ब्लु बेरी मफीन्स..

Submitted by सुलेखा on 7 September, 2010 - 16:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप गव्हाचे पीठ

१ १/२ टी स्पून बेकींग सोडा

१/२ टी स्पून मीठ

१ कप साखर..

१ कप दूध..

१/३ कप तेल..[कनोला/वेजिटॅबल्/कोणतेही]

१ टेबल्स्पून विनेगर..

१ १/२ कप फ्रेश ब्लु बेरीज...

[ या प्रमाणात १२ मफीन्स तयार होतात..]

क्रमवार पाककृती: 

प्रथम ओवन ४०० .फॅ. वर प्रि हीट करा..

मफीन्स च्या बेकींग ट्रे ला थोडेसे तेल व पीठ लावुन कोटींग करुन घ्या..

गव्हाचे पीठ + मीठ + बेकींग सोडा चाळ्णी ने चाळुन /मिक्स करुन घ्या..

एका मोथ्या भांड्या त साखर + दुध +तेल + विनेगर चमच्याने छान एकत्र करुन घ्या..

वरील गव्हा चे पीट या मिश्रणा त घालुन मिक्स करा..

आता ब्लु बेरी ज घालुन हळुवार मिक्स करा...

मोठ्या चमच्या ने हे मिश्रण मफीन्स च्या ट्रे मध्ये ३/४ इतके भरा..

२० ते २५ मिनिटे ओवन मध्ये खरपूस रंगावर बेक करा..

ओवन बंद करा..आणखी ५ मिनिटा नी ओवन मधुन ट्रे बाहेर काढा व थंड होऊ द्या..

मफीन्स तयार आहेत..

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात एकूण १२ मफीन्स तयार होतील..
अधिक टिपा: 

ब्लु बेरीज नसल्यास-- अ‍ॅप्पल्/केळे [प्रमाण थोडे कमी-१ कप] घ्यावे..

साखरे एवजी मध घेता येइल..

माहितीचा स्रोत: 
इंटर नेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही रेसिपी मधुरमच्या ब्लॉगवरुन घेतलेली आहे. http://www.egglesscooking.com/2009/03/02/vegan-blueberry-muffins/
फक्त लेमन झेस्ट लिहिले नाहीये ...

तुमचे अ‍ॅडिशन काय आहे यात?

ही रेसिपी मधुरमच्या ब्लॉगवरुन घेतलेली आहे. http://www.egglesscooking.com/2009/03/02/vegan-blueberry-muffins/
फक्त लेमन झेस्ट लिहिले नाहीये ...
तुमचे अ‍ॅडिशन काय आहे यात?
>>>> इथे ढिगभर रेसिपी मिळतिल कुठल्यातरि ब्लॉगवरुन, साईटवरुन किंवा पुस्तकातुन घेतलेल्या. दर वेळि स्वःत:चे अ‍ॅडिशन न करता लिहिलेल्या. यात काय नविन गोष्ट? माहितिचा स्रोत लिहिला आहे ना तो पुरेसा आहे.

जादू ह्यांना अनुमोदन.

मी इथे 'मिनोती' ह्या आयडीचे निरिक्षण केले की ह्याधी सुद्धा त्यांनी अशीच टीप्पणी एका रेसीपीवर दिलीय.
मला त्यांनाच एक प्रश्ण विचारावासा वाटतोय व प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे कारण मी सुद्धा प्रामाणिकपणे विचारतेय,
हे असे दाखवून द्यायचे कारण?
आणि दुसरे म्हणजे, तुम्हाला नक्की कसे काय माहित की वरील पाकृ सुद्धा अगदी ह्याच ब्लॉग वरून घेतलीय?

