चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही!

Submitted by नरेंद्र गोळे on 31 August, 2010 - 05:21

घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घराला मुळातली संपन्नता काही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही.

आपल्या भारताचे तसेच झाले असावे असा मला संशय येतो आहे. भारतात ७०% व्यवसाय शेतीचा समजला जातो. म्हणून भारतातला कर्ता व्यवसाय, शेतीच म्हणायला हवा. मग भारत जर दारिद्र्यरेषेवरच घुटमळत असेल तर, तो दोषही कर्त्यालाच चिकटायला हवा ना!

सर्व जगात थेट कर-आकारणी तिथल्या प्रमुख व्यवसायांवर केली जाते. मॉरिशससारख्या देशात तो पर्यटनव्यवसाय असतो, जपानसारख्या देशात उद्योगधंदे असतात, मग भारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते. कर्त्या पुरूषाच्या आमदनीवर घर चालावे अशी अपेक्षा काय अवाजवी आहे? मग इतर छोट्यामोठ्या व्यवसायांना वेठीस धरून त्यांच्या जीवावर राज्य चालवणे ह्यात कर्त्याचा पुरूषार्थ तो काय राहिला?

एक जमाना होता जेव्हा भारतातील शेतकरी ताठ कण्याने जगत असे. आपला मुलगा आपल्याच व्यवसायात रहावा तरच तो संपन्न होऊ शकेल अशी त्याची खात्री असे. मुंबईला जाऊन शिकू पाहणार्‍या मुलासही बाप विचारत असे, "ही काय तुला अवदसा आठवली? इथेच शेती कर. जमीन भरभरून संपत्ती देते आहे. त्या काळ्या आईची सेवा कर. ती तुला काहीही कमी पडू देणार नाही." पण असे म्हणणारा बापच आज दिसेनासा झाला आहे. कुठे शोधायचे त्याला?

आजचा शेतकरी असलेला बाप म्हणतो, "शेतीत काही राम राहिला नाही. पावसाच्या कृपेवर अवलंबून असणारी शेती दिवसेंदिवस बे-भरवशाची ठरू लागली आहे. इथे राहिलात तर पोटापाण्याचे वांधे होतील. तेव्हा शिकूनसवरून उद्योगाला लागा. नोकरीधंदे करा, पण शेती करू नका. का? तर ती फायदेशीर राहिलेली नाही!" खरच का हो शेती फायदेशीर राहिलेली नाही?

विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. सिंधुताई सपकाळ म्हणतात, "शेतकरी आत्महत्या करतो. पण शेतकर्‍याची बायको आत्महत्या करत नाही. ती, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची चिल्लीपिल्ली हर प्रयत्नांनी वाढवते. त्यांचा सांभाळ करते. म्हातार्‍या आईवडलांना आधार देते आणि त्याच शेतीला पुन्हा नांदती करून, आयुष्य सुखरूप करते." असे जर असेल तर मग तो शेतकरीच ते का साध्य करू शकत नाही हो? तोच कुठे तरी अपुरा पडतो आहे की काय?

मला वाटायचे की घरपट्टीत वाढ होते, पाणीपट्टीत वाढ होते तशी शेतसार्‍यातही नियमित वाढ होत असणार. पण तशी स्थिती नाही. वीसवीस वर्षे तोच शेतसारा भरणारे शेतकरी, शेतीचे उत्पन्न मात्र कायमच चढत्या दरांनी विकून आमदनी वाढवत आहेत. म्हणजे खर्च कमी होत आहे, उत्पन्न वाढतच आहे. तरीही शेती परवडत नाही असे बव्हंशी शेतकरी का बरे म्हणत असतात?

विहीरी, बी-बियाणे, अवजारे, पंप यांकरता घेतलेली कर्जे सदा-अन-कदा माफ केली जातात. शेतीच्या पंपांना वीज कमी दराने दिली जाते व कित्येकदा तिची बिलेही माफ केली जातात. खते, बी-बियाणे, अवजारे यांकरता सरकारे कायमच अनुदाने (सबसिडी) देतांना दिसतात. दर पावसाळ्यापश्चात आपापल्या भागांना अवर्षण ग्रस्त जाहीर करवून घेऊन, सरकारी अनुदाने मिळवण्याची त्यांच्यात होड लागते. अनेकांना तीही हरसाल मिळतांना दिसते आहे. तरीही शेती अनुत्पादक कशी बरे ठरत आहे?

एकदा मी असाही विचार केला की, समजा शेतकरीच ना-करता ठरत आहे म्हणा, किंवा चांगले हुशार लोक या व्यवसायातच येत नाही आहेत म्हणा, म्हणून पुरेशा प्रयासां-अभावी शेती अनुत्पादक ठरत असावी. मग इतर व्यवसायात जाणार्‍या हुशार लोकांना, ती तर पर्वणीच वाटली पाहिजे. म्हणजे शेतीस उत्पादक बनवा आणि संपन्न व्हा. साधेसोपे खुले आव्हान. पण नाही. अशी कुणालाही शेती खरीदता येत नाही हो, भारतात. तुम्ही शेतकरी असलात तरच शेती खरेदी करू शकता, असे मला कळले (म्हणजे आमची संधी गेलीच म्हणायची! कारण आम्ही वंशपरंपरागत भूमीहीन!! – आठवा, "उंबरठ्यास कैसे शिवू, आम्ही जातीहीन"). म्हणजे होतकरू व्यावसायिकांना शेती करण्यास मज्जाव आणि परंपरागत शेतकर्‍याची ढासळती उमेद, अशा दुष्टचक्रात शेतीचा व्यवसाय अडकलेला दिसत आहे!

शेतमालाचे भाव, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून राहतात. उत्पादनखर्चावर किंवा शेतकर्‍याच्या गरजांवर नाही. त्यामुळे वस्तूंच्या कृत्रिमरीत्या निर्माण केल्या गेलेल्या सुकाळ-दुष्काळाने, सृजनशील शेतकर्‍यांनी कष्टाने निर्माण केलेल्या शेतमालास, कवडीमोल किंमतीत फुकून टाकण्याची वेळ, वायदे-बाजारात दलाली करणारे सृजनाशी संबंध नसणारे दलाल, पैशाच्या ताकतीवर आणतांना दिसतात. केंद्रीभूत अर्थव्यवस्थेचा हा अनिवार्य दुष्परिणाम आहे.

