फिशटॅन्क - घरात मासे पाळणे विषयी

फिशटॅन्क वा घरात मासे पाळणे विषयीची माहिती/फोटो/अनुभव या धाग्यावर लिहीणे अपेक्षीत आहे! स्मित

गेली दोन/अडीच वर्षे धाकटी हट्ट करीत होती म्हणुन दोन महिन्यान्पुर्वी मित्राच्या मुलाकडून एक फिशटॅन्क व सहा मासे विकत आणले.
यथावकाश बाहेरील खोलीत त्यान्ची "प्राणप्रतिष्ठापना" वगैरे केली. परवा मित्राचा डिजीटल कॅमेरा उसना मिळाला, तर टॅन्कच्या काचेतून फोटो निघतात का ते बघितले, काही बरे आलेत असे मला वाटले म्हणुन इथे टाकतो हे! स्मित

गोल्डफिश
Photo_0162.jpg

Photo_0165.jpg

Photo_0166.jpg

रेड हेड फिश
Photo_0164.jpg

ह्यान्च नाव माहित नाही, पण मी ह्यान्ना छोटूस्से पापलेट म्हणतो फिदीफिदी
Photo_0163.jpg

आता दर आठवड्याला पाणी बदलणे, रोजच्या रोज सकाळसन्ध्याकाळ माशान्ना त्यान्चे खाणे घालणे, हवेचे यन्त्र नियमित बन्दचालू करणे, वगैरे बाबी सुरू झाल्यात!
वेळ मिळेल तसे या माशान्चे अनुभव जरुर लिहीन, तुम्हाला कुणास अधिक माहिती/अनुभव असल्यास जरुर इथे मान्डा! स्मित


या धाग्यासाठी "कोणता ग्रुप" निवडावा हे न समजल्याने, प्रकाशचित्र हा त्यातल्या त्यात सोईचा ग्रुप निवडला हे! स्मित
मॉड्स्/ऍडमिन, कृपया या धाग्यास योग्य तो ग्रुप द्याल का?
...;
आपला, लिम्बुटिम्बु



limbutimbu,
तो 'छोटा पापलेट' म्हणजे angel fish. अतिशय नाजूक असतात.
आणि फ्लॅश बंद करून फोटो काढून बघा. टँकमध्ये cfl लावला आहे का? तेवढ्या प्रकाशात चांगले फोटो येतात.
शिवाय जर aeration व्यवस्थित असेल, तर पाणी दर आठवड्याला बदलण्याची आवश्यकता नसते. महिन्यातून एकदा बदलले तरी चालते.
टँकला एका बाजूने छान चित्र लावून बघा. माशांना खेळण्यासाठी फायबरची खेळणी मिळतात. पण दगड/गारगोटी इ. प्रकार टँकमध्ये ठेवू नये.



मी पण मागे एकदा Angel Fish आणले होते. ते खुप नाजुक असतात.
आम्ही त्यान्ना ईतके खाऊ घातले की ते मरुन गेले.
आता मी Kissing Fish आणले आहेत.



आपण काचेच्या राउंड बाऊल (??) मधे मासे पाळु शकतो का ? किती ठेवु शकतो ? गोल्डन फिश ठेवता येइल का?
त्यांचे खाद्य काय ? लिंब्या भो जरा सांगता का प्लीज ..
****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



माशांना खाण्यासाठी ज्या छोट्या रंगीत गोळ्या मिळतात, तशा ३-४ गोळ्या एका लहान माशाला (म्हणजे छोट्या रेड हेड्सच्या आकाराचे) दिवसभरासाठी पुरेशा असतात. माशाच्या शेपटीखाली दोर्‍यासारखं काही लोंबकळताना दिसलं की माशाला अपचन झाले, असं समजावं. मग १ दिवस खायला काही देऊ नये.
माशांना जास्त खायला दिल्यास त्यांचं उरलेलं खाणं टँकमध्ये सडून पाणी खराब होतं.
शिवाय worm tablets मिळतात. काचेवर एखादी tablet चिकटवून ठेवावी. मासे येताजाता ती खाऊ शकतात.