मान्य आहे कि दुसर्‍याची मेहनत आपल्या नावावर खपवू नये पण रेसीपीच्या बाबतीत तसे काहि वाटत नाही. कारण हजारो पाकृ त्याच त्याच प्रकाराच्या खाजगी साईट, खाजगी ब्लॉग वरती असतात. लेखिकेने एकदा लिहिले ना की Internet आणि घेतले नाही ना आपल्या नावावर 'सन्मान' मग कशाला अशी टीप्पणी?
तुम्हाला हि चिंता आहे का की कोणी आपल्या नावावर खपवत नाही ना म्हणून? तुमच्या सर्व पाकृ अगदी नेहमीच स्वःनिर्मीत असतात का हो? आणि मायबोलीवर असे कुठे लिहिले आहे का कि स्वःनिर्मीत पाकृ लिहा म्हणून. उदाहरण द्यायचे तर तुमच्या पालेभाजीच्या रेसीपीत तोच तोच पणा होता व ती एकच पद्धत होती जी किती जणं वापरतात मग तुमचे काय होते अ‍ॅडिशन(तुमचाच शब्द)?

मी अजून नवीनच आहे मायबोलीवर पण असे काही पाहिले की वाटते की हि वृती व अट्टाहास हे दाखवत नसेल ना की, मी किती कायद्याला धरून चालते, मी नेहमीच कशी बरोबर वागते असे का? (हा अंदाज आहे, तुमच्या बाबतीत पुर्ण अनुमान नाही काढले अजून, ते तुमच्या उत्तरावरून ठरेल.

मला असं वाटतं की नुसतं "ईंटरनेट" न लिहिता, ब्लॉग चा दुवा/ युआरेल द्यावा, असं म्हणायचं असेल मिनोतीला कदाचित.

लेखिकेने एकदा लिहिले ना की Internet आणि घेतले नाही ना आपल्या नावावर 'सन्मान' मग कशाला अशी टीप्पणी?>>>>> अनुमोदन.
मिनोती ही रेसिपी तुमच्या ब्लॉगवरुन घेतलेली नाहि आहे ना मग तुम्हाला काय problem आहे.

पण मिनोतीशी असं बोलायचं तरी काय कारण आहे ? समजा तिचा मुद्दा चुकीचा आहे तरी 'तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे' वगैरे का ? आणि कुणाला तिच्या रेसिपी आवडत नव्हत्या तर तिथे तेव्हाच सांगायचं होतत की.

त टि: मी पण "तशी" नवीनच बर्का.

समजा तिचा मुद्दा चुकीचा आहे तरी 'तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे' वगैरे का ?>>
जशाला तशाच शब्दात सांगितलं तर पटायची शक्यता जास्त असू शकते.
जादू आणि चिदेवला अनुमोदन.

सिंड्रेलाबाई,
>>आणि कुणाला तिच्या रेसिपी आवडत नव्हत्या तर तिथे तेव्हाच सांगायचं होतत क>><<

तुमच्या पोस्टमधली काहि वाक्ये मला लागू होत नाही कारण मी तर अतिशय नम्रपणे पोस्ट लिहिली आहे पण तुमच्या नको त्या आगावूपणाला हे उत्तर कारण 'फक्त' एकच तुमचे वरील वाक्य बहुधा माझ्या पोस्टमधून काढलेल्या अर्थातून असावी म्हणून हा खुलासा करतेय,

तुम्ही माझ्या पोस्टचा अर्थ रेसिपी आवडली नाही असा काढला असेल तर पुन्हा हेच म्हणेन की कुणाच्याही रेसिपीला, 'ह्याच्यात काय तुमची अ‍ॅडिशन' असे विचारणारीला म्हटले आठवण करून द्यावी की तुमच्याहि इथे पाककृती अश्या आहेत पालेभाजीच्या ज्यामध्ये काहीच नवीन अशी 'त्यांची' अ‍ॅडिशन दिसली नाही. रोजच्याच पद्धतीने लसूण, मिरची, डाळ अश्या सारखे तेच तेच जिन्नस घालून केलेल्या मग इथे कशा काय लिहिल्या त्यांनी? हा एक मुद्दा.
दुसरा मुद्दा सरळ आहे कि, कोणतेही स्वःताला सन्मान( credit) न देता वरील लेखिकेने लिहिले आहे ते पुरेसे न्हवते का? नसेल प्रत्येक्ष लिंक देता आली तर इतके काय मोठे? आणि वर मिनोती ह्या अगदी कश्या काय खात्रीने लिहितात की 'इथूनच' पाकृ घेतली म्हणून? त्यानी एक प्रश्ण विचारला असता तर निराळी गोष्ट पण अगदी इथूनच घेतली असे लिहिणे किती बरोबर आहे?

