कोणीच ना पहाते...

Submitted by स्वानंद on 6 September, 2010 - 11:40

कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ?

ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा

संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा

माझे अबोलणेही भासे मला विषारी
कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा

आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला
माझा अनाम साथी असला सुना नकाशा

तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची
तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान!

आता 'आनंद वा सुखांचे' ऐवजी 'स्वानंद वा सुखांचे' असे केले तर धमालच येईल!

आपल्याला शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

अत्यंत सुंदर ग़ज़ल! बेफिकीरच्या सुचनेचा विचार केलेला दिसत नाही. तसा आनंद आणि स्वानंदमध्ये फरक तो काय?

बादवे, स्वानंद किरकिरे तुम्हीच का? Happy

स्वानंद वा सुखांचे केल्यास - सुखांचे किंवा स्वतःचेही प्रदेश नसणे असे होऊ शकेल व एक वेगळीच मजा येईल.

(व्यक्तीगत मत)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!