माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.
अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.
'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.
तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?
सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले ते वेगळंच. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!
(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!
(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?
(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.
या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.
(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!
काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.
या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.
पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...
मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.
अॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"
जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.
"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"
उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.
"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.
"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.
"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."
"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."
पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?
झकास्.माझी चिडचिड वाढते आणि
झकास्.माझी चिडचिड वाढते आणि रक्तदाब देखील. शेवटी गेंडा आणला त्याची चामडी सोसली आणि त्याचा कोट मनावर आणि शरीरावर घातला.तात्पर्य हल्ली सुखी आहे.
<याचा प्रत्यय तर मायबोलीवर
<याचा प्रत्यय तर मायबोलीवर इतकेवेळा येत असतो. वय जास्त म्हणून सगळे गप्प रहातात त्यामुळे आपल्याला वाटेल त्याला आणि वाटेल ते बोलायचं लायसन्स मिळाल्यासारखं बोलतात. >
वय जास्त असलेले असे कितीसे लोक आहेत हो मा बो वर? एक मी नि दुसरे सुधीर काळे. ते तर चांगलेच लिहीतात. बाकीचे मला माहित नाहीत, कुणि एव्हढे मोठे असतील.
म्हणजे मुद्दा असा की माबो वर येऊन केवळ वयाने मोठे आहे म्हणून वाट्टेल ते लिहिणार्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे फक्त वयाने मोठे असलेल्यांनी लिहीले म्हणून तुमची चिडचिड होते असे असेल तर, आशा आहे की फार वेळा नाही.
साजिर्या, अरे मायबोलीवरच मला असे विचारण्यात आले, पण मायबोलीवरचेच लोक मला भेटायला नि फार एंडला भेटायला प्रेमाने आले होते, त्याचा उल्लेख करायलाच पाहिजे, नाहीतर मी कृतघ्न ठरेन.
आता असा प्रश्न विचारून माझी चिडचिड कमी केल्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. उगाच जिथे तिथे वाईटच बघायचे ही भूमिका हळू हळू कमी करायला पाहिजे.
कुणितरी लिहीले लोक परदेशात नीट रहातात पण भारतात येऊन घाण करतात!! धन्य, धन्य!
अहो, भारताची लोकसंख्या किती, तिथे येणारे परदेशी किती? काही विचार करा! परदेशातून आलेल्या लोकांनी किती घाण केली नि नेहेमी तिथे रहाणार्यांनी काय केले? जिथे घाण आहे तिथे परदेशातील किती लोक जातात? झोपडपट्टीत कोण रहातात? मुंबईच्या लोकलने नेहेमी प्रवास कोण करतात? परदेशातलेच फक्त? क्कैच्च्या क्कै! उगाच आपले काही पण सांगायचे!
फारच सुरेख
फारच सुरेख
झक्कीसाहेब, तुमच्या
झक्कीसाहेब,
तुमच्या प्रतिसादात तुम्ही जे लिहिल आहे "कुणीतरी...." ते बहुधा माझ्या प्रतिसादाबद्दल आहे. मी लिहिल आहे की
"४. रस्त्यात, बागेत कुठेही कचरा टाकणारे लोक. यातलेच बरेचजण दुसर्या देशात गेले तर तिथे टाकणार नाहित कचरा पण आपल्या देशात असतील तेव्हा काय वाट्टेल ते करतील. "
मी अस अजिब्बात म्हणालेले नाही की देशातला सगळा कचरा परदेशात रहाणारे लोक येऊन करतात. झोपडपट्टीमधले लोक घाण करतात म्हणुन बाकिच्या सुजाण लोकांनीही तसच करायच असतं का? परदेशात ट्रिपला जाणारे, छोट्या काळासाठी जाणारे, रहाणारे तीथे रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. पण त्यातलेच काहीजण भारतात असताना हा विचार करत नाहीत. यांचा राग येण्याच कारण दुट्प्पीपणा. चांगल वागणे माहीत असुनही कायदा नाही, कोणाची भिती नाही म्हणुन वाईट वागणं हे कसल लक्षण!
आता जे लोक अस करत नाहीत त्यांना माझ्या अशा लिहिण्याबद्दल राग यायची गरजच नाही कारण मी अशा सुजाण लोकांविषयी काहिच्या काही लिहिलेलं नाही.
मंदार .. एकदम मस्त लेख.. संजय
मंदार .. एकदम मस्त लेख..

संजय दत्त आणी सलमान खान या दोघांकडे पैसा आणी प्रसिध्दी ह्या दोन्ही गोष्टी आहेत..