त्याना नक्की काय दाखवायचे आहे असे प्रत्येक वेळी करून?
हे जर एखाद वेळेला केले तर समजू शकते पण नको तिथे उगाच कशाला ते खोचक प्रश्ण? ह्या आयडीने आधी सुद्धा असे केले आहे ते पाहिल्यावरच मी लिहिले. नाहितर मलाही अश्या ठिकाणी बोलावेसे वाटत नाही.

आत थोडे तुम्हाला फुकटचा सल्ला, तुमच्या सवयीनुसार 'आगावू' सल्ला म्हणा, तुमची नको तिथे विनोद करणे, उगाच टोमणे मारणे, पोस्ट नीट समजावून न घेता कोणाची बाजू घेणे वगैरे सवय तुमच्यापुरती ठिक आहे पण सतत आपल्या अश्या सवयीचे प्रदर्शन करु नका. एक दिवस खूप हसे होइल. जरा बाहेर या कोंडाळ्यातून .. चांगले राहिले तुम्हाला. ( हे खास तुमच्या त. टी साठी आहे हे लक्षात आले असेलच.)
तिरसट वागा बोलायचे असेल माझ्याशी तर हरकत नाही पण पुर्ण वेळ तयारी ठेवावी लागेल. मी गरज लागली तर जसा समोरचा माणूस आहे तसा नम्रपणा सोडू शकते. Happy

मी देखिल या व्यक्तीला हे असं "ही रेसिपी इथली तिथली" सांगताना पाहिलं आहे. आणि मलाही हे नक्की काय prove करण्याचा प्रयत्न आहे कळले नाही.

माझ्याबद्दल बोलायच झालं तर मला १७६० ब्लॉग्स वर जाऊन रेसिपीज पहायला वेळ नाही, आणि interest पण. मला रेसिपी हवी असते तेव्हा मी मायबोली गाठते. तेव्हा कुठ्ल्या का ब्लॉग वरची असेना, चांगली रेसिपी इथे दिली तर माझ्यासारख्या (आळशी) लोकांना चांगलच आहे. परत मायबोलीकरांवर जास्त विश्वास, त्यामुळे ब्लॉग वरुन पाहून करेन न करेन, पण इथल्या कोणीतरी tried aani tasted रेसिपि आहे अस सांगितलं तर ती करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेकडो ब्लॉग्स वरच्या हजारो रेसिपिज मधल्या चांगल्या दहा रेसिपीज इथे आल्या तर वाईट काय? त्यातही कोणीही "ही माझी स्वतःची रेसिपी" म्हणून सांगत नाहीच आहे.

मधुरम चा ब्लॉग मी या आधी कधी पाहिला नाही. माझ्या नेहेमीच्या वाचनातले जे रेसिपी ब्लॉग्ज आहेत त्यांचे लेखक रेसिपी सादर करायच्या अगोदर बरीच तयारी करतात. स्टेप बाय स्टेप फोटो काढणे. घटक पदार्थ सगळीकडे सहज मिळण्यासारखे नसतील तर त्याऐवजी काय वापरता येईल याची माहिती देणे. व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या चुका नाहीत ना हे तपासणे, तत्कालिक ( सणांच्या अनुषंगाने किंवा सीझनल घटकांच्या अनुषंगाने) काही माहिती देतात. हे सगळं करताना जे परिश्रम त्यांनी घेतलेत त्याची जाणीव म्हणून तरी एखाद्या ब्लॉगवरून रेसिपी इथे दिली असेल तर त्या ब्लॉगला अन त्या ब्लॉगच्या मालकाला / मालकिणीला श्रेय दिले पाहिजे - हा ब्लॉग जगात सुद्धा मानला जाणारा संकेत आहे . इतर तो पाळत नाहीत किंवा मायबोलिवर काही लोक पाळत नाहीत असा युक्तिवाद करणे म्हणजे ' इतर लोक चोरी करतात, म्हणून मी पण करणार, त्यात काय चूक' म्हणण्यासारखंच आहे.