धन्स चिनुक्स स्मित ,
राउंड बाऊल (??) मधे मासे पाळु शकतो का ? किती ठेवु शकतो ? गोल्डन फिश ठेवता येइल का?
>> हे पण सांग ना माहीत असेल तर .
****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



दिप्या, तो बाऊल (गोल चेन्डूसारखी बरणी का?) किती मोठा हे त्यावर ते अवलम्बुन हे! स्मित चान्गला फुटभर किन्वा जवळपास तेवढ्या व्यासाचा तरी हवा
चिनुक्स, टॅबलेट माहिती नव्हती, बर झाल सान्गितलेस
आत्ता पर्यन्त आम्हि त्या छोट्या गोळ्या टाकायचो, पण एन्जल फिश नी त्याहुन छोटे मासे आणल्यावर पाऊडर आणली, पण तिने पाणी गढूळ होते म्हणून मग क्युब आणला, क्युबचा छोटा तुकडा टाकतो, तो पाण्यात "विरघळला" की लहान्नान्ना खाणे मिळते
पण शिन्चे गोल्डफिश, तो आख्खा तुकडाच्या तुकडा पळवतात असे आढळले तेव्हा आधीच हाताने बारीक करुन टाकावयास सुरवात केली, आता या टॅबलेट मुळे अजुन सोपे होईल
ते येडे गोल्डफिश, जेवाणखावाण झाले त्यान्चे की खालची रन्गित खडी तोन्डात पकडतात अन वर जावुन "थू थू" केल्यागत टाकून देतात! तो त्यान्चा खेळ अस्तो का?
बाकी तू चान्गली माहिती देतो हेस!

सुरुची, जमल्यास फोटो पण टाकाना इथे नावानिशी! स्मित

मी सद्ध्या फिल्टरची माहिती (किम्मत वगैरे) काढतो हे! तो बसवला तर पाणी सारखे सारखे बदलायला लागणार नाही का? आत्ता दर ६/७ दिवसान्नी बदलावे लागते, खर तर ४/५ व्या दिवशीच जाम गढूळलेले अस्ते, आणि हवा पण सारखी सोडावी लागते, नाहीतर मासे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे बहुतेक, पृष्ठभागाशी वर वर वावरतात!
...;
आपला, लिम्बुटिम्बु



तो बाऊल (गोल चेन्डूसारखी बरणी का?) - हो , चांगली मोठी आहे . आणलीये पण आता मासे आणायचे आहेत , तुम्ही कुठुन मिळवले ते ? मी २-३ पेक्षा जास्त ठेवु नये असा विचार करतोय स्मित
****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



काचेच्या बाऊलमध्ये मासे ठेवता येतात. किती ते आकारावर अवलंबून आहे. साधारण १ घनफूट जागेत १-२ मासे, असा हिशेब आहे (याहूनही जस्त मासे ठेवतात, पण मग माशांना नीट खेळता येत नाही). हल्ली aerator बसवलेले बाऊल मिळतात. त्यात पाणी १५ दिवसांनी बदलले तरी चालते. मात्र जर aerator नसेल, तर मात्र दर दोन दिवसांनी पाणी बदलावे.
मात्र आता थंडी सुरू होईल. शक्यतो पाणी योग्य तापमानावर राहावे म्हणून आत दिवा असतो. बाऊलमध्ये तशी सोय करता येत नाही, आणि पाणी थंड झाले की मासे मरतात.
कमी ऑक्सिजनवर जगू शकणारे काही मासे आहेत. उदा. betta. या माशांना ७-८ दिवस पाणी बदलले नाही तरी चालते. चांगल्या दुकानात जाऊन असे कमी ऑक्सिजनवर जगणारे मासे आणता येतील.
टँकमध्ये aerator बरोबर filter हवाच. फार महाग नसतो. साधारण दोन्ही मिळून ५०० रुपयांत मिळू शकते. यामुळे महिनाभर तरी पाणी बदलावे लागत नाही.
नळाचे ताजे पाणी टँकमध्ये भरू नये. एक दिवस शिळं पाणी वापरावं. पाण्यातील क्लोरीन काढून टाकण्यासाठी nullifier liquid (यालाच white liquid पण म्हणतात) टाकावे. १x१x१ फूट जर टाकीचे आकारमान असेल, तर साधारण झाकणभर solution टाकावे. पाण्यातील bacteria, शेवाळे काढून टाकण्यासाठी blue liquid मिळते. दुकानदाराला विचारून आपल्या टँकच्या आकारमानानुसार टाकावे. ही दोन्ही solutions फार महाग नसतात. १ बाटली साधारण २५ रुपयांना मिळते, आणि ६ महिने तरी पुरते.
.
तोंडात दगड घेऊन उडवणे, हा माशांचा आवडता खेळ आहे.



धन्स रे माहीती बद्दल
>>मात्र आता थंडी सुरू होईल. शक्यतो पाणी योग्य तापमानावर राहावे म्हणून आत दिवा असतो. बाऊलमध्ये तशी सोय करता येत नाही, >> पण आता मी तर तो बाऊल आणलेला आहे अरेरे , \\****************************
स्मित इश्श ! फिदीफिदी हाहा खो खो हसून हसून गडबडा लोळण



बाऊलमधल्या माशांची खूप काळजी घ्यावी लागते. फिल्टर, एरेटर नसल्याने पाणी बदलण्याचा माशांना त्रास होतो. शिवाय थंडी. बाऊलमधले मासे फार जगत नाहीत, असा माझ्यासकट अनेकांचा अनुभव आहे.



