स्तुपांची मंदिरं- भाग 3 ( जगन्नाथपुरी मंदिर)

Submitted by मधुकर on 10 August, 2010 - 08:51

पुरी येथील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा हि इतर काहि नसुन केवळ बुद्ध अणि सोबत बोधिसत्व यांच्या रथयात्रेचे रुपांतर आहे. फाहीयान या चीनी प्रवाशाने इ.स. च्या ५ व्या शतकात स्वत: आपल्या डोळ्यानी हा बौद्ध सोहळा पाहिला व त्याची नोंद करुन ठेवली. मात्र नंतर काही शतके उलटल्यावर याच बौध्द सोहळ्याचे हिंदुकरण झाले व ते आज जगन्नाथपुरी मंदिर म्हणुन आपन बघतो. ( संदर्भ: सरकार-ईंडिया थ्रु एजेस पृ. ३३)

जातीयबंधने काहि प्रमाणात शिथील आहेत
हे मंदिर मुळात बौध्द मंदिर असल्यामुळे आधिपासुन ते सर्वाना खुले होते. नंतर हळूहळू त्याचे हिंदुकरण झाले पण तुलनेने जातीयवाद मात्र तितका रुजविता आला नाही. पुरीमधे जातीप्रथेत बरिच उदारता दाखविण्यात येते. प्राध्यापक घुर्ये यांचे कथन आहे कि, “जगन्नाथाच्या प्रसिद्ध मंदिराचा कार्यकारी पुरोहित एक न्हावी असतो. भगवंतासाठी त्यानी तयार केलेल जेवणाचे पदार्थ काही सनातनी ब्राह्मणांचा अपवाद सोडल्यास सर्वाना स्विकार्य आहे.” ( संदर्भ: घुर्ये: १९६९: २७)

डॉ. राजेंद्रलाल मिश्रा:
यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध काळानंतर कृष्ण या विष्णुपुजेचा काळ आला. जगन्नाथ्च्या पुजेची विशिष्टता, येथील धार्मिक उदारता, विस्तीर्ण जणांचा आधार, येथील जातीबंधनाची शिथिलता, बुद्धदंतधातुची रथयात्रा हिची येथील रथयात्रेशी समानता आणि इतरही अन्य काही बाबी अशा आहेत कि, ज्यामुळे पुरी हेच दंतपुर आहे. जेथे पवित्र बुद्धदंत धातु आवशेष ठेवले होते आणि त्याचे जतन केल्या जात होते. या मताची पुष्टी होते. दरवर्षी याच दंतधातुला ब-याच हर्षोल्हासा आणि भक्तिभावाने व मिरवणुकिने फिरविल्या जात असे, आणि नंतरच्या काळात तिला श्रीलंकामधे नेण्यात आले. ( दिवे: १९७०: ४३ , ईमारटल ईंडिया, खंड-१, भारतिय विद्या भवन १९७०)

राजा मुकुंददेव
ब-याच लढाया व परकिय खुन खराब पाह्त हजारो वर्षापासुन उभा असलेला बुद्ध मंदिराचा शेवटचा राजाश्रय होता राजा मुकिंददेव. मुकुंददेव १५५१ मधे गादिवर आला. ह्या राजाच्या शासन काळापर्यंत पुरिच्या मंदिर बुद्ध मंदिरच मानल्या जात असे पण या राजाच्या शासना नंतर बौद्ध धर्म लयास गेला व हिंदुनी मंदिरावर ताबा मिळविला ( संदर्भ: नरसु १०८, “ए स्टडी ऑफ कास्ट”). या राजाच्या नंतर हिंदुनी बुद्धाचं अस्तित्व लपविणार कट रचला. बुद्धाच्या विशाल मुर्तीसमोर एक मोठी भींत बांधण्यात आली त्यामुळे बुद्धाची विशाल मुर्ती लपविल्या गेली. आज ज्याला सुर्यनारायण मंदीर म्हणुन संबोधल्या जाते त्या मंदिराच्या मागे हि भिंत असुन पुरीच्या जगन्नाथा मंदिराच्या आवारातच आहे. मंदिराच्या आवारात विशाल बुद्ध मुर्तीचे अस्तित्व असणे आणि बाहेरुन ती न दिसणे म्हणजेच या मंदिराच्य पुर्व ईतिहासाची कल्पना करता येते.

अलिकडच्या काळातील एक पुरातत्व उत्खनन
ओरिसातिल बुद्ध धर्माच्या क्षेत्रामध्ये अलिकडाच्या काळातील उत्खननामुळे दृष्टिस पडलेले अवशेष झ्या विभागाला फार महत्व प्राप्त करुन देतात. जसे कि ललितगौरी येथील उत्खणनात पवित्र अवशेष असलेले कुंभ मिळाले. रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी ब्रह्मावन, कुरुमा इ. ठिकाणी अलिकडेल काळात झालेल्या पुरातत्वीय उत्खनन सोरिसातिल बौद्ध क्षेत्राना एक नवा आयाम मिळालेला आहे. ओरिसात मिळालेली तांत्रीक-वज्रयानी शिल्पे हि तिबेट, नेपाळ आणि चिन या देशातील बौद्ध कलेशी साम्य दर्शवितात. यावरुन असे लक्षात येते कि हा सगळा प्रांत बौद्धमय होता. पुरी सुद्धा बौद्धमय होते व जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर असण्याची शक्यता अधिक दाट होते.

