण झालं...." नवरा किती म्हणजे किती हाताशी येतो त्याचं उत्तम उदाहरण देत माझी ऑफिसातली सखी. "...त्यात सध्या सासूबाई आहेत इथे. त्यामुळे साध्याच बोलाचालीला भलभलती वळणं लागतात...."
मला अजून कानातल्याचा आणि ह्याचा बादरायणही संबंध दृष्टीक्षेपात नाही.
"त्या चांग्लच वागतात गं... पण शेवटी लेकाचीच बाजू घेणार ना... कारणं काही नाहीत गं.... आता विचार करतेय तर अगदी क्षुल्लक वाटतय....
पण तेव्हा ना.... खरच.... वैताग आला काल...... काही नको. कुणाची बायको नको, कुणाची सून नको, आई नको... लग्नाआधीची मी.... तीच परत हवीये...." आता हळू हळू डोळे तरळायला लागले. मी अजून अनभि‍ज्ञच.
".... मग हे कानातले घातले... माझ्या लहानपणीचे आहेत.", अन हसलीही खुदकन.

बोलता बोलता दुसरी म्हणाली की, " हो गं.. हो. मी ना, असं वाटलं की, शाळेत जाताना आई घालायची तशा दोन वेण्या घालायचे....एकदम आपलं आपल्याला सापडल्यासारखं काहीतरी... "
एक एक करीत असलच काही काही निघालं. आपण असलं काही केलं किंवा करतो हे लक्षात येऊन हसलो आणि किंचित हळव्याही झालो.

हे "माझी मी" किंवा "माझा मी"पण किती आतली भावना आहे ते कधी कळतं? तर बायको, नवरा, सून, जावई, शेजारी, सहकारी, वरिष्ठं, कनिष्ठं असल्या संदर्भांमधून, "कुणाचं कुणीतरी" बनण्याच्या प्रयत्नात आपण छिन्नी-हातोडा घेऊन स्वत:ला घडवत (का बिघडवत) बसतो तेव्हा. कधीतरी हे आपलेच आपल्यावरले घाव सहन होत नाहीत, टरफलांमधून जगणं असह्य होतं अन..... एकदम "मी माझी" किंवा "मी माझा" ह्या आतल्या अनुभूतीसाठी आपण हे असलं काहीतरी करतो.
म्हणजे माझ्या सहकारी सखीनं केलं.
तुम्ही? तुम्ही केलय असं काही... आपल्यातल्या आपल्याला गवसायला, घट्टं धरून ठेवायला?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, सही विषय! माझी एक वही आहे शाळेपासूनची .. आवडतं काहीही त्यात लिहीलेलं कविता, वाक्य, एखादा अविस्मरणीय प्रसंग, द. मा. मिरासदारांची नववीत असताना घेतलेली सही, अमिताभचे फोटो काय वाट्टेल ते आहे त्यात. पण तीच मी आहे! ती वही उघडली की माझी मी सापडते. Happy गंमत म्हणजे गेल्या दीड वर्षात त्यात काहीच अ‍ॅड झालं नाहीये, मी हरवले बहुतेक. Proud Happy

माझा नंबर पयला!
असंच काहीतरी घडलं... काय ते आठवत नाहीये. पण हे नक्की आठवतय की, अगदी जीवाची उलाघाल झाली. काहीतरी घट्टं धरून ठेवावं... माझं, मीपण मला मिळवून देणारं काहीतरी....
अन शोधून शोधून काढून मी माँटेसरीत असताना न्यायचे ती लाsssल रंगाची पिशवी घेऊन मी बाजारात गेले होते. नक्की किती विनोदी, विसंगत दिसलं असेल ते असेल... मला मात्रं बाहेरून गृहिणी बाजारात जातेय पेक्षा आतून... मी माँटेसरीत जातेय असलच वाटलं होतं....
माझी मी!