दिप्या, एक काम कर, बाऊलच्या तोन्डाच्या आकाराची मेटलची शन्कुकार लॅम्पशेड आण, ती बाऊलवर ठेवली की दिव्याची सोय होईल! एखादीच जोडी बाळग आधी!
कोणतातरी फायटर मासा बघितला हे मी छोट्याश्या बाऊलमधे, त्याची चौकशी कर! (मात्र तो मासा दुसर्‍या माशान्बरोबर रहात नाही अस ऐकुन हे)
चिनुक्स, चान्गली माहिती! फोटो पण टाका राव! मजा येईल स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु



फिल्टरचा मला वेगळाच अनुभव आला होता.
खराब पाणी आत जाऊन ते बाहेर येताना स्वच्छ होऊन यावे यासाठी ते असते, पण आत जाणार्‍या पाण्याबरोबर दोन छोटे गोल्डफिश, एक डॉलर फिश अन एक एन्जल यांचा क्रमाक्रमाने आत जाऊन, नंतर बाहेर न येता आल्यामूळे शेवट झाला. फिल्टरमध्ये अडकून मेलेले हे बिचारे काढताना प्रचंड वाईट वाटले. मीच त्यांना मारल्यागत.
मग फिल्टरच काढून टाकला.
माशांची संख्या १०-१५ होती, ती चिनूक्स म्हणतो त्यप्रमाणे ५ वर आणली. (टँक २*१*१)
मग त्यांचं घाण करणंही कमी झालं. महिन्यातनं एकदा पाणी बदललं तरी चालतं.
ऑक्सिजन मात्र २४ तास चालू असतो. अन हिवाळ्यात एक सीएफएल लँपही.



फिल्टरमध्ये मासे अडकले? फिल्टर दगडांनी झाकून ठेवतात, शिवाय त्याची जाळी अगदी लहान असते.
फिल्टर नसला तर माशांची घाण पोटात जाऊन ते आजारी पडू शकतात.
साजिरा,
तू एखाद्या चांगल्या दुकानात फिल्टरची चौकशी कर. तू म्हणतोस तसं व्हायला नको.



CFL Lamp नी उष्ण्ता मिळते का? किती watt चा लावावा लागतो?



CFL नी खरं तर अतिशय कमी उष्णता मिळते. टँकचा आकार, आणि खोलीचं तापमान यावर CFL लावायचा की ट्युब लावायची, हे ठरवता येतं. हल्ली वीज नसते, किंवा बिल जास्त येतं, म्हणून CFL वापरतात, पण त्यामुळे फारशी उष्णता मिळत नाही.
माझी टँक २x२x३.५ फूट या आकाराची आहे. पण घरात फार गार होत नाही, त्यामुळे ४ W चा CFL पुरतो. खूप थंडी असेल तर साधारण २५ W चा बल्ब लागतो. थंडीत शक्यतो CFL वापरू नये. बल्ब लावावा. (म्हणजे खूप थंडी असेल तर) पण हे सारं टँकचा आकार, आणि तापमानावर अवलंबून आहे.



गोल्डफिश आणी एंजल/गोरामी एकत्र ठेउ नयेत, त्यांचं आपापसात जमत नाही! गोल्डफिश बरोबर शार्क ठेवावेत. शार्क खुप चपळ असतात, आणी टँक मधे प्रचंड active असतात. ते टिकतात ही खुप.

हा पहा माझा शार्क, आणला तेव्हा २-३ से.मी. होता, आता फुटभर व्हायला आलाय! स्मित
shark.jpg

माशांच्या दुकानात त्यांना खाण्यासाठी बारीक तंतूसारख्या जिवंत अळ्या मिळतात. त्या खायला घातल्यास मासे फटाफट मोठे होतात, पण त्या अळ्या जास्त दिवस जिवंत रहात नाहीत, त्यामुळे त्या सारख्या थोड्या-थोड्या आणाव्या लागतात. त्या खुप स्वस्त असतात.

एक 'सकर' नावाचा मासा मिळतो, तो दिसायला जरा विचित्र असतो. पण तो टँकमधली घाण खाउन टँक स्वच्छ करतो.



शार्कच्या काही जाती सगळ्याच माशांना त्रास देतात. उदा. golden shark (या शार्कचे पंख सोनेरी असतात, बाकी पांढरा किंवा काळा). हा दिसायला सुरेख पण इतर माशांना खूप त्रास देतो.
टँक आणल्यापासून सुरुवातीचे २-३ महिने तरी फार मासे आणू नयेत. आपल्याला एकदा सगळी सवय झाली, की मग संख्या वाढवता येते.