प्रेरणा:
जग्या यांची प्रेमात पडला Electronics Engineer ही कविता आणि त्या कवितेच्या प्रेरणेतून लिहिलेली कमलाकर विभुते यांची प्रेमात पडला Software Engineer ही कविता.

******************************************************************************************************************
प्रेमात पडली Clinical Psychologist
Consciously जगत होते
तू नव्हतास तोवर
Balanced वागत होते
जोवर नव्हता तुझा वावर
तू आलास आणि
Develop झालं obsession
जरा नाही दिसलास की
उफाळून यायचं depression
तू समोर असलास की
कायमंच mania
कधी मला सोडून जाशील
सततचा phobia
तू एकदम स्मार्ट आणि होतकरु
अगदी हवा तसा बॅचलर
तुला जिंकता यावे म्हणून
पछाडले Jung अन Adler
तुझ्या स्वभावाचे करुन पाहिले
Freudian Analysis
DSM मधे कुठे बसतोस
ह्यावर लिहित बसले thesis
वाटते आता काढावी
तुझी EEG
आणि बघावे MRI ने तरी
होतो आहेस का राजी
कधी वाटते करावे तुला
पूर्ण hypnotize
तुझ्यावरचे माझे प्रेम
कसे कळणार तुला precise ?
मी एकटीच आहे का रे
अशी अपेक्षा ठेवणारी
Maslow ची hierarchy
गाठता यावी म्हणून झटणारी ?
खात्री आहे तू मिळाल्यावर
मला येईल सगळं realization
झटक्यात गाठेन मी stage of
Self- actualization
*ह्या कवितेत वापरल्या गेलेल्या मानसशास्त्रीय शब्दांचे अर्थ इथे सापडतील.
सानी धप्पा काय चाललयं हे
सानी धप्पा काय चाललयं हे

तू समोर असलास की कायमंच
तू समोर असलास की
कायमंच mania
कधी मला सोडून जाशील
सततचा phobia>>>>
आवडेश!
श्री, मयुरेश धन्स हं
श्री, मयुरेश धन्स हं
मस्त.
मस्त आहे
मस्त आहे
मस्त गं! काही शब्द ओळखीचे
सानी जी , तुमची कविता "वेड "
सानी जी , तुमची कविता "वेड " लावणारी आहे

एकदम झ्हकास जमून आली आहे ... तुमचा झ्ह्ब्बू आवडला
मस्त.
मस्त.:):हाहा:
कधी वाटते करावे तुला पूर्ण
कधी वाटते करावे तुला
पूर्ण hypnotize
तुझ्यावरचे माझे प्रेम
कसे कळणार तुला precise
छान! गुड वन!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
तुला जिंकता यावे
तुला जिंकता यावे म्हणून
पछाडले Jung अन Adler>>> जियो, जियो
सानी तुला RET ची गरज आहे!!!!
तू समोर असलास की कायमंच
तू समोर असलास की

कायमंच mania
कधी मला सोडून जाशील
सततचा phobia .......... सही आहे सानी..
वा वा सानी जी..... क्षणभर ECT
वा वा सानी जी..... क्षणभर ECT दिल्यागत झालं......
भन्नाट रचना... खूप आवडली.
अजून लिहा....
सानी, असं पेशंटमधे गुंतायचं
सानी, असं पेशंटमधे गुंतायचं नसतं बरं का, त्यापेक्षा एखाद्या नॉर्मल माणसाला पेशंट करुन टाकायचं, आणि त्याच्या पेशन्स चा अंत बघायचा, कसं ?
कमलाकर, मन-कवडा, वत्सला, जग्य
कमलाकर,
मन-कवडा,
वत्सला,
जग्या,
मुटेजी,
बेफिकीर,
आगाऊ,
प्रसिक,
डॉ. कैलास,
दिनेशदा,
खुप खुप धन्यवाद!!!
सानी तुला RET ची गरज
सानी तुला RET ची गरज आहे!!!!>>>> आगाऊ, धन्य रे! तुला या पण क्षेत्रातलं सगळं माहितीये ___/\___
अरे, माझी REBT पण झाली... पण वेड जाईना, काय करू
डॉ. कैलास, ECT!!!!! बापरे
दिनेशदा, पुढच्या वेळी तुमचा सल्ला नक्की पाळेन
मग शेवटी कोणती थेरपी
मग शेवटी कोणती थेरपी चाललीय?
"पुढच्या वेळी " म्हणजे किती वेळा?...मला वहिदा-राजेश-धर्मेंद्र यांचा खामोशी आठवला (हमने देखी है उन आंखोंकी महकती खुशबू----नक्कीच क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची गरज आहे तिथे -डोळ्यांना वास येतो आणि तो दिसतो!!)
भारीये
भारीये
भरत, डुआय, खुप खुप धन्स मग
भरत, डुआय, खुप खुप धन्स

मग शेवटी कोणती थेरपी चाललीय?>>> नाही आता कोणतीच नाही...थेरपीच्या पलिकडची स्टेज गाठली मी केंव्हाच
"पुढच्या वेळी " म्हणजे किती वेळा?>>> किती पेशंट्स येतील यावर अवलंबून आहे हे
आता मला एकच गाणं आठवतंय, "ये दिल, दिवाना, दिवाना, हैं ये दिल
सानी - Good one. या कवितेचा
सानी -
Good one. या कवितेचा अर्थ लागतो. शब्द उगाच वापरले नाहीत
बहुतेक अशा कवितेत मूळ Theory च चुकलेली असते
वाव !! सानी, खुप मस्त. माझ्या
वाव !! सानी, खुप मस्त. माझ्या लिखाणाच्या धांदलीत कविता वाचायला मिळालीच नाही.
किप इट अप ... ऑल वेज
शुभेच्छा
देवनिनाद
सानी, लै भारी.... खुप
सानी, लै भारी....
खुप शुभेच्छा..
छान आहे, उगाच शब्दांच्च खेळ
छान आहे, उगाच शब्दांच्च खेळ मांडलेला नाहीये. खरच आवडली
तू समोर असलास की कायमंच
तू समोर असलास की

कायमंच mania
कधी मला सोडून जाशील
सततचा phobia
सानी,
वाह ...क्या बात है !
तुमची कविता वेड लावणारी आहे हे खरंच आहे !
मला तर बहिणाबाईंची ती कविता आठवली .....मन वढाय वढाय ...उभ्या पिकातलं ढोरं ..!
तुमचे इंग्रजी शब्द मात्र आमच्या डोक्यावरुन गेले .....
अवधूत, निनाद, ठकु, असुदे, अनि
अवधूत,
निनाद,
ठकु,
असुदे,
अनिल,
फार मस्त वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून!!! तुमचे अनेक आभार
एकद्म भारी!!!
एकद्म भारी!!!
गणेश, आभारी आहे
गणेश, आभारी आहे
सानी................. तोडलस,
सानी................. तोडलस, फोडलस.........
खुप सही लिहिलयस सानी
खुप सही लिहिलयस सानी
सानी, शप्पथ धम्माल आहे
सानी, शप्पथ धम्माल आहे
सही गं... मस्तच जमलीये !
सही गं... मस्तच जमलीये !
Pages