ईतर उल्लेख
१) शंकराचार्यानी ९ व्या शतकात पुरिला भेट दिली व तेथे गोवर्धन मठाची स्थापना केली. याच काळात पुरी एक प्रसिद्ध बौद्ध व हिंदु स्थान होते.
२) “अनर्घाराव नाटकम” हा मुरारी मिश्र यांचा ग्रंथ. इ.स. च्या नवव्या-दहाव्या शतकातील मानल्या जातो. त्यात समुद्र किना-यावर पुरुषोत्तमाची पुजा होत असल्याची नोंद आहे.
३)कृष्णमिश्र रचित “प्रबोध चंद्रिका नाटकम” याची रचना इ.स. १०७८ मधे झाली. त्यात पुरीच्या भगवान पुरुषोत्तमाचे “देवायतन” असल्याचा उल्लेख आहे.
४) मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर येथील शारदादेवी मंदिरातील शिलालेखात ओद्र देशातील पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे. त्याचा काळ सुमारे इ.स. १० वे शतक असावे.
५) नागपुर येथील माळवा देशांच्या राजांचे शिलालेख इ.स. च्या ११०४ मधिल असुन त्यात पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे.

वरिल सगळ्य़ा संदर्भांवरुन इ.स. ९५० च्या दरम्यान पुरी मधे जगन्नाथाचे मंदिर असल्याचे सिद्ध होते.

आता इ.स. पुर्व काळातिल पुरिचा थोडासा ईतिहास बघु या
इ.स. पुर्व तिस-या शतकात संम्राट अशोकाच्या शासनकाळा पासुन संपुर्ण पुरी जिल्हा बुद्ध धर्माच्या प्रभावात आलेला होता. महामहोपाध्याय गांगुली यानी उल्लेख केलेली “वेदी” हिच हे बौद्ध क्षेत्र असावी. डॉ. पटेल यांच्या म्हणण्याप्रमाणे जगन्नाथ मंदिराच्या उंचीवरुन असे दिसते कि, हे एका उंच चबुत-यावर बांधलेले आहे. हा चबुतरा म्हणजेच स्तुप होय.

वास्तविकता पुरी शहर संपुर्ण सपाट जागेवर वसले आहे. जवळपास कुठेही टेकडी किंवा डोंगर नाही. म्हणुन जो उंच चबुतरा आहे आणि ज्यावर आजचे जगन्नाथ मंदिर उभे आहे तो चबुतरा मानवनिर्मित आहे. बौद्धानी हा चबुतरा स्तुप बांधण्यासाठी आणी त्या स्तुपात बुद्धावशेष ठेवण्यासआठी निर्माण केला असावा. हे बुद्धावशेष आजही ब्रह्मधातुच्या रुपात लाकडी प्रतिमेत “नवकलेवरा” च्या प्रसंगी ठेवण्यात येतात.

नुकत्याच (केलेल्या डागडुज्जीच्या कामात अशोकस्तंभ सापडला)
उत्खनन कार्यात हजर असलेले डॉ. पटेल यांचे म्हणणे आहे कि, “या बाबतीत महत्वाचे म्हणजे आर्कीऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया यांनी नुकतीच डॉ. टी. पी. सत्यमुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली काही डागडुज्जीचे काम केले गेले. हे काम नटमंदिर विभागातील गरुड स्तंभाच्या पायथ्याशी केले गेले. त्यामधे एक अशोक स्तंभाचे अवशेष सापडले, ज्यावर मौर्य कालिन पॉलिश केलेली आहे.” हा अशोक स्तंभ चबुत-याच्या ब-याच खाली गेलेला आढळला. स्वत: लेखक व त्याचे सोबती असलेले डि. आर. प्रधान (टिम) यानी त्या स्थळाला नविनीकरण चालु असताना भेट दिली. त्याना आढळले कि, संपुर्ण जगन्नाथ मंदिर परिसर हा मानवनिर्मीत आहे. आणि बौद्ध स्थळाच्या स्तुपाशी त्याच्या चबुत-याची साम्यता हेच दर्शविते कि हे मंदिर पुरातन बौद्ध स्तुपावर बांधण्यात आले.

इ.स. च्या नवव्या शतका नंतर यजाती प्रथम ह्या राजाच्या नेतृत्वात सोमवंशी या जनजातीनी उत्कल काबीज केले. त्या काळापासुन पुरुषोत्तम आनी नरसिंह यांना बरोबरीचे मानण्यात येण्याची प्रथा सुरु झाली. “जगाचा स्वामी” या अर्थाने बुद्धाला जगन्नाथ म्ह्टल्या जात असे. ते शिव व विष्णु याना सुद्धा म्हणने सुरु झाले. जगन्नाथ हा शब्द लोकनाथ किंवा लोकेश्वर या बोधिसत्वांला समानार्थी शब्द म्हणुन वापरल्या जाऊ लागला. नंतरच्या काळात जेंव्हा बुद्ध धर्माला अवनती प्राप्त झाली तेंव्हा लोकेश्वर फक्त शिवालाच म्ह्टल्या जाउ लागले. व जगन्नाथ शब्द विष्णुस्पेशल बनुन गेला.

पुरीचा राजकिय ईतिहास

राजा भानुदेव द्वितीय यांच्य अशिलालेखा वरुन असे सिद्ध होते कि, पुरी येथील प्रमुख देवतेला जगन्नाथ म्हणन्याची प्रथा इ.स. च्या चौदाव्या शतकापासुन पुढे लोकप्रिय झाली. त्या पुर्वी हे पुरुषोत्तम क्षेत्र म्हणुन लोकप्रिय होते. बौद्धांच्या चबुत-यावर सोमवंशीय राजाने हे मंदिर बांधले.
९५० इ.स. पर्यंत ब्राह्मण धर्मिय सोमवंशी राजाने भौमकार या बौद्ध शासकाचा पराभव केला होता. ह्या विजयाचे प्रतीक म्हणुन सोमवंशी राजा यजाती प्रथम यांनी पुरीला पुरुषोत्तमाचे मंदिर बांधले. एका दंतकथे प्रमाणे रजा इंद्रद्युम्न याने बांधलेले पुरी येथील मंदिर रेतीमधे अदृष्य झाले. मदलांजी यांच्या म्हणण्या प्रमाने जेंव्हा आजचे जगन्नाथ मंदिर बांधण्यात आले तेंव्हा यजातीने बांधलेले मंदिर पडक्या अवस्थेत आले होते.

