हत्तीशी दांडू....

Submitted by ह.बा. on 20 August, 2010 - 09:22

कळत नव्हतं आधी
पाऊस मलाच का भिजवतोय
माझ्या अंगणात लिहीलेलं
तिचं नाव मुजवतोय...

आता उत्तर जुळतं आहे
कळायच ते कळतं आहे
पावसाच्या प्रत्येक थेंबात
काहीतरी जळत आहे...

पाऊस मला मारतो आहे
दादागीरी करतो आहे
माझ्यासारखाच होऊन वेडा
तिच्यासाठी झुरतो आहे

मी तिला विचारलं
'पाऊस तुला कसा वाटतो?'
ती म्हणाली
'जसा तू पाऊस मला तसा वाटतो'

'सखे मी घाबरलोय
तू मला विसरशील
तो थोडा चिखल करेल
आणि तू घसरशील'

मोठ्यानं हसून म्हणाली
'तुला कशी सोडीन रे?
चार महिन्यांच्या फकीराशी
जन्म कसा जोडीन रे?

तुझी माझी जोड आहे
मना-मनाची ओढ आहे
ढवळा ढवळ करण्याची
पावसाची खोड... गोड आहे

पावसावरती चिडू नको
त्याचा काहीच स्वार्थ नसतो
आणि हत्तीशी दांडू खेळण्यात
वेड्या काहीच अर्थ नसतो'

-ह बा

गुलमोहर: 

मोठ्यानं हसून म्हणाली
'तुला कशी सोडीन रे?
चार महिन्यांच्या फकीराशी
जन्म कसा जोडीन रे?<<<

या ओळी आधी कुठेतरी वाचल्यात.....

माझ्याच "तू कोसळून तर...." या ललीत लेखात लाजो... आणखी कुठे वाचल्यास का? माझ्या 'अस्तासाठी व्यस्त जगणे' या काव्यसंग्रहातही ही कवीता आहे... आणखी कुठे?

हां तरीच Happy

मला वाटत तुमच्या त्या लेखात मी प्रतिक्रियेत पण म्हंटलय की या ओळी छानैत Happy

म्हातारी झाले...आठवत नाय आता Proud

लाजो तू म्हातारी झालीस पण "कुठेतरी वाचल्या आहेत" हे वाचून माझ ऐन तारुण्यात आवसान गळालं ना... असो...
तरी बरं कवितेविषयी बोललीस... आभारी आहे.

ह बा, कविता आवडली!!! फक्त "आणि हत्तीशी दांडू खेळण्यात" याचा अर्थ नाही कळला, कृपया सांगणार का?

मयुरेश, Happy
गंगाधरजी, आभारी आहे.
गौतम, 'हत्तीशी दांडू खेळायला जाऊ नये माणसाने'
अशी एक म्हण आहे तीचा अर्थ आपली कुवत न ओळखता आपल्यापेक्षा बलवान माणसाशी लढायला जाने. या कवितेत नायिका पावसाला हत्ती म्हणते आहे आणि पावसाविषयी तक्रार करणार्‍या प्रियकराला सांगते आहे की 'हत्तीशी दांडू खेळण्यात वेड्या काहीच अर्थ नसतो.' प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

ह बा.................. मस्तच.............!

फक्त "सोडीन" आणि "जोडीन" हे शब्द खटकले.......... ते सोडेन आणि जोडेन असे हवे ना.....!
सोडीन, जोडीन हे बोलिभाषेमुळे अपभ्रंश झालेले शब्द आहेत्....लिखाणातल्या भाषेत सोडेन आणि जोडेन असेच हवे ना........... !

शंका आली म्हणुन उपस्थित केलिये....... हलकेच घ्या......... माझे म्हणणे चुक असल्यास तुम्ही समजुन विषद कराल याची खात्री आहे.

बरोबर भ्रमर. ते कोल्हापुर स्टाईलचे शब्द आहेत. हरकत नसावी पण माझ्या मते. चांगले वाटतायत आहेत्त तसेही.

लाजो आज्जी Happy

काही विषद करण्यासारखे नाही त्यात. तो तिचा संवाद आहे जसे आहे तसे योग्यच आहे मित्रा... प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

कविता छान्...पाऊस सगळ्यांनाच हळवं करतो!
भ्रमर हा प्रमाण भाषेचा मुद्दा होईल ना?
आता मी पण हळवं लिहिली हळवेच्या ऐवजी...कधीकाळी उच्चाराप्रमाणे लिखाण व्याकरणात प्रमाण होते.....

मयेकर,
प्रतिक्रीयेबद्दल आभारी आहे!!! Happy

बाकी प्रमाण भाषा-बोली भाषा अशा वादानुसार ही कवीता वाचकांना चुकीची वाटत असेल तर वाचकांच्या मताचा आदर आहे.

हो रे भरत, मला कुठलाही मुद्दा रेटायचा नाही रे........ आणि मात्रेऐवजी टिंब देणे हे नॉर्मलच आहे. असे टिंब असेल की तिथे मात्रा आहे हे उच्चारताना लक्षात येते.... उदा. आलं , गेलं वगैरे....... म्हणजे त्याचा उच्चार आल, गेल असा सरधोपट होत नाही. असो.
ह बा च्या रचनांचा आस्वाद घेऊया आपण........... Happy

'चार महिन्यांचा फकीर' हा उल्लेख आवडला.

ह.बा.,

ही सुमार कविता आहे. आपण ही रचायला नको होतीत असे म्हणणे चुकीचे ठरेल, पण वाटते खरे तसे! स्पेशली, कोसळून तर दाखीव दाद्या अन यारिचा चवदार थर होताच की त्यावर असे लेखन वाचल्यानंतर!

-'बेफिकीर'!

मी आपल्या भावना समजू शकतो बेफिकीर. आपण उल्लेख केलेल्या लेखात या कवितेच्या काही ओळीही आहेत आणि संदर्भही आहे. कवीता बीए च्या पहिल्या वर्षाला असताना केलेली आहे. कम जादा तो रहेगाही ना?
पण तीच्याविषयी चांगलच बोलाव असं मी आजिबात म्हणनार नाही. काही हितचिंतकांसाठी ही चांगली संधी ठरावी.
बोला रे.... बोला....

ह ..बा तुमची कविता अप्रतीम आहे फक्त तेवढ कवितेच शिर्षक मनाला खटाकतेय जेवढ बघा फक्त............

जितेंद्र, केदार
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

आवडली.
तुमची "श्रावण..." माझी अतिशय आवडती कविता आहे ...यात तिचे काही स्पॉटस जाणवतात पण ही तितकीशी अपीलींग नाही पण ते असायचच...!!! चिअर्स !!!

Pages