मन...

Submitted by कमलाकर देसले on 17 August, 2010 - 12:17

मन नाव घनाचे,कधी बरसते खुप
मन उडता कापूर,दरवळणारा धूप...

मन भणंग साधू,तयास नाही गाव
मन फक्त एकटे,विश्वाचा महाराव...

मन चिरंजीव हे,वनवननारा वारा
मन अश्वत्थामा,जयास नाही थारा...


मन बांधविन,बेडीची असते साक्ष
मन मुक्तीविन,मुक्ताचा असतो मोक्ष...

मन शून्यवरती,संख्येचाच आरोप
मन नसते,असतो दोरीवरचा साप...
18522_800px-Rain_ot_ocean_beach.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आवडली

अष्टाक्षरीचे नियम पाळल्यास अधिक छान वाटावी ही रचना! चित्र उत्तमच!

कविता अधिक अस्पष्ट असल्यास अधिक आवडावी.

आपले धुळे जिल्ह्यात कुणी आहे का?

-'बेफिकीर'!