किलबिल :- श्रेयानचा दगडुशेठ बाप्पा

Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2010 - 06:34

छोट्या मुर्तीकाराचे नाव : श्रेयान माळवदे.
वय : साडेपाच वर्षे
मुर्ती : खेळायच्या क्ले ने बनवली आहे.
आमची मदत : फक्त फोटो काढणे.
shrey_ganesh.jpg

आणि ही दगडूशेठ सारखी बप्पांची सोंड Happy
shrey_ganesh_sond.jpg

हा गणपती पुर्णपणे श्रेयान ने स्वतःच बनवला आहे. मुकुटाला आईचे कानातले लावायची आयडीया पण त्याचीच. आधी त्याला सोंडेवर लावायचे होते कारण त्याने दगडूशेठ सारखी गोल वळलेली सोंड बनवली म्हणून.. पण ते सोंडेवर खूप मोठे वाटले कानातले म्हणून मग स्वतःच मुकुट म्हणून लावले. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना धन्यवाद !

मागच्या वर्षी शाळेत क्ले मोल्डींग स्पर्धा होती तेव्हा श्रेयान ला पहिला नं मिळाला होता. त्याने फार सुंदर मिकी माउस बनवला होता असं मला त्याच्या टीचरने सांगितलं. मी तेव्हा हॉस्पिटलाईज असल्याने त्याचे फोटो नाहियेत. Sad

मायबोली ला देण्यासाठी चित्र काढ .. असा लगागा लगागा लाउनही त्याने ह्यावेळी एकही चित्र काढुन दिलं नाही. साहेब सोसायटीच्या गणेशोत्सवात लई बिजी Happy म्हणे विसर्जन झाल्यावर काढ्तो.. आणि फारच भुण्भुण केली की मग काडीपेटीएवढं चित्र अर्ध्या मिनिटात काढुन खाली बाप्पाकडे पळून जायचा.

गणपती बाप्पा त्याचा फार आवडता देव आहे. बाप्पाचं विसर्जन त्याला अजिबात आवडत नाही. हिरमुसला होउन रडतो. आई बाप्पा का गं जातात ? असं पुढच्या आठवडाभर विचारत रहातो.
त्याची काही चित्र इथे प्रतिसादात टाकते.

DSC03223.JPGDSC03222.JPGDSC03194.JPGDSC03192.JPGDSC03224.JPG
नाग बघून उंदीर घाबरला.. बाप्पा पडले .. मोदक सांडले.. चंद्र हसला वगैरे.. Happy

DSC03227.JPG
शंकरबाप्पांचे केस असे का ? तर म्हणे कैलासपर्वतावर खूप वारा असतो. Lol

100_2702.jpgDSC03228.JPG

ही गणेशा फॅमिली सगळ्यांची वाहने पण आहेत. कार्तिकेय खेळतोय बाजुला आणि बालगणेश आईजवळ Happy
100_2695.jpg
ही रेखाचित्रे श्रेयान तिन साडेतिन वर्षांचा असताना त्याचे काढली
आहेत. त्या आधी गणपतीच्या गोष्टींची सिडी बघायचा तेव्हा. मग सारखे प्रश्न सुरु झाले गणपतीच्या बाबांनी त्याचे डोके का कापले ? ई. ई. म्हणून सीडी दाखवणे बंद केले.

100_2700.jpg

सगळीच चित्रे छान आहेत!
गणेशा फ्यॅमिली तर एकदमच भन्नाट कल्पना!!! विष्णु आणि शेषनाग हे कल्पनेच्या पलीकडे!!!
जबरदस्त आहे श्रेयानची कल्पनाशक्ती आणि चित्रकला!

अरे वा........ खरंच कसली कल्पनाशक्ती आहे रे श्रेयान तुझी...... जबरी !!
असाच चित्रं काढत रहा आणि आईला सांग इथे आम्हाला दाखवायला Happy

बाजुची माळेची सजावट सोडता संपुर्ण मुर्ती त्यानी बनवली आहे, दगडुशेटची मुर्तीच बनवायची होती त्याला, पण सोंडेवर असत तस काही आम्हाला मिळाल नाही. मग मुकुट बनवला त्याचा Happy

तो अंगठा खरच छान आला आहे, मी पण ऑबजर्व केला नव्हता. Happy विचारतो मुद्दाम केला आहे का? त्याची निरिक्षण क्षमता भन्नाट आहे Happy
बर्‍याच वेळा हे असं का? विचारल्यावर तो सांगतो "हे असच असतं तुंम्हाला माहित नाही?" शंकर बप्पांचे केस हे एक उदाहरण Happy

श्रेयान, तुला खूप शाबासकी! Happy सगळ्याच कलाकृती मस्त आहेत!
कैलास पर्वतावर वाहणार्‍या वार्‍याचे लॉजिक जबरी! Lol

सगळी चित्र अप्रतिम... चित्राचा आकार आणि वळण याची योग्य जाण उपजतच आहे... मस्तच Happy

साडेपाच वर्ष.... वा.. वयाच्या मानाने अतिशय सुंदर कल्पकता... Happy
एकदम मस्त , गोड आहे बाप्पा... Happy
श्रेयान अभिनंदन.... मस्त बाप्पा बनवला आहेस.

Pages