मासे पाळण्याची आवड बहुतेक आपल्या सर्वांनाच असते. निदान लहानपणी तर नक्कीच. रंगीबेरंगी माशांचं हे जग आपल्यावर कधी गारुड करुन जातं ते समजत नाही. काहींची ही भूल उतरते आणि माझ्यासारख्यांना मात्र आयुष्यभर साथ देते.
ह्या छंदाचा पाठपुरावा करताना मिळालेले काही आनंदक्षण आणि काही ज्ञानकण तुमच्याबरोबर वाटून घ्यावेत म्हणून हा लेखनप्रपंच. मत्स्यपालनाचे बहुतेक सर्व पैलू आपण इथे यथाशक्ती चर्चूया आणि आपल्या शंका निरसून घेउया.
सुरुवात करुया एका मूलभूत प्रश्नापासून. मासे का पाळायचे ? छंद, आवड, घराची सजावट म्हणून, ब्लडप्रेशर, टेन्शन अश्या काही व्याधींवर उपचार म्हणून... "चाय पीणेचे फायदे" सारखी अशी अनेक कारणं देता येतील. पण मला विचाराल तर यात अनेक पैलू दडल्येत असं मी म्हणेन. पण ह्या सर्वापेक्षाही जास्त असते ती निसर्गाच्या जवळ जाण्याची आपली ओढ. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला निसर्गाच्या जास्त जवळ येत नसल्याने आपण निसर्गालाच आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करु शकतो घरात एक अॅक्वेरीयम ठेवून. आपला अॅक्वेरीयम हा एक निसर्गाचा जिवंत तुकडाच असतो, त्यातल्या मासे, झाडं एव्हढच काय तर पाण्यासहीत.
फिशटॅन्क म्हणजे तूम्ही घराच्या आत बनवलेली बाग असू शकते. त्या माश्यांसाठी तूम्ही तयार करुन घेतलेल एक घर असतं ते. त्यात सोडलेले मासे विचारात घेतले तर ती एक जिवंत प्राण्याची जबाबदारीही असते. ह्या छंदायोगे आपण मुलांना मासे, त्यांच जीवनचक्र, त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना (होय, माशांनाही भावना असतात) ह्यांची ओळख करुन देउ शकतो. त्यांची जबाबदारी घ्यायला शिकवू शकतो. साधारणत: एखादा पाळीव प्राणी पाळून मुलांना जे काही काही शिकवता येउ शकतं त्यापेक्षा मासे पाळून आणखीन जास्त शिकवता येतं असं मी म्हणेन. अर्थात यात आपणही शिकत जातोच.
मासे पाळण्याचा एक फायदा म्हणजे ही आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. ह्याला फारशी जागा लागत नाही, ह्यांची इतर प्राण्यांइतकी काळजी ह्यावी लागत नाही, वेळच्यावेळी खाणं आणि साफसफाईची काळजी घेतली तर फारसे रोगही होत नसल्याने हा छंद फारसा महाग पडत नाही. अर्थात इतर सार्या गोष्टींप्रमाणे ह्यातही आपण करु तेव्हढा खर्च कमीच असण्यचीही उदाहरणं कमी नाहीत, पण आपल्याला नेमकं काय हवय ते आधीच ठरवल तर हा छंद नक्कीच परवडण्याजोगा असतो.
मासे पाळायचे ठरवल्यावर सर्वात आधी पडणारा एक प्रश्न म्हणजे, टॅन्क की बाउल ? म्हणजे गोल की चौकोनी टॅन्क ...

गोल फिशबाउलने बर्याच जणांच्या छंदाची सुरुवात झाली असली तरीही, त्याचे काही सनातन तोटे आहेत जे विचारात घेतले पाहिजेत.
१. ह्यात ठेवल्या जाणार्या माशांची संख्या आणि प्रकार मर्यादित असते. म्हणजे ठराविक जातींचे आणि तेही ठराविक संख्येपेक्षा जास्त मासे यात ठेवता येत नाहीत. शक्यतो मोठे वाढणारे मासे, उदा. कोई, अरवाना वगैरे.
२. बाउल्सना तडा गेल्यास ते रिपेअर होत नाहीत.
३. बाउल्स स्टॅन्डर्ड साईझेस (आणि अर्थात शेप्स) मध्येच मिळतात.
३. बाउल्स आकाराने गोल असल्याने त्यात मासे व्यवस्थित दिसत नाहीत.
मासे पाळायचं ठरवण्यावेळीच टॅन्क ठेवण्याची जागा नक्की करुन घ्यावी. जवळच पण उंचावर ईलेक्ट्रीकल सॉकेटस् असावीत जेणेकरुन पुढे फिल्टर्स, एरिएटर्स, हिटर्स वगैरे लावताना जास्त वायरिंग करावे लागत नाही. टॅन्कची जागा दिवसाचे दोन तास तरी सूर्यप्रकाश टॅन्कवर पडेल अशी असावी. टॅन्कमध्ये झाडे लावायची असल्यास सूर्यप्रकाशाचा फायदाच होतो. जास्त वेळ सूर्यप्रकाश हा टॅन्कसाठी त्रासदायक ठरु शकतो पण त्यावर उपाय आहेत.
शक्यतो लोक टॅन्क बैठकीच्या खोलीत ठेवतात, शयनगृहात ठेवणारेही आहेत. पण जर स्वयंपाकघरात ठेवणार असाल तर टॅन्कवर झाकण मस्ट आहे, अन्यथा टॅन्कवर तेलकट तवंग येउ शकतो. टॅन्क ठेवायच ठरवतानाच त्याची जागाही निशित करुन घ्यायला हवी. शक्यतो बैठकीच्या खोलीतली निवांत बसून वाचायची जागा ही बेस्ट चॉईस असू शकते. आसपास मोकळी जागा असावी कारण उद्या साफसफाई करताना अडगळीच्या जागेत वाकून काम करणं कठीण होउ शकतं. (मला विचारा. टॅन्कमध्ये वाकून हजारेक पिल्लं पकडून मोजणं हे किचकट वेळखाउ आणि पाठदुखीच काम आहे ह्याची गॅरेंटी देउ शकतो मी)
जागा ठरवतानाच टॅन्कचा आकार आणि त्यावरुन त्याचे वजन ठरेल. हे वजन, टॅन्कसाठी स्टॅन्ड बनवून घ्यायचा असल्यास कामी येते. साधारणत: एका घनफूटास अठठावीस लिटर (म्हणजेच अठठावीस किलो) (१ घनफूट = १ फूट x १ फूट x १ फूट) हे पाण्याचे वजन + टॅन्कचे वजन + दगड / वाळू ठेवणार असल्यास त्याचे वजन. हे सर्व टॅन्क आणण्याआधीच विचारात घेणे जरुरी आहे. तुम्हाला हवे असलेल्या आकारात टॅन्क बनवून घेता येतो. आणि हा आकार कोणताही असू शकतो अगदी आपल्या विचारांच्या पलिकडलाही.
