वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.
किमया जेव्हा पाचवीत गेली, तेव्हा आपली लेक आता मोठी झालिये अस समजुन (किंबहुना मला सुद्धा गोष्टी सांगुन जबाबदार पालकत्व निभावता येत हे दाखवण्यासाठी) हेमंत एक दिवस तिला अॅडम आणि ईव्हची गोष्ट सांगत होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी असणारे दोन मानव सदृष्य(??) जीव, सफरचंदाच झाड, त्यांच भांडण,आपण सगळे कसे त्याचे वंशज आहोत वगैरे आणि पुढची सगळी कथा अगदी रंगात आली होती. किचन मधे स्वयंपाक करत असले तरी माझे कान त्याच्याकडेच होते.
सगळ शांतपणे ऐकणारी किमया अचानक हेमंतला म्हणाली,"बाबा, पृथ्वीच्या उत्पत्तीच्यावेळी फक्त अॅडम आणि ईव्ह हे दोघेच जर मनुष्यप्राणी असतील तर त्यांची मुले म्हणजे एकमेकांचे बहिण-भाऊ झाले, मग पुढची पिढी कशी काय जन्माला आली?आणि आपण त्यांचे वंशज कसे काय???"
हेमंत आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतोय आणि चेहरे पांढरे फटक. काहीतरी थातुरमातुर उत्तर मीही देवु शकले असते पण त्यामुळे माझ्याही मनात अनेक वर्षे दबा धरुन बसलेला हाच प्रश्न वर आला. भिडस्त स्वभाव म्हणा किंवा आई-बाबा सांगतात ते सगळ बरोबरच अशी झापड लावल्यामुळे मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता पण प्रश्न मनात आला होता जरुर.
असा प्रसंग दुसर्यांदा आला जेव्हा आजी (साबा) सगळ्या नातवंडांना कृष्णजन्माची कथा सांगत होत्या. त्या नेहमीच पौराणिक कथा सांगत असतात आणि बदलत्या विश्वाबरोबर आपली नातवंडे आपली संस्कृतीही जपतील याची पुरेपूर काळजी घेत असतात.
साबा अगदी तल्लीन होऊन सांगत होत्या,'देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले आणि त्यांची वरात स्वत: कंस रथ हाकत घेऊन चालला होता. अचानक आकाशवाणी झाली, "ज्या देवकीसाठी तू इतका आनंदीत आहेत त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल"
झाल सगळ तिथेच बिनसल, कंस चिडला आणि रागाने त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर कडा पहारा ठेवला. देवकीच्या सातही मुलांना त्याने निर्घुणपणे मारले. आठवा कृष्ण मध्यरात्री जन्मला आणि वसुदेवाने त्याला आपल्या परम मित्राकडे यमुनेचा पूर पार करुन सोडले. नंतर कंसवधाची कथा.
मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी) म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!"
आजी खरतर अनुत्तरीत झाल्या. रागतिरेकाने त्यांनी धपाटा जरी मारला असला तरी त्यांच्याकडेही उत्तर नव्हते या प्रश्नाचे.
आतापर्यंत असे अनेक अनुत्तरीत प्रश्न मला विचारले असतील किमया आनि येशाने ज्यांची उत्तरे मी देवू शकले नाही किंबहुना माझ्या उत्तरांनी त्यांच समाधान झाल नाही.
"सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग??"
"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस
करायला महाभारत घडवल का??
असे असे अनेक प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील ना? किंवा पडले असतील. मग पौराणिक कथा काय बिनबुडाच्या का??
या कुंतीच्या कथेतून नेमका काय
या कुंतीच्या कथेतून नेमका काय बोध मिळतो ? का सांगायची ती ? त्यातून नेमका काय सांस्कृतिक बोध मिळतो ?
त्यापेक्षा मी पहिल्यापासुनच लिहित आलोय, कि नव्या कथा रचाव्या, आणि नितीमत्तेचे घडे स्वत:च्या वागणुकितुन द्यावे.
