क्रोशा स्वेटर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

क्रोशाचा स्वेटरः

IMG_0384.jpg

लहान मुलांचे स्वेटर साधारण अंदाजे केले जातात. म्हणजे नवजात
नवजात - ४२ साखळ्या
तीन महीने - ६० साखळ्या
सहा महीने - ७२ साखळ्या
साखळ्या नेहेमी सहाने भाग जातील अशा घेतल्या जातात.

माप घेण्यासाठी खालील मापं घ्यावीत.

१. गळ्याचं माप
२. बाहीचं माप
३. उंची

अंदाजे गळ्याचं माप + एखादा इंच इतकी लांब होईल एवढी साखळी घालावी. साखळ्या मोजाव्यात व सहाने भाग जाण्यासाठी लागल्या तर साखळ्या वाढवाव्यात. म्हणजे मापाप्रमाणे १०० साखळ्या झाल्या तर दोन साखळ्या वाढवाव्यात म्हणजे सहाने पूर्ण भाग जाईल.

सहा भागाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे होते
१ भाग - पुढची उजवी बाजू
१ भाग - पुढची डावी बाजू
१ भाग - उजव्या खांद्याचा
१ भाग - डाव्या खांद्याचा
२ भाग - पाठीचे

साहीत्य: दहा नंबरची लोकरीच्या विणकामाची क्रोशाची सुई. गुलाबी आणि पांढरी लोकर. (एका वर्षाच्या मुलीच्या स्वेटरसाठी १०० ग्रॅम गुलाबी आणि पन्नास ग्रॅम पांढरी - हा ढोबळ अंदाज) या स्वेटरमधे वापरलेली लोकर वर्धमानची फोर प्लाय लोकर आहे. चित्रात दिलेला स्वेटर हा अगदी लहान बाळासाठीचा स्वेटर आहे त्याचीच कृती इथे देत आहे.

पहीली ओळ
१. बेचाळीस साखळ्या घालणे
२. वर दोन साखळ्या घालणे.

दुसरी ओळ
३. शेवटच्या दोन साखळ्या सोडून तीसर्‍या साखळीपासून प्रत्येक साखळीत खांब घालायला सुरुवात करावी. हे पूर्ण झाल्यावर खांबाची पहीली पट्टी तयार होईल.
४. दोन साखळ्या घालणे
५. पहील्या सहा खांबात खांब घालून घेणे
६. सातव्या खांबात मुखरी (दोन खांब + एक साखळी + दोन खांब)
७. पुढच्या सहा खांबात खांब, चौदाव्या खांबात मुखरी घालणे.
८. पुन्हा खांबात खांब २८ व्या खांबात मुखरी
९. पुढे खांबात खांब ३५ व्या खांबात मुखरी
१०. या प्रकारे पट्टी पाच भागात विभागली जाईल. दोन भाग पुढचे, दोन खांद्यावरचे, एक मोठा भाग पाठीकडचा.

तिसरी ते सहावी ओळ
११. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला दोन साखळ्या
१२. खांबात खांब आणि मुखरीत मुखरी घालून ओळ पूर्ण करणे.

(परमेश्वरा हे लिहायला फारच अवघड आहे Sad किचकट! त्यापेक्षा करुन चटकन होईल.)

सहा ओळी झाल्यावर खालीलप्रमाणे आकार तयार होईल.

square.png

एका बाजूने खुला आहे ती समोरची बाजू. चार ठीकाणी मुखर्‍या आल्या आहेत. तिरक्या रेघा दाखवल्या आहेत. मधल्या सरळ आडव्या रेघा आहेत तिथे दुमडल्यावर असे दिसत असेल. IMG_0384_0.jpg

दोन गुलाबी + दोन पांढर्‍या + दोन गुलाबी अशा ओळी झाल्या.

सातवी ओळ : सातव्या ओळीपासून विण सुरु होते.

IMG_0384_1.jpg

  • सातव्या ओळीची सुरुवात करताना दोन साखळ्या वगैरे न घालता एकदम सुरुवात करायची आहे. यात पहीला खांब सोडून दुसरा खांब सुईवर उचलून घेऊन खांब विणायचा आहे. --|-- इथे सरळ उभी रेष म्हणजे दुसरा खांब असं धरलं तर त्याच्या खालून (dotted line) जाणारी रेषा म्हणजे सुई आहे. अशा पद्धतीने हा खांब उचलून विणायचा आहे.
  • हा खांब विणल्यावर लगेचच शेजारी तीन खांब विणणे
  • यानंतर मधे तीन खांब सोडून चौथा खांब उचलून विणणे. पुन्हा शेजारीच तीन खांब विणणे. अशाप्रकारे विण कोपर्‍यापर्यंत चालू ठेवणे.
  • आता कोपर्‍यावर आल्यावर बाहीसाठी कोपरा जोडून घेणे आहे. अधिक समजावं म्हणून खालील चित्र पहा. बाण केलेल्या रेषा एकावर एक येतील आणि गोल केलेले दोन कोपरे जोडले जातील.

square_0.png

अशी विण घालत दुसर्‍या कोपर्‍यावर आल्यावर तोही जोडून घेणे. आणि मग मधे आल्यावर मधेही जोडून घेणे. म्हणजे आता दोन बाह्या आणि समोरचा भाग बटण लावतो तो असे तयार होईल.

ओळ ८ आणि पुढे शेवटपर्यत -

आठव्या ओळीपासून उचललेला खांब उचलून विणणे. आणि शेजारीच तीन खांब विणणे. पुढचा उचललेला खांब विणणे शेजारीच तीन खांब विणणे ही विण आता सतत घालत रहायचं त्यामुळे स्वेटर वाढत राहील. मधे रंग डीजाइनप्रमाणे बदलणे.