शेतकर्‍यांनी केंद्रीभूत अर्थव्यवस्थेपेक्षा विभक्तघटकाधारित अर्थव्यवस्था स्वतःहून निर्माण करण्याची गरज आहे. पाणी, वीज, बी-बियाणे, खते यांकरता आपल्या जमीनीबाहेरच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्याच जमीनीवर केलेल्या पर्जन्यशेती, सौरवीजशेती, पशुपालन आणि पारंपारिक शेती यांच्या आधारे स्वयंपूर्णता प्राप्त करून घेणे शक्य आहे का? असे शक्य असेल तर चार जणांच्या एका कुटुंबास स्वयंपूर्णता साधण्याकरता जमीनीचा केवढा तुकडा जरूर ठरेल?

इथे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या जवळपास १०० कोटी आहे तर भारताचे क्षेत्रफळ ८७ कोटी एकर आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एका माणसास अर्ध्या एकरापेक्षा जास्त जमीन याकरता मिळण्यासारखी नाही!

खालील पत्त्यावरील माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
http://swayambhuu.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

arc | 2 September, 2010 - 05:26 >> अनुमोदन.

तसेच ..
धान्याची दारु निर्माण केली तर काय बिघडणार? काही नाही. त्यावर एक बाफ आहे, तिथे मी ते शेतकर्‍यांना कसे फायदेशीर ठरेल हे लिहले आहे.

जाते ते धान्य अतिरिक्त असते की कसे >> ते अतिरिक्त नसते, ६०-८५ च्या काळात धान्याच्या काळाबाजार व्हायचा. साठवणूकदार ते साठवायचे व मान्सून खराब गेला की दुप्पट किमंत घेउन ते विकायचे. त्याला प्रतिबंध म्हणून सरकारने अनेक योजना सुरु केल्या होत्या, त्यातील एक म्हणजे सरकारी गोदामे. किमतीवर नियंत्रन करण्यासाठी मग जेंव्हा गरज पडेल तेंव्हा सरकार हे धान्य खुल्या बाजारात आणते. तसेच युद्धजन्य परिस्थिती / नैसर्गीक आव्हाने इ साठी पण ह्या अंतर्गत योजना केली जाते. (वाजपेयीच्या काळात प्रथमच ही गोदामे भरुन वाहत होती. पण त्यांना हा मुद्दा नीट मांडताच आला नाही. ) ह्यातील भरपुर गोदामात शीतगृहे नाहीत. त्यामुळे फळे, भाजा इ नाशवंत माल विकतच घेतला जात नाही. कित्येक गोदामे ही नीट न वापरल्या गेल्यामुळे तिथे ठेवलेले धान्य निकॄष्ट होते. शिवाय त्यातून देखील काळाबाजार चालतो हे आहेच.

मुख्य मुद्दा म्हणजे शेती मध्ये एन्ड टू एन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणने जरुरी आहे, तर शेती अमेरिकेसारखी फायदेशीर होईल. खरेतर इतके सगळे अयोग्य असूनही भारत अनेक गोष्टी जसे साखर / कॉटन निर्यात करतो हे भुषणावहच म्हणावे लागेल.

कोणी बिटी बियानांवर किंवा जमिनीची धुप ह्यावर अजून का लिहले नाही? इथे असलेले शेतकरी लिहतील काय?

मी इथे कंट्रोल बद्दल लिहले होते. काय योगायोग - काल शरद पवारांनी, मनमोहनसिंगांना एक प्रेझेंटेशन दिले त्यात साखर इन्डस्ट्री डिकंट्रोल करावी ह्या दृष्टीने पावले उचलण्यात यावीत हे सुचविले आहे.
http://www.thehindu.com/news/national/article609346.ece

अश्विनीमामी, तुम्ही कळीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अर्ध्या एकर शेतजमीनीत म्हणजे सुमारे २२,००० वर्गफूट जमिनीत चार जणांचे कुटुंब पोसले जाऊ शकेल असे मला कशावरून वाटते?

मी गोळा केलेली प्राथमिक माहिती खाली देत आहे. सोबतच माझी स्वयंपूर्ण भूखंडाच्या किमान आकाराची संकल्पनाही मांडत आहे. तिचीच परीक्षा घ्यावी ही विनंती

स्वयंपूर्ण भूखंड

चार जणांच्या कुटुंबास, स्वावलंबी, स्वयंपूर्ण जीवन स्वाभिमानाने जगण्यास सोयीच्या भूखंडाचा किमान आकार काय असावा? तिथे घर करून राहणार्‍यांना प्रकाश, पाणी, वारे, वीज, ऊर्जा आणि इतर जगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क साधण्याकरता आवश्यक ती साधने, त्या भूमीतील उत्पन्नातूनच मिळवणे शक्य होईल का? स्वसंरक्षणही करणे साधता येईल का? याबाबत निकष प्रस्थापित करणार्‍या अभ्यासाची साधने गोळा करणे हा या अनुदिनीचा उद्देश आहे.

१. कमाल उपलब्ध जमीन
भारताची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे १ अब्ज दोन कोटी इतकी आहे. तर भारतभूमीचे क्षेत्रफळ सुमारे ८१ कोटी तेवीस लक्ष एकर इतके आहे (माहितीस्त्रोत: http://india.gov.in/). यावरून भारताची लोकसंख्या घनता दर एकरी सुमारे दीड माणूस अशी येते. एका एकरात सुमारे ४३,५६० वर्ग फूट भूमी असते, हे लक्षात घेता एका माणसास स्वतःचा चरितार्थ चालवण्याकरता, फार फार तर सरासरी २९,००० वर्ग फूट जमीन मिळण्यासारखी आहे. प्रत्यक्षात नद्या-नाले, डोंगर-तलाव, वनराई-जंगले, वाळवंटे-हिमनद्या इत्यादींनी व्यापलेली भूमी उपजीविका साधण्यासाठी योग्य धरता येणार नाही. यांव्यतिरिक्तची जमीन समसमान वाटली तर माणशी अर्ध्या एकराहून कमी जमीनच काय ती प्रत्येकाच्या वाट्याला, उपजीविकेकरता म्हणून मिळण्यासारखी आहे. अगदी कमाल जमीन उपलब्धता गृहित धरली तरीही, चार जणांच्या कुटुंबास सुमारे १,१६,००० वर्ग फूटापेक्षा जास्त जमीन, उपजीविकेकरता उपलब्ध होण्यासारखी नाही.

२. चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारी वीज
चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारी वीज = ४ किलोवॅट स्थापित क्षमता, आठ तास दररोज वापर गृहित धरता ४ x ८ = ३२ किलोवॅट-तास = ३२ वीज एकके. ४० वॅट कळस सौर शक्ती करता २’ x २’ आकाराचा तक्ता लागतो, म्हणून ४ किलोवॅट कळस स्थापित क्षमतेकरता १०० असे तक्ते लागतील. त्यांचे क्षेत्रफळ ४०० वर्ग फूट इतके होईल. म्हणून ४०० वर्ग फूट जमीन लागेल. http://www.solar-kit.com/epages/62035995.sf/en_GB/?ObjectPath=/Shops/620... या दुव्यावरून ४० वॅट कळस सौर शक्ती करता, २०० युरो म्हणजेच अंदाजे १२,००० रुपये भांडवली खर्च येऊ शकेल. म्हणून ४ किलोवॅट कळस शक्तीकरता १०० x १२,००० = १२,००,००० रुपये भांडवली खर्च येऊ शकेल.

३. चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारा तांदूळ
http://www.rice-trade.com/rice-consumption.html या दुव्यावरून असे लक्षात येईल की चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारा तांदूळ, सुमारे १ किलो असतो. म्हणून दरसाल सुमारे ३६५ किलो तांदूळ लागू शकतो. http://dacnet.nic.in/rice/HS-B-Table-01.htm या दुव्यावरून असे लक्षात येईल की भारतातील तांदुळाच्या पीकाखालील महाराष्ट्रातील जमीन, निम्नस्तरीय उत्पादन देते. जास्तीत जास्त अलीकडील, जास्तीत जास्त उत्पादन गृहित धरले, तर ते हेक्टरी दोन टन इतके असू शकते. महाराष्ट्रातील निम्नस्तरीय जमीन विचारात घेता, (आकडेमोडीच्या सोयीकरता) हेक्टरी ७३० किलो गृहित धरूया. यावरून अर्धा हेक्टर सुपीक शेती, चार माणसांकरता पुरेसा तांदूळ पिकवू शकेल. अर्थातच त्याकरता अर्धा हेक्टर म्हणजे अंदाजे ५४,००० वर्ग फूट जमीन लागेल.

४. स्वयंपूर्ण भूखंडाच्या गुणनाची संकल्पना
उपलब्ध जमीनीचा कमाल आकार पाहू जाता, पहिल्याप्रथम असे गृहित धरूया की त्यापैकी केवळ एक चतुर्थांश जमीनच (म्हणजे २९,००० वर्ग फूट) त्या चार जणांच्या कुटुंबास प्रत्यक्षात उपलब्ध आहे. वरीलप्रमाणे गरजा जर त्यातून भागवता आल्या, तर जे उत्पन्न वाचेल त्यातूनच त्यांच्या इतर गरजा भागवता येतील. अशाप्रकारे एक जरी एकक प्रत्यक्षात कार्यान्वित करून यशस्वी झाले, तर मग त्याच अनुभवाचे गुणन करून स्वयंपूर्ण भूखंडांची संख्या वाढवत नेता येईल आणि देश स्वयंपूर्णता गाठू शकेल.

वरील सर्व माहिती मी स्वतंत्ररीत्या http://swayambhuu.blogspot.com/ या अनुदिनीवर संकलित करून ठेवलेलीच आहे. इथल्या सहज संदर्भाकरता इथे पुन्हा उपलब्ध करून देत आहे.

अर्कः
सरकार जर असे जास्त धान्य निर्माण करीत असेल, ते खरेदीही करीत असेल तर ते वाया जाऊ न देता, गरजु लोकांपर्यंत पोहचवले गेलेच पाहिजे. ही देखील सरकारचीच जबाब्दारी नाही का? जनता भुकेली असताना, गोदामे नाहीत, वाहतुकीला ट्रक नाहीत, पीडीएस एफेक्टीव नाही, म्हणुन धान्य सडते..हे बरोबर नाही. अन या सर्व गोष्टी सरकारी यंत्रणेवरच अवलंबुन आहेत. मग सरकार अंग कसे काढुन घेउ शकते. लाखो टन अन्न दर वर्षी सडते.. हा कबुलीजबाब निर्लज्जपणाचा कळस वाटत नाही का?

बेजबाबदार धान्यखरेदी: तुम्ही सरकारी धान्य खरेदी, त्याच्या वेळा, त्याची साठवण अन वाहतुक ह्याचा जरा प्रत्य्क्ष अनुभव घ्या. मग मी बेजबाबदार का म्हणालो ते कळेल.

सडक्या धान्यापासुन दारु च बनते का फक्त? इतर काहीच नाही? इथॅनॉल / इंडस्ट्रीयल अल्कोहोल, गेला बाजार बायोगॅस? भरा कि सिलिंडर अन जाऊ द्या कि त्या जनते पर्यन्त जे एल पी जी खरेदी करु शकत नाहीत. पण असे केल्याने ' काही लोकांना' पैसे मिळणार कसे? बरोबर ना?

पॉलीहाऊसः मी वित्तपुरवठ्यातील त्रुटी बद्दल बोललो होतो. कर्जमाफी हा वेगळा मुद्दा आहे. कर्जमाफी बॅन्कांना झाली, शेतकर्‍यांना नाही, ह्यावर दुमत नसावे. अर्थात काही शेतकर्‍यांनाही फायदा झाला. पण काही नियमीत कर्जफेड करणारे, कर्ज का फेडले म्हणुन पस्तावले!