बर्याच पौराणिक कॅरॅक्टर्समधे
बर्याच पौराणिक कॅरॅक्टर्समधे ग्रे शेड्स आहेतच. स्वतः धर्मराज म्हणवून घेणार्या युधिष्ठिराने जुगार खेळून मोठे मर्यादा उल्लंघन केले होते. अशाच अनेक गोष्टी आहेतच. अख्खं महाभारत सूडावर बेतलेलं आहे. पण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन असतात (१) ती वाईट आहे म्हणून तिची माहितीच करुन घेऊ नये (२) एखादी गोष्ट कशी नसावी हे माहित करुन घ्यायचं असेल तर तो बोधही घेता येतो. इथे जुगाराने अख्खं साम्राज्य कसं धुळीला मिळालं, वनवास नशिबी आला, घरच्या स्त्रीच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली हे कळू शकतं. तसंच ज्या आईबाबांना मुलांवर भक्तीचे संस्कार करायचे असतील ते परमात्मा कसा भक्ताच्या संकटकाळी मदतीला धाऊन येतो हे सांगू शकतील कृष्ण-द्रौपदीचं उदाहरण सांगून.
अर्थात लहान मुलांना हे खूप जड जातं. त्यामुळे निव्वळ कोल्हा, ससा यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, इसापनिती सांगितली जाते त्याप्रमाणे ह्या गोष्टी सांगाव्यात व जमल्यास त्यातील पॉझिटिव्ह बाजू सांगावी/ निगेटिव्ह बाजू स्वतःमधे पॉझिटिव्ह बदल करुन घेण्यासाठी सांगावी. हे जमत नसेल तर मी आधीच म्हटल्याप्रमाणे किंवा दिनेशदा म्हणतात तसे नव्या किंवा प्रॅक्टीकल भासणार्या कथा झिंदाबाद.
स्पायडरमॅन, हॅरी पॉटर वगैरे गोष्टीही रिअलीस्टीक नसतातच पण त्या मुलांना आवडतातच आणि प्रश्नही मनात येत नाहीत त्यांच्या. मग त्यांच्यामधे रंगून जाऊन काय मिळतं मुलांना? कुठले संस्कार की जस्ट एंटरटेनमेंट?
अश्वे
अश्वे
exactly दिनेशदा, आणी आशु, मला
exactly दिनेशदा, आणी आशु, मला हे १००% पटत. मी अत्ता पर्यंत माझ्या लेकीला कधीही पौराणिक कथा सांगितल्या नाहीत ,आजीने सांगायचा प्रयत्न केला पण तिला त्या गोष्टी आवडत ही नाहीत. त्यामुळे मला नशिबाने अत्ता पर्यंत असल्या प्रश्णांना उत्तर द्यायची वेळ आली नाही कधी. ज्या त्या वयात / योग्य जे ते मुलांना सांगाव, समजवाव अस मला वाटत.मोठी झाली की ती असल्या गोष्टी वाचायला द्याव्यात, सांगाव्यात म्हणजे ती स्वतः त्याची उत्तर शोधायचा प्रयत्न करतील, बर्याचशा गोष्टी आपोआप कळतील ,ज्या कळणार नाहीत त्या विचारतील , पण तेव्हा निदान आपण सांगीतलेल समजायच्या वयाची तरी असतील.
पुर्वी या सगळ्या गोष्टींची
पुर्वी या सगळ्या गोष्टींची कुतूहल अगदी नातवंडांची तोंडं बघेपर्यंत असायचं आता मात्र हॅरी पॉटर लहान असताना, शेक्सपिअर तरूण वयात अन शेरलोक होम्स सारख्या रहस्य कथांमधेच रमणारी पिढी दिसते. टिव्ही चॅनल्सवर तरी दाखवायचे रामायण, श्री कृष्ण .. आता ह्या रिअॅलिटी शो च्या जमान्यात ते सुद्धा कुठेसं नाहीसं झालयं. निदाना आज्जी-अजोबांना या सार्या गोष्टी नातवंडांना सांगताना नवल वाटतं तर आपणही त्यांना ह्या वयात प्रोत्साहन देऊन अश्या पौराणिक, अध्यात्मिक कथा फक्त अंधश्रद्धेचे संदर्भ वगळून सांगण्यास हट्ट करावा. कारण त्यांच्या पिढिने अश्या अध्यात्मिक अन पौराणिक कथांविषयी भरपुर वाचन, भजनं, भारूडं, पंढरीची वारी.. केलेली आहेत. अर्थात त्यांचं ज्ञान थोडसं अज्ञानाला अनुसरून असेलही पण तेव्हा आपण त्याची दुरूस्ती करून एखादा सकारात्मक दाखला द्यावा कि जेणेकरून ती कथा कशी सांस्कृतिक मुल्ये जपणारी आहे हे पटवून द्यावं. एवढं तर प्रत्येक आई बाबांना नक्कीच जमेल.
