मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 10:43

aikaGaneshDevaNew.jpgसांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:

मायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.

सगळ्या स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थीला होईल. प्रवेशिका कुठे आणि कशा पाठवायच्या हे खालील धाग्यांवर सविस्तरपणे लिहीण्यात आले आहे.

---------------------------------------------------------------------------------------
टाकाऊतून टिकाऊ

टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा

---------------------------------------------------------------------------------------

प्रकाशचित्र स्पर्धा:

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ : विरुध्द - Contrast

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : एक नवीन सुरुवात

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३: आधार

स्पर्धेच्या नावावर टिचकी मारल्यास स्पर्धेची माहिती आणि नियम बघता येतील.

---------------------------------------------------------------------------------------

लहान मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमः

किलबिल : लहान मुलांसाठी गुणदर्शनाचे कार्यक्रम

चला माबोकरांनो लागा तयारीला Happy
"जिंकण हरणं महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे जास्त महत्वाचे आहे" तेंव्हा सगळ्याच स्पर्धेच्या प्रवेशिका सगळ्यांनीच पाठवून संयोजकांचा/परिक्षकांचा ताण अजुन वाढवूया Happy
गणपती बाप्पा मोरया

..

संयोजक , मुख्य पानावर ठळक गणेशोत्सवाची लिंक देता येईल का? स्पर्धा शोधून काढाव्या लागल्या. Sad
जर अगोदरच तशी दिली असेल आणि मला ती दिसली नसेल तर क्षमस्व. Happy

वा वा! झाली का घोषणा..
छान आहेत स्पर्धेचे विषय. ही घोषणा पहिल्या पानावर पाहिजे. आत आल्यावरसुद्धा लिन्ककडे पटकन लक्ष जात नाही. तिथे एखाद्या पोस्टरची इमेज देऊन लिन्क दिली तर बरं होईल.

वा.......मस्त आहेत सगळ्याच स्पर्धा !!
धम्माल येणार एकंदरीत Happy
गणपती बाप्पा मोरया ..........!!!!!!!!!

वा!!
झकास कहाणी... नाविन्यपूर्ण स्पर्धा... आणि अप्रतिम पोस्टर्स!!

सीमा - 'नवीन लेखन' पानावर सर्वात वरती 'गणेशोत्सव स्पर्धा घोषणा' असा दुवा दिसतो आहे ना?

>>(माझ्या मते)
माझ्या डोळ्याला म्हण. Proud
(मलाही दिसली नव्हती, ती आहे तिथे काही दिवस, फक्त लक्ष जात नाही पटकन्)

मला २१ गणपती व त्यांची नावे गणपतीच्या दिवसात टाकण्याची इच्छा आहे. (स्पर्धा नव्हे) पण मी गॄप मध्ये सामिल होउ शकत नाहीये, मी काय करु??

वर सांगितल्याप्रमाणे ज्या स्पर्धांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी घोषित केल्या आहेत, जेणेकरून तयारीला वेळ मिळेल. बाकीच्या स्पर्धा गणेशोत्सवाच्या दिवशीच घोषित होतील.

Pages