अतुल्य! भारत - भाग १० : जोधपुर (राजस्थान)

Submitted by मार्को पोलो on 2 September, 2010 - 02:43

जोधपुर ही पुर्वी मारवाड ची राजधानी होती. ह्या शहराला "निळे शहर" असेही म्हणतात. ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात त्यामुळे बरेचसे शहर निळे दिसते.
ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "मेहरानगढ किल्ला" व "जसवंत थडा".

मेहरानगढ :
ह्या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा ह्याने १४५८ मध्ये सुरु केले. हा किल्ला शहारापासुन ४०० फूटांच्या ऊंचीवर स्थित असुन चारही बाजूंनी ऊंच तटबंदिने सुरक्षित केलेला आहे. ह्या किल्ल्यावर आजही तुम्हाला तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात. ह्या किल्ल्याला एकूण ७ दरवाजे आहेत. ह्या किल्ल्यातले संग्रहालय हे राजस्थानातील काही प्रमुख संग्रहालयांपैकी एक मानले जाते.
प्रचि १

-
-
-
किरत सिंग सोधा ची छत्री...
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
तोफगोळ्यांच्या खुणा
प्रचि ६

-
-
-
किल्ल्याची तटबंदी व आतील भाग
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
ईथे पर्यटकांचे स्वागत पारंपारीक राजस्थानी संगीत वाजवुन केले जाते.
प्रचि १२

-
-
-
अशाच संगीतावर थिरकणारा एक राजस्थानी मुलगा.
प्रचि १३

-
-
-
खिडक्यांवरील नक्षी. ह्या सर्व खिडक्यांवरील कोरीव काम/जाळीची नक्षी हे दगडामध्ये केलेले आहे.
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
तुमचे भविष्य तुमच्या हातात.
प्रचि २०

-
-
-
शाही महाल
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
किल्ल्यातील संग्रहालय
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-

प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
किल्ल्याची तटबंदी व त्यावरील तोफा
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-

जसवंत थडा :
जसवंत थडा सरदार सिंग ह्याने १८९९ मध्ये महाराजा जसवंत सिंग दुसरा ह्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला. हा पुर्णपणे संगमरवरात बांधला आहे.
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
जोधपुर शहर
प्रचि ५०

-
-
-
मेहरानगढ किल्ला:
प्रचि ५१

-
-
-
-------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - जयपुर (राजस्थान)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
-------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

मेहरानगड अत्यंत सुंदर आहे. प्रचि १४ पाहिल्यावर लक्षात आले का, 'घूंघट की आड से' चं इथे शूटिंग झालंय तसंच 'म्हारे हिवरा मे नाचे मोर' ची सुरुवात.. ते एका राजाला १०० राण्या असल्याची गोष्ट सांगत असतात ते इथेच. जोधपूर हे तसं गरीबच आहे. पण निव्वळ पैसे वाचवण्यासाठी चुन्यात निळ मिसळत नसावेत. कारण याला ब्ल्यू सिटी प्रमाणे सन सिटीही म्हणतात इतकं ऊन असतं. भौगोलिक परिस्थितीचा काहीतरी परिणाम म्हणून निळा रंग प्रचलित असावा.
महालाबद्दल विशेष म्हणजे सर्व रंग वनस्पतींपासून बनवले आहेत आणि छत, खांबांचे पत्रे हे सोन्या चांदीचे आहेत. आता पुन्हा एकदा प्रचि २१ पासून पुढे पहा. डोळे विस्फारतील! Happy

मस्त रे चंदन... Happy अगदी तुझ्या नावाप्रमाणे.. रंगसंगती आहे ह्या फोटोंमधे Happy

राजस्थानमधली शस्त्रे... एकदम क्लास. तिथे असा बाजारही भरतो. Happy

शाही महाल... एकदम झकास... खरच अतुल्य भारत अन अतुल्य असे तुझे फोटो Happy

आशूडी, माहीती बद्दल धन्यवाद. कोण म्हणेल फक्त लंका सोन्याची होती... जर लंका सोन्याची होती तर.. हा भारत तीचा बाप होता Wink

हाही भाग मस्त, शाही महाल एकदम डोळे दिपवणारा आहे. किल्यातील नक्षीकाम, तोफा, शस्त्रे पण जबरदस्तच. आणखीण एक म्हणजे किल्यावर असणारी स्वच्छता पण नोंद घेण्यासारखी आहे. शेवटच्या फोटोतील फ्रेम पण आवडली. Happy

आशूडी , चांगली माहिती Happy

चंदन, छान फोटो. उम्मेद भवन राजवाडा पण सही आहे. मस्त टेकडीवर वसवलेला आहे. ओसियांचे मंदिर नाही का पाहिले?

ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात(पैसे वाचविण्याच्या काय पण तर्‍हा).
<<<<
जोधपुरातला तो निळा रंग ब्राह्मणांशी निगडित आहे. पूर्वी ब्राह्मणांची घरं वेगळी ओळखू यावीत म्हणून ती अशी निळी रंगवली जात असत. मग अशी काही अट राहिली नाही. बर्‍याच लोकांनी तशी रंगवून घेतली घरं. आम्ही ज्या हवेली हॉटेलात राहिलो होतो जोधपुरात, तिथल्या मालकांनी ही माहिती सांगितली होती.
या पानावरही आहे तसा उल्लेख.

दैदिप्यमान राजस्थानची दैदिप्यमान फोटोग्राफी! मन भरून आले.

हा साराच अतुल्य भारत पाहून तुम्ही धन्य झालात. आम्हालाही अशी संधी मिळो.

चंदन, मला प्रची-१७, मानवी सृजनाचा आविष्कार म्हणून माझ्या अनुदिनीवर वापरण्याची इच्छा आहे. अनुमती द्यावी ही विनंती.

अ प्र ति म!!!!!
मित्रा, आता तुझे कौतुक करायला शब्दपण तुच देत जा पुढिल प्रचिंबरोबर Happy
७, ११, २१, ४५ भन्नाट आवडले.

सुंदर फोटो Happy
शहर खरच काय छान नीळं दिसतय.
७, १०, १३,१९,४०,४५,५०,५१ आवडली

आशूडी, श्रद्धा माहीती बद्दल धन्यवाद.

आशूडी आणि श्रद्धा,
अधिक माहिती बद्दल धन्यवाद. लेखात बदल केला आहे. मला जी माहिती गाईड ने सांगितली ती मी लिहीली होती. चूभूदेघे...
'घूंघट की आड से' चं इथे शूटिंग झालंय तसंच 'म्हारे हिवरा मे नाचे मोर' ची सुरुवात.. >>>
आता ही गाणी पुन्हा पाहिली पाहिजेत... Happy
---------------------------------------------------
सुकी,
तिथे असा बाजारही भरतो>>>
अरे, हे माहितच नव्हते. नाहितर आणली असती २-३ आठवण म्हणुन.
कोण म्हणेल फक्त लंका सोन्याची होती... जर लंका सोन्याची होती तर.. हा भारत तीचा बाप होता >>
अगदी खरे...
---------------------------------------------------
रंगासेठ,
आणखीण एक म्हणजे किल्यावर असणारी स्वच्छता पण नोंद घेण्यासारखी आहे>>>
हे अगदी खरे आहे. राजस्थानात सर्वच जागी अशी स्वच्छता दिसते.
---------------------------------------------------
नरेंद्रजी,
आपण ती प्रचि वापरू शकता.
आपल्याला आवर्जुन सांगावेसे वाटते की त्या सर्व खिडक्यांवरील कोरीव काम/जाळी दगडातील आहे.
---------------------------------------------------
प्रकाश,
३२,३३,३४ हत्तीवरचे किंवा उंटावरचे मेणे(कॅरीयर) आहेत वाटते>>>
मलाही तसेच वाटते आहे.

प्रचि-१३ मधले वाद्य आहे "रावणहट्टा".
अतिशय सुंदर मनोहारी रचना याचेवर धनुष्याने वाजवण्यात येतात.

शोभा गुर्टू यांनी गायलेल्या,
"रंगरंगिलो छेलछबिलो" या राजस्थान पर्यटन मंडळाच्या गाण्यातही रावणहट्टचे सूर आहेतच.

मस्त. Happy

कोरीवकाम केलेल्या तोफेचा फोटो, अँगल आवडला.

(बाकी, कोरीव काम असलेली तोफ, तलवारीची रत्नजडीत मूठ, याला निव्वळ कलेवरचे प्रेमच जबाबदार असले पाहीजे. नाहीतर शस्त्रास्त्रांना वेगळा 'लुक' द्यावासा कुणाला वाटेल?)

Pages