प्रेमात पडला Electronics Engineer

Submitted by जग्या on 4 September, 2010 - 11:53

प्रेमाचा Doppler Radaar माझा
ठेवतो मी नेहमी Activate
कोण जाणो करून जाऊ शकते
कधीही नकळत ‘ती’ Captivate

रोजच वाटते मिळतोय signal
पण असते नुसतीच खरखर
channel ‘Fine-tune’ करेपर्यंत
निघून जाते ‘ती’ भरभर

Network coverage वाढावे म्हणून
modulate करतो मी Bandwidth Range
Resonance मात्र होत नाही कारण
माझी wavelength च आहे strange

निराश झालो कारण झाला Jam
माझ्या प्रेमाचा band pass filter
तेवढ्यात screen वर दिसली sine wave
आले असेल कहो ‘ तिकडून ‘ उत्तर ??

वाटले मलाही ‘Koi Mil Gaya ‘
अन ‘प्रेमाची Frequency’ मिळाली
कळले नंतर तो होता Interference
कारण Reception cable होती जळाली

- जग्या Happy
४/९/२०१०

शब्दखुणा: 

अफलातून Lol इंजिनिअरिंगची ४ वर्षे आठवली तरी तुला भरपूर टर्मिनॉलॉजिस लक्षात आहेत.
मला फक्त आत्ता रेसिस्टरची वॅल्यूच तेवढी काढता येते. Wink

त्या नंतर... सगळ्या का.का .कवितांमध्ये...

चांगल्या का.का.कविता
काहीच्या काही का.का. कविता असे विभाग करावेत.... Happy

धन्यवाद मित्रानो ..... या पुढील लेखन "जग्या वालचंदनगरी " या नावाने करावे म्हणतोय ... असाच प्रतिसाद राहू द्या हि विनंती ....

@ रन्गासेठ - मित्रा , प्रेमात resistance मोजता येणेच जास्त महत्वाचे असते ....resistance वाढला कि शिव्या/ मार खाण्याचे chances जास्त ..... बरोबर ना ?

@ Dr साहेब - यमक आवडली तुमची ... कधी करताय मग कविता ??

मी तर तब्बल १४ वर्षांनी टर्मिनॉलॉजि वाचतेय. एकही शब्द आठवत नाही. सहा वर्ष ( डिप्लोमा आणी डिग्रीची मिळुन हो.. नाहीतर कुणितरी लगेच मठ्ठ म्हणायच Uhoh ) मला आज रेजिस्टर्ची वॅल्युपण काढता येणार नाही Sad

कविता छानच Happy

@मिनी - माझ्या Room mate ची case थोडी wireless network सारखी होती . Login केल्या केल्या त्याला मोट्ठे जरी नसले तरी "मिनी" (चे ) signal regularly मिळायचे Happy Wink

@ अवधूत - प्रश्न आवडला. Normally लोक "तुम्ही खरच स्वतः eng आहात काहो?" असे विचारतात Lol .
मी Mech. Engg. आहे

जग्या तुमची कविता वाचली, आवडली. प्रतिसाद पण वाचले. मंदार जोशींच्या प्रतिसादावरुन मलाही वाटले, आपल्या क्षेत्राचा पण झेंडा फडकवावा... म्हणून लगेच लिहायला घेतली ही कविता...
वाचा नक्की हं माझा झब्बू :
प्रेमात पडली Clinical Psychologist
http://www.maayboli.com/node/19623 Happy

@ सानी - सानीजी , धन्यवाद . तुमची कल्पना आवडली. सध्या engineer आणि doctors नि प्रेमात पडण्याचा season च सुरु आहे म्हणा कि Happy

काही उपोग नाही. जगात (देशात) साईन वेव्ह्ज कमी , त्यामुळे रेजोनन्स कमी. हलकासा रेजोनन्स दिसला की फ्यमिली इनिशीएटेड इंटरफिअरन्स जास्ती आहे. रेझोनन्ट एंड्साठी पिक्चर बघा हिंदी. Proud

* आपल्याला अनुभव नाही, पण सर्किट बोर्ड उडालेले बरेच मित्रमैत्रिणी आहेत Sad

सध्या engineer आणि doctors नि प्रेमात पडण्याचा season च सुरु आहे म्हणा कि.....
AnimatedSmileyDoctor.gifsmileyvault-cute-big-smiley-animated-045.gifAwesome_Smiley___Engineer_TF2_by_Sitic.png हा हा हा!!!!!

@ आगाऊ - आपल्या "युग" प्रवर्तक comment बद्दल धन्यवाद .... मोट्ठे श्रेय "कमलाकर" जी व "सानी" जी ना जाते ..... त्यांनी माझ्या "कल्पने" च्या झ्होपडी मधून आपल्या प्रतिभा शक्ती ने "टोलेजंग" इमारत उभी केली ... Happy
@ ऋयाम - जसा राखेतून phoenix जन्मा ला येतो , तसा उडालेल्या circuit board मधून micro-chip निर्माण होऊ शकते . Common yaar , आखिर उम्मीद पे हि दुनिया तिकी हैं Happy
@ प्रसिक - धन्यवाद . तुमची animations आवडली Lol

@ आगाऊ - आपल्या "युग" प्रवर्तक comment बद्दल धन्यवाद .... मोट्ठे श्रेय "कमलाकर" जी व "सानी" जी ना जाते ..... त्यांनी माझ्या "कल्पने" च्या झ्होपडी मधून आपल्या प्रतिभा शक्ती ने "टोलेजंग" इमारत उभी केली ... Happy >>> जग्या धन्स हं Happy पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. Happy तुम्हाला पु.ले.शु. Happy

@ सानी - अर्रे वां ... झ्होपडी आणि इमारती चे बोलता बोलता एक गोष्ट सांगायचीच रहायली .... तुम्ही आणि आम्ही एकाच "Mutual Admiration" society मध्ये रहातो बरका Happy

मोट्ठे श्रेय "कमलाकर" जी व "सानी" जी ना जाते ..... त्यांनी माझ्या "कल्पने" च्या झ्होपडी मधून आपल्या प्रतिभा शक्ती ने "टोलेजंग" इमारत उभी केली >> खर तर तुमचेच आभार "जग्या" जी. या "टोलेजंग" इमारतीचा पाया तुम्हीच तर रचला. Happy लवकर नविन पाया (कविता) टाका बरं Happy .

तुम्ही आणि आम्ही एकाच "Mutual Admiration" society मध्ये रहातो बरका Happy >>>
हं हे मात्र अगदी बरोबर आहे हं जग्याजी Happy

खर तर तुमचेच आभार "जग्या" जी. या "टोलेजंग" इमारतीचा पाया तुम्हीच तर रचला. Happy लवकर नविन पाया (कविता) टाका बरं Happy >>> "कमलाकरजीं"नी लिहिलंय तेही अगदी खरं आहे. मी तर हेही म्हणेन की पहिली, मुख्य आणि original निर्मिती करणारा सगळ्यात महत्त्वाचा असतो. एकदा निर्मिती झाली, की तिच्या प्रतिकृती बनवणे, त्यांना अधिक सुशोभित करणे, त्यांचा विस्तार आणि डागडुजी करणे फारसे अवघड नसते...आणि आम्ही तसेच काहीसे केलेय Happy

@ कमलाकर आणि सानी - कौतुकीची थाप पाठीवर परत एकदा मारल्या बद्दल धन्स ... लोभ असावा हि विनंती ...
@ स्वप्ना - Lol