अनुत्तरीत प्रश्न

Submitted by शुभांगी. on 9 September, 2010 - 05:03

वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.
किमया जेव्हा पाचवीत गेली, तेव्हा आपली लेक आता मोठी झालिये अस समजुन (किंबहुना मला सुद्धा गोष्टी सांगुन जबाबदार पालकत्व निभावता येत हे दाखवण्यासाठी) हेमंत एक दिवस तिला अ‍ॅडम आणि ईव्हची गोष्ट सांगत होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी असणारे दोन मानव सदृष्य(??) जीव, सफरचंदाच झाड, त्यांच भांडण,आपण सगळे कसे त्याचे वंशज आहोत वगैरे आणि पुढची सगळी कथा अगदी रंगात आली होती. किचन मधे स्वयंपाक करत असले तरी माझे कान त्याच्याकडेच होते.
सगळ शांतपणे ऐकणारी किमया अचानक हेमंतला म्हणाली,"बाबा, पृथ्वीच्या उत्पत्तीच्यावेळी फक्त अ‍ॅडम आणि ईव्ह हे दोघेच जर मनुष्यप्राणी असतील तर त्यांची मुले म्हणजे एकमेकांचे बहिण-भाऊ झाले, मग पुढची पिढी कशी काय जन्माला आली?आणि आपण त्यांचे वंशज कसे काय???"
हेमंत आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतोय आणि चेहरे पांढरे फटक. काहीतरी थातुरमातुर उत्तर मीही देवु शकले असते पण त्यामुळे माझ्याही मनात अनेक वर्षे दबा धरुन बसलेला हाच प्रश्न वर आला. भिडस्त स्वभाव म्हणा किंवा आई-बाबा सांगतात ते सगळ बरोबरच अशी झापड लावल्यामुळे मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता पण प्रश्न मनात आला होता जरुर.
असा प्रसंग दुसर्‍यांदा आला जेव्हा आजी (साबा) सगळ्या नातवंडांना कृष्णजन्माची कथा सांगत होत्या. त्या नेहमीच पौराणिक कथा सांगत असतात आणि बदलत्या विश्वाबरोबर आपली नातवंडे आपली संस्कृतीही जपतील याची पुरेपूर काळजी घेत असतात.
साबा अगदी तल्लीन होऊन सांगत होत्या,'देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले आणि त्यांची वरात स्वत: कंस रथ हाकत घेऊन चालला होता. अचानक आकाशवाणी झाली, "ज्या देवकीसाठी तू इतका आनंदीत आहेत त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल"
झाल सगळ तिथेच बिनसल, कंस चिडला आणि रागाने त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर कडा पहारा ठेवला. देवकीच्या सातही मुलांना त्याने निर्घुणपणे मारले. आठवा कृष्ण मध्यरात्री जन्मला आणि वसुदेवाने त्याला आपल्या परम मित्राकडे यमुनेचा पूर पार करुन सोडले. नंतर कंसवधाची कथा.
मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी) म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना!"
आजी खरतर अनुत्तरीत झाल्या. रागतिरेकाने त्यांनी धपाटा जरी मारला असला तरी त्यांच्याकडेही उत्तर नव्हते या प्रश्नाचे.

आतापर्यंत असे अनेक अनुत्तरीत प्रश्न मला विचारले असतील किमया आनि येशाने ज्यांची उत्तरे मी देवू शकले नाही किंबहुना माझ्या उत्तरांनी त्यांच समाधान झाल नाही.
"सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग??"
"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले??"
"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस Lol करायला महाभारत घडवल का??

असे असे अनेक प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील ना? किंवा पडले असतील. मग पौराणिक कथा काय बिनबुडाच्या का??

गुलमोहर: 

ह्म्म्म..

या कथांचा वापर; मनोरंजनासाठी, धर्म-संस्कॄती कळावी म्हणून की मूल्ये शिकवण्यासाठी हा विचार जरुर व्हावा.>>>>> अगदी बरोबर.

स्वतःच्या मुलांवर कंट्रोल नाही मग असले मुर्खासारखे प्रश्न विचारणारच ती. स्वराली नीट डोळे उघडुन पाहीलंत तर कळेल की सगळीच लहान मुले चौकस असतातच. फक्त या अ‍ॅटिटयुडमुळे ते प्रश्न ओठावाटे बाहेर पडत नाही इतकेच.