मी सुरुवात करताना २ फूट रुंद, १.५ फूट उंच आणि १ फूट तिसरी डायमेन्शन असलेला टॅन्क घेतला होता. वाळू, दगड, पाणी आणि इतर सर्व अॅसेसरीज बसवूनही त्याचं वजन माझ्या रायटिंग टेबलने सहज पेलवलं होतं. टॅन्क बनवून देणार्याला त्याच्या मजबूतीविषयी पूर्ण कल्पना असल्याने शक्यतो काचेच्या जाडीत तडजोड करु नये.
टॅन्क त्याच्या जागेवर ठेवल्यानंतर तो डोळ्यांच्या पातळीत आल्यास अधिक सुंदर वाटतो. अर्थात टॅन्ककडे बघताना तुम्ही उभे असणार की बैठकीच्या जवळपास ठेवून बहुतेक वेळा तो बसूनच बघितला जाणार हे ठरवावे.
एकूणच, सुरुवात करण्यापूर्वीच जेव्हढी माहिती गोळा करता येउ शकेल तेव्हढी करायला सुरुवात करा. प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीच आपल्याला नक्की काय करायचय ते ठाउक असणं बर असतं नाही का ?
विकत घेतानाच शक्य तेव्हढा मोठा टॅन्क घ्यावा. याचं कारण म्हणजे, मोठा टॅन्क सेट करताना जो त्रास होईल तेव्हढा सोडला तर छोट्या टॅन्कपेक्षा तो सोयीचा पडतो. त्यात जास्त पाणी राहु शकत असल्याने प्रत्येक साफसफाईच्या वेळी आपण जास्त पाणी बदलु शकतो. साफसफाईला दुप्पट मोठ्या टॅन्कला दुप्पट वेळ नाही लागत, छोट्या टॅन्कपेक्षा थोडाच जास्त वेळ लागतो. शिवाय जास्त पाणी जास्त वेळ साफ, स्वच्छ, सुरक्षित राहू शकते, जास्त पाण्यात जास्त मासे सुखाने राहू शकतात. थोडक्यात म्हणजे ज्यादाके ज्यादा फायदे. मात्र मोठा टॅन्क म्हणजे जास्त जागा, जास्त वजन, जास्त मजबूत स्टॅन्ड, जास्त वाळू, जास्त किंवा मोठे मासे हेही विसरता कामा नये.
टॅन्क सेट करणे
जागा, टॅन्कची साईझ निश्चित करावी. आपल्याला टॅन्क नक्की कसा सजवायचाय ते ठरवावे, लागणारे सामान एकदम घेउन यावे. खाली दिलेल्या यादीतील सगळे सामान कम्पल्सरी नाही.
स्टॅन्ड
टॅन्क
वरती ठेवायला काच / शेड
पाठीमागे लावायला बॅकग्राउंड वॉलपेपर
शेडमध्ये लावायला दिवा व त्याची फिटिन्ग्ज
टॅन्कच्या आकाराची दोन ते तीन एमएम जाडीची थर्माकोलची शीट
लाकूड (बॉगवूड)
सायफनिंग व पाणी भरण्यासाठी पाण्याचा पाईप
वाळू, दगड, गोट्या.....
झाडे
फिल्टर
एरिएटर (ऑक्सिजन मशीन), हवेची ट्यूब, २ रेग्युलेटर, २ स्टोन..... टी जंक्शन,
हिटर (पाण्याचे तपमान २४ डि. से. च्या खाली जात असल्यास)
लिटमस पेपर
खड्याचे मीठ
थर्मामीटरचा स्टीकर.
मासे (शक्यतो टॅन्क घेताना घेउ नयेत)
बाजारातून आणलेला टॅन्क दोन तीनदा धुवून घ्यावा, शेवटचे मीठाचे पाणी वापरुन धुतल्यास उत्तम. धुताना साबणाचा स्पर्शही होउ देउ नये. वाळू, दगड पाणी स्वच्छ नीघेपर्यंत धुवून घ्यावेत.
टॅन्क ठेवणार असलेली जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर थर्माकोलची शीट ठेवावी. त्यावर टॅन्क ठेवावा, त्यात दगड ठेवावेत, वर वाळु ओतावी. वाळु आणि दगड सेट करताना काही गोष्टी विचारात घेणे जरूरीचे आहे.
दगड टोकदार, धारदार नसावेत, पोहताना घासल्यास माशांना इजा होण्याची शक्यता असते. दोन दगड एकमेकांच्या आधाराने वाळूत घट्ट बसवल्यास गुहेचा फील बनवता येतो. रेडिमेड गुहा आणण्यापेक्षा हे स्वस्त पडतं. गुहेचा उपयोग माशांना खेळायला, लपायला होऊ शकतो. त्याशिवाय दगडांचा अजून एक फायदा म्हणजे, दगडाने पाण्याच्या प्रवाहात येणार्या अडथळ्यामुळे तीथे घाण जमून रहाते. सायफनिंग (साफसफाई) च्या वेळी एका ठिकाणी मिळणार्या घाणीमुळे बराच वेळ वाचतो.
सर्वात आधी टॅन्कमध्ये खरे / खोटे दगड ठेवून घ्यावेत. मध्यभागी एखादा जरा मोठा दगड टॅन्कमध्ये खूप छान दिसतो. दगड एकमेकांवर ठेवून त्यांना वाळूत खुपसल्यावर ते न डगमगता राहू शकतात. अश्या प्रकारे बनवलेली गुहा दिसत्येही सुंदर आणि माशांना लपण्यासाठी छान जागाही होते. गुहेसाठी चांगले दगड सापडत नसल्यास, खापरं किंवा हरताळकेसाठी आणलेली सुगडं (छोटे माठ) खालून फुटके असल्यास वापरता येतात. घाबरलेले , थकलेले किंवा दुसर्या कुठल्याही आडोसा हवा असलेले मासे ह्यात विश्रांती घेउ शकतात.
आता टॅन्कमध्ये वाळू सोडायला हरकत नाही. साधारण दिड ते दोन इंचाचा वाळूचा थर पुरेसा ठरतो. वाळु टॅन्कमध्ये टाकल्यावर त्यात डोंगर दर्या तयार कराव्यात. वाळू एका पातळीत दिसण्यापेक्षा उंचसखलपणा असल्यास जास्त चांगली दिसते. तसेच वाळूला टॅन्कच्या एका बाजूला उतार द्यावा. उताराच्या ठिकाणीही घाण जमा होउन रहात असल्याने सायफनिंगच्या वेळी सोयीचे पडते.
