न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

Submitted by अनिलभाई on 29 April, 2008 - 08:18

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे.
वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.


१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
-----
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही

२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना .. झक्की मलाही म्हणाले अनिलभाई एकदम सरळ, सज्जन आहे जिलेबीसारखे .. उगाच त्यांच्या दाढीमिशा बघुन घाबरु नको Wink

भाई येथे तेथे कशाला जायला लावता? तुमच्या पावर्स वापरून बोळा लावा. मग आम्ही तुम्हाला सरळ सज्जन जिलबीच काय, भाबडा, कर्तुत्त्ववान वडापावसुध्दा म्हणू.

चनस,
जा बघ तुला मुभा दिलीय.

बाय द वे. एन्जे चा ग्रुप जॉईन कर.
म्हणजे मुभा द्यायची गरज लागणार नाही. Happy

ते म्हणाले...... मला केळवण...... गटगला ..
ते म्हणाले मला..... केळवण....... गटगला ..

(माझा एक मित्र मला केळवण ऐवजी 'डोहाळजेवण' घालायला निघाला होता जर्मनीत.. Proud

त्यापेक्षा सरळ बनाना फॉरेस्टडिनर नि बिफोर बेबी डिनर असे मराठी शब्द वापरले की घोटाळा होत नाही!