मंदिराती कागद पत्रावरुन समजते कि, लाकडाच्या मुर्ती राजा यजाती यांनी स्थापन केल्या होत्या. के.सी. पाणीग्रही यानी रक्तबाहु या राजाची ओळख राष्ट्रकुट तृतीय गोविंद (इ.स. ८०५ ते ८१५) यांच्याशी केलेली आहे. रक्तबाहु याने यजाती राजाच्या १४४ वर्षे आधी आक्रमण केले होते. याप्रमाणे राजा यजाती यानी पुरी येथे मंदिर बांधण्याचे वर्ष ९४५ ते ९५० हे येते.

स्टिस्टेनक्रॉन यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रद्युम्न प्रकरण ज्या राजांच्याअ काळात घडले ते तीन राजे होते. यजाती प्रथम, यजाती द्वितीय आणी चोडगंग देव. या तिघांची मिळुन एक पौराणिक पुरुष इंद्रद्युम्न मानल्या गेला. मुरारी मिश्र यांचा ग्रंथ “अनर्घरघवम” यावरुन या म्हणण्याची पुष्टी मिळते. यात म्हटले आहे कि, इ.स. च्या ९५० मधे पुरी येथे मंदिर होते.

पुरिवर परकिय आक्रमणामुळे तेथील मुर्तीला सोनेपुर इथे आणावे लागले. सोनेपुर येथे १४४ वर्षे मुर्तिला गाडुन ठेवले गेले होते. सोनपुरचे सोमवंशीय राजा यजाती प्रथम याने मुर्तीचा शोध घेतला आणि आदिवासिंच्या (सवर जमातीच्या ) मदतीने नविन मुर्तीची पुनर्स्थापना केली असे मंदिराच्या कागद पत्रावरुन दिसते.
यावरुन हे स्पष्ट होते कि, सोमवंशीय राजानेच सर्व प्रथम जगन्नाथ पुरिचे मंदिर (स्तुपाच्या चबुत-यावर) बांधले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लेख थोडा विस्कळीत झाला असला तरी रंजक माहिती मिळाली.
लेखाच्या शेवटी कालरेषा (टाईमलाईन) दिलीत तर समजणे सोपे होईल.

जसजसे धर्म बदलत जातात तसतशी जुन्या धार्मिक स्थळांवर व उत्सवांवर नव्या धर्माची आवरणे चढतात. हे मानवी इतिहासात नेहमीचे आहे. भारताबाहेरचे मोठे उदाहरण म्हणजे ख्रिसमसचा सण.

मी 'रोमन बाथ' गावात राहते. तर इथे सगळ्या जुन्या रोमन मंदिरांच्या जागी मोठे चर्च व इतर ख्रिस्ती इमारती झाल्या आहेत. रोमनांनी मंदिरे बांधण्याआधी आदिवासी इंग्रज (!) सुद्धा गरम पाण्यांच्या कुंडांना पवित्र मानीत व त्यांची पूजा करीत.

सध्याच्या उत्खननात पुरीच्या जगन्नाथाजवळ जुने बौद्ध अवशेष सापडले. सम्राट अशोकाचे साम्राज्य जवळच असल्याने त्यात आश्चर्यजनक काही नाही. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी तो स्वतः आणि त्याची प्रजादेखील वैदिक धर्माचे पालन करीत. तेव्हा आणखी खोल खणले असता समजा वैदिक प्रतिमा मिळाल्या तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

<जसजसे धर्म बदलत जातात तसतशी जुन्या धार्मिक स्थळांवर व उत्सवांवर नव्या धर्माची आवरणे चढतात. हे मानवी इतिहासात नेहमीचे आहे. भारताबाहेरचे मोठे उदाहरण म्हणजे ख्रिसमसचा सण. >

हेच खरे. अपवाद फक्त मुसलमान नि हिंदू. जित्या जागत्या हिंदू धर्माचीदेवळे फोडून तिथे मशिदी बांधल्या. आद्य श्री शंकराचार्यांप्रमाणे वादविवाद करून कुठला धर्म श्रेष्ठ हे पटवून दिले नाही. नंतर हिंदूंनी देखील बुद्धाला देवाचा अवतार मानले.

पण मधुकररावांच्या शांतताप्रिय व सौम्य मुसलमान लोकांना तसले काही येत नाही! जे मुसलमान नाहीत त्यांना मारून टाकायचे! एव्हढेच माहित!!

सुप्रसिद्ध गंग डायनेस्टी जी शाळेच्या इतिहासात पण शिकवतात ती ओरिसावर ११ ते १५ वे शतके राज्य करत होती. गंग राजे हिंदू राजे होते. बौद्ध नाही. त्यामुळे तुझे लेखात जे जनरलायझेशन आहे ते चुकीचे आहे. हॅविंग सेड दॅट, त्या काळात राजा हिंदू असला व नसला तरी प्रजा जैन, हिंदू, बौद्ध असायची हे कुठलेही जनरल स्टेटमेंट करताना विसरु नको.

आता तुझ्या पहिल्या पुराव्या कडे ..