वाळूला आपल्याला हवा तसा शेप देउन झाला की, मग त्यावर एखादी प्लास्टिक शीट (नसल्यास वर्तमानपत्रही चालेल) ठेवावी. मग त्यात वरुन हळूहळू पाणी ओतावे. प्लास्टिक शीट मुळे पाण्याचा फोर्स कमी होउन वाळू उधळली जात नाही त्यामुळे पाणी घाण होत नाही.
टॅन्क पाण्याने अर्धा भरल्यावर मग त्यात झाडे वगैरे लावावीत. झाडांच्या विविध प्रकाराची ओळख करुन घेतल्यास त्यांच्या विषयी माहिती मिळते आणि कुठली झाडे कुठे लावावीत ह्यासाठी मदत होते.
टॅन्कच्या सजावटीला अॅक्वास्केपिंग असे नाव असून हे एक फार पुढारलेले शास्त्र आहे. ह्यात झाडे, लाकडाचे तुकडे, दगड व इतर गोष्टींचा वापर केला जातो. यात एखाद्या स्थापत्यशास्त्रज्ञाने आरेखलेल्या बागेप्रमाणे टॅन्क जतन केला जातो. मासे हे फक्त लाईफ बॅलन्सिंगसाठी वापरले जातात. पण आपला प्रमुख उद्देश मत्स्यपालन असल्याने आपण फक्त याची तोंडओळखच ठेवूया. अर्थात एखाद्याला मासे पाळण्यापेक्षा ह्यातच जास्त इंटरेस्ट वाटत असल्यास हेही करायला हरकत नाही.
टॅन्कमध्ये जिवंत झाडे लावायची असल्यास वाळु ही मिडियम जाडीची असावी. त्यात झाडाची मुळे न दुखावता खोचून झाड नीट रोपावे. गवतासारखे उंच सॅजिटारीया, साधे व स्पायरल (स्क्रू) वॅलेस्नेरीया, पिग्मी ग्रास, छोटुल्या पानांचे बकोपा, लालसर दिसणारे लुडविगीया, झुडुपाप्रमाणे असलेले अॅमेझॉन स्वोर्ड, नाजुक कबम्बा, भरपूर ऑक्सिजन सोडणारे हायड्रीला ही झाडे सहज उपलब्ध असतात व जगतात ही. झाडे लावतानाच उंच झाडे पाठीमागे व बुटकी झाडे पुढे अशी वर्गवारी करुन घ्यावी. सॅजिटारीया, वॅलेन्सेरीया यासारखी झाडे टॅन्कच्या मागच्या काचेच्या जवळ सरळ रेषेत लावावी. एखाद्या कोपर्यात हायड्रीला, कबम्बाचा गुच्छ ठेवावा. कबम्बासारखे नाजुक झाड शक्यतो दांडगाई करणार्या माश्यांबरोबर ठेवू नये. झाडे लावतानाच मुळांशी दगडाचे आळे केल्यास झाडे उपटली जाण्यास प्रतिबंध होतो. अर्थात झाडांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो सूर्यप्रकाश. दिवसातून दोन तीन तासही सूर्यप्रकाश मिळत नसल्यास लाइट लावणे गरजेचे ठरते. थंबरूलप्रमाणे १ लिटरला १ ते ३ वॅट लाइट असावा व साधारण बारा तास चालू ठेवावा. पण रिझल्ट तपासूनच. कारण जास्त प्रकाश म्हणजे अल्गीजची जास्त वाढ आणि कमी प्रकाश म्हणजे झाडांची कमी वाढ व निस्तेज होणे.
लाईट्सची अॅरेंजमेंट करतानाच त्यात ट्यूबलाईट, एनर्जी सेव्हर लॅम्प्स, नाईट लॅम्प अशी सोय करुन ठेवावी. म्हणजे मूड लायटींग (आपल्या मूड्स प्रमाणे) करता येईल.
निसर्गातले उजेड काळोखाचं गणित समजवून घेतलं की टॅन्कमध्ये लाईट कसे लावायचे ते लक्षात येतं. जसा सूर्य उगवण्यापूर्वी असलेला अंधूक प्रकाश सूर्योदयानंतर उजळतो तसेच टॅन्कमध्येही प्रकाश हळूहळू वाढवत न्यावा. अचानक प्रखर प्रकाश टाळावा, मासे दचकू शकतात. प्रकाश कमी करत जातानाही हळूहळू करावा. ह्यासाठी एकापेक्षा जास्त ट्यूब्ज / बल्बज् लावता येतील. अर्थात हे करताना लाईटच्या बिलाचा विचार विसरुन चालणार नाही. १००० वॅट १ तास चालवल्यावर एक युनिट वीज खर्च होते. जर १०० वॅटचा बल्ब रोज एक तास जाळला तर एका महिन्यात १०० x १ x ३० = ३००० वॅटअवर्स = ३ युनिट्स = ३ x ३.५ रु ( किंवा जो काही रेट असेल तो) = महिना १०.५ रु बिलातली वाढ. यासाठीच सूर्यप्रकाशासारखा स्वस्त पर्याय नाही. 
टॅन्कमध्ये झाडे नीट जगली की मग मासे सोडायला हरकत नाही. आपण ठरवलेले मासे दुकानातून आणले की ती पिशवी माश्यांसकट टॅन्कमध्ये तशीच ठेवावी. पिशवीतले पाणी हळूहळू टॅन्कमधल्या पाण्याच्या तपमानाला येईल. साधारण दहा मिनीटांनी पिशवीतले मासे टॅन्कमध्ये सोडावे. नवीन मासे आणतानाही ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच नवीन मासे टॅन्कमध्ये सोडताना आधीच्या माशांना खाणे घालावे, यामुळे त्यांचे लक्ष खाण्याकडे रहाते. नाहितर जुन्या रहिवाश्यांनी नव्यांचा पाठलाग करणे शक्य आहे.
माशांना दिवसातून दोनवेळा तरी खायला घालावे. ट्यूबीफ्लेक्स (गांडूळांसारखे दिसणारे किडे), ब्लड वर्म्स, डॅफ्निया (Daphnia), व्हाईट वर्म्स, बीअरवर्म्स, डासांच्या अळ्या असे अनेक प्रकारचे जिवंत व वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य निर्मित खाणे बाजारात उपलब्ध असते. वेगवेगळ्या प्रकारचे खाणे खात राहिल्याने मासे; तजेलदार, तरतरीत, चपळ व चमकदार रहातात. मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन करणार्यांना खाणे बनवताही येउ शकते. ह्याशिवाय चिकन, मटण व बीफ हार्टसारखे पर्यायही वापरले जाउ शकतात.
