मायबोलीची १४ वर्षे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १४ वर्षे पूर्ण केली. गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

गेल्या एका वर्षात प्रकर्षाने जाणावलेली गोष्ट म्हणजे नवीन निघालेल्या/निघत असलेल्या मराठी वेबसाईटस. या सगळ्या वेबसाईटचं मायबोलीकडून स्वागत ! इतर भाषांच्या तुलनेने, मराठीत अजूनही खूपच कमी वेबसाईट्स आहेत आणि जितक्या जास्त तितक्या मराठी भाषिकांसाठी चांगलेच आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाचा मुख्य उद्देश नवीन उपक्रम सुरु करण्यापेक्षा आहेत ते जास्त लोकप्रिय करणे, पाया जास्त भक्कम करणे असा होता. त्यामुळे फारसे नवीन उपक्रम सुरु केले नाहीत.

मायबोली.कॉम

लाईव मिंट (वॉल स्ट्रीट जर्नलशी संलग्न) या इंग्रजी दैनिकाने संपूर्ण स्वतंत्र संशोधनावरून असा निष्कर्ष काढला की मायबोली ही फक्त मराठीतलीच नाही तर देवनागरीतली पहिली वेबसाईट आहे. त्याबद्दल त्यांनी मायबोलीवर एक खास लेखही प्रकाशित केला. एका नावाजलेल्या दैनिकाकडून असा उल्लेख झाला ही मायबोली आणि मायबोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मायबोलीवर आता सर्रास देवनागरीत आयडी दिसतात. आणि ही सोय याच वर्षात (Nov 2009) सुरु झाली.

गणेशोत्सव २००९
पन्ना (सपना पाध्ये) यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २००९ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला.

दिवाळी अंक २००९
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सूवर्णमहोत्सवी वर्षात, स्वाती_आंबोळे यांच्या नेतृत्वाखाली आपण २००९ चा अंक प्रकाशित केला. गेले दहा वर्ष सतत चालू असलेली ही एक सांस्कृतिक चळवळच म्हणता येईल. गेल्या ५० वर्षात , महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आढावा घेणारं "प्रिय अमुचा.." हे अभ्यासपूर्ण सदर हे या अंकाचं एक वैशिष्ट म्हणता येईल.

मदत समिती आणि स्वागत समिती
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

स्वयंसेवक व्यवस्थापक
रुपाली महाजन (रुनी पॉटर) यांनी या जबाबदारीचा स्विकार केला आहे. सर्व उपक्रमांच्या स्वयंसेवक व्यवस्थापनाचं काम त्या बघतात.

संयुक्ता
फक्त एका वर्षापूर्वी, वैशाली राजे (लालू) यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या "संयुक्ता" ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. फक्त स्त्रियाच या ग्रूपच्या सभासद असतील याची खात्री करून मगच त्यांना सभासद केलं जात असल्याने, सभासदांमधे एक वेगळा विश्वास निर्माण होतो. संयुक्ताच्या सभासदांनी मराठी भाषा दिवस, महिला दिवस, महिलांसाठी सर्वे, वेगळ्या क्षेत्रातल्या कर्तबगार स्त्रियांशी संवाद आणि इतर कितीतरी फक्त सभासदांसाठी असलेले उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.

मराठी भाषा दिवस
या वर्षी पहिल्यांदाच आपण मराठी भाषा दिवस साजरा केला. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम अगदी थोडा कालावधी असतानाही त्याची जबाबदारी घेतल्याबद्दल संयुक्ता प्रशासनाचे आभार.

अक्षरवार्ता
चिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

वर्षाविहार २०१०
विनय भिडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत केलेल्या वार्षिक वर्षाविहार मेळाव्याला आजपर्यंतची सर्वाधिक उपस्थिती मायबोलीकरांनी लावली.

टीशर्ट २०१०
विनय भिडे यांच्या नेतृत्वाखाली टीशर्ट समितीने तयार केलेले टिशर्ट मायबोलीकरांना खूप आवडले. पल्ली (पल्लवी देशपांडे) यांनी टिशर्टसाठी सुलेखन तयार करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

जीटीजी (GTG)
वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी मायबोलीकरांची संमेलने होत असतात. मुंबई-पुण्याबरोबरच बंगळूरू, न्यूजर्सी, अटलांटा इथेही सातत्याने संमेलने होऊ लागली आहेत. मध्यपूर्वेत गेल्या वर्षात पहिल्यांदाच संमेलन झाले.
वॉशिंग्टन डीसी इथे झालेल्या पहिल्या मोठ्या संमेलनात अमेरिकेतल्या १२ राज्यातून मायबोलीकर उपस्थित होते.