मुलं जस जशी मोठी होत जातात तसे त्यांचे पंखातले बळ अन झेपावण्यासाठीचे आकाशही तितकेच पसरत जाते.
रच्याकने, मला लहानपणी
रच्याकने, मला लहानपणी बाळकृष्णाच्या विविध असुरवधांच्या कथा खूप आवडायच्या. मी परत परत वाचायचे व दुष्टांचा कसा नाश झाला! कशी फजिती झाली! असं एंजॉय करायचे. यमुना पार करुन जाणं गोपांची मैत्री, पेंद्या व कृष्णाचं अनोखं नातं, कालिया मर्दन, यशोदेला सतावणं, यशोदेने लटकं रागावणं तर फार आवडे. त्यामानाने रामायणात जास्त रमायचे नाही, पण सगळं माहित मात्र होतं. पुढे मोठं झाल्यावर या सगळ्या गोष्टींकडे बघायचा अध्यात्मिक / सामाजिक दृष्टीकोनही आला त्यामुळे अधिक आवडायला लागल्या.
अर्थात प्रत्येकाची मूस वेगळी असते
मला त्या कंसाबद्दल अजून थोडा
मला त्या कंसाबद्दल अजून थोडा जास्त आतला प्रश्न पडला होता.
जर तो कंस इतकाच वाईट होता ... इतका की तो सात अर्भकांना आपटून मारू शकतो.
तर त्याने देवकी आणि वासुदेवाला तिथेच का नाही मारले ?
आणि काय रे ? रामायण संदर्भहीन
आणि काय रे ?
रामायण संदर्भहीन वाटते काय ?
Harry Potter चालते आणि रामायण संदर्भहीन वाटते ! कमालाय !
काही काही प्रश्न खरचं इतके
काही काही प्रश्न खरचं इतके अनपेक्षित असतात की त्यावेळेला काय उत्तर द्यावे समजत नाही. मी US ला होते तेंव्हा मुलीला जरातरी आपल्या पौराणिक कथा माहिती असाव्यात या हिशोबाने रामाची गोष्ट सांगायला सुरुवात केली - मुलगी जेमतेम २ वर्षाची - सुरुवातीलाच प्रश्न - दशरथाला तीन बायका का होत्या आणि बाबाला एकच का? आता २ वर्षाच्या मुलीला काय सांगणार?
परवाचीच गोष्ट माझा मुलगा होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेचा अभ्यास करत होता - त्यात त्यांना micro-organism पासून माणसापर्यंत सर्वांच्या प्रजनन पद्धती थोडक्यात सांगितल्या होत्या. शाळेतून आल्यावर त्याने विचारले 'मम्मा, तुला micro-organism कसे reproduce करतात माहित आहे?' मी म्हंटल 'नाही' पुढचा प्रश्न "मग human being?' मी म्हंटल 'माहित नाही' लगेच तो ओरडला 'तुला माहित नाही?' या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला, मग मी लगेच उत्तर बदलले ' आठवत नाही' (हा हा हा)
काय करणार? अशी उत्तर द्यावी लागतात. त्याने त्याचे तात्पुरते समाधान झाले (आणि नवरा माझ्याकडे बघुन हसत राहिला ते वेगळच!). पण या गोष्टीला अश्लील अश्लील म्हणणारे (पु.लं. च्या भाषेत शरिराप्रमाणे मनाला 'कुबड' आलेली) माणसे इथे आहेत. असो
लेख समर्पक आहे आणि बर्याच प्रतिक्रियाही!