***
शेती हा अश्याच कॉन्ट्रॅडिक्शन ने भरलेला व्यवसाय आहे, अन त्यावर मात करणे हे कौशल्य आहे. गणिता सारखे आहे, थोडे समजुन उपयोग नाही, पुर्ण समजले तरच १०० नाहीतर ० !! ... स्टेप्स ला मार्क देण्याची पद्धतच नाही Happy

शेती म्हणजे अन्नधान्याचीच असा आपला सगळ्यांचा ठाम समज झालेला आहे. त्याबरहुकूमच आपले सगळ्यांचे विचार चौकटीत राहिलेले दिसत आहेत. त्या चौकटीचा भंग करण्याकरता मी आता काही नवे लिहीतो.

दहा वर्षांपूर्वी सौर पटलांचा वापर करून तयार होणारी वीज ५० रुपये प्रती युनिट दराने तयार होई, तर मराविमं तेव्हा ५० पैसे प्रती युनिट दराने पारंपारिक वीज विकत असे. आज सौर वीज १५ रुपये प्रती युनिट पडते आहे तर मराविमं ५ रुपये प्रती युनिट दराने पारंपारिक वीज विकते आहे. आणखी ५ ते १० वर्षांत हा कल उलटा होणार आहे. हे नक्की.

आज चार जणांच्या एका कुटुंबास २,५०० वर्ग फुटावरील सौर पटले आवश्यक ती संपूर्ण वीज पुरवू शकतात. अर्ध्या एकरात संपूर्ण सौरशेती केल्यास छताखालील जागा इतर वापराकरता उपलब्ध राहून अन्य किमान आठ कुटुंबांना लागणारी वीज मराविमंला विकता येण्याजोगी आहे. असे केल्यास अन्य कुठलीही शेती न करताही कुटुंब पोषण सुखैनैव होऊ शकेल.

सौर शेती, कडकडीत उन्हे किमान चार महिने असणार्‍या भागांत नक्की यशस्वी होऊ शकते.

गोळेसाहेब,

स्वयंपुर्ण भुखंडा ऐवजी, स्वयंपुर्ण गावांची कल्पना योग्य वाटते. कारण, भारतवर्षा मध्ये पुर्वी अशी गावे अस्तित्वात होतीच. परकीयांनी आक्रमणे करुन अन इथले येत्द्देशीय उद्योग बंद पाडण्यासाठी म्हणुन ग्रामस्वराज्याची कल्पना उध्वस्त केली. आता परकीय तर गेले आहेत, पण स्वकियांनीच परकीय निती अवलंबायचे ठरवले आहे. त्यामुळे, सुशिक्षित लोकांनी पुन्हा 'स्वयंपुर्ण ग्राम' योजना प्रत्यक्षात कशी येईल ह्यावर विचार करावा.

खेड्यातील उत्पादक अन शहरी ग्राहक, ह्यांना जोडणारी सहकारी भांडारे व्यावसायीक तत्वावर सुरु करणे सुशिक्षितांना सहज शक्य आहे. पण 'सहकार' ह्या कल्पनेवरच विश्वास राहिला नसल्याने, (कारणे अनेक आहेत) सहकार चळवळीचे पुनरुत्जीवन करणे अवघड होत आहे.

स्वयंपुर्ण भुखंडा ऐवजी, स्वयंपुर्ण गावांची कल्पना योग्य वाटते. कारण, भारतवर्षा मध्ये पुर्वी अशी गावे अस्तित्वात होतीच.>>>

हो, चंपक. खरयं!

जास्त समर्पक वर्णन करायचे तर बारा बलुतेदारांची व्यवस्थाच पण नव्या व्यवसायसंचात सुरू करण्याची गरज आहे. (आर्क म्हणतात तसा नवा skill-set) ऊर्जाशेती, पर्जन्यशेती, मत्स्यशेती इत्यादी नवनव्या व्यवसायसंचांना सामील करून घेऊन नवी ग्रामव्यवस्था उदयास आणण्याची गरज आहे.

यादृष्टीने तुमच्या संकेतस्थळावरील उदाहरण नमुनेदार ठरू शकेल.

खेड्यातील उत्पादक अन शहरी ग्राहक, ह्यांना जोडणारी सहकारी भांडारे व्यावसायीक तत्वावर सुरु करणे सुशिक्षितांना सहज शक्य आहे.>>>

होय. या समस्येचे हे एक उत्तम समाधान ठरण्यास लायक आहे.

शेती ही कुणालाही विकत घेता यावी, हे पटणारे नाही.... डॉक्टर व्हायला आधी इन्टर्नशिप लागते, वकील व्हायलाही आधी अनुभव दाखवावा लागतो, मग सनद मिळते, कॉर्पोरेट मध्ये नोकरीतही प्रोबेशन असते..... आणि खिशात पैसे आहेत म्हणून शेती विकत घेता आली पाहिजे ( आणि ज्याच्याकडून ती घेतली त्यालाच राबायला ठेऊन आपण परत 'वन' बी एच के ( वन हा शब्द इंग्लिश आहे, शेतीशी त्याचा संबंध नाही.. Happy ) मध्ये जायला मोकळे, ही कल्पना पटणारी नाही...

ज्याला शेती घ्यायची आहे, त्याने आधी शेतात किमान एक वर्ष राबावे, किमान स्वतःपुरते तरी उत्पादन जमते का हे पहावे, त्यानंतर शेतकर्‍याच्या अंगठ्याने ( म्हणजे सही शिक्क्याने) अनुभवाचा कागद जोडून मगच ती शेती त्याला मिळण्यास हरकत नसावी.... ५० एकर शेती द्या, त्यात विहिरी द्या.. मग मीही उत्पादन काढून दाखवतो.... दाखवाल की ! त्यात काय विशेष .. ! शेतकर्‍याला पाच पन्नास कॉम्पुटर द्या... शे पाचशे एक्झिकेटिव द्या, कॉल सेम्टर द्या, चिकन्या रिसेप्शनिस्टचा ताफा द्या.. शेतकरी सुद्धा आय सी आय सी आय बँक चालवून दाखवेल ! Happy प्रश्न आहे तो , यातील काही किंवा बर्‍याचश्या गोष्टी हातात नसतानाही ते काम करुन दाखवण्याचा... जे आपल्या देशातील शेतकरी करत असतात.