मिनोतीने मागे दिलेले प्रतिसाद ज्यांना खटकले त्यांनी तिथेच लिहायला हवं होतं..
मिनोतीच्या रेसिपी ज्यांना आवडत नाहीत त्यांनाही तिथेच प्रतिसाद लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे अन इग्नोअर करण्याचंही. इथे दिलेल्या रेसिपीवर प्रतिसाद्,किंवा मिनोतीच्या प्रतिसादावर चर्चा अवश्य व्हावी. मिनोतीने ( अथवा इतर कोणीही ) मागे काय प्रतिसाद दिले होते हे उकरून काढण्याने किंवा उगाळत बसण्याने काय होणार ?

सुलेखा यांनी स्वत: काही खुलासा केला नाही, मूळ रेसिपीवर प्रतिक्रिया नाही, अन तरिही एवढे प्रतिसाद Happy

ब्लॉगच्या मालकाला \ मालकिणीला श्रेय देण्याचा मुद्दा मान्य! पण "तुम्ही ही रेसिपी इथे का दिलीत, यात तुमच्या additions काय" असे प्रश्ण जरूर खटकले.

मागे १-२ दा अस झालं तेव्हा ignore केलं, पण सतत किती ignore करणारं म्हणून शेवटी लिहीलं इतकचं!

मेधा, मला वाटतं इथे ब्लॉग मालकिणीला/मालकाला श्रेय देण्याच्या मुद्दा नक्कीच मान्य आहे.त्यावरून मी स्पष्टीकरण देत नाहीये व दुमतही नाहीये.
पण जे खटकले ते मी माझ्या दोन्ही पोस्टमध्ये लिहिले आहेच कोणते 'दोन मुद्दे'. पण परत परत तेच लिहावे लागते कारण गोष्ट सरळ असूनसुद्धा ते असे उगाच फाटे का फोडले जातात की श्रेय दिलेच नाही, उकरून काढणे वगैरे?
मुद्दे हेच की, असे अ‍ॅडिशन काय विचारायचे कारण? कितीतरी पुर्वापार चालत आलेल्या कृतीतील जिन्नस कायम तेच असतात. फक्त पद्धत वेगळी असु शकते. पण म्हणून तू हि रेसिपी कोणाची तरी घेतलेलीच आहेस व ती इथूनच घेतली आहेस हे खात्रीने कसे काय लिहायचे? प्रत्येक वेळेला अगदी असे लिहिण्याचा वा प्रश्ण विचारायचा रोख काय मग?
रहाता राहिला उकरून काढण्याविषयी, हे सुद्धा उगीच लिहिले आहे. तुम्हीच विचार करा ना, एखादी व्यक्ती पहिल्यांदा असे काही लिहितो तेव्हा तुम्ही मनात म्हणता, जावू दे.. लिहिले असेल असेच. पण पुन्हा पुन्हा पाहिल्यावर तुमच्या सुद्धा डोक्यात हेच येइल की काय करतेय तरी काय हि व्यक्ती व शेवटी सहज सुद्धा बोलूनच जाल की, का रे बाबा तू असे करतोस? तुला आधी हि करताना पाहिले म्हणून विचारतेय कि तुला असे करायचे कारण काय? त्यामूळे उगाच ते उकरणे वगैरे तुर्तास बाजूला राहू दे.

सुलेखा ह्यांचा खुलासा नक्कीच अपेक्षित आहे त्याबरोबरच मिनोती ह्यांचा सुद्धा वरील दोन मुद्द्यावर खुलासा अपेक्षित आहे. कारण त्यांना समजण्यात गैरसमज असेल तर आम्हालाही आमची चूक कळेल.