>>>> मला लहानपणी
>>>> मला लहानपणी बाळकृष्णाच्या विविध असुरवधांच्या कथा खूप आवडायच्या
मला अजुनही "कहाण्या"आवडतात, कहाणीचे पुस्तक अजुनही मी वाचतो
खूप दिवसांपासून बघतेय. उलट
खूप दिवसांपासून बघतेय. उलट सुलट प्रतिसाद मिळालेत या ललितावर.
"लहान मुलांचे नकळत्या वयातले प्रश्न" आणि "त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपण ठरवलेली स्ट्रॅटेजी" हे बहुआयामी विषय आहेत. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी परिस्थीती आणि त्यानुसार त्यांनी मुलांच्या अशा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ठरवलेली स्ट्रॅटेजी वेगवगळी आहे. एकाच घरात त्याच लहान मुलाला त्याच प्रश्नाला त्याच्या/तिच्या आजी-आजोबांनी दिलेले उत्तर आणि त्याच्या/तिच्या आई-वडीलांनी दिलेले उत्तर यात फरक असेल.
१) काही वेळा काही प्रश्नांनी "तू मोठा/ मोठी झालास्/झालीस की सांगेन" असे उत्तर देऊन तातपुरती सुटका करून घ्यावी लागते.
२) काही वेळेला अवांतर माहीती न देता थोडक्यात शास्त्रीय माहीती द्यावी लागते. प्रजनन वै. विषयीच्या प्रश्नांविषयी.
३) काही वेळेला काही पालन दामटून गप्प बसवतात मुलांना. "फटकावून काढेन पुन्हा असे प्रश्न विचारशील तर!" असे दरडावून/
आणि इतरही अनेक स्ट्रॅटेजीज असू शकतील.
एकच एक स्ट्रॅटेजी ठरवून दर वेळेला त्या प्रमाणे वागणे जमेल असे वाटत नाही. शिवाय आपण लाख वागून घरचे सगळेच सेम स्ट्रॅटेजी फॉलो करतील असे नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आजच्या पिढीला अनुसरून जे योग्य वाटेल तसे करावे. दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः नवनवीन गोष्टी रचण्याची, किंवा अश्वी च्या म्हणण्याप्रमाणे नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याच्या हेतूने धार्मिक व पौराणिक गोष्टींचा आधार घेण्याची कल्पना मला आवडली. त्याच अनुषंगाने चिऊताई चिऊताई दार उघड (http://www.maayboli.com/node/17579) या कथेत बदल करून सांगते मी राजसला. तर त्या ही ललितावर अशाच उलट-सुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरे. अमुकच करेन, तमुकच करेन असे ठरवून वागण्यापेक्षा रागरंग बघून, मुलांची बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती बघून योग्य वेळेला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.
अभिश्रुती अश्लील काय त्यात??
अभिश्रुती अश्लील काय त्यात?? micro-organisam ज्यांची मुल शिकताहेत त्या प्रत्येक पालकाला या प्रश्नाला सामोर जावच लागणार आहे. जिथ human body, Reproductive system असे विषय येतात तिथ मुल चौकस होतात. तो मानवी स्वभाव आहे.
मुलांनी प्रश्न विचारणे हे
मुलांनी प्रश्न विचारणे हे त्यांच्या चौकस बुद्धीचे आणि आईबापाच्या खुल्या दृष्टीकोनाचे द्योतक आहे. ते तसे नाही विचारले तर(च) काळजी वाटुन घ्यावी स्वतःबद्दल आणि मुलांबद्दलही.
मुलांच्या मनात प्रश्न आले म्हणजे दिलेली माहिती process करायची कुवत आली.
राम आणि कृष्णाबद्दल माझे मत
राम आणि कृष्णाबद्दल माझे मत -
हे दोघेही राजे होते. आणि राजांचे स्तुतीपाठक काहीही लिहितात.. अगदी ते देवांचे अवतार होते वगैरे..
