उदंड देशाटन करावे ... लडाख

Submitted by सेनापती... on 19 August, 2010 - 17:38

चंदन यांच्या 'अतुल्य भारत' मधील लेह-लडाख वाचत असताना लेह मधल्या ढगफुटीची बातमी आली आणि गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास केला होता ते सर्व क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली. का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे. त्या १३ दिवसांचा सफरनामा येथे मांडतोय. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल.

शब्दखुणा: 

मायबोलीकरांचे आभार... अवघ्या ३-४ दिवसात केलेल्या ह्या लिखाणाला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलात... अपेक्षा आहे की पुढे सुद्धा असेच देत राहाल...

प्रवासवर्णन वाचले...एका फट्क्यात वाचुन काढले....अतिशय सुन्दर वर्णन अन लेखन देखिल्....माझि देखिल ईछा आहे लडाखला जान्याचि बाइक वरुन बघु कधि मुहुर्त येतोय ते....बाकि मे तुझे ट्रेकवर्णन पण वाचलेय छान अहे ते पण्....तुझ्या ह्या लेख मालिकेचा नक्किच उपयोग होइल कधितरि....ह्यासाठि लागनार्‍या तयारीवर पण पोस्ट कर न काहितरि...ह्या वाचनिय अनुभवाबद्दल धन्यवाद.....

एक प्रश्न आहे...एवढ सगळ तु एव्हढ्या कमी वेळात ते ही काहि चुक न करता कसे लिहिलेस्....आय मीन मराठीत.....it took me 5-7 min to write this sentense....krupaya evdhya fast kase kay lihile link tutu na deta he sangave....

तू मराठी लिहायला काय वापरतोस??? मी ऑफलाईन असेन तर बराहा नाहीतर ओन्लाईन थेट जीमेल वापरतो... कधी कधी quillpad .com

तसा जी मेल हेक्टीक वाटते,कधीतरी ब्लॉगर वर असेन तर मला तिथे नाही जमत

I am also want to come @ ladakh trip. This year anyone arrange it. Please I am not possible to type in marathi.

सेनापती,

अफलातून लेखमालिका आहे!

मी रोज दोन दोन लेख वाचावे अशा कल्पनेनी सुरवात केली प ण स्वतःला थांबवताच आलं नाही. बाकी सगळी कामं बाजूला सारून एका बैठकीत वाचून काढली.

आम्ही दहा वर्षापूर्वी लडा खची ट्रिप फॉलियेज या ग्रुपबरोबर केली होती फोर व्हीलरने आणि खूप धमाल आली होती. पण तुमच्या ट्रिपच्या तोडीची नव्हती. ट्रिप करावी तर तुमच्यासाऱखी आणि त्यावर लिहावं ते ही तुमच्यासारख्यानी.

तुमची लिहायची स्टईल अगदी ओघवती आहे त्यामुळे आपण गोष्ट ऐकतो आहोत असं वाटतं. कशी रोमांच उभे राहातात, कधी डोळ्यात पाणी येतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सैनिक तिथे लढतात आणि आपण बारीक बारीक गैरसोञींचाही बाऊ करतो याची लाजच वाटते.

तुम्ही चार दिवसात हे लिहून संपवलंत हे वाचून चकितच झालो. लिहिण्यात सुसूत्रता यायची असेल तर किती वेळा ते खोडून फेरफार करावे लागतात हे मला ठाऊक आहे. हे चार दिवसात लिहायचं म्हणजे टेरिफिक आहे!

धन्यवाद स्वीट टॉकर.

लिखाण ४ दिवसात इथे पोस्ट केलेले आहे. लिहायला त्यापेक्षा कैक अधिक वेळ लागला आहे. Happy