स्वतःच्या मुलांवर कंट्रोल नाही मग असले मुर्खासारखे प्रश्न विचारणारच ती. >>> तुमची मुल तर बोलतच नसतील.. त्यांना प्रत्येक पडलेला प्रश्न आपल्या आइला मुर्खासारखा वाटेल का असे वाटत असेल Uhoh

स्वराली, तुम्हाला इथे कुणी जबरदस्ती केली नाहीय प्रतिसादाची. नाही आवडलं तर नका वाचु, नका देऊ प्रतिसाद. आणि इतकंच सांगताय तर तुमचे लेख करा इथे प्रदर्शित. लोकांनाही कळु दे चांगलं लेखन कशाला म्हणतात ते.

गुब्बे, पौराणिक कथांचे रेफरन्सेस बदलल्येत. नंतर फुर्सतीत लिहीनच.

स्वराली, आपल्याला खटकलेली गोष्ट सांगायची एक पद्धत असते. तुमच्या लिहीण्यातून ते जाणवलं नाही. एकंदरीतच तुमच्या कोमेंतवर लिहावे असे काही नाही.

अरेच्चा! ह्या चर्चेला दुसरच वळण लागलं की!
मला एक समजतं.... स्वतःचे अजुन एकही लिखाण इथे प्रकाशित झालेलं नस्तांना थोडक्यात स्वतःला तेवढीसुद्धा अक्कल नसतांना दुस-याच्या अकलेचे वाभाडे काढु नयेत! हिम्मत असेल तर इथल्या दिग्गजांच्या पसंतीस उतरेल असं लिखाण करुन दाखवावं!

अम्या.. कधी लिहितो आहेस रे .. ऑन दि स्पॉट नाना.. तुझं लिखाण वाचायला उत्सुक अन तेही असल्या विषयांवर.

योडे, अमित .. विषयांतर जास्त नको. इथून पुढच्या पोस्टींना सरळ नागालँड मधून ऐकू येणारे मौन समजा .. Wink

ह्या विषयावर आणखी .. काही प्रश्न अन त्याची उत्तरे यावीत खरोखर.

मी म्हणाले ना कंपुतली माणसे. कशी आली धावुन जिला बोलले तिचा पत्ता नाही . तिला सुद्धा कळले असणार की तद्दन फाल्तू लिखाण आहे म्हणुन तर पळाली ती.
चांगल लिहिल तर देइन चांगला प्रतिसाद. आता या लिखाणावर काय कप्पाळ प्रतिसाद द्यावा.

असुदे नुसते रेफरन्सेस बदलले नाहित तर चुकिचे आहेत. आधी वाचाव कि लिहायच्या मग मुक्ताफळ उधळावित.
तुम्ही काय माझ्यावर कोमेंत करणार? रेफरन्स शोधा आणि गुब्बीचा लेख सुधारा Lol

<< मी म्हणाले ना कंपुतली माणसे. >>>

इथे ह्या लेखावर प्रतिक्रीया देणे अपेक्षित आहे की कंपुशाहीची चर्चा ?

<<कशी आली धावुन जिला बोलले तिचा पत्ता नाही <<>>>

सगळे आपल्यासारखे रिकामटवळे नसतील.

<<तिला सुद्धा कळले असणार की तद्दन फाल्तू लिखाण आहे म्हणुन तर पळाली ती. >>

आता आपणासारख्या महान, थोर वगैरे 'साहित्तीक' जाण असणार्‍यांनी (भले लेखनातले कच्चे दुवे न दाखवता का होईना) पाजळ्यावर कळले असेल बहुधा.

<<चांगल लिहिल तर देइन चांगला प्रतिसाद. आता या लिखाणावर काय कप्पाळ प्रतिसाद द्यावा.>>
अच्छा, म्हणजे वरच्या सगळ्या प्रतिक्रीया ह्या स्वतःला "काय लिहायच ते कळत नसल्यामुळ्ये" आल्यात होय....

अरे ही काय पद्धात आहे प्रतिक्रिया द्यायची ? थोडातरी सुसंस्कृतपणा दाखवा की. तुम्हाला नाही आवडलं तसं लिहा पण ही व्यक्तिगत गरळ ओकणं कशाला ? अ‍ॅडमिन काही तरी करा बुवा . अशा व्यक्तिगत प्रतिक्रिया हल्ली बर्‍याच ठिकाणी दिसायला लागल्यात मायबोलीवर. हे लक्षण फारसे बरे नाही वाटत.

स्वराली, मला ह्या लेखावर जे लिहायचय ते मी लिहीनच, त्यासाठी तूमच्या परवानगीची गरज नाही. रेफरन्स बदलल्येत हे माझ मत आहे, तूम्हाला चूकीचं वाटत असेल तर सिद्ध करा.

बाकी सकारात्मक लिहू न शकणार्‍याला सांगून काय उपयोग आहे म्हणा.