>>सुलेखा यांनी स्वत: काही खुलासा केला नाही, मूळ रेसिपीवर प्रतिक्रिया नाही, अन तरिही एवढे प्रतिसाद<<<<
हो, काय करणार, रेसीपी वर पहिलाच प्रतिसाद असा असल्यावर त्यानुसारच पोस्टी येणार. आणि तुम्हीच म्हटले ना कि तेव्हाचे तेव्हाच बोला व इथेच बोला मग इथेच बोलणार ना. Happy

किती त्या दुसर्‍यात खोड्या काढायच्या. मला हे http://www.egglesscooking.com/2009/03/02/vegan-blueberry-muffins/

साईटवर मिळालं.
{Ingredients
Ingredients Unbleached All Purpose Flour (I used bleached) 2 cups
Baking Soda 1 and 1/2 teaspoons
Salt 1/2 teaspoon Lemon zest from 2 lemons
Sugar 3/4 to 1 cup
Milk, any (I used Rice Milk) 1 cup
Canola Oil 1/3 cup
Lemon Extract (I did not use it) 1 teaspoon
White Vinegar (I used apple cider vinegar) 1 tablespoon
Blueberries, fresh or frozen 1 and 1/2 cups
Yield: 12 muffins.}

सुलेखाने तर गव्हाचं पीठ वापरल आहे. म्हणजे बेसीक रेसिपीमध्ये स्वतःचा बदल स्प्ष्ट आहे. कोणावर काहिही ताने मारायचे हे अती झालं. मुळात ती रेसीपी मराठीत द्यायचा प्रयत्न केला आहे. रेसिपी इंटरनेटवरून घेतली आहे हे लिहिलं आहे.

इंटरनेटवरून जेंव्हा १० वेगवेगळ्या ब्लॉग्जवरून एकत्र करून कोणी रेसिपी देत असेल तर ते त्या १० ब्लॉग्जची नाव लिहीणार का इंटरनेटवरून लिहिणार सोर्स म्हणून? इंटरनेटवर प्रत्येक रेसिपी ओरिजनल त्या ब्लॉगरची असेलच असही नाही. सुलेखाला ती रेसिपी आवडली आणि आपल्याबरोबर शेअर कराविशी वाटली ती तिने केली सोर्स कुठचा ते सांगून.

मी अजून नवीनच आहे मायबोलीवर पण असे काही पाहिले की वाटते की हि वृती व अट्टाहास हे दाखवत नसेल ना की, मी किती कायद्याला धरून चालते, मी नेहमीच कशी बरोबर वागते असे का? >>>>

हे मिनोतीबाबत लिहीले असेल तर माझा अनुभव सांगते.
मी माबोवर टाकलेल्या डाळ इडलीची रेसिपी मिनोतीला तिच्या ब्लॉगवर टाकायची होती. तेव्हा तिने मला कॉन्टॅक्ट करून माझी परवानगी घेऊन मगच ब्लॉगवर लिहीली. Happy