दाद,
मस्त विषय चालू केलात Happy

आशूडी सारखीच माझीही एक अनुदिनी आहे. शिवाय कवितांची वही आहे. आणि एक डायरी आहे ज्यात आवडलेले उतारे, कविता, मेसेजेस, चारोळ्या असे काय वाट्टेल ते खरडलेले आहे.
त्यांची पाने चाळत बसते मी. Happy

मस्तच विषय!! काहीदिवसांपुर्वीच असे काहीतरी घोळत होते मनात.
<< लग्नाआधीची मी.... तीच परत हवीये >> असे अधुन मधुन वाटतेच हल्ली.

आशू, दाद- मस्तं Happy
मीही हरवते बर्‍याचदा. कधीकधी गोतावळ्याविना मी अशी उरलेलीच नाही आता असेही वाटते.
कधीतरी पळुन हिमालयात जायचे (आणि तिथली शांती बिघडवाची) असे एक स्वप्न आहे. Wink

मस्त विषय. रोजच्या जगण्यात अचानक काहीतरी मनाला लागतं (जे नंतर आठवल्यावर शुल्लक वाटतं :)) किंवा उगाचच आईची आठवण येते मग भूतकाळात जाणं आलंच!

रैना - same pinch! आपण हिमालयात भेटु आपलं आपलं 'मी पण' घेऊन. Happy

ये ब्बात!
लेख वाचला, प्रतिक्रियाही वाचल्या, बराच विचार केला पण असं भूतकाळात मी कधी जात नाही, गेलो तरी मन तिथे फारसे रमत नाही हेच जाणवले.
निंबूकडे आहे तसली वही, ऑटोग्राफ बुक्स माझ्याकडेही होते पण आता त्याच्याशी काहीच धागा जुळत नाही, जणू तो मी आणि आत्ताचा मी यात काही संबंधच नाही, एक त्रयस्थ, कोरडेपणा वाटतो....जो बीत गई वो बात गई......

आगाऊ, अगदी खरं आहे रे. Uhoh पण कधी कधी डायरी, वह्या, चारोळ्या कविता.. या सगळ्या गोष्टीही नकोश्या होतात तेव्हा खरतर "माझ्यातल्या मी" ची उणीव प्रकर्षाने जाणवू लागते. असच बर्‍याचदा होतं आयुष्यात. Uhoh

माझ्यातल्या मी ला शोधण्यासाठी बर्‍याचदा एकांतातले मौन अन पापण्यांवर जागा धरून बसलेल्या त्या दवांचीच साथ मिळते. Uhoh

:भारी: Happy

> ....., अमिताभचे फोटो काय वाट्टेल ते आहे त्यात
मलाही उगाच काहीही जपुन ठेवायची सवय आहे... अचानक कधी 'कप्पा आवरा' असं चालु झालं की सापडतं सारं..

मला नाही वाटत आपण हरवतो. आपल्याकडे फक्त वेळ कमी पडतो कधी-कधी. बाकी आपण तेच असतो, आयुष्यभर....

जुन्या ग्रिटिंग्ज, लव्ह Quotes लिहलेली जुनी पॉकेट डायरी, कॉलेजची ओळखपत्र, जुने पेन्स, काही आवडते वर्तमानपत्रातील कात्रण, काही शाळेतली पुस्तक, शाळेत मिळलेली प्रगती पुस्तकं असं कितीतरी मी अजुन जपून ठेवलय. प्रत्येक वस्तु म्हणजे एक आठवण आहे त्या-त्या काळातली.... कधीतरी एकटं त्यांच्यासोबत आठवणीत हरवायला बरं वाटत

मला पण उगाच काहितरी जपून ठेवायची हौस आहे. मला आलेले कुठलेही पत्र / पत्रिका / कार्ड मी फेकत नसे. घरी गेलो कि सगळे उपसून बसायचे आणि परत तसेच ठेवायचे. पुरात त्यातले बरेचसे वाहुन गेले ते बरेच झाले म्हणायचे.