राजा मुकुंददेव
ब-याच लढाया व परकिय खुन खराब पाह्त हजारो वर्षापासुन उभा असलेला बुद्ध मंदिराचा शेवटचा राजाश्रय होता राजा मुकिंददेव. मुकुंददेव १५५१ मधे गादिवर आला. ह्या राजाच्या शासन काळापर्यंत पुरिच्या मंदिर बुद्ध मंदिरच मानल्या जात असे पण या राजाच्या शासना नंतर बौद्ध धर्म लयास गेला व हिंदुनी मंदिरावर ताबा मिळविला >>

नक्रो रे राजा पुरावे बदलू. त्या आधी ५०० वर्षे राजा अंनतवर्मन देव ह्याने हे मंदिर १०७८ ते ११४८ ह्या काळात परत बांधले / मोठे केले हे पुरातत्व खाते सांगते. हा राजा गंग घराण्याचा आहे. ह्याच्या बद्दल माहिती तुला नेट वर मिळेल. तसेच हा राजा बौद्ध नव्हता. तर हिंदू राजा होता. आधी शैव व नंतर वैष्णवाचा पुरस्कार ह्याने केला. वैष्णव झाल्यावर त्याने हे मंदिर उभारले. त्यातील बाह्य प्रदेश कोसळ्याल्यावर तिथे उत्खनन झाले व त्यावरुन जे मिळाले त्यावर भारतीय पुरातत्व खाते हा कालावधी निश्चित करते. कदाचित ते चुक असतील, पण थांब पुढे वाच ...

पुढे कलिंग उत्कल ह्या घराण्याकडे हे राज्य गेले. तू दिलेला मुकुंददेव हा राजा, हा राजा बौद्ध नाही तर हिंदू होता. त्याला बहामनी, मुस्लीम राजाने गोहेरा टिकी इथे १५१९ मध्ये हारवले. त्यामुळे ही यात्रा, देव सगळे प्रकरण थांबले, पण काही वर्षात परत पुरी हिंदूंच्या ताब्यात आली, व हे सर्व परत सुरु झाले. पुढचा इतिहास लिहत नाही. गरज नाही.

नंतरचे पुरावे .. गरज वाटत नाही. तुझा मुकुंददेवाचा "परकिय खुन" म्हणजे हिंदू लोकांनी केलेल्या खुनखराबाचा पुरावाच उभा राहिला नाही.

जो कोणी नरसु १०८, “ए स्टडी ऑफ कास्ट" वाला लेखक आहे, त्याचे संशोधन किती मौलिक आहे हे त्या खोट्या वस्तूस्थितीमुळे कळते. त्याचे आभार !!

हा सगळा इतिहास तुला अन त्या नरसु १०८ ला मान्य नसला तर माझी काही हरकत नाही. तू तुझे असे संशोधन जारी ठेव. वेळ मिळाला की आस्वाद जरुर घेऊ.

तुला पुरी मंदिरा बद्दल माहिती आहे तर एक प्रश्न पडला आहे. खुद्द प्रभू येशू ह्या मंदिरात येऊन गेला असे इंग्रजी इतिहासकार म्हणतात. ते खरे आहे का?

अनुल्लेख करता आला असता, पण इतिहास मांडत आहेस म्हणून उल्लेख करावाच लागला. नाहीतर उद्या आणखी कोणी ह्याच लेखाला पुरावा म्हणून देईल. Happy

माझा विरोध तुझ्या लेखनाला अजिबात नाही, हे परत सांगू इच्छितो, पण लेका, व्यवस्थित लिही ही कळकळीची विनंती, जिथे बरोबर आहे तिथे मी बरोबर आहे हेच म्हणणार ह्याची खात्री बाळग. तू जसा द्वेषाने पछाडून हे लेख लिहतोस तसा मी बौद्धधर्म द्वेषाने पछाडलेला नाही, ह्याची नोंद मात्र जरुर घे.

तू जसा द्वेषाने पछाडून हे लेख लिहतोस तसा मी बौद्ध धर्म द्वेषाने पछाडलेला नाही, ह्याची नोंद मात्र जरुर घे.>> ग्रेट अ‍ॅटिट्युड. आवडलं.

>>>> अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी तो स्वतः आणि त्याची प्रजादेखील वैदिक धर्माचे पालन करीत. तेव्हा आणखी खोल खणले असता समजा वैदिक प्रतिमा मिळाल्या तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. <<<< अगदी अगदी!
केदार, गुड वर्क Happy

.

मृदुला,

सम्राट अशोक हा वैदिक धर्माचं पालन करत नसे. चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्म स्वीकारल्यावर बिंदुसारानं आजिवकांकडून दीक्षा घेतली होती. त्यामुळे अशोकावर संस्कार होते आजिवक व जैन धर्मियांचे. अशोकाचा वैदिक धर्माशी संबंध नव्हता.

केदार,

मधुकरसारख्या तथाकथित धर्मांतरित बौद्ध विद्वानांपेक्षा तू बौद्ध नसून सुद्धा तुला बौद्ध धर्माची जास्त व अचूक माहिती आहे. हिंदूद्वेषाने पछाडलेल्या व गरळ ओकणार्‍यांचे खोटे मुद्दे तू आपल्या अभ्यासपूर्ण लिखाणाने खोडून काढले आहेस याबद्दल तुला धन्यवाद व तुझे अभिनंदन!

.