दोन तीन मिनीटात संपेल एव्हढे खाणे माश्यांना पुरेसे असते. पण सगळ्या माश्यांना खाणे मिळते आहे ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नाहितर मोठे / अॅग्रेसिव्ह मासे खाणे संपवून टाकतील आणी लहान मासे उपाशीच रहातील. दोन तीन ठिकाणी खायला घातल्यास सर्वाना पुरेसे मिळू शकेल. किडे घालण्यासाठी तरंगणारे, भोके असलेले कप्स मिळतात. त्यात सोडलेले किडे त्या भोकांतून बाहेर पडण्यासाठी वळवळत रहातात व माश्यांचे भक्ष्य बनतात. यामुळे खाण्यासाठी टाकलेले किडे, वाळूत जाउन लपून बसण्याची शक्यता कमी होते. तसेच रेडिमेड फिशफूड साठी फ्लोटिंग रिंग्ज मिळतात. टाकलेले फूड त्या रिंगमध्येच तरंगत रहाते व माश्यांना ते खाणे सोपे जाते.
कोणताही मासा साधारणत: वरून बघितल्यास डार्क व खालून बघितल्यास पेल दिसतो. निसर्गाने त्यांच्या शत्रूला ते सहज दिसू नयेत म्हणून केलेली ही एक साधी युक्ती आहे. वरुन बघणार्याला पाण्याखालच्या जमीनीमुळे डार्क रंगाचा मासा दिसणे कठीण तसेच खालून बघणार्याला वरच्या आकाशामुळे फिकट रंगाचा मासा दिसणे कठीण.
माश्यांच्या रंगरुपावरुन त्यांच्या सवयी ओळखण्याचे काही आडाखे आहेत. मासा जेव्हढा रंगीत तेव्हढा त्याला सूर्यप्रकाश जास्त आवडतो. अंगावर उभे पट्टे असलेल्या माश्यांना उनसावली असलेल्या (उंच झाडे असलेल्या) भागात फिरणे पसंत असते.
लॅटरल लाईन (तोंडापासून सुरु होउन शेपटापर्यंत जाणारी शरीरमध्य रेषा) च्या वरती तोंड असलेले मासे (उदा. गप्पी, डॅनिओज) हे टॅन्कच्या वरच्या भागात त्यांचे खाणे शोधतात, लाईनवर तोंड असलेले मासे (बार्बस्, गुरामी) मध्यभागात तर लॅटरल लाईनच्या खाली तोंड असलेले मासे (लोच, कॅटफिश) पाण्याच्या तळाशी भक्ष्य शोधत फिरतात. टॅन्कमध्ये कोणते मासे ठेवायचे हे ठरवताना हि माहिती फायद्याची ठरते. सगळ्या प्रकारचे एक दोन जातीचे मासे ठेवले की टॅन्क भरलेला वाटतो. नुसते वरवर फिरणारे मासे असले तर टॅन्कचा मध्यभाग रिकामा वाटत रहातो.
मासे : http://en.wikipedia.org/wiki/List_of_freshwater_aquarium_fish_species
अॅक्वेरीयममध्ये साधारणतः ठेवले जाणारे मासे खालील ग्रुप्समध्ये विभागले जातात.
लाईव्ह बेअरर्स किंवा पिल्लांना जन्म देणारे मासे - यात गप्पी, मॉली, प्लॅटी, स्वोर्ड टेल्स, ट्रॅन्जेलीन हे मासे येतात. पाळायला व ब्रीड करायला अत्यंत सोपे असे हे मासे बहुत्येकदा बिगिनर्सचे पहिले मासे असतात. काही विशेष गरजा नसल्याने हे पाळणे अजिबात कठिण नसते. शक्यतो एका नरास दोन माद्या ह्या प्रमाणात ठेवावे. ह्यांचे खालचे ओठ किंचीत जाडसर असतात, झाडांच्या पानावर जमलेलं शेवाळ खायला ओठांचा उपयोग होतो. ह्यामुळेच कदाचित ह्यांना बाकीच्या माश्यांना टोचायची आवड असते. आकाराने मोठ्या माशांना ह्यांचा त्रास होत नाही उलट झुपकेदार शेपटीमुळे गप्पीसारख्या माश्यांनाच इतरांपासून सांभाळायला लागते. लाईव्ह बेअरर्समध्ये मेल फिमेल ओळखण्याची सहज सोपी खूण म्हणजे गुदद्वाराजवळचा पर. फिमेल्समध्ये हा त्रिकोणी असून मेल्समध्ये तो जननेंद्रीयाचे काम करतो आणि आडव्या नळीसारखा व लांबट असतो. ब्लॅक मॉलीच्या फोटोंमध्ये हा फरक स्पष्टपणे पहाता येईल. मेल्स हे फिमेल्सपेक्षा आकाराने लहान असतात.
गप्पीला अॅक्वेरीयममधले फुलपाखरु म्हंटले जाते ते त्यांच्या चित्तवेधक रंगांमुळे आणि लहरणार्या शेपटीमूळे. कल्पनेपलिकडल्या रंगात उपलब्द्ध असलेले गप्पी कुणाच्याही नजरेला सहज आकर्षून घेतात. फिमेल्स त्यामानाने कमी रंगीत असतात. रंग आणि शेपटीच्या आकारावरु ह्यात कित्येक जाती आहेत. गप्पी साधारणतः एक ते दिड इंचापर्यंत वाढतो. पिल्ले वाढवून विकताना मेल्स व फिमेल्स सेपरेट टाक्यात ठेवतात. त्यामुळे मेल्सच्या टेल्सची वाढ चांगली व लवकर होते. मेल्सच्या टॅन्कमध्ये दोन तीन फिमेल्स ठेवल्यास शो ऑफ करण्याच्या नादाने शेपट्या आणखीनच छान बनतात. 
मॉलीजचे काळे, पांढरे, सोनेरी, चंदेरी एकसमान रंग त्यांना पॉप्युलर बनवतातच पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे त्यांची कुणाशीही न भांडण्याची वृत्ती. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वतःची पिल्ल खातं नाहीत. त्यामुळे टॅन्कमध्ये फक्त मॉलीजच असल्यास (मेल व फिमेल्सही) त्यांची संख्या वाढणारच. ह्यात फिनेज वरुन सेल फिन, मून टेल, लायरा टेल असे प्रकार असतात.
प्लॅटी, स्वोर्डटेल आणि ट्रॅन्जेलीन हे एकमेकांचे चुलतभाउच. त्यामुळे ते एकमेकात सहज ब्रीड होतात. लाल रंग हा ह्यांचा बेस असला तरी हे बर्र्याच रंगात मिळतात. पैकी प्लॅटीला स्वोर्ड नसते. बाकी दोघांच्याही मेल्सना शेपटीच्या खालच्या टोकाला तलवारीसारखे लांब टोक असते. स्वोर्डटेल आणि ट्रॅन्जेलीन मधला मुख्य फरक म्हणजे स्वोर्डटेल्सचे डोळे काळे असतात तर ट्रॅन्जेलीन्सचे लाल. ट्रॅनजेलिन्सच्या सगळ्या व्हरायटीज ह्या फिन्सच्या आकारावरुन आहेत. प्लॅटि व स्वोर्डटेल्सच्या व्हरायटीज रंग आणि फिनेजमधील फरकांमुळे ओळखता येतात. प्लॅटि आकाराने दिड ते दोन इंच वाढतात तर स्वोर्डटेल्स / ट्रॅन्जेलीन चार ते पाच इंच वाढतात.