अन्नधान्य हे मूलभूत गरजांअम्ध्ये येते. त्याची किंमत कमी राखण्यासाठी सरकार प्रयत्न करते... शेतकर्‍याला पाणी वीज फुकट मिळते, पण त्याचा फायदा शेतकर्‍याला कुठे होतो? तो तर आपल्या इतराना होतो, कारण त्यामुळे किंमती मर्यादीत रहातात.

समजा , जरी शेतकर्‍याला वीज बिल, पाणी बिल, टॅक्स चालू केले, तर त्यामुळे शेतकर्‍याला किंमती त्या प्रमाणात वाढवून द्याव्या लागतील ना? मग, अखेर त्याची भरपाई आपल्या इतर लोकानाच महाग धान्य घेऊन करावी लागणार....

अन्नधान्य हे मूलभूत गरजांमध्ये येते. त्याची किंमत कमी राखण्यासाठी सरकार प्रयत्न करते... शेतकर्‍याला पाणी वीज फुकट मिळते, पण त्याचा फायदा शेतकर्‍याला कुठे होतो? तो तर आपल्या इतराना होतो, कारण त्यामुळे किंमती मर्यादीत रहातात.
.
समजा , जरी शेतकर्‍याला वीज बिल, पाणी बिल, टॅक्स चालू केले, तर त्यामुळे शेतकर्‍याला किंमती त्या प्रमाणात वाढवून द्याव्या लागतील ना? मग, अखेर त्याची भरपाई आपल्या इतर लोकानाच महाग धान्य घेऊन करावी लागणार....

प्यारेजी, तुम्ही अत्यंत साध्या शब्दात या देशाचे शेतीविषयक अर्थशास्त्र मांडलेत.

जामोप्या,

तुम्ही ज्या अर्थाने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहता आहात, त्या अर्थाने हल्लीचे जग पाहत नाही.
नाहीतर शेतीधारक, जमीन कसणारे शेतकरी आणि शेतमजूर अशी वर्गवारी निर्माणच झाली नसती.

जमीनीचा ताबा हा, मालकी हक्क कुणास असू शकतो वा कुणास नाही या विषयाशी संबंधित आहे.
आज काश्मिरात आपण जमीन घेऊ शकत नाही त्याचे कारण निराळे आणि महाराष्ट्रात इतर भाषिक लोक, शेतकरी असल्याने जमीन विकत घेऊ शकतात तरीही मराठी माणूसच जमीन घेऊ शकत नाही, त्याचे कारण निराळे. हे कारण नाहीसे करण्याची गरज आहे.

जमीन कसण्याबाबत माझे मत असे आहे की एकजात सर्व नागरिकांना, इतर कुठलीही उपजीविका पत्करण्याआधी, जमीन कसण्याचे शिक्षण अनिवार्य करावे आणि किमान एक वर्ष तरी प्रशिक्षणार्थी म्हणून (as intern) शेती करणे (शेतात राबणे) आवश्यक असावे. म्हणजे शेतमजूर ह्या वर्गाला आपोआपच प्रतिष्ठा लाभेल. तर, हा व्यवसाय लाभदायक करणार्‍यांत हुशार विद्यार्थीही समाविष्ट झाल्याने उत्कर्षाचे नवे मार्ग सापडू लागतील.

बाकी मुटेजींशी मी खालील बाबतीत पूर्णत: सहमत आहे.
प्यारेजी, तुम्ही अत्यंत साध्या शब्दात या देशाचे शेतीविषयक अर्थशास्त्र मांडलेत.>>>

रच्याकने: जामोप्या, तुमची शेती आहे का हो? म्हणजे मालकीची, वंशपरंपरागत, कसायला घेतलेली?

आमची शेती नाही... होती ती ४० वर्षापूर्वी कूळकायद्यात गेली.... Happy .. परभाषिक शेती घेऊ शकतो, स्वभाषिक नाही, असे काही बहुधा नसावे. ते लोक कायद्यात पळवाटा काढत असावेत. किंवा जे करायचे ते कायद्यानुसारच करत असावेत. ( तुम्हाला यातून बच्चनचे नाव सुचवायचे आहे का? Happy )

पारंपारिक शेती बरोबरच अ‍ॅरोमॅटिक व मेडिसिनल झाडांची शेती करणे ही फायद्याचे होउ शकते. केळकर कंपनीने याबाबतीत नो- हाउ देणे, सल्ला देणे व तयार झालेले तेल विकत घेणे हे केले आहे. पचोउली, जिरॅनिअम लेमन ग्रास वगैरे ची लागवड धान्या पेक्षा सोपी पड्ते ( तुलनेने कमी लेबर इंटेंन्सिव) व त्यात रिटर्न्स आहेत. नैसरगिक तेलाचे भाव नेहमी चढते असतात. अर्थात क्वालिटी वर आहे. शिवाय सॉइल पण बरोबर पाहिजे तर यील्ड चांगले येते. केळकर उद्योग समुहाची केवा बायोटेक म्हणून कंपनी आहे त्याद्वारे
हे ज्ञान दिले जात असे. कै श्री भाउसाहेब केळकर असताना त्यांना ह्या लागवडीत खूपच रस होता. आताही कोणाला माहिती हवी असल्यास जरूर संपर्क करा. मी आहेच. त्यानिमित्ताने ही एक्टिविटी परत सुरू होईल.
शेतकर्‍यांची सहकारी संस्था करून त्यात एका ठिकाणी डीस्टिलेशन सुविधा उपलब्ध करता येइल. एक उत्तम सल्ला गार माझ्या ओळखीचे आहेत. त्यांची मदत घेता येइल. एक मराठी उद्योजक आहेत त्यांनी ते डिस्टीलेशन यंत्र विकसित केले आहे. त्याची ही माहिती मिळवून ठेवते.