ते पराक्रमी होते, महापुरुष होते यात शंका नाही.. पण देवांचे अवतार हे जरा जास्तच झाले. तसेच तुकाराम वैकुंठाला गेले हेही..
ते पराक्रमी होते, महापुरुष
ते पराक्रमी होते, महापुरुष होते यात शंका नाही.. >>> कशावरुन तुम्ही नि:शंकपणे म्हणताय की ते पराक्रमी होते, महापुरुष होते? त्या राजांच्या स्तुतीपाठ़कांनी सांगितलं/लिहून ठेवलंय म्हणून? स्तुतीपाठक तर बुळ्या माणसांना देखिल पराक्रमी म्हणून प्रोजेक्ट करु शकतात. जसं ते त्यांना देवांचे अवतार म्हणतात तसं पराक्रमी महापुरुष म्हणतातयत, तुम्ही लक्ष नका देऊ
मुलांनी प्रश्न विचारणे हे
मुलांनी प्रश्न विचारणे हे त्यांच्या चौकस बुद्धीचे आणि आईबापाच्या खुल्या दृष्टीकोनाचे द्योतक आहे. ते तसे नाही विचारले तर(च) काळजी वाटुन घ्यावी स्वतःबद्दल आणि मुलांबद्दलही. >>> अनुमोदन रैनाजी... जमेल तेवढा Generation Gap कमी करावा.
अजून चर्चा सुरु आहे का इथे
अजून चर्चा सुरु आहे का इथे ?
महाभारत हे एक उत्तम काव्य आहे. कदाचित त्यात थोडासा इतिहास पण असेल. जर धर्माचा चष्मा काढून ठेवला, तर त्यात समाजशास्त्र दिसेल. अनेक थोर लेखकांनी हे कार्य केले आहे.
महाभारताचा कळिचा मुद्दा होता, तो पांडव हे पंडूचे पुत्र नसणे हा. म्हणुन कौरव त्यांना राज्य द्यायला तयार नव्हते. इथूनच विवाहपद्धती सुरु झाली. नियोग पद्धत समाजमान्य उरली नव्हती. (महाभारतात विवाहाचे कितीतरी प्रकार येतात.)
रामायणातही असे मुद्दे आहेत. त्या काळातले आदर्श लहान मूलांवर न लादणेच योग्य.
आणि सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टि आहेत की.
अगदी सकाळचा चहा, कुठून येतो. त्याचे मळे कुठे आहेत. पेपर कुठे छापतात, दूधाच्या पिशव्या कुठे भरल्या जातात, सांगाल तेवढे थोडे. (अर्थात त्याला संयम आणि वाचन दोन्ही हवे.)
माझा पुतण्या दोनच प्रश्नांनी सुरवात करायचा. याला काय म्हणायचं आणि याचं काय करायचं ?
हा संवाद असा व्हायचा.
याला काय म्हणायचं ?- मोसंबी
याचं काय करायचं ?- कापून खायची किंवा रस काढायचा.
मोसंबी कुणी आणली, कुठून आणली ? ती झाडाला लागते का ? झाडं कुठे असतात ? अशी लांबड असायची ( यातूनच वडाच्या झाडाला वडे लागतात, असे ठरवून तो मोकळा झाला होता.)
तो शाळेतून आणि वहिनी ऑफिसमधून संध्याकाळी एकाच वेळी घरी येत असत. तो आला कि दफ्तर फेक, बुट फेक असे करुन, आई पाणी दे, आई खायला दे असे करत रहायचा. त्यावर उपाय म्हणून वहिनी त्याला एक दिवस ऑफिसमधे घेऊन गेली. दिवसभर त्याला तिथे बसवले. तिला ऑफिसमधे किती काम असते, तिला यायला जायला किती आणि कसा प्रवास करावा लागतो, हे त्याने बघितल्यावर, आई पण दमून येते, हे त्याला न सांगताच कळले. त्यानंतर त्याने स्वतःच पाणी घ्यायला सुरवात केली. इतकेच नव्हे तर तो, आईला पण पाण्याचा पेला भरुन देऊ लागला. कुठलीही गोष्ट सांगून, हि जाणीव झाली असती का ?
Pages