अॅनाबॅन्टीड्स - लॅबॅरिन्थ ग्रुपच्या माश्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांना हवेतला ऑक्सिजन घेता येतो. अर्थात पूर्णपणे नाही. त्यामूळेच आरामात पोहत असताना अचानक सूळकन् पृष्ठभागावर येउन जाणं ही ह्यांची सवयच असते. कल्ल्यांखाली असलेले फिलर्स ह्यांना स्पर्शज्ञान करुन देतात. सयामीज फायटर्स, गुरामीज, पॅरॅडाईज फिश ही ह्या प्रकारच्या माशांची नावं. हे ही पाळायला अत्यंत सोपे असतात आणि ब्रीडींगलाही. पाण्याच्या पृष्ठभागावर पानाच्या आधाराने तोंडातून बुडबुडे काढून बनवलेलं ह्यांच घरटं आणि त्यानंतर नर घेत असलेली पिल्लांची काळजी हे बघत रहाण्याजोगे असतात.
फायटर हा बिगिनरसाठी चांगला मासा आहे. मूळचा सयाम (थायलंड) च्या भाताच्या खेचरात वाढणारा हा मासा तिथे (कोम्बड्यांच्या झुंजीसारख्याच) झुंज खेळण्यासाठी वापरला जातो. एक मेल दुसर्या मेलला आपल्या एरियात सहन करुच शकत नाही. सगळे पर फुलवून एकमेकांवर प्राणांतिकपणे तूटून पडून केलेली हि मारामारीही बघत रहाण्याजोगी पण क्रूर असते. त्यामुळे टॅन्कमध्ये एकावेळी एकच मेल (सुखाने) राहू शकतो. पण फिकर नॉट. कमीत कमी जागेत राहू शकणारा व हवेतला ऑक्सिजनही घेउ शकणारा हा मासा असल्याने तूम्ही ह्याला चक्क हॉर्लिक्सच्या बरणीतही अगदी आरामात पाळू शकता. तेजस्वी रंग आणि झुबकेदार शेपटी व इतर पर ह्यामुळे हा अतिशय देखणा दिसतो. साधारणतः तीन इंचापर्यंत वाढणारा हा मासा तसा स्वभावाने शांत असतो. लाल, निळा, हिरवट, सोनेरी, पांढरा, काळा व ह्यांचे मिक्स अश्या विविध कलर्समध्ये मिळतो. मेल्स हे फिमेल्सपेक्षा जास्त रंगीत व जास्त मोठे पर असणारे असतात आणि सहज ओळखता येतात.
पर्ल गुरामी हा गुरामी फॅमिलीमधला (माझ्यामते) सर्वात सुंदर मासा. सहा इंचापर्यंत वाढणारा हा मासा स्वभावाने अत्यंत शांत, पाळायला अगदी सोपा असतो. पिवळसर सोनेरी रंगाच्या शरीरावर पाढरट ठिपके, लॅटरल लाईनवर काळ्या ठिपक्यांची नक्षी, पाण्यात सहज विहरणे हे अतिशय सुंदर तर दिसतेच पण त्याहून सुंदर वाटतो तो मीलनाच्या काळात मेल्सच्या गळ्यावर दिसणारा लालभडक रंग. मेल फिमेल ओळखण्याची आणखीन एक सोपी खूण म्हणजे मेल्सचा वरचा पर फिमेल्सपेक्षा लांब असतो.
गोल्डन गुरामी रंगाने सोनेरी असून साधारण पर्ल गुरामी एव्हढाच वाढतो. ब्ल्यू गुरामी हा अत्यंत स्टर्डी मासा असून त्याच्या रिक्वायरमेंटस् जास्त नाहीत. हा पाण्याच्या तपमान व PH च्या बर्याच मोठ्या रेंजशी जुळवून घेउ शकत असल्याने पाळणे अगदी सोपे जाते.
किसिंग गुरामीचे नाव असे पडण्याचे कारण म्हणजे त्यांच्या (अश्लाघ्य :स्मित:) सवयी. रंग गुलाबी असल्याकारणाने असेल कदाचित पण दोन किसिंग समोरा समोर आल्यावर त्यांच्या अंगात इमरान हाश्मी संचारतो. हा आकाराने फुटभरापेक्षा जास्त मोठा होउ शकतो.
हनी गुरामी पिवळसर तर कॉपर गुरामी तांबट लाल असतो हे दोन्ही मासे तसेच ड्वार्फ गुरामीही दोन ते तीन इंचापेक्षा जास्त मोठे होत नाहीत. पैकी ड्वार्फ गुरामीज अत्यंत लाजाळू असून ह्याला लपण्यासाठी जागा आवश्यक असते.
सर्व गुरामीज मध्ये फिमेल मेलपेक्षा आकाराने मोठी असते व कमी प्रमाणात असलेल्या रंगावरून ओळखता येते.
टेट्रा - अत्यंत शांत असे हे मासे हे झाडांनी गच्च भरलेल्या टॅन्कमध्ये अतिशय खूलून दिसतात. ग्रुपने रहाण्याची आवड असल्याने हे शक्यतो डझनाच्या संख्येने पाळावेत. आकाराने लहान असल्याने हे ग्रुपमध्ये नजरेत भरतात. ब्लॅक विडो सारखा अपवाद सोडला तर जवळ जवळ बाकी सगळे टेट्राज हे टिपीकल टॉर्पेडो शेपची बॉडी असलेले, सीझर्स शेप टेल असलेले असतात. सगळ्या माश्यांत मिळून मिसळुन रहात असल्याने कम्युनिटी टॅन्कमध्ये ह्यांच्यासारखे दुसरे मासे नाहीत. पण छोट्या आकारामूळे ह्यांना जास्त मोठ्या माश्यांबरोबर ठेवू नये.
बार्बस् - नावाप्रमाणेच अत्यंत शार्प असलेला हा ग्रुप. रोझी बार्ब, शुबर्टी बार्ब, चेरी बार्ब, टायगर बार्ब, टिनफॉईल बार्ब ही ह्यातली काही नावे. ग्रुपने रहाणे, चपळाईने पोहोणे, अॅग्रसिव्ह टेरेटोरीयल बिहेव्हीयर ही ह्यांची वैशिष्ट्ये. स्वतः आकाराने जास्त मोठे नसल्याने मोठ्या माश्यांच्या वाटेला हे जात नाहीत पण टिनफॉईल बार्ब आकारानेही मोठे होतात तेव्हा लहान माश्यांबरोबर ह्याना ठेवणे जरा विचारपूर्वकच करावे.