मराठी उद्योजक
ज्याना स्वत:चा उद्योग सुरु करायचा आहे, व्यावसायिक नेटवर्किंग करायचे आहे त्या मायबोलीकरांसाठी आपण "मराठी उद्योजक" ग्रूप या वर्षात सुरु केला आहे.

खरेदी विभाग

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers)
या वर्षात मेनका प्रकाशन, प्रशांत देगावकर, दिपाली देशपांडे, Eterne Gold, माईंड अँड मिडिया, समीर आगटे या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण २१ झाले आहेत. मायबोलीचे एक व्यावसायिक भागिदार "विहंग प्रकाशन" यांनी मायबोलीवर पुस्तके विक्रीला ठेवल्यावर त्यांना आलेल्या चांगल्या अनुभवावर आधारित एक प्रशस्तीपत्रही दिले आहे.

खरेदी विभागात या वर्षी आपण भारतातही पुस्तके विकायला सुरुवात केली आहे आणि भारतातल्या मायबोलीकरांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.


जाहिराती विभाग

जाहिराती विभागात (मायबोलीवर इतरत्र होत असलेल्या बदलांच्या तुलनेत) फारसे बदल गेल्या वर्षात झाले नाही. या उपक्रमासाठी मदत केल्याबद्दल श्री दिपक ठाकरे (साजिरा) यांचे आभार.

कानोकानी.कॉम
कानोकानी ही संकल्पना अजून रुजतेय. बर्‍याचा जणांना अजून कानोकानीचा फायदा कसा करून घ्यावा हे पुरेसे समजले नाहीये हे लक्षात आल्यावर कानोकानी समितीने नियमितपणे तिथे बदल करायला सुरुवात केले आहेत. कानोकानीवर येणारा वाचकवर्ग हळूहळू वाढतो आहे. जे वाचक नेहमी मायबोलीवर इतरत्र येत नाहीत ते तिथे येत असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकाला पहिल्यांदाच भेट देणारे २१७ नवीन वाचक हे कानोकानीवरच्या लिंकवरून आले होते. म्हणजे कानोकानी नसते तर मायबोलीचा दिवाळी अंक असतो हे कदाचित त्यांना माहिती झाले नसते.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, हितगुजवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात. मार्चमधे मायबोलीचा सर्वर बंद पडला तेंव्हा सुदैवाने कुठलाही मजकूर वाया न जाता त्याला पुन्हा जिवंत करता आले.

मधूनच काही वाचकांना " Server Not available due to Technical reason" अशा अर्थाचा संदेश गेल्या काही महिन्यात यायला लागला आहे. मायबोली वरच्या वाढत्या वावराचा हा एक परिणाम आहे. सर्वरची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

भविष्यातले उपक्रमः
मायबोलीने अगदी सुरुवातीपासून "आधी केले, मग सांगितले" हे धोरण ठरवून घेतले आहे. त्यामुळे नवीन उपक्रमांबद्दल आधी सांगणे योग्य होणार नाही. साधने, वेळ यांच्या अभावामुळे संयोजन केलेले अर्धेच प्रकल्प पुढे जातात किंवा जे जातात त्याना वाटते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो. एका अर्थाने हे त्या उपक्रमांसाठी आणि संस्थेच्या वाटचालीसाठी योग्य असते कारण अशा अवघड वाटचालीतून पार पडणारे प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता ही वाढते.

आम्ही कोण मधे म्हटल्याप्रमाणे "सर्वात मोठी, सगळ्यात उत्कृष्ट,सर्वसमावेषक" मराठी वेबसाईट करण्याचा आमचा मानस नाही. जितकं शक्य आहे तितकं करायचं पण मनापासून करायचं इतकंच.

-----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती: रुनी पॉटर, नंद्या

मराठी उद्योजकः
मिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली)

गणेशोत्सव २००९ - (पन्ना) -सपना पाध्ये , (पराग) - पराग सहस्रबुद्धे, (अल्पना) - अल्पना खंदारे, (बस्के) - भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर, (चंपक) - भारत करडक, (सिंडरेला) - तृप्ती आवटी, (राहुल) - राहुल जोग

दिवाळी अंक २००९
स्वाती आंबोळे (स्वाती_आंबोळे), गजानन देसाई (गजानन), कौतुक शिरोडकर (कौतुक शिरोडकर), मंजुषा वैद्य (मृण्मयी), परागकण, ट्युलिप गोखले(ट्युलिप), विनय देसाई (परदेसाई)