अजूनही सवय गेली नाही, पण साधारण तीन चार महिन्यांनी झटका येतो, आणि खंडिभर कचरा बाहेर निघतो, प्रत्यक्षातलाहि आणि मनातलाही. परत नव्याने सगळ्याला सुरवात !!

माझ्या ना दाद, सर्व मनात आहे. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासुनच्या आठवणी, त्यामुळे मला मागे जायला खुप सोपे पडते. पण मी जास्त जात नाही , शक्यतो अलिप्त रहाते हल्ली (वयानुसार हळवेपणा पण वाढतो की काय कुणास असे वाटते म्हणुन). मुलीमधे पळुन गेलेल बालपण शोधते आहे सध्या Happy

ह्म्म्म्म.. कल्पना चांगली आहे. पण आगाउशी सहमत.

कधी कधी मात्र खुप कंटाळा आला की थंड हवेच्या कोंदट काडेपेटीतुन फिरण्याऐवजी दुचाकीवरुन एकटाच सुसाट सुटतो टीशर्टातुन ओसंडणार्‍या पोटाची तमा न बाळगता.... उगाच वाटतं घटकाभर विशी-बाविशीत गेल्यासारखं.. Wink मनातल्या मनांत बांधा सडपातळ झालेला असतो, टकलावर परत कोंबडा बांग द्यायला लागतो, उगाच पिचलेल्या forearm वरच्या शीरा तटतटु लागतात.... आणी सिग्नलला आलेल्या कुठल्यातरी शोडषेच्या, 'काका' अशा हाकेने समाधी भंग पावते. आधीच्या डबल स्पीडने निमुट गोठ्यात परततो आणी स्वतःच्या हाताने कासरा अडकवुन घेतो.

बाकी आगाउच्या पोस्टीमुळे माझ्या काही सगळ्यात आवडत्या रचनांपैकी एकीची आठवण करुन दीली. वाटलं म्हणुन लिहितोय इथे. धाग्याच्या मालकीणबाईंना अस्थानी वाटली तर काढुन टाकीन.

जो बीत गयी सो बात गयी..

जीवन मे एक सितारा था
माना वह बेहद प्यारा था
वह टूट गया तो टूट गया
अंबर के आनन को देखो
कितने इसके तारे टूटे
कितने इसके प्यारे छूटे
बोलो टूटे तारोंपर कब अंबर शोक मनाता है..
जो बीत गय़ी सो बीत गय़ी...

जीवन मे था वह एक कुसुम
थे उसपर नित्य निछावर तुम
वह सूख गया तो सूख गया
मधुबन की छाती को देखो
सूखी कितनी इसकि कलिया
मुरझायी कितनि वल्लरीया
पर बोलो सूखे फ़ुलोपर कब
मधुबन शोर मचाता है..जो बीत गयी सो बीत गयी..

जीवन मे मधु का प्याला था
तुमने तन मन दे डाला था
वह टूट गया त्तो टूट गया
मदिरायल का आन्गन देखो
कितने प्याले गिर जाते है
मिली मिट्टी मे मिल जाते है
जो गिरते है फ़िर कब उठते है
पर बोलो टूटे प्यालो पर कब मदिरायल पछताता है..जो बीत गयी सो बात गयी

मृदु मिट्टी के बने हुए है
मधुघट फ़ूटा ही करते है
लघूजीवन लेकर आये है
प्याले टूटा ही करते है
फ़िरभी मदिरालय के अंदर
मधू के घट है
मधू प्याले है
जो मादकता के मारे है
वो मधू लूटा ही करते है
वह कच्चा पीने वाला है
जिसकी ममता घटप्यालोपर
जो सच्चे मधू से जला हूआ, कब रोता है चिल्लाता है...
जो बीत गयी सो बात गयी..

