वज्रगड (वसईची 'हिराडोंगरी' )

Submitted by Yo.Rocks on 16 September, 2010 - 14:02

ठाणे जिल्ह्यात वसई, विरार ते पालघर या पटट्यात नाही म्हटले तरी बरेच गड आहेत.. त्यांचा विस्तार वा इतिहास फारच छोट्या स्वरुपात असल्याने (अपवाद वसईचा किल्ला) तसे ते दुर्लक्षितच राहिले... वसईचा किल्ला सोडला तर बाकी गड तसे अज्ञातच राहिले.. येथील बरेच गड हे आजुबाजूच्या प्रदेशावर पहारा देण्यासाठी वापरले गेले होते.. नि त्यातलाच असा एक गड "वज्रगड" !! ("पुरंदर" चा शेजारी नव्हे !) मलाही हे नाव माहित नव्हते.. खरे तर मी वसईला 'हिराडोंगरी' नावाची एक टेकडी आहे जिथुन सुंदर देखाव दिसतो हे ऐकुन होतो.. नि तिथे जाण्याचा मार्ग नेटवर शोधतानाच कळले की या टेकडीचे खरे नाव वज्रगड आहे.. "Fort was built for keeping a watch on movements between Vasai Fort & Arnala Fort during Vasai Mohim of Peshavas during the period 1737 - 1739. " अशी माहिती नेटवर सापडली नि नवल वाटले !

रमझान ईदची सुट्टी होती सो त्यादिवशी सकाळी अर्नाळा किल्ला करु नि तिथूनच मग हिराडोंगरीवर जाउन येउ असे ठरवले.. सोबतीला योगी (योगेश२४) होताच.. पण अर्नाळ्याचा समुद्रकिनारा गाठेपर्यंत बर्‍यापैंकी उशीर झाला.. आमची वेळ चुकली नि समुद्राच्या भरतीची वेळ सुरु झाली.. किल्ल्यावर जाण्यासाठी किनार्‍यावरुन लहान बोट असते.. पण इथे जेट्टीची सोय नसल्याने गुडघाभर पाण्यात उतरावे लागते.. समुद्राच्या जोरकस लाटांवर हेलकावे खाणार्‍या ह्या बोटीत चढणे म्हणजे कसरतच.. ती कोणत्याही क्षणी उलटेल असे वाटत होते.. त्यातच प्रवाश्यांची धांदल.. आम्ही पण पॅन्ट गुडघाभर फोल्ड करत, कॅमेर्‍यांचे जीव सांभळत पुढे सरावलो.. त्यातच एक लाट आली नि पाणी चांगलेच कमरेच्या वरती गेले.. चढताना कळले की ही शेवटची बोट मग थेट संध्याकाळी परतावे लागेल जे आम्हाला शक्य नव्हते.. दुसर्‍या दिवशी गणेश चतुर्थी असल्याने लवकर परतायचे होते.. त्यामुळे वैतागत पाण्यातून बाहेर पडलो.. जल्ला अर्नाळ्याचा किल्ला राहिला पण समुद्र भिजवून गेला..
तिथेच मग हवा खात कपडे सुकवत थोडेफार फोटोसेशन केले..


(किनार्‍यावरुन दिसणारे अर्नाळा बंदर नि तेथील सुंदर मंदीर !)
---------------------------------


(अर्नाळा किल्ल्याचा एक सुटा भाग.. पहारा ठेवण्यासाठी वापरात असावा..)
------------------------------------
अर्नाळा किल्ल्याला दुरुनच टाटा करुन आम्ही वज्रगड गाठायचे ठरवले.. तिथूनच अर्नाळा-वसई-अर्नाळा एसटी पकडून रवाना झालो.. अर्ध्यातासातच आम्हाला टेकडी दिसली नि समजले स्टॉप आला.. खरे तर स्टॉप नव्हता पण ही टेकडी तेथे असणार्‍या दत्तमंदीरामुळे बर्‍यापैंकी प्रसिद्ध आहे.. वसईत गिरीज गावात या टेकडीला 'हिराडोंगरी' वा 'गिरीजडोंगरी' अशी ओळख आहे.. "वज्रगड" हे खरे नाव लोकांना कितपत ठाउक असेल हा प्रश्नच आहे.. उगीच घोळ नको म्हणून आम्हीसुद्धा हिराडोंगरी म्हणूनच स्टॉप सांगितला..