उत्पादन आल्यावर त्याची कापणी करून त्याचे डिस्टिलेशन करून तेल काढून त्याचा जीसी अनालिसिस करावा लागतो. तो कंपनीस पसंत पड्ल्यासच कंपनी खरेदी करते नाही तर शेतकर्‍यास ते ओपन मार्केट मध्ये विकावे लागते. अर्थात ते भाजीपाल्यासारखे नाशिवंत नाही. तेला मध्ये अनेक प्रती असतात.
गोइंग रेट फफाय जर्नल मध्ये असतात.

बेजबाबदार धान्यखरेदी: तुम्ही सरकारी धान्य खरेदी, त्याच्या वेळा, त्याची साठवण अन वाहतुक ह्याचा जरा प्रत्य्क्ष अनुभव घ्या. मग मी बेजबाबदार का म्हणालो ते कळेल. >> ह्या अर्थाने बेजाबदार म्हणत असल तर बरोबर आहे तुमचे, सुधारणेला वाव आहे.

सडक्या धान्यापासुन दारु च बनते का फक्त? इतर काहीच नाही? इथॅनॉल / इंडस्ट्रीयल अल्कोहोल, गेला बाजार बायोगॅस? भरा कि सिलिंडर अन जाऊ द्या कि त्या जनते पर्यन्त जे एल पी जी खरेदी करु शकत नाहीत. पण असे केल्याने ' काही लोकांना' पैसे मिळणार कसे? बरोबर ना?>> ह्याल भाबडा आदर्शवाद म्हणतात. हे खासगी करखाने आहेत्,जनहितार्थ चालवलेल्या PSU नाही. ज्यात फायदा त्याचे उत्पादन ते लोक घेणार.उद्या धान्यापासुन पशुखाद्य किंवा बिस्किटे तयार करण्यात त्यांना नफा मिलत असेल तर ते त्याचे उत्पादन घेतील. कोणीही इतरांना अडवले नाहिये इथॅनॉल / इंडस्ट्रीयल अल्कोहोल, गेला बाजार बायोगॅस तयार करण्यापासुन.as long as, law of the land is being followed , we have no rights to complain.

स्वयंपुर्ण भुखंडा ऐवजी, स्वयंपुर्ण गावांची कल्पना योग्य वाटते.>> barter systemहा पर्यायही वाइट नाही मग, पण हे implement करायला हुशार स्थानिक लोक ही गरज आहे. झालेय असे की हुशार सर्वात आधी गाव सोडुन पळ काढतात.जर काही हुशार लोक सुरवातीला कायम मुक्काम ठोकुन,नंतर अधुनमधुन लांबुन का होईना मार्गदर्शन करत राहिले तर हे शक्य होईल,पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

मामी: तुम्हाला मेसेज पाठवला आहे. अधिक माहिती जरुर पाठवा.

अर्कः बायोगॅस हा इकॉनॉमीकली व्हायेबल आहे, फक्त त्यात कष्ट जास्त अन नफा दारु पेक्षा कमी आहे. पण मग कल्याणकारी राज्याची कल्पना राबवताना भांडवली नफ्यासाठीच का चाललेय सगळे? असो. कारण तो विषय वेगळाच आहे.

४० वर्षापूर्वी कूळकायद्यात गेली>>>>
कुळकायद्याने सगळीच शेती काही जात नसावी. तुम्हाला हल्ली तुमच्याकडे अर्धा एकरही शेती नाही असे म्हणायचे आहे का?

तुम्हाला यातून बच्चनचे नाव सुचवायचे आहे का?>>>>
जामोप्या, मला कुणाचेच नाव सुचवायचे नाही. खरे तर मला भाषिकच्या ऐवजी स्थानिक शब्द वापरायचा होता.

पारंपारिक शेती बरोबरच अ‍ॅरोमॅटिक व मेडिसिनल झाडांची शेती करणे ही फायद्याचे होउ शकते.>>>
नक्कीच, मामी. शेतीच्या संकल्पना हळूहळू विस्तारत आहेत. अगदी वनशेती, औषधशेती, सुगंधशेती इत्यादी इत्यादी. तेव्हा पारंपारिक शेतीसोबतच हेही व्यवसाय शेतकर्‍याने केल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकेल. शिवाय कुठल्याही शेतात मधमाशा पालनाचा अवश्य विचार करावा. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची झाडे धुर्‍यावर लावावित.

ह्याल भाबडा आदर्शवाद म्हणतात. हे खासगी करखाने आहेत्,जनहितार्थ चालवलेल्या PSU नाही. ज्यात फायदा त्याचे उत्पादन ते लोक घेणार.>>>>
खरंय आर्क.

बायोगॅस हा इकॉनॉमीकली व्हायेबल आहे, फक्त त्यात कष्ट जास्त अन नफा दारु पेक्षा कमी आहे. पण मग कल्याणकारी राज्याची कल्पना राबवताना भांडवली नफ्यासाठीच का चाललेय सगळे? >>>>
नाही चंपक, नक्कीच नाही. आपणच बायोगॅस लोकप्रिय करायला हवा!

आमची शेती तरी कुळकायद्याने सगळीच गेली.... आता आमची काही शेती नाही... कूळकायद्याने सगली शेती जात नाही, ही माहिती नवीनच आहे...

गोळे साहेब ते पूर्णपणे सस्टेनेबल घराची कल्पना अतिशय चांगली आहे. त्यात कमी जागेचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे व अर्थशिप सारखे घर बांधले पाहिजे. माझ्या डोक्यातही ती आयडिया आहे. शेती नाही पण भाजीपाला काढ्णे मला जमेल. व प्राणी पाळणे. काही कम्यून सारखी आयडिया असेल तर मला घ्या त्यात.

कमी जागेचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे व अर्थशिप सारखे घर बांधले पाहिजे. माझ्या डोक्यातही ती आयडिया आहे.>>>>
मामी, माझी संकल्पना वाचली आणि लक्षात आली असे मानता येण्याजोगा हा पहिलाच प्रतिसाद आहे.
त्याखातर धन्यवाद!