डॅनिओ - ह्यात चार जाती आहेत. झेब्रा, स्पॉटेड, पर्ल आणि जायंट. ह्यातला जायंट ३ इंचापर्यंत वाढतो बाकीचे दोन इंचापर्यंतच. पण अत्यंत चपळ असलेले डॅनिओज टॉर्पेडो शेप मुळे उत्कृष्ठ स्वीमर असतात. सहा ते बारांच्या संख्येत ठेवल्यास मोजणे कठीण जावे अश्या वेगाने सतत इकडून तिकडे पोहोत असताना अॅक्वेरीयम चैतन्यमय भासू लागतो.
चिकलेटस् (Chichlids) छोट्या आकाराच्या रामारेझी (Apostograma Remirezi) पासून ते मोठाल्या ऑस्कर पर्यंत वाईड रेंज असलेला हा ग्रुप. आकाराने चपटे, आकारानुसार थोडेसे अॅग्रेसिव्ह, टॅन्कमध्ये लपण्याच्या जागा, गुहा असणे आवश्यक. (एरिया ठरवायला सोपे पडते). हे रोग चटकन पकडतात पण रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे रोगाशी झगडतातही. ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे हे पिल्लांची काळजी घेतात. त्यांना अंगावर पाजतातही (अंगातून स्रवणारा एक द्रव) त्यामुळे एकच पेअर ठेवल्यास पिल्लं मिळवणं फारसं कठीण नसतं (तसही आपल्याला काहीच कराव लागत नाही, त्यांच तेच करतात
) ह्यांच्यात जोडी जमते आणि एकत्र रहाते. अर्थात एक गेल्यास दुसरा (री) शोधणंही चालतं पण एकदा जमलेली जोडी विनाकारण बिनवसून घेत नाही.
एन्जल्स (pterophyllum scalare) हे मूळचे अॅमेझॉनच्या खोर्यातले मासे, आठ ते दहा ईंचांपर्यंत वाढणारा हा मासा दिसतोही सुंदर आणि वागतोही सुंदर. तीन काळे पट्टे असलेले मार्बल एन्जल्स, पट्टे नसलेले स्वच्छ सोनेरी गोल्डन एन्जल्स, अंगावर चट्टे असलेले स्कार एन्जल्स, लाल डोळे असलेले रेड आय एन्जल्स, वेल टेल, घोस्ट, ब्लॅक अश्या जवळ जवळ ३० व्हरायटीज आहेत.
ह्या ग्रुपमधला माझा सर्वात लाडका म्हणजे रामारेझी. ह्याला रॅम्स चिकलेट असही लाडकं नाव आहे, दोन अडीच ईंचापर्यंत वाढणारा हा मासा त्याच्या अंगावरल्या रंगाच्या उधळणीमुळे खासच दिसतो.
शार्कस् : होय शार्क्सच पण हे खरेखुरे शार्क्स नव्हेत. हे लोच / कॅटफिशची एक व्हरायटी आहे. फुटभरापेक्षा जास्त वाढणार्या टायगर शार्क पासून ते सुंदर रंगसंगती असणार्या रेड टेल शार्क सारख्या चार प्रजाती आपल्याकडे कॉमन आहेत.
जरी आपण बहुतेक ग्रुप बघितले असले तरीही काही सांगणे बाकी आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे बॉटम फीडर्स. यात कॉमन सकरफिश (प्लेको), कॅटफिश, लोच, ईल यासारखे मासे येतात. तळाशी चरणारे हे मासे टॅन्कच्या साफसफाईत महत्वाची भूमिका बजावतात. दगड, झाडं, काच यावर जमलेले शेवाळ खाणं हा यांचा आवडीचा उद्योग.
हे काही माझ्या खास आवडीचे देखणे मासे.
हार्लेक्वीन रासबोरा : रासबोरा ग्रुपमधला हा मासा. ह्याच्या अंगावरील त्रिकोणी आकाराचा निळसर काळा पॅच अगदी खुलून दिसतो. ह्याचा कळप / थवा / जथ्था (Shoal) एकत्र पोहोताना सुंदर दिसतो. दोन ईचापर्यंत वाढणारा हा मासा अगदी शांत असतो.
व्हाईट क्लाउड माउंटन मिनो : सायप्रिनीडस् (Cyprinids) ग्रुपमधला हा मासा खरा थंड पाण्यातला. अतिशय चपळ असा हा मासा १.५ ईंचापर्यंत वाढतो. स्वभावाने शांत असा हा मासा ग्रुपने रहातो. हा आपली अंडी खात नाही.
ग्लास कॅटफिश : संपूर्ण पारदर्शक असा हा मासा बघणार्याला बुचकळ्यातही टाकतो आणि माशाच्या शरीररचनेच ज्ञानही देतो
बोस्मॅन रेनबो : रेनबो ग्रुपमधला हा मासा अतिशय सुंदर दिसतो. हा चार ते पाच ईंचापर्यंत वाढतो.
फ्लॉवर हॉर्न आणि पॅरटफिश: अंगावर फुलांची नक्षी आणि डोक्यावर टेंगूळ असलेला हा मासा. ह्याला पॅरटफिशप्रमाणेच शास्त्रीय नाव नाही कारण ते दोघेही निसर्गतः आढळुन येत नाहीत.
पिर्हाना : अत्यंत बदनाम असणार्या ह्या माश्याच्या तीन चार जाती आहेत. आकाराने फुटापेक्षा जास्त वाढू शकणारा का मासा बघतानाच त्याच्या विषयीचा दरारा जाणवतो.
टॅन्कमधील ईतर प्राणी : यात गोगलगाई, श्रिम्प्स आणि क्रॅब्स तसेच न्यूटस वगैरे ही येतात. क्रुस्टेशिअन ग्रुपची हि मंडळी सुंदरही दिसतात आणि उपयोगीही असतात.
काही विचित्र मासे : दिसायला कितीही वेगळे वाटत असले तरीही हे नैसर्गिक मासेच आहेत.. 
अॅक्वेरीयम मधला सर्वात जास्त फेमस मासा म्हणजे गोल्डफिश. हा मूळचा थंड पाण्यातला मासा, क्रुशियन कार्प पासून डेव्हलप झालेला हा गोल्डफिश, कोई माश्याचा जवळचा नातेवाईक. मातकट हिरवटसर रंग असलेल्या मूळ माश्यापासून कल्पनेपलिकडले रंग आणि आकार निर्माण झाले. हे करण्यामागे चीन व जपान ह्यांची चार ते पाच शतकांची कामगिरी आहे. दहा बारा ईंच वाढु शकणारा हा मासा ईतक्या वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे की ते प्रकार बघून म्युटेशन्स, अॅडेप्टेशन्स आणि सिलेक्टीव्ह ब्रीडींगच्या मानवी साद्ध्यांनी थक्क व्हायला व्हावे.