मस्त धागा आहे..
मी असलाच काहीतरी विचार करत होते आणि अचानक माझेच विचार व्यवस्थित शब्दांत मांडल्यासारखा हा धागा समोर आला Happy

>>'भूतकाळात मन रमत नाही'
आगाऊ अनुमोदन. काहीकाही गोष्टी करण्याचा एक ठराविक काळ असतो. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी मनापासून केल्या/करत आहे आणि मन मारुन काहीच केले नाही/करत नाही. त्यामुळे काही 'हरवले' असे वाटत नाही. 'माझे' म्हणून जे काही होते ते अजूनही सोबत आहेच आणि जे सुटले त्याची वेळ संपली म्हणून सुटले. सुटलेले कधीकधी समोर येते त्याबद्दल तुटकपणा अजिबात जाणवत नाही. कधी काळी या गोष्टी केल्या, यातून आनंद मिळत होता याची फक्त गंमत वाटते एवढेच. Happy

परेश लिमये, बच्चन ना? छानच.

('विरंगुळा' मध्ये असल्याने हे वाहून जाणारे 'गप्पांचे पान' आहे.)

परेसभाय, मुंह की बात छीन ली!! मी याच कवितेचा रेफरन्स देत होतो.
प्रतिक्रिया वाचून मला वाटले होते की माझा विचार 'जेंडर स्पेसिफिक' आहे की काय, पण लालूच्या अनुमोदनामुळे तसे दिसत नाहीए.

माझी मी पेक्षा कधी कधी असेच पुर्वीचे जबाबदारी नसलेले दिवस आठवतात. ते दिवसभर काहीही हेतु न ठेवता (aimless) फ्रेंड्स बरोबर फिरणे,उगाच खरेदी करणे वगैरे.
परवाच सीडीचे खण लावताना मला एक बराच जुना सीडीचा सेट मिळाला. हा मी पुर्वी एकटी असताना वेळी नेहमी घरात कामं करताना लावायची. माझी बेस्ट मैत्रीणीने मला माझी आवडती गाणी डॉउन्लोड करून दिला होता. लगेच ती गाणी लावली नी एकटीच रमून गेली त्या दिवसात एका ठिकाणी बसून आठवणी काढत. अगदी ती ही गाणी कॉपी करत असतानाचा सगळा सीनही आठवला. आम्ही त्या दिवशी आक्खा दिवस मॉलमध्ये असेच फिरलो होतो. मग बरेच काही काही कपडे घेतले होते. व घरे येवून परत एकमेकींना घालून दाखवणे प्रकार, मग सगळी ज्वेलरी काढलेली, हा कपड्याचा ढिगारा, तिघी प्रत्येक कपडे उगाचच ट्राय करत होतो. गाणी एकदमच मोठ्या आवाजात लावलेली.. हसणे, मधेच पिझ्झा बनवला मूड आला म्हणून..जोक सांगणे. हि मैत्रीण मधूनच ये गाना चाहिये असे विचारत.. कॉपी करत होती...
मी, माझी बहिण व हि जवळची मैत्रीण रात्रभर हा पसारा आवरून झोपलो. हि गाणी एकली तसे हा दिवस आठवला. पुर्णपणे उनाड कधी कधी जगावेसे वाटते मात्र....गोड वाटले तो दिवस आठवून......

बाप रे बाप...

मी तर शोधलच नाहीये अजून स्वतःला. पण आजीचा हात डोक्यावरुन फिरला की काहीतरी हरवल्यासारख वाटण नाहीस होतं खरं थोड्यावेळापुरतं.

आगाऊला अनुमोदन ... आणि परेशला डायरेक्ट मुजरा ... Proud
मलाही हरवलेलं काही आठवत नाही ... दोन वर्षांपूर्वीच संपलेले कॉलेजचे दिवसही नाही.
चांगलं काही आठवायची सवय नसावी बहुदा मला ...
पण ज्यांना हि सवय आहे ... त्यांचा नक्कीच हेवा वाटतो मला !