कल्पना करा की आपली अर्धा एकर (२२,००० वर्गफूट) जागा एका धबधब्याच्या तळाशी आहे. तर त्याखाली मोठा तलाव तळघरात बांधून पाऊसकाळात पाणी साठवणे, उंचीवर असल्यास त्याद्वारे ऊर्जानिर्मिती, उन्हाळ्यात उताराकडील वापरदारांना पाणीपुरवठा इत्यादीकरता जागेचा वापर करून पैसा मिळवणे आणि उपजीविका चालवणे शक्य आहे.

अशा प्रकारच्या अदभूत उपायोजनांद्वारे लहानशा जमिनीचा उपजीविकापूर्तीकरता वापर करण्याचे अभिनव मार्ग शोधून काढण्याची आवश्यकता आहे.

गोळे साहेब मी यावर खूप वाचन केले. मला एक सेल्फ सस्टेनिन्ग घरकुल बांधायचे आहे. ऊर्जेच्या गरजा
सूर्य व बायोगॅस, पवनचक्की द्वारे भागवायच्या. किंबहुना त्यात भागतील एवढ्याच ठेवायच्या. एक कंप्यूटर व नेट कनेक्षन, पंखा व जुजबी स्वयंपाकाची व्यवस्था इतकेच. पाणी शक्यतेवढे रिसायकल करायचे. अर्थ शिप
बांधताना जमिनीच्या कंटूर व दगड वगैरेच्या कला कलाने बांधायचे. एक साइड सूर्य फेसिन्ग असते तिथे सोलर पॅनेल बसवायचे. एक कुत्रा, कोंबड्या, बदके, एक गाय वासरू शेळी ससे जमल्यास पाळायचे.
भाजी पाला लावायचा. दूध अंडी मिळतील. नेट वर लिहून व सल्लागारी करून पैसे कमवायचे. जास्त निसर्गाकडून घ्यायचे नाही. निसर्गाचा आदर करायचा. प्लॉट वर एक छोटेसे मंदीर जरूर बांधायचे. हो आपल्याला देवाचा आधार लागतो. तिथे छोटीशी फुलबाग करायची. कायम जुनी हिन्दी गाणी स्ट्रीम करत राहायचे. इ प्रसारण सारखे. जैविक कचर्‍यापासून खत व बायो गॅस बनवायचा. इथपरेन्त माझी तयारी आहे.

माझा भाचा( फॉर अ चेंज हा मला आत्या म्हणणारा आहे. मामीवाला आता दहावीत आहे) आर्किटेक्ट आहे त्याला मी हे सांगितले व घर डिजाइन करायला सांगितले. शक्यतो लॉरी बेकर टाइप. शुन्य रिस्पॉन्स. तो मॉल्स डिझाइन करण्यात गुंग आहे.

मला एक सेल्फ सस्टेनिन्ग घरकुल बांधायचे आहे. >>>>

मामी, मलाही स्वयंपूर्ण, स्वावलंबी स्वरूपाचे असेच एक घर बांधायचे आहे.

तोच विचार सूत्ररूपात वर दिलेलाच आहे. सुरूवातीला अर्धा एकर शेत घेऊन तसे करावे असा विचार केला होता. मात्र शेत म्हटले की लोक वेगळ्याच दिशेला वेगळ्याच समस्यांमधे खेचू लागतात असे आता लक्षात आलेले आहे. आपण किमान २२,००० वर्ग फूटाचा एक एन ए केलेला जमीनीचा तुकडा म्हणू या. (मध्यंतरी लोणावळ्याजवळच्या तुंगी किल्ल्याच्या पायथ्याशी २४,००० वर्ग फूटाचा असला तुमडा २४ लाखात उपलब्ध होता. अजूनही असेल कदाचित.) माझ्या अंदाजाप्रमाणे असे तुकडे स्वखर्चाने विकत घेणारे दहा समविचारी लोक मिळाले तर हा प्रकल्प उचल घेऊ शकतो. मात्र माझा विचार, ज्या ठिकाणी असा तुकडा दोन-अडीच लाखात उपलब्ध होईल त्या ठिकाणी घेण्याचा आहे. (अहमदनगर जिल्हा अथवा गोदावरीतिरी पैठणच्या दिशेने). चार माणसांच्या उपजीविकेपलीकडे कितीतरी पटीने जास्त नैसर्गिक उत्पन्न तिथे मिळवणे मला सध्यातरी शक्य कोटीतील वाटत आहे.

तुम्ही करत असलेल्या/ करू इच्छित असलेल्या कुठल्याही अशा प्रकारच्या प्रकल्पास माझ्या हार्दिक शुभेच्छा! तसेच माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व माहिती तसेच मला शक्य होणारे सर्व प्रकारचे अनाहुत सल्ले मी मोफत देण्यास तयार आहे.

मुंबई पुणे मार्ग व पश्चिम महाराष्ट्र हे जागेच्या द्रुष्टीने अवघड व महाग काम आहे. पैठ्णजवळ आपले चंपकभाऊ आहेत ते सल्ला देऊ शकतील. माझा कसला प्रकल्प Sad नुसते स्वप्न आहे. माझ्याकडे एक १००० स्क्वे यार्ड चा प्लॉट आहे त्यावर काहीतरी करायचे असे. पण त्याआधी एक प्रकल्प सातवीत आहे तो पदवीउत्तर शिक्षणापरेन्त न्यायचा आहे. त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांमागे धावणे शक्य नाही. तुमच्या प्रकल्पावर राबायला तयार आहे मात्र.

गोळे साहेब ते पूर्णपणे "सस्टेनेबल घराची कल्पना अतिशय चांगली आहे. त्यात कमी जागेचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे व अर्थशिप सारखे घर बांधले पाहिजे. माझ्या डोक्यातही ती आयडिया आहे

मामी,
यातील सस्टेनेबल आणि अर्थशिप याचा अर्थ नाही कळाला...
क्रुपया जरा विस्तारान सांगा ...!
Happy

अनिल, तुम्ही प्रश्न मामींना केलेला आहे. तरीही मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मामींनी सांगावं, बरोबर आहे की नाही ते!

सस्टेनेबल म्हणजे बाह्य कुठल्याही (मोफतच्या) मदतीची अपेक्षा न करता, त्याच जमीनीतून मिळालेल्या/मिळू शकणार्‍या महसुलावर चार जणांच्या कुटुंबाचा संपूर्ण चरितार्थ चालू शकेल असे घर/जमीन.