बाकी चालू दे तुमचे Happy

चिदेव ला अनुमोदन.
थोडे विषयांतर.
मी पण मायबोली वर नवीन आहे आणि थोड्या काळातच मी पाहिली आहे इथल्या बर्‍याच लोकांची प्रवृत्ती!
स्वत:ला सिद्ध करणे, बाकीच्यांवर आरोप करणे हे खास करुन इथल्या बर्‍याच जुन्या लोकांना फार आवडते. दुर्दैव असे की ते स्वत:च्याच मस्तीत असतात आणि आपण कसे वागतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही (किंवा आले तरी मस्ती मध्ये दुर्लक्ष करतात). आपल्या ग्रूप (कंपू म्हणतात आ ह्याला) कोणी मुर्खासारखी विधाने केली तरी त्याला अनुमोदन देणे आणि एखाद्या नवशिक्याची मात्र एक जरी चुक झाली (त्यांच्या मते) तर त्याच्यावर तुटून पडणे. स्वतःची लायकी न पाहता मत ठोकून देणे. खर तर मला ह्या लोकांच्या कुपमंडूक वृत्तीचे हसू येते. आहेत कोण ही लोकं खरं तर? लाखो वेबसाईट्स पैकी मायबोली एक, आणि त्याचे स्वयंघोषित पोलीस ही लोकं!! ह्यांना सांगावे वाटते, इथे त्याच विषयावर वर्षानूवर्षे तेच ते (टोमणे मारणे, कुचकट बोलणे, गरज नसताना मतप्रदर्शन करणे) करण्यापेक्षा कधीतरी आत्मपरिक्षण करा आणि ह्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.
वरील मजकूर सगळ्याच जुन्या लोकांन लागू होत नाही. इथे खूप चांगली आणि प्रगल्भ लोकंही आहेत ज्यांनी हे इगनोअर करावे.

प्राची , तुमचा अनुभव चांगला आहे ना पण मुद्दा हा आहे की इथे मिनोती अश्या लिंका का देतात व खोचक टिप्पणी?

आता हेच उदाहरण पहा, मेधा ह्या आयडीने खालील दुव्यामध्ये मध्ये लिहिलेल्या पाकृ वर सुद्धा अशीच एका साईटचा दुवा देवून टिप्पणी केलीय.
http://www.maayboli.com/node/18979

दोन्ही पाकृ अगदी आहेत खर्‍या सारख्या. Happy मग मेधा ह्यांनी काय लिंकमधील ब्लॉगरचे श्रेय 'स्वःताचे प्रयोग' म्हणून खपवतात असे मिनोती ह्यांना सुचवायचे आहे का? म्हणजे ते लिंक व त्याखालील मिनोतींची टिप्प्णी पाहून असेच मनात येते.
पण वरती तर मेधाताई अगदी प्रामाणिकपणे लिहितात की , ब्लॉगरचे श्रेय घेवू नये. मग त्यांनी लिहिलेली पाकृ खरेच स्वःताच्या प्रयोगातून केली असावी पण मिनोती ह्यांना तसे मान्य नसावे म्हणून लिंक दिली का?

म्हणून म्हटले मिनोती ह्यांच्याकडूनच जाणूनच घ्यावे की असे बर्‍याच रेसीपीवर लिंक देणे व हि रेसीपी इथल्यासारखीच आहे असे लिहिणे ह्यातून त्यांना काय म्हणायचे?

बाळूमामा, मी अजून तरी विशेष कुठल्या बाफवर फिरले नाहीये. पण इथला हा वरचा अनुभव पाहून तसेच जाणवते.

आर्च, तुम्हाला अनुमोदन. बरं झाले तुम्ही नेटवरची रेसिपी शोधुन इथे टाकलीत Happy
इंटरनेटवर प्रत्येक रेसिपी ओरिजनल त्या ब्लॉगरची असेलच असही नाही. सुलेखाला ती रेसिपी आवडली आणि आपल्याबरोबर शेअर कराविशी वाटली ती तिने केली सोर्स कुठचा ते सांगून. >>> अगदी बरोबर.

सुलेखा , मला वाटते रेसिपी टाकण्याचा हा तुमचा पहिलाच प्रयत्न. तुम्ही माबोवर रेसिपी जरूर लिहुन शेअर करा Happy