आणी आपल्या देशात पैसा आणी प्रसिध्दी असेल तर सर्व काही निभाऊन जाते... कारण त्यांच्यामागे त्यांना वाचवणारे मोठे हात असतात..
आणी ते मोठे हात निर्मान करणारे तुम्ही आम्ही आहोत..
आज एकजण पण भारतात आपण दिलेल्या टॅक्सच्या रक्क्मेचा कुठे कुठे आणी कसा विनियोग झाला हे विचारत
नाही..
माझ्या गावी आज २०१० मधे घरापर्यंत जायला फक्त मातीची पाऊल वाट आहे.. त्यातुनच टु व्हीलर न्यावी लागते..
१९८६ पासुन आज पर्यंत २० वरुन अधिक लोक प्रतिनीधीनी घरी येऊन मते मागितली रस्ता करणार ह्या आश्वासनाखाली..
आता अजुन पर्यंत रस्ता नाहीये.. किंवा पुढील १०-२० वर्षात बनेल की नाही ठाऊक नाही..
त्याच लोकप्रतिनीधींकडे आज परदेशातल्या टॉप मॉडेल्स च्या कार आहेत.. ऊ.दा. बी. एम. ड ब्ल्यु, मर्सीडीज..
आता ते परत मत मागायला आले की त्यांना आम्ही घरासमोर पण ऊभे राहु देत नाही.. अर्थात त्याचा काहीही ऊपयोग नसतो.. कारण खालेल्या पैशाचा निवडणुकीच्या वेळेस कसा ऊपयोग करायचा हेही त्यांना चांगले ठाऊक
असते..
गावातुन ट्रकच्या ट्रक भरुन माणसे आणली जातात.. त्यांना निवडणूकीच्या वेळेस दारु, मटण आणी चिकण दिले जाते ... ते दिले की ती लॉबी आपली ..
आता हे सगळे सर्व डोळ्यांसमोर आसुन काहीही करु शकत नाही ह्याची खंत वाटते...
असो.. पण ह्यातुन घडलेला एक किस्सा येथे सांगावासा वाटतोय..
आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या आरोग्य मंत्री.. त्यांनी आमच्या गावातील सरकारी हॉस्पीटल मधला
कॅन्सर ट्रीट्मेंट चा कोबाल्ट युनीट १९९८ साली बंद पाडला..
आमच्या गावाच्या व आजुबाजुच्या २५० कि.मी. पर्यंत परिसरातील लोक त्या कोबाल्ट युनीट द्वारे मोफत ट्रीटमेंट घेत..
तो बंद पडल्यापासुन गरीब लोकांना ३००-३५० कि.मी. लाल पिवळ्या गाडी ने मराठवाड्यातील रस्त्याचे अंतर पार करुन जावे लागे...
आणी तो युनीट बंद पाडण्यामागे १९९८ ला राजकारण असे होते की.. हॉस्पीटलचा जो डीन आहे त्याच्या नातात्ल्या कोणीतरी प्रायव्हेट हॉस्पीटल सुरु केले.. गावापासुन ४० कि.मी. अंतरावर.. म्हणजे ते हॉस्पीटल चालायला नको का??? म्हणुन हे सरकारी बंद पाडले गेले...
आता आज १२ वर्षानंतर मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे..
त्या डीन च्या मुलाने आत्महत्या केली.. एम.बी.बी.एस पास होत नाही म्हणुन...
त्यांच्या पत्नी त्यांना सोडुन गेल्या... आता ते एकटेच राहतात.. म्हातारपणी पहायला मागे पुढे पण कुणी नाही
आणी एस्स्स्स्स्स्स.. आप्ल्या आरोग्य मंत्र्यांना कॅन्सर झाला आहे...
त्यांनी अमेरिकेत येउन करोडो रुपये (तेच जनतेचे लुटुन खालल्ले) कॅन्सर ट्रीटमेंट वर खर्च केले..
पण अमेरिकेतल्या डॉक्टरनी पण त्यांना सांगीतले.. आजुन फार तर फार १.५ -२ वर्ष जगाल
ही बातमी गावभर वार्यासारखी पसरल तेंव्हा ज्यांचे रुग्ण आणी नातेवाईक आजही ३०० कि.मी. प्रवास करतात कॅन्सर ट्रीटमेंट साठी त्यांनी देवाचे शतशः आभार मानले...
चांगल वागणे माहीत असुनही
चांगल वागणे माहीत असुनही कायदा नाही, कोणाची भिती नाही म्हणुन वाईट वागणं हे कसल लक्षण!