जो कोणी नरसु १०८, “ए स्टडी ऑफ कास्ट" वाला लेखक आहे, त्याचे संशोधन किती मौलिक आहे हे त्या खोट्या वस्तूस्थितीमुळे कळते. त्याचे आभार !!>> केदार त्या नरसु पी. लक्ष्मी ना असं म्हणन्या आधी तुझं स्वतःचं वाचन किती ते तपासुन बघायला हवे. याने वरिल ग्रंथ १९२२ मधे प्रकाशित केले आहे आणि त्याची अलिकडची आवॄत्ती "ब्लु मुन बुक्स" दिल्ली मधुन २००२ मधे प्रकाशीत झालेय. तुझं ज्ञान त्याच्या पेक्षा जास्त असल्यास तो प्रकाशीत कर ना! त्याच्या लेखनात खोटी माहीती कशी आहे हे सिद्ध कर.

वरिल सगळी माहिती हि विद्वान व ईतिहास कारानी अधिकृत केलेली आहे. त्यांची नावे येणेप्रमाणे

१) डॉ. के जमनादास
शिक्षणः एफ. आर. सी. एस. (एडिनबर्ग) जे एक विख्यात भाल्य चिकित्सक आहेत.
भारतिय प्राचिन ईतिहास, संस्कृती व पुराणवास्तुं शोधन यात स्नातक आहेत.
२) डॉ. एम. डी. नलावडे
शिक्षणः पि. एच. डी. माजी ईतिहास विभाग प्रमुख, पुणे विद्यापिठ. (यांनी तिरुपती बालाजी एक बौद्ध क्षेत्र या पुस्तकातिल ८ पानी प्रस्तावना लिहली ज्या मधे त्यानी वरिल मी लिहलेल्या सगळ्या मुद्दयाना कशी मान्यता दिली त्या प्रस्तावनेत आहे. एकदा वाचुन बघा)

३) रामचंद्र चिंतामण ढेरे:- यांच "श्री विठ्ठल एक महा समन्वय"
४) एन. पि. जोशी:- यांच "प्राचिन भारतिय मुर्ती विज्ञान"
५) जी. एस. घुर्ये. :- "गॉड्स एण्ड मेन"

या सगळया पुस्तकांतुन वरिल लेख लिहलाय. हे सगळे खोटे आणि केदार फक्त तुम्ही खरे का ?

वरिला लोकानी लिहलेले लिखान जर तुम्हाला खोटे वाटत असल्यास ते निव्वड द्वेषापोटी तुम्ही बोलताय.

आणि जर तुमची माहिती खरी असल्यास तुम्ही स्वतः थेसीस लिहुन डॉक्टरेट का नाहि मिळवत. म्हणजे तुम्ही ठोकम ठाक करताय.

असो. तुम्ही काहि तुमचा तेढ सोडणार नाही.
चलने दो.

मधुकरराव, तुमच्या भाग १ मधील एक महत्वाचा मुद्दा आहे.. वारकर्‍यांची ५ तत्वे आणि पंचशील.. यावर काहीतरी लिहाल अशी अपेक्षा..... बाकी दगड, धोंडे, खापर्‍या गोळा करायला आपण काही डायनासुराची हाडे गोळा करणार्‍यांपैकी नाही... माझ्या दृष्टीने तुमच्या लिखाणातून खरा महत्वाचा बाहेर आलेला मुद्दा फक्त हाच आहे....

तसं तर या ५ तत्वांवर हिंदुनीही मायबोलीवर कुठे लिहिले नाही. तुम्हीच लिहा ..:) हाती घेऊन काठी/ बोले महाराचे थेट मराठी// असं विठोबाबाबत म्हटलेले आहेच ! स्वतः विठोबाच महाराची बोली न लाजता बोलत असे , असे वर्णन आहे... तेंव्हा न लाजता या विषयावर लिहायला हरकत नसावी.... Happy

जसजसे धर्म बदलत जातात तसतशी जुन्या धार्मिक स्थळांवर व उत्सवांवर नव्या धर्माची आवरणे चढतात. हे मानवी इतिहासात नेहमीचे आहे

यावरून आठवले, नुकतेच न्यू जर्सी मधले एक आर्थिक विवंचनेत सापडलेले चर्च एका हिंदु मंदिराने विकत घेतले आणी तिथे कृष्ण मंदिर बांधले. आणखी हजार वर्षानी तिथे उत्खनन केले तर त्या मंदिराच्या पायाशी काही ख्रिश्चन अवशेष सापडतील. पण केवळ तेवढ्यावरून इथले चर्च हिंदुंनी बळकावून मंदिर बांधले असे म्हणता येणार नाही.

असो. तुम्ही काहि तुमचा तेढ सोडणार नाही.
चलने दो >> Rofl

रामचंद्र चिंतामण ढेरे:- यांच "श्री विठ्ठल एक महा समन्वय - ह्यांच नाव मध्ये नको आणू. संतसाहित्याचा अभ्यास अन त्याचा हिंदू-बौद्ध फुटी साठी संबंध एकटा तुच लावू शकतोस.

या सगळया पुस्तकांतुन वरिल लेख लिहलाय. हे सगळे खोटे आणि केदार फक्त तुम्ही खरे का >>>
केदार त्या नरसु पी. लक्ष्मी ना असं म्हणन्या आधी तुझं स्वतःचं वाचन किती ते तपासुन बघायला हवे >>
वाचायला शिक. पूर्ण प्रतिक्रिया वाच. मीच खरा असे म्हणालो का? तुला वाचता येत नाही त्याला मी काय करु? तू जो पुरावा दिला तो मी खोडला. फक्त तितकेच प्रतिक्रियेत लिहले आहे. माझ ज्ञान मला कोणासमोर सिद्ध करायची गरज नाही. Happy माझ वाचन किती हा प्रश्न येऊ नये. तू फक्त योग्य पुरावे द्यायला हवे. खोडल्यावर आरडाओरडा करण्यात काय हशील. इतरांनी काय वाचावे, ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा तू काय वाचून इथे मांडत आहेस हे महत्वाचे ठरते. तू भलतेच मांडतोस अन ते मी तुझा विरोध न करता पुराव्याने खोडतो तर तू कांगावा करतोस. नेहमीसारखेच. मी अगदी अशीच प्रतिक्रिया अपेक्षित करत होतो. Happy

त्याच्या लेखनात खोटी माहीती कशी आहे हे सिद्ध कर. >> वर मग काय केले? प्रकाश पडला नाही का? परत वाच.