पुरेशी उंची झाली की शेवटची ओळ विणणे. इथे हवं त्याप्रमाणे डीजाइन करता येईल कमानी कमानी याव्यात म्हणून चार साखळ्या एक मुका खांब. किंवा एक मुका खांब दोन नेहेमीचे खांब पुन्हा एक मुका खांब असं.

शेवटची ओळ झाली की बंद करणे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

खुप सुंदर दिसतोय स्वेटर. मी कधी स्वेटर करायच्या फंदात पडले नाही कारण खुप वेळ लागतो ना त्याला. मी छोटो रुमाल, तोरण केली आहेत.

मीन्वा,

मी लोकर आणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्या सहा ओळी विणल्या. मस्त दिसते आहे. पुढे काय करायचे ते लवकर लिहा! वाट बघते आहे!

मीन्वा.
एकदम मनापासुन आभार. हेच जरा मोठ्या मुली (२ वर्ष) साठी करायचं असेल तर कितीने वाढ्वायचं ते पण लिहिशील.

नेटवर डिजाईन्स सर्च कर ना..

पुस्तकांच्या दुकानातही विचारलेस तर सापडतील खुप पुस्तके. माझ्याकडे इंदुमती रिंगे यांचे पुस्तक आहे (दोन सुयाम्वरचे विणकाम असे कायतरी नाव आहे). त्यात पण स्वेटर्सची खुप डिजाईन्स आहेत.

मला चांगलं पुस्तक नाही सापडलं. नेटवर बरंच काय काय आहे पण मला वाचून करायला जरा किचकट वाटतं.

लहान मुलांचे स्वेटर साधारण अंदाजे केले जातात. म्हणजे नवजात
नवजात - ४२ साखळ्या
तीन महीने - ६० साखळ्या
सहा महीने - ७२ साखळ्या
साखळ्या नेहेमी सहाने भाग जातील अशा घेतल्या जातात.

माप घेण्यासाठी खालील मापं घ्यावीत.

१. गळ्याचं माप
२. बाहीचं माप
३. उंची

अंदाजे गळ्याचं माप + एखादा इंच इतकी लांब होईल एवढी साखळी घालावी. साखळ्या मोजाव्यात व सहाने भाग जाण्यासाठी लागल्या तर साखळ्या वाढवाव्यात. म्हणजे मापाप्रमाणे १०० साखळ्या झाल्या तर दोन साखळ्या वाढवाव्यात म्हणजे सहाने पूर्ण भाग जाईल.

सहा भागाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे होते
१ भाग - पुढची उजवी बाजू
१ भाग - पुढची डावी बाजू
१ भाग - उजव्या खांद्याचा
१ भाग - डाव्या खांद्याचा
२ भाग - पाठीचे

मीन्वा.......हे असं लिहिणं खरंच अवघड आहे गं !! पण तू सोपं करुन लिहिलंस.
मी आतापर्यंत टेबल क्लॉथ, टेबल मॅट, शॉल, टिव्ही कव्हर असंच केलंय....त्यामुळे मापं वगैरे घेऊन कसं करायचं माहित नव्हतं. पण हे वाचून कळल्यासारखं वाटतंय Happy
माझी आई म्हणजे क्रोशाचा चालताबोलता खजिना आहे Happy

क्रोशा चे पुस्तक " क्रोशाचे विणकाम" प्रतिभा काळे. ह्याचे २ भाग आहेत. मी माझी मुलगी लहान असताना अनेक स्वेटर केले होते. पायमोजे केले होते. ह्याच पुस्तका वरुन. खुप छान छान विणी आहेत. प्रकार ही खुप आहेत. ( ह्या प्रतिभा काळे म्हणजे "अन्नपुर्णा" कार मंगला बर्वे यांच्या भगीनी)

मिन्वा ... धन्यवाद!! खुप छान डीझाईन आहे. हात शीवशीवायला लागले. करुनच टाकते. पुर्वी मी खुपच भराभर विणत असे. म्हणजे एका दिवसात पुर्ण मोजा जोड + टोपरं. बाळाच्या साध्या स्वेटर साठी ३ दिवस लागायचे. तेही फक्त ट्रेन मध्ये १ तासाच्या प्रवासात आणि लंच टाईम मध्ये विणुन. आता तो स्पीड झेपणार नाही बहुतेक. गॅप खुप झाली. रुमाल तर अनंत केले. शाली केल्या.

आता परत करुन बघते. आप ने मेरे दिल के तार छेड दिये...... पुरानी यादे ताजा हो गई.......

मिन्वा ... धन्यवाद!! खुप छान डीझाईन आहे. मी स्वेटर करत आहे. मोजा टोपरं कस करायच ते लिहा pl परत एकदा thanks

मला क्रोशाचं विणकाम येत नाही. Sad
पण शिकायची इच्छा आहे, आणि हा स्वेटर बघून तसा करून बघावासा वाटतोय. जमल्यास ते प्रतिभा काळे यांचं पुस्तक आणीन पण ते खांब आणि साखळ्या शिकायला पाहिजेत ना!
फारच गोड आणि सुंदर दिसतोय हा स्वेटर. आणि ते कॉम्बिनेशन पण फार सुंदर दिसतंय! मस्त, खूप आवडला.

मीन्वा, खूप गोड दिसतोय स्वेटर. रंग-संगती आणि वीण दोन्ही अगदी बेष्टपैकी!

आपण एक वेगळा धागा सुरू करुया का विणकामाचा? सगळ्यांची डिझाईन एका जागी बघायला मजा येईल.

चालेल अनया. करतेस का नवा धागा सुरू कि केला आहेस? मी पण घालते नविन काहीतरी करायला त्या निमित्ताने. Happy बाकी सगळ्यांना प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.