अर्थशिपः पृथ्वी हीच जणू अवकाशातील एक जहाज आहे अशी कल्पना करून, तिच्यावर रोज येत असणारी प्रारणऊर्जा आणि तिच्या अंतरंगातील संग्रहित ऊर्जा यांच्या आधारे तिच्यावरील मानवाचा चरितार्थ चालावा अशाप्रकारची केलेली संकल्पना.

sustainable living is living without abusing the natural resources of the area you live in.
your surroundings should sustain your lifestyle. for example if you use a private jet and drink designer mineral water costing $ 1000 a bottle. you are not living sustainably. you are taxing the earths' resources. If you eat burgers made of imported meat or eat commercially harvested fried chicken you are taxing the earth 's resources. Your level of consumption of earths resources should sustain the level at which the resources can regenerate. As simple as that.

earthships are a type of green buildings designed to make the best use of locally available materials. earthship.com is a good website for complete information.
green is used for environmentally friendly stuff. It advocates use of alternative energy sources, clean technology, recycling of resources and biodegradable materials. you can build them anywhere. they do not look great but are great. you don't really need imported italian marble or granite for living a happy life. It is a lifestyle choice really.

गोळे,

तुम्ही 'नवदर्शनम'बद्दल ऐकले आहे का? तुम्ही आणि अश्विनीमामींनी ज्या कल्पना मांडल्या आहेत जवळपास त्याच धर्तीवर यांचे काम चालते. कृपया येथे पहा. यांच्याकडून माहिती मिळवणेही उपयोगी ठरू शकेल.
(भानू काळ्यांच्या 'बदलता भारत' पुस्तकात पहिल्यांदा नवदर्शनम् संस्थेची माहिती वाचली होती. नंतर वर दिली आहे, ती वेबसाईटही बघितली होती.)

अमा, किंवा गोळे म्हणत आहेत त्याचे २ प्रकार आहेत.
१)एकट्याने , अगदी अश्विनी यांच्यासारखा पोष्टसारखा आदर्श म्हणता नाही येणार पण त्याच्या जवल जाणारा प्रयोग माझ्या मते गौरी देशपांडेंनी विचुर्णीला केला आहे.
२)community sustainable living.१९६८ सालापासुन Auroville,pondechary, येथे १२०० एकरावर एका उघड्या माळरानावर ह्याला सुरवात झाली.आज तिथे ५००००० झाडे डौलात उभी आहेत. तिथे हा प्रयोग यशस्वी राबविला जातोय असे मला तरी वाटले.मी तिथे as a tourist गेले होते. तिथल्या membershipसाठी मात्र तुम्हाला वेगळ्या प्रोसेसमधुन जावे लागते.गांधीजींच्या आश्रमात जसे सगळ्या कामाला एकच मोबदला हे सुत्र इथे राबवले जाते.मुळात सगळी system cashless आहे. आम्ही solar kithen मधे जेवणसुध्दा तिकडच्या मेम्बरच्या account वरुन घेतले आणि memberला पैसे दिले. ह्या सगळ्याला base मात्र अध्यात्माचा आहे ,मेम्बरशीपसाठी तुम्ही अध्यात्मिक असणे सक्तीचे नाही पण त्यांचे काही नियम मात्र पाळले पाहिजेत.माझी मैत्रिन तिथे एका दगदी मचाणावरच्या झोपडीत theatre intern म्हणुन राहिली होती.
मला तिथे परदेशी लोक जास्त दिसले भारतीय लोक तुलनेने कमी, काही जण म्हणतील शी त्यात काय असे आयुष्य तर कुठल्याही खेड्यात बघायला मिळते, पण मुद्दा हा आहे की नाईलाजने नाही तर स्वतःहुन जगण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असताना, जाणीवपुर्वक हे खडतर आणि तरीही निसर्गाच्या जवळ जाणारे आयुष्य या लोकांनी स्वीकारले आहे ,there is some concrete thought and purpose behind it.हे सगळे लोक गेली ४० हुन जास्त वर्ष ज्या काही पध्दतीने शब्दशः creative आयुष्य जगले आहेत,कारण इथे रोज स्वतःच्या हातानी नवनिर्मिती होत असते , ते हेवा वाटण्यासारखे आहे .
auroville च्या वेबसाईटवर जाउन अंदाज येत नाही त्यांच्या कामाचा, किमान ३ दिवसांची प्रत्यक्ष भेट द्यावी लागते त्याची भव्यता कळायला

* माझ्या मते, असे एकदम आदर्श पद्धती सर्वत्र लागु करणे शक्य नसते. भारतात किंवा जगभर असे आदर्श गावे/ वसाहती/ किमान हॉलीडे होम ई प्रकार सुरु आहेत. पण सर्वसामान्य जनतेला तिच्याकडील उपलब्ध साधनसंपती विचारात घेऊन, 'शाश्वत विकासा' बद्द्ल बोलणे योग्य राहिल. केवळ काही लोकांना असे करणे शक्य झाले तरी तो प्रयोग 'सर्वोत्तम' आहे आहे असे मानले जाउ शकत नाही.

उदा. विज्ञानामध्ये जोवर एखादा प्रयोग सर्व जगात कुठेही, किमान/ उपलब्ध साधनसंपत्ती वापरुन करता येउ शकतो, अन जो सर्वत्र सारखेच निकाल/निष्कर्ष देतो, त्याला सर्वमान्यता मिळते. असे प्रयोग मग 'हाय इम्पॅक्ट फॅक्टर' च्या नियतकालिकात प्रसिद्ध होतात. बाकी 'स्पेशालिटी प्रयोग' मात्र कमी आय. एफ. च्या नियतकालिकात जातात.

##मी 'बदलता भारत' वाचलेले आहेच. छान उदाहरणे आहेत. पण भानु काळेंचा त्यात दिलेला मेल आय डी बंद आहे. संपर्क करावासा वाटत होता, कारण काही उदाहरणांच्या वेबसाईट्स उपलब्ध नसल्याने त्याबद्दल पत्रव्यवहार करावासा वाटला.

Pages