कॉमन गोल्डफिश, ह्याच्या मूळ रुपातील अवताराला बुलडॉग म्हणायचे पूर्वी पण सध्या तसले कुठेच दिसत नाहीत. काळाकभिन्न ब्लॅक मूर, रंगीबेरंगी शिंतोडे उडवलेला शुबंकीन, बाहेर आलेल्या डोळ्यांचे टेलिस्कोपीक आय, लांबसडक कॉमेट, गुळगुळीत (खवलेरहीत भासणार्या) शरीराचे कॅलीको, एखाद्या चेंडूसारखे गरगरीत पर्ल स्केल, बबलगमच्या फुग्यांसारखे फुगे डोळ्यावर असलेले बबलआय, पांढरेधोप शरीर आणि लाल टोपी असलेले रेड कॅप, सिंहाच्या आयाळीसारखे खवले असलेल्या डोक्याचे लायनहेड हे आणि असे कित्येक प्रकार आहेत गोल्डफिशमध्ये.
पुढच्या लेखनाची रुपरेखा.
३. मासे : रोग,
४. मेन्टेनन्स, वॉटर बॅलन्सिंग व लाईफ सिस्टीम
५. लाईट, हिटर, फिल्टर, इतर अॅसेसरीज
६. ब्रीडींग
क्रमश:
ह्या विषयावरील अजून एक धागा http://www.maayboli.com/node/3141
तुमचे प्रश्न / सूचना यायला सुरुवात होउद्या.....
मला मलेशिअन कासव पाळायचॅ आहे,
मला मलेशिअन कासव पाळायचॅ आहे, ते {mumbai मधे} कुठे विकत मिळॅल?
मला नविन प्लानतेशन मत्स्यालय
मला नविन प्लानतेशन मत्स्यालय बन्वाय्चे आहे, तर मी कोन्ते मासे पालु.
(No subject)
ही माझी फ्लोवेरोनची जोडी
ही माझी फ्लोवेरोनची जोडी आहे.
मला टेट्रा फिश पाळन्याचि आवड्
मला टेट्रा फिश पाळन्याचि आवड् आहे, पन ते गोल्डफिश सोबत राहातात का?
ऋषिकेश, प्लान्टेड अॅवेरीयम
ऋषिकेश,
प्लान्टेड अॅवेरीयम ही खर्चाची आणि अभ्यासाची बाब आहे. ग्रॅव्हेल, फर्टिलायझर्स, प्लान्टस्, लाईट, फिल्टरेशन, कार्बन डायॉक्साईड गॅस व डिस्पेन्सर, वॉटर क्वालीटी व मासे एव्हढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.
प्लान्टेड अॅव्केरीयमसाठी टेट्राज्, डॅनियोज्, ऑटोसिन्क्लस, श्रिम्प्स असे अनेक ऑप्शन्स आहेत.
टेट्रा आणि गोल्ड शक्यतोवर एकत्र नका ठेवू.
बा.बु..... मी या सदराचा
बा.बु.....
मी या सदराचा नियमित वाचक असून तुम्ही वेळोवेळी करीत असलेल्या मार्गदर्शनाचा माझ्या या आवडीसाठी तसेच माशांच्या जपणूकीसाठी उपयोग करीत असतोच.
आज काही नवे प्रतिसाद वाचताना तुम्ही 'मीठा' बाबत उल्लेख केला आहे. तो थोडा सविस्तरपणे कराल का ? म्हणजे मी डिसइन्फेक्शनसाठी ब्ल्यू लिक्विड वापरतो [अर्थात ज्यावेळी पाणी बदलले जाते त्याचवेळी....एकदाच]. त्याचा उपयोगही छानपैकी होतो. पण 'मीठ' प्रकार मला नवीन आहे.
माझ्याकडील फिशटॅन्क ३ x १ x १ चा असून 'अग्रेसिव्ह' म्हटले जाणारी कोणतीही माशांची जात नाही. संख्याही १२ ते १५ इतकीच मर्यादित ठेवली आहे. वाढ मात्र खूपच चांगली असून सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
अशा परिस्थितीत 'मीठ फीडिंग' हवेच का ?
अशोक पाटील
अशोक, खडे मीठ (नॉन आयोडाईज्ड)
अशोक,
खडे मीठ (नॉन आयोडाईज्ड) हे निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. अॅक्वेरीयम्समध्ये मासे आजारी असताना मीठ वापरुन बरेचदा फायदा होतो. जखमी नसलेल्या माशांना जनरल ट्रीटमेन्टसाठी रेकमेन्डेड.
ब्ल्यू लिक्वीड (मिथिलीन ब्ल्यू) हे पाण्याच्या पॅरॅसिटल (परोपजीवी) ट्रीटमेन्ट्साठी वापरावे.
तसेच येलो व ग्रीन लिक्वीड्स ही मिळतात. हि सर्व वेगवेगळ्या रोगांच्या ट्रीटमेन्ट्साठी वापरली जातात. यावर सविस्तर लिहायचे आहेच.
तात्पुरता इलाज म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानदाराकडून माहिती मिळवू शकता.
मला कोया आनि गोल्डफिशचि ब्रीड
मला कोया आनि गोल्डफिशचि ब्रीड कराय् चि आहे. ह्यासाठी जरा माहिती हवी होती
मला मासे पाळन्याचि खुप आवड्
मला मासे पाळन्याचि खुप आवड् आहे, आनि त्यातच मला करिअर कराय्चे अस्ल्यास असे कोन्ते कोर्सेस आहेत क?
असे कोर्सेस आहेत. नीट माहिती
असे कोर्सेस आहेत. नीट माहिती मिळवून लिहीन.
तोपर्यंत या विषयावरील पुस्तके मिळवून वाचा.
(No subject)
(No subject)
हा माझा शार्क आणला तेव्हा २
हा माझा शार्क आणला तेव्हा २ ईचाचा होता, आता तो फुट्भर झाला आहे.
मला angel fish चि ब्रीड
मला angel fish चि ब्रीड कराय्चि अस्ल्यास मी ती कशि करु?
ऋषिकेश, जातीनुसार माश्यांच्या
ऋषिकेश, जातीनुसार माश्यांच्या ब्रीडींगच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
तुमच्याकडे एकूण किती टॅन्क आहेत ? काय आकाराचे ? दिवसातला किती वेळ तुम्ही या छंदासाठी देउ शकता ? तुम्हाला हा छंद म्हणून जोपासायचाय की व्यवसाय म्हणून करायचाय ? या व इतर अनेक बाबींवर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
बागुलबुवा, मला angelfish,
बागुलबुवा,
आणि हे माझ्हे angel आहेत, यांची मला breed कराय्चि आहे. त्याबाब् त काही विचार तुम्हि सांगल का?