<<<अच्छा, म्हणजे वरच्या सगळ्या प्रतिक्रीया ह्या स्वतःला "काय लिहायच ते कळत नसल्यामुळ्ये" आल्यात होय<<< अम्या .... Rofl

?????

काय सांगत्येस काय योडे ? म्हणजे स्वतःची खरी ओळख सांगण्यासारखी नसणारे काही नरपुंगव किंवा नारीपुंगव्या वावरतायत त्यापैकी काय ?

पुर्वीच्या काळी लोकांना उपदेश करताना या प्रकार्रच्या कथा सांगितल्या गेल्या त्या "रुपक" या माध्यमातुन. उदा. पंचतंत्रातील कथा. अगदी तशाच पध्द्तीने पौराणिक कथांचा उगम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा उद्देश लोकांनी त्यातील चांगले / वाईट व्यक्तीमत्व समजुन घेउन चांगल्या व्यक्तीमत्वाचे गुण आत्मसात करावे हा असावा. (रामायण महाभारत खरे/खोटे, घडले कि नाही तो मुद्दाच वेगळा). नंतर कानगोष्टी प्रमाने काही संदर्भ नविन आले असतील काही वगळले असतील. पण एक गोष्ट नक्कि कि लो़कांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम व्हावा (लोकांनी 'सिरीयसली' घ्यावे) म्हणुन त्या गोष्टींना "दैवी" चमत्कारांचा साज चढवला गेला आणि त्यामुळे आताच्या विज्ञान युगात लहान मुलांचे प्रश्न अनुत्तरीत रहात असावेत.... Happy

गुब्बे..मला तुझे 'अनुत्तरित प्रश्न' खूप आवडले..मीपण आपल्या लहानपणी च्या नॉस्ट्लेजियापायी कौतुकाने मी नील साठी इसापनीती,जातका टेल्स इ.इ. पुस्तकं घेतली होती . पण त्याला कुठे गाय ,गाढवाच्या पाठीवरून निघालीये..तर प्राणी बोलताहेत इ. गोष्टी फार खोट्या वाटल्या ( तो स्वतः ६ वर्षाचाय Happy ) तो मला म्हणाला,' नानी, I already know what they are trying to teach .. I dont want to read these books..
त्याला माझी मुलगी चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी प्रॅक्टिकल अप्रोच् घेते. जसं मॉलमधे फिरतांना जर नील ला एखादी गोष्ट खूप आवडली तर ती त्यालाच विचार करायला लावते कि ती वस्तू/खेळणं त्याला आत्ताच्याआत्ता विकत घेणं जरूरी आहे का?? त्याने त्या क्षणी ती वस्तू विकत घेण्याचा मोह आवरला तर घरी जाऊन तेव्हढेच डॉलर्स तो आपल्या पिगी बँक मधे जमा करतो.. मग त्याच्या वाढ दिवसाच्या दिवशी त्याच पैशाने ते पुस्तकं,कपडे,खेळणी विकत आणतात आणी आश्रमात जाऊन गरजू मुलांना त्या वस्तू देतात. त्यातून नील ला झालेला आनंद मी अनुभवलाय आणी दर वेळी पिगी बँक मधे पैसे जमा करताना तो उत्साहाने त्याबद्दल बोलत असतो..
आजकाल मुलांना प्रॅक्टिकल अप्रोच आवडतो.. चेटकिणी,जादू च्या गोष्टी कश्या आता आपोआप
गायब होऊ लागल्यात.. असो.. फार लांबलं नै?? या विषयावर अजून एक लेख लिही बरं.. Happy

गुब्बी, मुलांचे प्रश्न फारच नेमके आणि अडचणीचे आहेत, नै?

परवा माझी एक भाच्ची (वय वर्षे पाच) शंकर पार्वतीचे चित्र काढत होती. तिने शंकराला व्यवस्थित रेखाटले. पण तिला पार्वतीला स्कर्ट घातलेलेच दाखवायचे होते!! का?? तर भाच्चीला स्कर्ट खूप आवडतो म्हणून! स्कर्टमध्ये सगळ्या मुली स्मार्ट दिसतात असे तिचे मत आहे. तिचे म्हणणे हे, की जर शंकर बाप्पा आखूड स्कर्ट (व्याघ्रांबर) घालू शकतो तर पार्वती का नाही???? मग तिची आज्जी तिला समजावत होती, की अगं त्या काळी बायका लुगडी नाहीतर परकर पोलकी घालायच्या! Wink पण भाच्चीबाई ठाम! शेवटी त्या छोटुकलीने पार्वतीला आखूड स्कर्टच घालायला दिला आणि जोशात चित्र रंगवले!! Happy

अरे व!! अरु
पार्वतीला स्कर्ट !! भारीच आहे भाच्ची !!मस्त , आवडले एकदम.
आजची मुले कीती स्वतंत्र विचार करु शकतात हे बघुन छान वाटले. आम्हाला कधी काही असले सुचलेच नाही. झापडे लावुनच सगळे शिकलो.