आम्ही उतरलो तिकडे येणार्‍या जाणार्‍या गाड्यांव्यतिरीक्त काहीच वर्दळ नव्हती.. खुप शांत परिसर वाटला.. तिथूनच एक पाउलवाट दिसली.. आम्ही त्याच वाटेने पुढे गेलो.. पण जेमतेच पाच सहा पावले चाललो नि हिराडोंगरीचा फलक दिसला.. या फलकावर नेहमीच्याच दुर्लक्षित होणार्‍या सूचना होत्या.. उदा. 'हा पिकनीक स्पॉट नाहिये, कचरा करु नका' इत्यादी. तर काही दुर्लक्षित करण्यासारख्या सूचना होत्या.. 'ही खाजगी मालमत्ता आहे..' 'इथे कॅम्प वा ग्रुपने येण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे'.. 'वाटेत घर लागेल तिथे परवानगी घ्यावी.. जास्त वेळ थांबू नये'.. 'मंदीराचे वा परिसराचे वा परिसरातील पक्षीप्राण्यांचे फोटो काढू नये !!' एवढ्या सगळ्या "हुकूमावरुन" च्या सूचना होत्या.. पण गडाचे नाव वा मंदीराची वेळ कुठेच दिसली नाही..(सांगायचे तर हा परिसर आता खाजगी मालमत्तेमध्ये येतो.. साहाजिकच दादागिरी दाखवणारच..)


(टेकडीवर जाणारी पाउलवाट)
-------------------------------------

आम्ही पुढे घर येइल तेव्हा बघू म्हणत पुढे गेलो.. तो फलक पार केला नि बाजूलाच फुललेल्या तेरड्याने लक्ष वेधून गेले.. साहाजिकच आम्ही कॅमेरे बाहेर काढले नि इथूनच नियमाची तोडफोड करण्यास सुरवात केली..
त्याचा पुरावा इथे खाली देत आहे..

------------------------------------

-------------------------------------

-------------------------------------

------------------------------------
या तेरड्यावरती भुणभूण करणारे भुंगे टिपण्याचा माझ्याकडून प्रयत्न झाला पण निराशाच झाली.. तरी नशिब फुलपाखरे तरी सवडीने पोझ देत होते.. तिथे दुसरीकडे योगीसुद्धा आपल्या कामात मग्न होता.. (त्याचे काम तो प्रदर्शित करेलच म्हणा.. Happy )


-----------------------------------

आम्हाला वाटेत डावीकडे घर दिसले पण ते थोड्या आतल्या बाजुस होते.. त्यामुळे परवानगी देणारा कोण समोर दिसलाच तरच घ्यायची म्हणत पुढे गेलो.. कडक उन्हात आजूबाजुची हिरवळ चमकत होती... अधुनमधून त्याच हिरवाईतून काही रानफुले डोकावून साद देत होती.. फुलपाखरांचा मस्त विहार सुरु होता हे सांगणे नकोच.. वाराही बर्‍यापैंकी होता.. अशा वातावरणात आम्ही दोघे अगदी मस्तपैंकी कासवगतीने चालत होतो.. दहा पंधरा मिनीटातच आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो.. नि तेथूनच मंदिराचे पहिले दर्शन झाले..

खरे तर ही म्हणावी तितकीपण उंच टेकडी नाहिये.. जेमतेम दहा पंधरा मिनीटात वरती पोहोचलो.. वाटही अगदी सोप्पी आहे..
-------------------------------


इथेच एका बाजुला गडाचे काही नामशेष आढळले..
----------------------------
आम्ही वरती पोहोचलो नि आजुबाजूचा सुंदर परिसर न्याहाळण्यात दंग झालो.. आम्ही पोहोचेस्तोवर दुपार झाली होती त्यामुळे मंदीर बंद होते.. एक जोडपे सोडले तर बाकी कोणीच नव्हते.. (तेव्हा फलकावर 'जास्त वेळ का थांबू नये' या सूचनेचे प्रायोजन कळले..:) )
हे मंदीर दिसायला खूपच सुंदर आहे.. बांधकाम छानच आहे.. आम्हाला श्रीदत्तगुरुंचे दर्शन झाले नाही पण मंदीर नि आजुबाजूचा परिसर बघून प्रसन्न वाटले..

-----------------------------

------------------------

-------------------------

------------------------

---------------------------

---------------------------
या गडावर पाण्याची टाकी वगळता बाकी काही पुरावे शिल्लक नाहीत.. एका झाडाखाली मात्र हनुमानाची प्राचिन मुर्ती ठेवली आहे.. बाकी परिसर अगदी स्वच्छ आहे..


(पाण्याचे मोठे एकमेव टाके)
------------------------

इथूनच वसईचा संपुर्ण परिसर नजरेस पडतो..

------------------------


(याच मंदीराच्या मागच्या भिंतीवर हे साहेब विसावले होते )

---------------------

------------------------

--------------------
मंदीराच्या सभोवतालचा असलेला परिसर ही टेकडीवरची मो़कळा जागा.. फिरताना लक्षात आले आम्ही मागच्या बाजून चढुन आलो होतो.. कारण एका बाजूस पायर्‍यांची वाट दिसली.. तर दुसरीकडे पायर्‍यांचे अर्धवट बांधकाम दिसले.. जागा जरी छोटी असली तरी त्या परिसरात जादू आहे.. मन अगदी प्रसन्न होउन गेले.. त्यातच पावसामुळे चोहीकडे हिरवाई पसरल्याने टेकडीवरुन पाहताना छानच वाटत होते..