१८८० ते १९३०-३५ पर्यंत हिंदू समाजाला फोडण्यासाठी खूप सार्‍या थेअर्‍या निर्माण झाल्या. विदेशी लोकांनी काय नाही नाही ते लिहलं आहे. वैष्णव तत्वज्ञान येशूनेच आणले इथपासून ते अश्या अनेक मंदिरांपर्यत ह्या थेअर्‍या लिहल्या. अन फुटिरतावाद्यांनी किंवा अन्याय झालेल्यांनी त्या उचलून धरल्या. सुदैवाने ते सगळेच सिद्ध होऊ शकले नाही, पण दुर्दैवाने अशी फुट पाडण्याचे कार्य साधले गेले आहे. जे तुझ्यासारखे डोळ्यावर पट्टी ठेवून लिहतात, त्यांना हे कळायचे नाही. वेळ गेलेली नाही. पट्टी काढून समाज पाहावा. अजूनही अभ्यसास वाव आहे. (इथे तुला लिहणे चालू आहे, समाजाला नाही, सुदैवाने समाज तसा विचार करत नाही. ) आणि त्यावरुन फक्त एकांगी बाजू उचलून आजही इतिहास निर्मिती चालू आहेच. निदान ते कोणी खोडलं असेल ह्याचा विचारही शिवत नाही. असो.

तुझे मित्र जे वारकरी, खापर्‍या इ इ आणून तुझ्यासोबत समाजही आणू पाहत आहेत, त्यांना एक नम्र विनंती, कृपया तसे करु नका. चिथावनी देताना कोणाला देतो हे पाहा. त्यापेक्षा आपण सुज्ञ आहात, आपण हा विषय घ्यावा अन लिहावे. संत साहित्याचा अभ्यास जर मधुकरने केला असता तर ही वेळ आली नसती. तो करतो त्याला अभ्यास नाही कॉपी पेस्ट म्हणतात. ते ही केवळ एकांगी पुस्तक वाचून, त्यावर मत तयार करुन इथे वेळोवेळी लिहतो.

मधुकर, बौद्ध, हिंदू अशी तेढ मायबोलीवर तू निर्माण करत आहेस, मी फक्त प्रतिक्रिया त्याही विषयाला धरुन लिहत आहे, ही प्रतिक्रिया तू मला उद्देशून लिहलेल्या व्यर्थ प्रतिक्रियेला आहे पण ती जरुरी आहे. मी आधी लिहल्याप्रमाणे सर्व बाजू निट मांड, कोणी कशाला विरोध करेल? फक्त ते योग्य असावे, नाहीतर असे भलतेच पुरावे देत असशील तर मी पोस्ट करणारच.

वाचकांना एक विनंती - मधुकरवर रागावून पोस्ट करायची जरुरी नाही. तावातावात यायची तर अजिबात गरज नाही. असे लेख फक्त पुराव्याने खोडू शकता. त्यासाठी तुम्हाला हाडकं गोळा करायलाच पाहिजेत असे नाही, पुस्तके आहेत ती वाचा अन खोडा. कुठल्या मंदिराबद्दल मधुकरने लिहले तर तक्रार व्गैरे करतो अशी भाषा वापरायची गरज नाही. त्याने काही कमीपणा येत नाही. अहो शिवाजीला, औरगंजेबाने सोडले हे असे लिहणार्‍यावर चिडायची गरज नसते.

हिंदू धर्मातील प्रसिद्ध मनुस्मृतीमधला एक श्लोक देतो. जामोप्या अर्थ देतीलच. Happy

देशधर्मान जातिधर्मान कुलधर्मांश्च शाश्वतान् |
पाषंडगणधर्मांश्च शास्त्रेस्मिन्नुक्तवान् मनु: ||

कु़ळकर्णी कृपया विषयात काही चुक असेल तर ती लक्षात आणून द्या, आपणही पुरावे देऊ शकता, जिथे चुक आहे तेथे चुक म्हणाले तरी काही बिघडणार नाही. तसेच हे पुरावे खंडन करताना माझे काही चुकले तर मी चुकले असे नक्कीच म्हणेन, त्याने माझी नैतिक हार होते असे मला वाटणार नाही, पुरावा महत्वाचा आहे असे वाटते. निदान इथे तरी, कारण गुगल वरुन मराठी सर्च केला ही असे बहुमोल लिखान सापडते म्हणून हे खंडन चालू आहे.

अहो शिवाजीला, औरगंजेबाने सोडले हे असे लिहणार्‍यावर चिडायची गरज नसते.
======

खरंय.. त्याच्यावर कीव करावी आणि बुद्ध त्याला सद्बुद्धी देवो ही मनापासून प्रार्थना करावी.

<म्हणजे मुद्दामून खोडसाळ वृत्तीने हिंदू धर्माविषयी केलेले भलते सलते
तुम्ही काहि तुमचा तेढ सोडणार नाही
तू जसा द्वेषाने पछाडून हे लेख लिहतोस तसा मी बौद्धधर्म द्वेषाने पछाडलेला नाही, >

इथे इतिहासाबद्दल दोन अभ्यासू दोन वेगळी वेगळी मते मांडत आहेत. या चर्चेची पातळी थोडी उंचावर नेऊन, परस्परांविरुद्ध असे वैयक्तिक पातळीवर आरोप करू नयेत. त्याकडे दुर्लक्ष करावे. नि खरे काय याचा शोध घ्यावा. हिंदूंविरुद्ध कुणाला काय दिसले ते त्याने लिहीले म्हणून लगेच तो हिंदू द्वेष होत नाही. ती मूर्ख मुसलमानांची समजूत.