---सावली यांच्या मताशी सहमत... बाहेरच्या स्वच्छ देशात राहुन आल्यावर मुंबईला विमान तळावरुन बाहेर पडल्यावर कागदाचा हातातला कचरा नकळत (?) रस्त्यावर भिरकावणारे काही शिकलेले महाभाग असतात.
कायद्याची नसलेली भिती तसेच लोकांमधे नसलेली जागृती हे मला कारण दिसते. येथे बेशिस्त पणा केला तर आजुबाजुच्या लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळतांत, त्या लाजे साठी का असेना कचरा खिशात ठेवावा लागतो (किंवा रस्त्यावर थुंकणे टाळावे लागते).
>>त्या डीन च्या मुलाने
>>त्या डीन च्या मुलाने आत्महत्या केली.. एम.बी.बी.एस पास होत नाही म्हणुन..
अरेच्चा! फारच साधा होता वाटतं हा मुलगा. डीनचा मुलगा म्हणून परिक्षेला न बसताही त्याला पास होता आलं असतं नाही का?
त्या डीन आणि आरोग्यमंत्र्याबद्दल वाचून तीळमात्र दु:ख झालं नाही. "करावे तसे भरावे" हेच खरं. आजकाल त्यासाठी दुसरा जन्मही घ्यावा लागत नाही. वर बसलेला "फैसला ऑन द स्पॉट" करतो पण फक्त त्याचा क्षण हा बहुतेक आपल्या अनेक वर्षांइतका असतो म्हणून आपल्याला "भगवानके घर देर है" असं म्हणावं लागतं
अर्थात देव करेल किंवा सरकार करेल म्हणून काही न करता स्वस्थ बसता कामा नये हेही खरंच.
स्वप्नाशी सहमत.
स्वप्नाशी सहमत.
मुळात हे सगळं का आणि कशामुळे
मुळात हे सगळं का आणि कशामुळे होतं?
आपण आपल्या प्रत्येक वागण्याचा आणि आपल्याभोवती घडणार्या प्रत्येक गोष्तीचा काहीतरी संदर्भ मनाशी ठेवून जगत असतो. जगताना, वागताना प्रत्येक वेळी काहीतरी अपेक्षा ठेवून जगत, वागत असतो. मी असा वागतोय, मग त्याने किंवा त्यांनी असंच वागायला हवं, निदान कुठेतरी ताळमेळ ठेवायला हवा. पण असं होत नाही, कारण प्रत्येकाचे संदर्भ वेगवेगळे असतात, निकष वेगवेगळे असतात, अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या पुर्ण होण्याची शक्यता फार कमी असते.
म्हणुनच वरचा दिनेशदांचा प्रतिसाद १००% पटतो...
<<<मंदार,
माझ्या आयूष्याने मला एक शिकवलय, चिडचिड करुन काहिच होत नाही (आपल्यालाच त्रास होतो) त्यापेक्षा जिथे शक्य असेल तिथे, थेट कृति करणे योग्य असते, आणि मी ति करतोच.
आणि आपण विवेकानेच वागायचे, हा नियम मी कधीच मोडत नाही. मिडियामधल्या मूर्खपणाला, त्याला प्रतिसाद न देणे, हे तर आपण करु शकतो ना ?>>>>
पण हे प्रत्येकाला, प्रत्येक वेळी जमेलच असे नाही. मग काही वेळ आपण ते मनातल्या मनात दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण एका ठराविक मर्यादेनंतर सहनशिलतेचा उद्रेक होतो आणि सगळी चिड चिड बाहेर पडते. माझी ही बर्याचवेळा होते. माबोवर नवीन होतो तेव्हा तर मी फारच चिडचिडा होतो


पण आता हळुहळु जाणिवपुर्वक बदल घडवून आणतोय स्वतःमध्ये. कुठल्या गोष्टीवर रिअॅक्ट व्हायचं आणि कुठल्या नाही हे ठरवता आलं की मग हळुहळु चिडचिड कमी व्हायला लागते. कुठ्ल्याही गोष्टीची चिड आली की मी मनाशी विचार करतो..आपण त्या ठिकाणी असतो तर कसे वागलो असतो आणि त्या क्षणी ते कितपत योग्य असले असते. बहुतांशी या प्रश्नांचे उत्तर अनपेक्षीत असेच मिळते. मग आपोआप चिडचिड कमी होत जाते.
अर्थात हा माझा अनुभव आहे, इतरांचे मत वेगळे असु शकेल
तुम्हाला सलमान आणि संजय
तुम्हाला सलमान आणि संजय बाबतच्या लोकमतावर चीड येते ?