मला angelfish, guppies, goldfish, molly, fighterfish अशा विविध माशांचि breeding करुन बघाय् चि आहे. हे सगळे मासे सध्या माझ्याकडे आहेत, माझ्याकडे दीड फुटाच्या तीन fish tank आहेत, त्यापैकी १ tank guppies, molly, fighterfish यांनी भरलेला आहे. दिवसातला ८ तास तरी वेळ मी या छंदासाठी देउ शकतो. मला हा छंद म्हणून जोपासायचा आहे. हा guppies, molly, चा tank आहे.
त्यापैकी मला आता angelfish ची breeding कराय्चि आहे.
(No subject)
ऋषिकेश, आपला नंबर संपर्कातून
ऋषिकेश, आपला नंबर संपर्कातून कळवा. प्रत्यक्ष भेटूनही बोलता येईल.
आपला सध्याचा सेट अप काय आहे ? अजून किती वाढवायचा विचार आहे ? रहायला कुठे ?
बागुलबुवा, माझ्याकडे २ बाय १
बागुलबुवा,
माझ्याकडे २ बाय १ १/२ बाय १ चा टँक आहे, १ वर्षा पासून ९ गोल्डफिश, १ ब्लॅक्मूर होते, कालच मी त्यात अजून २सिल्वर आणी २ ब्लॅक एंजेल्स, २ ब्लॅक शार्क असे ६ आण़खी सोड्ले एकूण १६ आहेत आता...
अजून किती आणी कोणते टाकू शकतो त्यांच्यासोबत..
एक पॉवर फिल्टर आणी बबल्स ची स्टीक आहे, पुरेसे आहेत कि अजून काही हवे?
मित्रहो, २७ एप्रिल ते १ मे
मित्रहो,
२७ एप्रिल ते १ मे पर्यंत पुण्यात शोभिवंत माशांचे प्रदर्शन आहे. म्हणजे मराठीत "अॅक्वेरीयम फिश एक्झिबिशन"
मी शनिवारी हजेरी लावायचा प्लान करतोय. एक्झॅक्ट ठिकाण कळले की कळवतोच.
पुणेकरांनो जमल्यास माहिती काढू शकाल कॉय ?
बागुलबुवा, कसली माहिती
बागुलबुवा, कसली माहिती काढायची आहे?
धन्स स्वाती, काम
धन्स स्वाती, काम झालं.
पुण्यातला पत्ता
http://www.karmayog.in/events/exotic-fish-and-bird-expo
http://www.sakaaltimes.com/20120426/5594477109714758550.htm
Event Date: 27 April 2012 - 12:00am - 1 May 2012 - 12:00am
This unique exhibition to be conducted by e-PAWS (Exotic Pets & Animals Welfare Society) from April 27 to May 1 will present an interesting peep into the world of birds and exotic fishes. The ‘Exotic Fish and Bird Expo – Pune’ will be held opposite Siddhi Garden, 100 feet DP road, near Mhatre Bridge, in an enclosed area of 15,000 sq. ft. Visitors will get a chance to witness octopus, jelly fish, doctor fish, clown, damsel, angels, shrimps, invertebrates, lion fish, sting ray and more water-dwellers.
The animal species will range from Finches to Macaws, to ornamental poultry and pigeons. A series of seminars and workshops will also be conducted every afternoon by eminent experts on day-to-day care, nutrition, medical issues and their remedies for pet fish and birds. Artist Pramod Kamble will sketch birds and fishes live, while Madhav Khare will deliver a lecture on ‘Aviation Learnt from Nature’.
मुंबईत १ मे ला आहे. http://www.sanjeevan.org.in/events/events.htm
Discus, Guppy & Betta Fish Competition
Organized by: Sanjeevan
Date: 1st May 2012
Time: 11.00 am to 2.00 pm
Venue: Hooseni Metal Rolling Mills, Atlas Mill Compound, Between Reay Road and Dockyard Road Station, Mazgaon, Mumbai - 400 010.
क्या बात..... अम्या किप ईट
क्या बात..... अम्या किप ईट अप...
दुर्मिळ मासे पाहण्याची
दुर्मिळ मासे पाहण्याची संधी..

रुईयामध्ये 'अॅक्वा लाइफ २०१२'चे आयोजन
सतिश, धन्यवाद. हेच लिहायला
सतिश, धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो.
मुंबईत असलेल्यांनी जरुर पहा.....
Summary AQUA LIFE 2012 exhibition - Mumbai India
Beginning DateTime 23rd May 2012 Wednesday 22:30 (GMT-06:00) 24th 9:30 (GMT+05:00)
Finishing DateTime 27th May 2012 Sunday 8:30 (GMT-06:00) 27th 19:30 (GMT+05:00)
Location Ruia College Matunga, Mumbai
Contact
Description An exhibition of Tropical freshwater and marine fishes and planted tanks
24th to 27th may at Ruia College Matunga
10 am to 8 pm IST
अधिक माहितीसाठी हे वाचा. (लिंक बद्दल स्वप्ना_राज यांचे आभार.)
यू ट्यूबवर बीबीसी अॅटलास
यू ट्यूबवर बीबीसी अॅटलास ऑफ द नॅचरल वर्ल्ड हि मालिका चार भागात आहे. त्यात अॅमेझॉन मधले अनोखे
मासे दाखवले आहेत. इथल्या मस्यप्रेमींनी अवश्य बघावी.
बागुलबुवा, माझ्या गोल्डफीशला
बागुलबुवा, माझ्या गोल्डफीशला नाकाला जखम झाली आहे. कारण माहित नाही. एकाच पॉटमधे दोन गोल्डफीश आहेत. २ वर्ष आनंदाने रहाताहेत, म्हणजेच दुसर्या फिशने जखम केली नाही. पॉटमधे ३ पेबल्स आणि एक शेल आहे. मला फारच वाईट वाटतं आहे त्यांचं रक्ताळलेलं नाक बघुन. काय औषध लावु?
प्लीज लवकर सांगा.
टेरामायसिन ५०० मी.ग्रा. किंवा
टेरामायसिन ५०० मी.ग्रा. किंवा २५० मी.ग्रा. x २
बेटनोवेट / सोफ्रामायसिन नका लावू.
थँक्स, बाबुवा. मी
थँक्स, बाबुवा.
मी प्रार्थना करत होते कि तुम्ही माबोवर असावात म्हणुन. नसता॑त तर लावलंच असतं मी सोफ्रामायसीन.
हे टेरामायसीन पाण्यात टाकायचं का? तेव्हा मग दुसर्याला वेगळं ठेवु ना?
Pages