मधुकरराव, वर vijaykulkarni | 11 August, 2010 - 08:12
हे पोस्ट पहा!
ते सत्य आहे. इथे त्याचे लिखीत, संगणकावर इ. पुरावे आहेत!!
त्यामुळे जर तुम्ही उद्या म्हणाल की जशी मुसलमानांनी हिंदूंची देवळे फोडली तशी हिंदू ब्राह्मणांनी ख्रिश्चनांची चर्चे फोडली तर मी तुम्हाला नक्कीच वेड्यात काढीन.

मी वर लिहीलेच आहे की श्री. आद्य शंकराचार्य यांनी तत्वज्ञानावर वाद घालून हिंदू धर्म श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. मग बुद्धांच्या देवळांनाहि अशी आर्थिक टंचाई भासली असेल, पुरेसे भक्त नाहीत, धर्माबद्दल उदासीनता इ. कारणांमुळे ते बुद्ध मंदिर उपेक्षित रहाण्यापेक्षा त्याचे हिंदू मंदीर केले तर बरेच की.

इतिहास सांगतो की मुसलमानांनी चांगल्या अवस्थेत असलेली, लोकप्रिय मंदिरे फोडून तिथे मशिदी बांधल्या!! याची तुलना तुम्ही बुद्ध व हिंदू मंदिरांशी कशी करू शकता?

तेंव्हा केवळ इतिहास, तुम्हाला समजला तसा, लिहा.

दुसरे सांगतो - इथे पुष्कळ शाळा कॉलेजात विकिपेडिया संदर्भ म्हणून अमान्य आहे.

निरनिराळ्या तंत्रज्ञाना संबंधी विकिपेडिया वरील माहिती पाहिली असता त्यात ज्ञानी लोकांना चुका आढळून आल्या आहेत.

..

<एकदा कोणीतरी "शुद्र" हा शब्द वापरला त्यानी लगेच माफी मागितली>

तो मीच. माफी लगेच नाही, कुणितरी माझ्या लक्षात आणून दिले की आजकाल त्यांना दलित म्हणतात. म्हणून मग माफी मागितली.

'हरिजन' शब्दाचे काय झाले कुणास ठाऊक?

बाकी तुमचे बरोबर आहे. रोजच्या जीवनात धर्मातले फार थोडे माहित असणे पुरे असते.

बाकीच्या गोष्टी इतिहास, तत्वज्ञान इ. विषयांच्या अभ्यासकांसाठी.

मधुकरचा दोष नसावा. तो जे वाचतो अन ज्याला खरे समजतो ते चुकीचे आहे. त्याला अनेकदा ते खोटे आहे असे सांगीतले तरी ते मात्र कळत नाही, उलट "तुम्ही काहि तुमचा तेढ सोडणार नाही" असे म्हणत तो फिरतो. ही अडचण मात्र जरुर आहे. Happy

ही अडचण केवळ तो स्वतःच दुर करु शकतो. अभ्यासाने. अन्यथा असे आरोप करणे थांबवलेले बरे.

लोकप्रिय होण्यासाठी सवंग लिहलेले बरे असते. कारण त्याला वेळ व तयारी अजिबात लागत नाही.

मधुकर, तुझी इच्छा असेल तर ही अडचण दुर करण्यासाठी मी हवी ती मदत करायला जरुर तयार आहे. पण ह्या सर्वासाठी खूप वेळ लागतो. मुख्य म्हणजे अ‍ॅनॅलिटकल मन लागते. एवढे करुनही कन्फुजन राहते ते वेगळेच. Happy

असो, तुला शुभेच्छा.

>>> सुदैवाने ते सगळेच सिद्ध होऊ शकले नाही, पण दुर्दैवाने अशी फुट पाडण्याचे कार्य साधले गेले आहे. जे तुझ्यासारखे डोळ्यावर पट्टी ठेवून लिहतात, त्यांना हे कळायचे नाही. वेळ गेलेली नाही. पट्टी काढून समाज पाहावा.

तो डोळ्यांवर पट्टी ठेवून लिहीत नाही. पूर्ण समजून उमजून हिंदूंविरूद्ध गरळ ओकतो. एखाद्या समाजाचा इतका द्वेष करणे हा एक मानसिक आजार आहे. ही एक प्रकारची विकृती आहे.

मधुकर :

तुमच्या लेखातले शेवटचे ३ परिच्छेद हे २००३ साली एका पटेल नामक सदगृहस्थांनी ओरिसा रिव्ह्यू या मासिकात लिहीलेल्या लेखात [ईंग्रजीत] आहेत. कदाचित तुमचे आणि त्यांचे पुस्तक सारखे असावे. [मला आत्ता लिंक सापडत नाही आहे. कालच शोधली पण सेव्ह केली नाही]. त्यात त्यांचे असेही वाक्य आहे
"Dr. H.K. Mahtab has reported about a
piece of stone of Asokan polish with the
symbols of Buddha, Dharma and Sangha at the
top of it, to have been discovered in
Bhubaneswar area and now housed in Asutosh
Museum, Calcutta. The symbols are a little
different from those found at Sanchi and other
places, but the Bhubaneswar symbols are
almost akin to the images of Jagannath,
Balabhadra and Subhadra."