ह्याचाहून कित्तेक मोठ्या गोष्टी आहेत चिडायला... !
'टेड बंडी' हे नाव ऐकलय का ? अमेरीकेतीत प्रसिध्द सिरीयल किलर होता .
तीसच्या वर निष्पाप मुलींचा बलात्कार आणि खून केला होता त्या नराधमाने !!
तो जेंव्हा जेल मध्ये होता तेंव्हा त्याच्यासाठी एका दिवसात दोनशे प्रेमपत्र यायचे.
मला त्या मुलींची चीड येते ज्यांच टेड बंडी वर प्रेम जडलं.
खरेतर कीव येते ..
आत्ता सुद्धा गुगल इमेजेस मध्ये सर्च करून पहा ... किती लोकांना तो आवडतो.
त्याचावर चक्क एक चित्रपट देखील बनलेला आहे !!
मंदार, अगदी दिल से विषय आहे
मंदार,

अगदी दिल से विषय आहे !
तुझी ही चिडचिड तर साहजिकच आहे, पण आजकाल असल्या गोष्टींच काहीच न वाटणारे आजुबाजुला दिसतात, असल्या कुठल्याही गोष्टींशी आपला काही सबंध नसतोच अस हे लोक (जास्त करुन परप्रांतीय) वागतात, तेंव्हा या वरुन माणुस हा दिवसेंदिवस आणखी संकुचित होतो आहे हेच खरं !
तु मात्र स्वतःपेक्षा लोकांचा,गावाचा,देशाचा,जगाचा विचार जास्त करतोस हेच दिसतेय, मग मात्र तुला त्रास हा होणारच !
चिडचिड करणं शरिराला घातक.
चिडचिड करणं शरिराला घातक. त्यामुळे नो चिडचिड मंदार
भावना पोहोचल्या! पण
भावना पोहोचल्या!
पण तुम्हिदेखील आता हा लेख लिहुन तेच तर करत नाहि आहात ना ? आणी प्रतिक्रियांमधे हि तेच दिसते - मुख्य म्हणजे चिडचिड क्रमांक दोन आणी तीन! - समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणे.
तुम्हि जसे लेख लिहुन तुमची चिडचिड सांगीतली तसेच कोणीतरी वाहतूकीच्या नियमांचे मेल पाठवतो, कँटीनच्या व्यवस्थापनाबद्दल तक्रार करतात - त्यांच्या मते ते बरोबर असतात - जसे आता तुम्हि स्वताला समजत आहात.
चिडचिड क्रमांक एक बद्दल ठिक आहे. पण जास्त चिडचिड करु नका! तुम्हि क्रुती करणारी माणसे आहात.काहितरि भलतेच घडायचे.
सध्या माझे मत असे होत चालले
सध्या माझे मत असे होत चालले आहे की भारतात लोकसंख्या जास्त असल्याने वाईट गोष्टी जास्त नजरेत येतात. इतर देशातहि बरेच काही काही वाईट असते, कचरा, घाण असते, पण दिसायला कमी दिसते. न्यू यॉर्क सिटी त जाऊन पहा, तिथल्यापेक्षा भारतातली खेडी नि लहान गावे जास्त स्वच्छ असतील.
त्याच न्यायाने भारतातले चांगले काय असे पहायचे ठरवले तर तेहि जास्त प्रमाणात दिसेल. तर असा एक धागा उघडला तर तोहि असा भरभरून वाहू लागेल, अशी आशा आहे.
दुर्दैवाने, सध्या इथे भारताबद्दल वाईटच जास्त ऐकू येते, काय मत होणार मग बाहेरच्यांचे?
मी एक दोनदा, मला भारतात आलेले चांगले अनुभव लिहीले तर भारतातल्याच लोकांनी मा़झी टिंगल केली, मला सांगितले की प्रामाणिकपणाचा नुसता आव आणला होता, खरे तुम्हाला फसवलेच, वगैरे.
पण वाईट लिहीले की लग्गेच शंभर प्रतिसाद. नि खरे असल्याने चांगलेच झोंबते लोकांना. मग काय वाट्टेल त्या शिव्या. पण त्यात खोटे काय होते ते नाही सांगणार. का बरे?
काही नाही तर वयाने मोठा म्हणूनच!!

नशीब, मी माझा फोटो नाही लावला, नाहीतर कुरुप माणसे इथे लिहितात म्हणूनहि कुणाची चिडचिड व्हायची!
Pages