अक्षरवार्ता
अश्विनी के, नंद्या, साजिरा, श्रद्धा, अनीशा, आशूडी, rar, अंशुमान सोवनी

संयुक्ता व्यवस्थापनः
लालू, शैलजा, स्वाती_दांडेकर, स्वाती_आंबोळे,रूनी पॉटर,anudon,अदिती,मैत्रेयी,रैना,सीमा

संयुक्ता सभासदत्व स्वयंसेवकः
रैना, नंदिनी, नीधप, शर्मिला फडके, अनिता, सशल, पूर्णा, भाग्य, शर्मिला, रुनी पॉटर, संपदा, भाग्यश्री

मराठी दिवस २०१०
अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा, संयुक्ता व्यवस्थापन, स्वाती आंबोळे

महिला दिन २०१०
अल्पना , रैना , anudon, पौर्णिमा , अनिता, नंदिनी, मृण्मयी, मृदुला, रूनी पॉटर, वर्षा, सखीप्रिया, स्वाती_आंबोळे, सुनिधी, मीन्वा, रमा, क्षिप्रा, अश्विनीमामी आणि केदार

वर्षाविहार २०१०
MallinathK, sameer_ranade, अश्विनी के, असुदे, कविता नवरे, डुआय, दक्षिणा, नील वेद, प्रणव कवळे, मधुरा भिडे, मनिषा लिमये, राज्या, ललिता-प्रीति, विशाल कुलकर्णी, सचिन_साचि

टीशर्ट २०१०
मंजूडी, दक्षीणा, परेश लिमये, मेधा२००२, anandsuju,

कानोकानी
अश्विनीमामी, आऊटडोअर्स, चंपक, डॅफोडिल्स, नात्या, मन-कवडा, महागुरु, विनायक, सायो

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मृ, मम.. Happy

मायबोलीचे, मायबोली टिमचे आणि मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप सार्‍या शुभेच्छा! मायबोली अशीच बहरत राहो. Happy

संपूर्ण मायबोली टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. Happy
कुठलाही नविन उपक्रम हाती घेण्याआधी पुरेसा अभ्यास (groundwork) केला जातो आणि त्यामुळेच उपक्रम यशस्वी होतात. हेच मायबोलीच्या बाबतीत खूप आवडतं. Happy

सही. नेटजगतात चौदा वर्ष म्हणजे केवढा दीर्घ काळ! तीन पिढ्यांहून जास्त.

लॉन्ग लिव्ह मायबोली!!

>>आम्ही कोण मधे म्हटल्याप्रमाणे "सर्वात मोठी, सगळ्यात उत्कृष्ट,सर्वसमावेषक" मराठी वेबसाईट करण्याचा आमचा मानस नाही. जितकं शक्य आहे तितकं करायचं पण मनापासून करायचं इतक>>मला वाटते ह्यातच मायबोलीचे यश सामावले आहे. इतरही मराठी वेबसाईट असताना फक्त "मायबोली"चे सभासदत्व घ्यावेसे वाटले ह्यातच सर्व काही आले.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

मायबोलीचे १५ व्या वर्षात पदार्पणाबद्दल हार्दिक अभिनंदन... आणि पुढील वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा...
मायबोलीचे, मायबोली टिमचे आणि मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप सार्‍या शुभेच्छा! मायबोली अशीच बहरत राहो.

अनुमोदन.

माझ्या आयुष्यातील, गेल्या दहा वर्षातील सर्व आनंदमय गोष्टींचा संबंध मायबोलीशी आहे. मायबोली वाचणे, लिहीणे ही माझ्या दिनचर्येतील अत्यंत आनंददायक गोष्ट.

ऑस्ट्रेलिया पासून भारत, यूरोप, अमेरिका येथील कित्येक बुद्धीमान व गुणसंपन्न लोकांशी माझा इथे परिचय झाला. त्यांची सहनशीलता अमाप. म्हणूनच मी इथे इतके वर्षे टिकलो.

मायबोली अमर राहो.

