महाबळेश्वर ट्रीप - ४: साईट सीइंग

Submitted by निंबुडा on 31 August, 2010 - 03:15

या आधीचे भागः
महाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन - http://www.maayboli.com/node/19261
महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265
महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268

प्रचि १> सह्याद्रीच्या पर्वतरांगा

प्रचि २> कृष्णा नदीचे खोरे

प्रचि ३> नीडल् पॉइंट

प्रचि ४> हॉर्स रायडींगसाठीचा घोडा (नुसताच फोटो काढला. इतक्या उंचीवरच्या त्या पठारावर हॉर्स रायडींग करायचे डेअरींग नाही झाले.)

प्रचि ५> कृष्णा नदी व त्यावरील धरण (हा स्पॉट महाबळेश्वर चे साईट सीइंग करताना एका पॉइंट वरून दुर्बिणीने दाखवतात (पैसे घेऊन). तिथे स्वदेस चे शूटींग झाले होते असे ही हे दुर्बिणवाले सांगतात. स्वदेस मध्ये शेवटी शाहरुख पाणी खेचायची मशीन चालू करून त्याच्या कामाचे प्रात्यक्षिक गावकर्‍यांना दाखवतो त्या सीन चे शूट म्हणे तिथे झालेय.)

प्रचि ६> गारेगार आईसक्रीम (हे आईसक्रीम मिळणारे दुकान जाम फेमस आहे. त्या दुकानमालकाचे त्या दुकानास भेट दिलेल्या अनेक फिल्मस्टार सोबतचे फोटोज तिथे प्रदर्शन मांडल्यासारखे लावलेत.)

प्रचि ७> ट्रॅफिक जॅम (यात अडकल्यामुळे सनसेट पॉइंट हुकला आमचा Sad )

प्रचि ८> दरीचे दर्शन (एको पॉइंट)

प्रचि ९> डायनॉसोर पॉइंट (डायनॉसोर च्या पाठीसारखा दिसतो तो भाग असे गाईड चे म्हणणे!)

प्रचि १०> आर्थर सीट पॉइंट

प्रचि ११> साईट सीइंग चा रस्ता

प्रचि १२> पॉइंट्स च्या लीस्ट ची पाटी

प्रचि १३> शिवमंदीर - १ (ब्लॅक अँड व्हाईट मोड)
खिलाडी या सिनेमातील अक्षय कुमार आणि आयेशा झुल्का अभिनीत "वादा रहा सनम" हे गाणे याच परीसरात चित्रित केले गेले आहे. गाण्यात या मंदीराचा परीसर + अक्षयची घोडेस्वारी + प्रचि १ मधील पर्वतरांगांचा शॉट वगैरे व्यवस्थित ओळखता येतो.

प्रचि १४> शिवमंदीर - १ (सेपिया मोड)

प्रचि १५> शिवमंदीरातील नंदी (सेपिया मोड)

गुलमोहर: 

छान गं!

सातपुडा पर्वतरांगा??????
सातपुडा पर्वतरांगा महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सिमेवर येतात.
ह्या सह्याद्रिच्या पर्वतरांगा आहेत.
बाकी फोटोज् छानच...

महाबळेश्वरला सातपुडा पर्वत रांगा >>>
सातपुडा पर्वतरांगा महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सिमेवर येतात. >>>
बाप्रे, हो का?> Uhoh माझा भूगोल फारच कच्चा आहे. Proud त्या गाईडने काहीतरी "सात...." असं सांगितलं आणि मी "सातपुडा" असा ग्रह करून घेतला माझ्या सोयीने. Biggrin

थांबा एडिटते. "सह्याद्रिच्या पर्वतरांगा" असं हेडींग टाकते. Happy

भारी फोटो
अगं वर्षू, ३ वर्षांमागचे फोटु हायेत ते. पिल्लू चे आगमन नव्हते झालेले तेव्हा. >>> म्हणुन काय झालं , तरी पण घेऊन जायचं Proud

खुप मस्त फोटो आहेत...तुम्हि जुन्या आठवनी ताज्या केल्या.
आम्हि लग्ना नन्तर गेलेलो...
आज फोटो बघुन परत जायची इछ्छा होत आहे........