रेसिपी हवी असल्यास मी पण मायबोलीच गाठते. कारण माबोवर जास्त भरवसा Happy

माबो च्या सर्व रसिकांचे मनापासुन आभार..
ब्लुबेरी मफीन्स ची पा़कृ.मी नेट वरुन च घेतली..मला आवड्ली..लगेच करुन पहायला जमणार नव्हते..म्हणुन लिहुन ठेवली..[अर्थात कोणत्या ब्लोग्,साइट वरुन ते मी लिहुन ठेवले नाही..]मागच्या आठवड्यांत करुन पाहीले...छान जमले...पण भारतात सगळी कडे ब्लु बेरीज मिळत नाहीत..त्यामुळे अ‍ॅपल.केळे घालुन केले..जमले..वेगवेगळ्या प्रदेशात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधुनच एखादा पदार्थ तयार करण्याचा आनंद वेगळाच असतो..त्यात बदल करणे कधी कधी गरजे चे होते..म्हणूनच माबो वर देण्या चा मानस केला..वेगवेगळ्या प्रांता मध्ये राहीले..पदार्थ करण्याची आवड असल्याने अनेक पाकृ संग्रही आहेंत.. आपल्याल जमले ते इतरांना सांगावेसे वाटले..म्हणुन च लिहीले ..इतक उहापोह होइलसे वाट्ले नव्हते..
पुढची रेसिपी लिहीली आहे..बेडवी पुरी-साग..प्रतिसाद मिळेलच अशी अपेक्षा आहे...

सुलेखा,

मुद्दाम सांगायला आले - मफिन्स तुमच्या पद्धतिने केले - खरेच छान झाले. तुम्ही रेसिपी देत रहा - इंटरनेटवरुन शोधण्यापेक्षा मायबोलीवर शोधणे नक्कीच सोपे. पुढल्या रेसिपीसाठी मायबोली पाहात राहू.
बेस्ट लक!

अमी

अरे खूप दिवस इथे बघितलेच नाही. मला सीसीडीतले मफिन्स खूप आवड्तात तसेच हे दिसतातेत. ते कुठ्ल्या ब्लुबेरीज घालत असतील कोण जाणे. कणीक वापरली आहे ते हेल्दी आहे कि. मी केकच्या रेसीपीत विनेगर कधीच घातलेले नाही त्यामुळे तो अनुभव नाही. माझ्याकडे खूप चांगले फ्रुटी फ्लेवर्स आहेत. ते घालून केले पाहिजे.

हे इथे खरं तर आधीच लिहायचं होतं.

मायबोलीवर आपण नेहेमीच मूळ लेखकाच्या प्रताधिकाराचा (copyright) आदर करतो. जसं मायबोलीवरील एखादी कविता/लेख कोणी आपल्या ब्लॉगवर किंवा संकेतस्थळावर मूळ लेखकाचा संदर्भ न देता प्रकाशीत केला तर ते आपल्याला आवडणार नाही तसेच इतर ठिकाणची पाककृती जर घेतली असेल तर त्यांचा संदर्भ दिला नाही तर ते त्यांनाही आवडणार नाही. फक्त "ईंटरनेट" एवढंच लिहुन चालणार नाही. परत वरील उदाहरण पहा. जर तुम्हाला दुवा माहीत नसेल तर इतरांनी तो दिला असेल तर तो आपल्या पाककृतीत जरूर द्यावा. शक्य असेल तर त्या व्यक्तीची परवानगी घेतलेली असेल तर ऊत्तम.

आता बर्‍याच वेळा आपण पारंपारीक पाककृती इथे लिहितो, तेव्हाही ज्या कुणा नातेवाईकाकडून ही माहिती मिळाली त्यांचं नाव लिहितोच.

मिनोती यांनी जो प्रश्न विचारला आहे तो बरोबर आहे. तुम्हालाही जर असे काही आढळून आले तर जरूर कळवा. तसेच एखादा मुद्दा पटला नाही तर त्या मुद्द्याचा विरोध करा. मुद्दा मांडणार्‍या व्यक्तिवर वैयक्तिक दोषारोप केले जाणार नाहित याची काळजी घ्या.

अ‍ॅडमिन/ जाणकार...

इथे मला रेसिपी लिहायची असेल तर कशी लिहू?
म्हणजे मी फक्त एकदा गुलमोहोरावर लिखाण आणि बाकी फक्त प्रतिक्रियाच दिल्या आहेत. त्यामुळे इतर विभगात लेखन कसं करयचं हे माहिती नाहिये मला.
सांगाल का प्लीज?