दाद मस्त विषय, आज पाहीला. Happy
मला जुन्या मित्र्-मैत्रिणींची पत्र काढून वाचत बसलं तर, किंवा लहानपणीची बोबडे बोल वाली कॅसेट ऐकली तर, किंवा जुने फोटो पाहीले की होतं, पण तेवढ्यापुरतं. लहानपणीची कॅसेट म्हणूनच मी इथे कॉपी करुन आणत नाही, ती आईकडे जाऊनच ऐकण्यात जी मजा आहे ती इथे नाही. पत्र बघत बसलं की सुद्धा काही काही गोष्टी नव्याने जाणवतात, अगदी अक्षराचं वळण वगैरे पण मी मन लावून बघत बसते.
आशू म्हणाली तशी वही बहुधा सगळ्यांकडे असणार. माझे कपाट पण असेच मी कोणाला हात लावू न देता ठेवले आहे.
शिवाय एखादा विशिष्ट वास (पाउस पडल्यावरचा मातीचा वै) परत तस्साच जाणवला की एकदम काहीतरी हरवल्यासारखं किंवा निसटून गेल्यासारखं वाटतं क्षणभर !
शिवाय मन:स्विनी म्हणाली तसं मलाही काही गाणी = कॉलेजचा एकत्र अभ्यास (सबमिशन्स) आणि गुलाम अलींच्या गझल्स = ऑफीसात उशीरापर्यंत केलेलं काम , असे अगदी डोक्यात गणित आहे. गुलाम अलींची ओळख तेव्हाच झाली. त्या गझल्स ऐकल्या की एकदम ऑफीसात शांतपणे काम करत बसलोय असे फीलिंग येते.

हां पण दाद विचारतेय तसं " तुम्ही केलय असं काही... आपल्यातल्या आपल्याला गवसायला, घट्टं धरून ठेवायला?"" ह्याचं उत्तर नाहीये हे वरचं.. ते मलाही ऐकायला आवडेल सगळ्यांचं. मला असं मुद्दाम काही करावंसं वाटलं असं अजून कधी नाही झालं, जेव्हा होईल तेव्हा करेनच काहीतरी आणि लिहीन इथे.
(विषयांतर होतंय पण हे लिहीताना एकदम आठवलं, कधी कधी मला एखादी जागा फारच आवडली की मी नवर्‍याला म्हणते, आपलं भांडण झालं की मी 'मी पण' शोधायला इथेच येईन, मग तू सगळीकडे शोधून शेवटी इथे ये ;))

परेश, क्या बात है!
मवा, अगदी बर्रोब्बर!
पण लोक्स, हे 'बीत गयी' ते पुन्हा अनुभवण्याबद्दल नाही.... कुठेतरी आपले आप्ल्याला "ओळखण्यासाठी" काही खुणा आपणच ठरवलेल्या असतात.... आपल्याच नकळत. कधीतरी त्या खुणा परत लेऊन आपली "आपण" ही ओळख आप्ल्यालाच पटवून द्यावसं वाटतं....
माझ्या सखीचं लहानपणीचं कानातलं घालणं काय किंवा दुसरीचं दोन वेण्या घालणं काय.... कशात आपण आपल्याला सापडू असं आपल्याला त्यावेळी वाटतं... ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. प्रत्येक वेळी तीच गोष्टं असेल असं नाही.
पण असलं काहीतरी आम्ही केलं. तुम्हीही केलयत का? अन... काय ते?

हम्म्म, मी हरवलोय आणि त्या 'मी' ला शोधायचा प्रयत्न करतोय असे कधी झाले नाही हेच खरे, आणि एखाद्या वस्तूमधे मला मी सापडेन हे तर नाहीच नाही, तेवढी अ‍टॅचमेंटच नाही.

Pages