---------------------
दिडेक तास व्यतित केला नि आम्ही निघालो.. उतरताना त्या अर्धवट बांधकाम केलेल्या पायर्‍यांवरुन उतरलो..

--------------------
उतरताना वाटेत एक झाड दिसले.. त्याबद्दल योगेशने माहिती दिली.. थोडे फोटोसेशन झाले नि आम्ही मार्गी लागलो..


( नाव आठवत नाहीये.. योगेश सांगेलच..:) )
------------------

आमची ही वाट नंतर पुन्हा त्याच वाटेला जाउन मिळाली जिथून आम्ही वरती आलो होतो.. काही क्षणातच आम्ही रस्ता गाठला... नि रिक्षा पकडून वसई रेल्वे स्टेशनची वाट धरली... विचार होता चिंचोटी धबधबा जमला तर बघून यायचा.. पण वेळेअभावी नि उकाड्यामूळे तो प्लॅन रद्द केला नि परतीची वाट धरली..

हा गड जरी फारच छोटा असला तरी एका अनोळखी जागेशी ओळख झाली होती.. नि आवडली देखील.. Happy
तुमचे जर वसईत (पश्चिम) जाणे झाले तर नक्कीच या वज्रगडाला भेट द्या.. तुम्हालाही आवडेल.. फक्त एवढच की चौकशी करताना हिराडोंगरी वा दत्तमंदीराची गिरीज डोंगरी म्हणून विचारा.. नाहितर वज्रगड अख्खा वसई परिसर पालथा घातला तरी सापडणार नाही.. Happy

याच सफरीमध्ये योगेश२४ ने काढलेले सुंदर फोटोज इथे प्रकाशचित्रे विभागात बघू शकता..
http://www.maayboli.com/node/19792 Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कि जागा ही ! झाडांचे फोटो का नाही काढू म्हणे ?
अरे लगे हाथ वसईचा किल्ला पण बघायला हवा होता. त्या परिसरात खुप फुलपाखरे दिसतात, या दिवसात.

ते झाड कांचन उर्फ कचनार चे
(कच्ची कली कचनार की, क्या समझेगी बाते प्यार की.... )

मस्त फोटो योगेश! Happy नेहमीसारखेच.

बाकी, हे वरचं टायटल मी सारखं "वसईची हिरो होंडागिरी" असं वाचतोय. Proud

यो, नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन आणि त्याला साजेसे फोटो. पुन्हा एकदा वज्रगडावर फिरतोय असं वाटलं Happy

कॅमेर्‍यांचे जीव सांभळत पुढे सरावलो.. >>>अगदी, अगदी (स्वतःपेक्षाही जास्त :फिदी:).

रच्याकने, तु काढलेले मस्त फोटो पाहुन माझी हिम्मत नाही होत आहे मी काढलेले फोटो प्रदर्शित करायला. Happy (खरंच मस्त आलेत सगळे फोटो).

ते झाड कांचन उर्फ कचनार चे>>>>होय दा, ते झाड कांचनचेच. त्या परिसरात भरपुर कांचनची झाडे होती.

भन्नाट.. योरा.. अन योगेश... जय अन विरू म्हणता येणार नाही Proud दोघे विरू-विरूच दिसतात.

सगळे फोटो एकदम झक्कास ! स्पेशली भगव्या मंदिराचा अन गुलाबी तेरड्याच्या फुलांचा...

हिरव्या.. तोड्याचा फोटो तर एकदम क्लास.. भर दिवसा लेझर शो मधला कलाकार दिसतोय Happy

योग्या.. दमला होतास का रे ? Proud

(कच्ची कली कचनार की, क्या समझेगी बाते प्यार की.... ) >> आठवले दिनेशदा.. Happy योगीने सांगितले होते..
वसईचा किल्ला पहाण्याचा विचार होता.. पण सगळी घाई होईल नि त्यात मजा नाही म्हणून कॅन्सल केले.. वसई किल्ला आणि तेथील पक्षी बघायचे तर संपुर्ण एक दिवस हवा..

वैद्यबुवा, मृदुल, सुकी .. धन्यवाद Happy

दोघे विरू-विरूच दिसतात. >> सुकी.. Lol

योगी.. Happy

लईच भारी रे, ते केशरी मंदीर हिरव्या बॅकग्राउंडवर काय उठून दिसते आहे. सॉलीड.
तुमचा दिवस अगदीच 'यो' झालेला दिसतोय.