सगळ्या मायबोली टीमचे अभिनंदन!!
मायबोली मुळे खुप नवीन मित्र मिळाले. खुप शिकायला मिळालं, मिळतय!
मनःपुर्वक आभार Happy

मायबोलीला अनेक शुभेच्छा!!!
अ‍ॅडमीन टीम आणि स्वयंसेवकांचे आभार!
मायबोलीबरोबरच माझं हे पहिलच वर्ष होतं पण प्रत्येकवेळी मायबोलीला भेट देताना 'आपल्या लोकांना' भेटल्याचा आनंद मिळतो. 'संयुक्ता' सारख्या उपक्रमांची खुप मदत झाली.
या वेळीच्या गणेशोत्सवात लहान मुलांचा प्रतिसाद आणि आमच्या ५ वर्षाच्या मुलीला मायबोलीवर जाऊन गोष्टी ऐकाव्याशा वाटणे, प्रचि बघवेसे वाटणे हे बघुन मायबोली शतायुषी होणार यात शंका नाही! आमच्यासारख्या लोकांसाठी मुलांना मराठी भाषेची जवळीक निर्माण करण्यात मायबोली नक्कीच मोलाची मदत करते आहे!

महिलादिना अंतर्गत काही स्वयंसेवकांची नावे राहिली होती. त्याबद्दल दिलगीर आहोत. ती नावे आता महिला दिनाच्या यादीत प्रकाशित केली आहेत.

सुंदर आढावा. मायबोलीचे आणि मायबोली प्रशासनाचे आभार मानावे तितके कमीच.
यापुढच्या वाटचालीलाही शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.

मस्त मस्त मस्त!
खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन......
प्रगतीला हातभार लावायला जमेल तसा आपला हात वर...
ढोल ताशाच्या गजरात एकेक गोष्ट वाचावी असा लेख आहे हा. एक साउंड फाइल टाकून द्या बरोबर.. Happy

हा लेख बाहेरच्या व्यक्तींनाही दिसतो का. लॉग इन न करता?
लिंक द्यायची आहे म्हणून...

Happy वरच्या सर्वांना अनुमोदन.
प्रशासकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार. आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!

मायबोलीचा विजय असो. Happy

अ‍ॅडमिन, वेबमास्टर आणि इतर सर्व मायबोली व्यवस्थापकाना इतके छान काम सातत्याने केल्याबद्दल शतशः धन्यवाद. मायबोली हे आपलं घरच वाटावं इतकं जवळचं झालेलं आहे.

लै भारी!

मायबोलीचे १४ वे वर्षे चंपक कुटुंबीयांच्या आयुष्यातील एक चिरस्मरणीय वर्ष आहे. भारतातील कुटुंबापासुन दुर असताना दुरदेशी आमच्या घरी नवीन बाळ जन्माला येत असताना, जी मायेची ऊब मायबोली परिवाराने दिली, तिला आम्ही जन्मभर विसरणार नाहीत.

याच वर्षी मायबोली वरुन प्रेरणा घेऊन मी एक मराठी संकेतस्थळ सुरु केले. अनेक मायबोलीकरांनी आणि उद्योजक गटाच्या सदस्यांनी त्या कामी मला मदत केली.

मायबोलीच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा आणि त्या वाटचालीत खारीचा वाटा उचलायला सदैव तत्पर....

चंपक, चंपी आणि निमिष Happy

>>> माझ्या आयुष्यातील, गेल्या दहा वर्षातील सर्व आनंदमय गोष्टींचा संबंध मायबोलीशी आहे. मायबोली वाचणे, लिहीणे ही माझ्या दिनचर्येतील अत्यंत आनंददायक गोष्ट.
अनुमोदन Happy
माझ्याही आयुष्यातील दुसर्‍या साडेसातीचा भयानक अवघड कालखण्ड सहन करताना वाळवण्टातील "ओअ‍ॅसिस" की कायसेसे म्हणतात त्याप्रमाणे मला तो काळ कण्ठायला मायबोलीवरच ताकद मिळत राहिली. Happy

मायबोली सन्चालक, सभासद, स्वयंसेवक मण्डळीन्चे मनःपूर्वक आभार अन भावी वाटचालीस शुभेच्छा!

आपल्या मायबोली संकेतस्थळाने सलग पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केल्याबद्दल मायबोली व्यवस्थापन आणि मायबोलीकरांचे हार्दीक अभिनंदन..
अनेक चांगले उपक्रम यावर्षी राबविल्याबद्दल मायबोली व्यवस्थापन आणि सर्व स्वयंसेवकांचे खास आभार.
आणि अशीच वाटचाल यापुढेही अखंड चालु राहो यासाठी मायबोलीला अनेकविध शुभेच्छा... Happy

मायबोलीचे हार्दिक अभिनंदन ! अ‍ॅडमीन व सर्व स्वयंसेवकांचे आभार.
मायबोली परिवाराची अशीच अखंड वाटचाल चालू राहो. Happy

Pages