इतर प्रश्न ठीक आहेत पण,

"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का?"
"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस करायला महाभारत घडवल का??

हे दोन प्रश्न चौकस बुद्धी पेक्षा आगाउपणाचे जास्त वाटतात. या गोष्टी समजायचे वय नाही बहुधा त्यांचे.. पुढे समज आल्यावर कळेल आपोआप.

धन्यवाद सगळ्यांना.
वर्षुतै मस्त ग कल्पना मुलांनाच विचार करायला लावायची.
अकु - पार्वतीला स्कर्ट लै भारी. माझी धाकटी लेक तर बर्‍याचदा गणपती बाप्पाना मॅगी, पिझ्झा खायला लावते Lol
mansmi18- बरोबर आहे तुझ या प्रश्नांमधे कदाचित आगाउपणा आहे पण आजुबाजुला माहितीचे स्त्रोत एवढे वाढलेत की त्यांनी या पद्धतिने विचार केला तर चुक वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने या सगळ्या भाकड कथा आहेत.

मला नविन वाद सुरु करायचा नाही
आगाऊ | 9 September, 2010 - 05:46
नाईलाज आहे पण डॉ. प.वि. वर्तक यांचे " वास्तव रामायण" आणि महाभारताचा खरा नायक भीम" ही दोन पुस्तके या अनुषंगाने जरुर वाचावीत>>> त्या 'काही' माबोकरांपैकी मी एक आहे. आपण सूक्ष्म रुपाने मंगळावर जाउन आलो असाही वर्तकांचा दावा आहे. तो कुठल्या अनुषंगाने पहावा? उत्तम विनोदी लिखाण म्हणून त्यांचे वाचन जरुर व्हावे.

आगाऊ, डॉ. प.वि. वर्तकांच्या " वास्तव रामायण" आणि महाभारताचा खरा नायक भीम" याबाबत मी लिहले होते जे मुळ विषयाला धरुन होते. मंगळावरच्या सुक्षरुपाने डॉ. वर्तकांच्या जाण्याचा उल्लेख मुळ विषयाला धरुन नव्हता.

मंगळावरचा त्यांचा सुक्ष्म रुपाने प्रवास हा दावा कोणीही वाचावा व प्रतिवाद करावा. यासाठी प्रचलित विज्ञानाच्या पुढे एक अगम्य विज्ञान आहे हे मान्य करुन वाचले म्हणजे त्याची सत्यता पटेल. उगाचच कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न आगाऊ सारख्या विद्वान व संशोधक वृत्तीच्या व्यक्तीने करावा, हे दुख:दायक आहे.

ज्या डॉ. प.वि.वर्तकांनी आपले आयुष्य केवळ संशोधनाकरिता खर्च केले त्यांची पुस्तके न वाचता, त्यांच्या संशोधनावर मुद्यावर आधारीत प्रतिवाद न करता त्यांच्या संशोधनाला विनोदी लेखन म्हणणे यासारखी दुसरी शोकांतिका नाही. एका मराठी माणसाने दुसर्‍या विद्वान, एम. बी. बी. एस., लेखक वयोवृध्द मराठी माणसची केलेली जहिर निंदा कोणत्या सुजाण मराठी माणसाला आवडेल ?

गरज नसताना नको तो मुद्दा मा. आगाऊ यांनी लिहला म्हणुन हे लिहावे लागले. माझ्या दृष्टीने हा वाद नाही. यावर कोणीही शब्दच्छल करुन निष्कारण लिहु नये हि नम्र विनंती.

गुब्बे ललित चांगले लिहिलेस
आपण ज्या काळात लहानाचे मोठे झालो त्यात आणि आताच्या काळात प्रचंड तफावत आहे.
आपल्याला हे असले प्रस्ण कधिच उद्बवले नव्हते, प्राणि बोलू शकतात, कृष्ण चे अस्तित्व, ह्या बद्दल कधिच आक्षेप घेतला नव्हता.
आता ह्या कथा वाचताना मात्र नक्की जाणवते की ह्या कथांचा सध्याच्या पिढीवर काही परीणाम होणार नाही, सध्याची पिढी खुप लवकर सगळ्या() गोष्टी आत्मसात करू लागली आहे आणि त्यामुळे हे किंवा या सारखे प्रश्ण येतच रहाणार.

Pages