त्या नंतर जुलै २००६ मध्ये जगन्नाथ पुरी मंदिराचे प्रशासक चित्रसेन पसायत यांच्या पेपरमध्ये तुम्ही लिहीले आहेत त्या कागदपत्रांचा उल्लेख नाही. तसेच त्यामध्ये त्यांनी जैनांच्या मंदिराविषयीदेखील एक थेअरी दिली आहे.

क्षची टिप्पण्णी, तुमच्या विठ्ठलमंदिराच्या लेखात असलेले 'बुद्ध' आणि विठ्ठलाचे संदर्भ, जगन्नाथाचा संदर्भ यावरून मलातरी असा निष्कर्ष दिसतो, की वेगवेगळ्याप्रदेशात बुद्ध हे विशेषण वेगवेगळ्या 'देवांना' मिळाले होते.

बाकी तुमच्या केदारला वापरलेल्या भाषेवरून

>>या राजाच्या नंतर हिंदुनी बुद्धाचं अस्तित्व लपविणार कट रचला. बुद्धाच्या विशाल मुर्तीसमोर एक मोठी भींत बांधण्यात आली त्यामुळे बुद्धाची विशाल मुर्ती लपविल्या गेली.

या ओळीत तुम्हि घुसडलेला भाग काय असेल याची निश्चीतच कल्पना येते आणि तुमची संस्कृतीही दिसून येते. Happy

>>तेव्हा आणखी खोल खणले असता समजा वैदिक प्रतिमा मिळाल्या तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अजून थोडे खोल गेले तर अमेरिकेत २४०० सालामध्ये भारतीय अवशेष सापडण्याचे भाकीतही आजच करता येईल. Happy

एकदा रशियन लोकांनी जाहीर केले की रशियात जुन्या तांब्याच्या टेलिफोनसारख्या तारा सापडल्या. त्या अमेरिकेत टेलेफोन येण्यापूर्वीच्या होत्या, यावरून टेलेफोनचा शोध रशियात लागला, अमेरिकेत नाही.

त्यावर उत्तर म्हणून भारतीयांनी सांगितले की १६७८ मधे बांधलेला वाडा पडला. त्यात टेलेफोनच्या तारा सापडल्या नाहीत. यावरून भारतात वायरलेस टेलिफोन निदान १६७८ साली सुद्धा प्रचलित होते, असा निष्कर्ष निघतो!

तर कशावरून काय निष्कर्ष निघतो, हे काय सिद्ध करायचे आहे त्यावरून ठरते.

माननीय प्रशासक मायबोली,

स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर) तसेच पुढचे काही भाग हे मधुकर यांनी लिहिलेला लेख हा कम्युनिझम प्रचाराचा एक भाग आहे. नक्षलावाद या विषयावर घडामोडी मध्ये झालेल्या चर्चेतुन ते कम्म्युनिस्ट पक्षाचे सदस्य असावेत हे दिसते.

कोणीही कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करावा पण अपप्रचार किंवा धार्मिक भावना दुखावणार लेखन करु नये.

यामुळे इतरांच्या श्रध्दांवर आघात होतो. हे लिखाण धार्मिक भावना दुखावणार आहे. सबब हे लिखाण प्रसिध्द राहु नये. याविषयात एक तज्ञांची समिती असावी जी आपल्यास या संदर्भात मार्गदर्शन करेल.

आपले याविषयातले स्पष्ट मत कळवावे हि विनंती.

आपला,

नितीन जोगळेकर
नितिनचिंचवड

नितीन,

आपले विचार "Admin" आणि "Adm" या आयडीच्या "विचारपूस" मध्ये लिहावे. त्यामुळे ते अ‍ॅडमिनपर्यंत लवकर पोहोचतील.

चला, आता राजकारणीही आले तर.

उत्खनन सुरु झाले.
आधी हौसे गौसे नौसे आले.
मग खापर्‍या गोळा करायला आर्किओलॉजिस्ट आले.
मग खापर फोडायला वकील आले.

आता राजकारणीही आले. अमूक एका बीबीवर एक माणूस असे लिहितो, म्हणजे त्याची विचारसरणी अशीच असणार, असे म्हणून डायरेक्ट त्याच्यावर कारवाई करायची... यालाच कम्युनिजम म्हणतात ! Proud

जागोमोहनप्यारे | 12 August, 2010 - 07:18 नवीन
चला, आता राजकारणीही आले तर.

हे मला उद्देशुन आहे असे मी समजतो.

नक्षलावाद या विषयावर घडामोडी मध्ये झालेल्या चर्चेतुन ते कम्म्युनिस्ट पक्षाचे सदस्य असावेत हे दिसते.

कोणीही कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करावा पण अपप्रचार किंवा धार्मिक भावना दुखावणार लेखन करु नये.

मी केवळ ते कमुनिस्ट पक्षाचे पुरस्कर्ते असावेत असे म्हणले आहे. याच बरोबर

आणखी एक वाक्य खाली लिहले आहे ते ही वाचावे. त्यांनी कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करावा. हे भारतीय कायद्याला धरुन आहे. पण याचा अर्थ त्यांनी विसंगत लिखाण करुन भ्रम निर्माण करायला मुभा आहे अस नाही.

मी स्पष्ट लिहिले आहे कारण विठ्ठलाबाबत माझ्या श्रध्दा या पुराणांवर आधारीत आहेत. अनेकांनी स्पष्ट चुका दाखवुनही मधुकर हा माणुस लेख मागे घेत नाही. आपले लेखन बरोबर कसे याबाबत प्रतिवाद ही करत नाही. याचाच अर्थ भावना दुखावण्याच्या हेतुने हा लेख प्रेरित आहे.

मी कोणत्याही पक्षाचा सभासद नाही.

यावर आपले म्हणणे काय आहे ते स्पष्ट करा.

Pages