अवघी विठाई माझी (१८) बेल पेपर्स

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

100_0955.JPG

या भाजीच्या नावात मोठी ऐतिहासिक चूक झालीय आणि ती, आजतागायत सुधारता आलेली नाही.
अजिबात तिखट नसलेल्या वस्तूला पेपर का म्हणावे ? आणि मग त्यावर पांघरुण घालण्यासाठी
तिला चक्क स्वीट पेपर म्हणावे ? (हे मला शाम जोशींच्या कथेच्या शीर्षकासारखे वाटते,)
हि चूक केलीय ख्रिस्तोफ़र कोलंबस साहेबांनी.(त्यांनी पिमेंटो असे स्पॅनिश मधे नाव दिले) शोधायला निघाले होते इंडिया, पोहोचले अमेरिकेला.
मग तिथल्या लोकांना इंडियन नाव ठेवले. तिथे वापरात असलेल्या भाजीला, पेपर म्हणून मोकळे
झाले. खरे तर या भाजीचा आणि त्यावेळी हव्या असलेल्या, इंडियन पेपर, म्हणजेच मिरीचा काही
संबंधच नाही. (मसाल्यांचा शोध मार्को पोलो नी शतकभर आधीच घेतला होता.)

या भाजीत वरील फ़ोटोत जे रंग दिसताहेत, त्याव्यतिरिक्त केशरी व जांभळा हेही रंग उपलब्ध आहेत.
क्वचित पांढरा रंग पण दिसू शकतो. तसेच या रंगांचे मिश्रण दिसू शकते, पण ते पिकण्याच्या
वेगवेगळ्या अवस्थेत खुडल्यामूळे दिसू शकते (उदा. लाल मिरची, आधी हिरव्या रंगाची असते,
मग ती हळूहळू लाल होते. पिवळ्या मिरचीचेही तसेच.)

आपल्याकडे हिरवी मिरची पूर्वापार वापरात आहे. तिचे सिमला मिर्च हे नाव अलीकडेच प्रचारात
आले. आपल्याकडे ती भोपळी मिरची वा ढब्बू मिरची नावाने ओळखली जात होती. एका मराठी
चित्रपटात (बहुतेक पुढारी ) नर्तिका लिला गांधीचा उल्लेख, भोपळी मिरची म्हणून केल्याचा
आठवतोय. (या लेखातील मिरचीचे सर्व उल्लेख म्हणजे ढब्बू मिरची. खरे तर आपली तिखट मिरची म्हणजे चिली व या मिरच्या एकाच कॅप्सिकम कूळातल्या आहेत. पण या मिरच्यात तिखटपणा उत्पन्न करणारे capsaicin, हे द्रव्य नसते )
आता वरील रंगांच्या मिरच्याही मिळू लागल्या आहेत. घंटेसारख्या आकारामूळे बेल पेपर्स,
असेही नाव आहे. पण आता यात वेगळे आकारही दिसू लागले आहेत.

100_0752.JPG

हिरव्या मिरचीची आपल्याला सवय आहे. आणि आपल्या अनेक पदार्थात ती अलगद जाऊन
बसलेली आहे. बहुतांशी आपण ती शिजवूनच वापरतो, पण भाजून वा कच्चीही, ती कोशिंबीरीत
वापरतात. ती फारशी तिखट नसते (मला मात्र एकदा विपरीत अनुभव आला होता, पावभाजी
साठी, म्हणून एकदा भोपळी मिरच्या आणल्या होत्या. त्या मी कापल्या, तर दोन दिवस
हातांची आग होत होती. त्या आकाराने जरा वेगळ्या होत्या.)

रंगीत मिरच्या भारतातहि आता मिळू लागल्या आहेत. त्या हिरव्या मिरच्यांपेक्षाही कमी
तिखट असतात. त्यामूळे त्या फार शिजवता येत नाहीत. थोड्याश्या परतल्या वा भाजून
सोलून घेतल्या कि झाले. जांभळी मिरची मात्र कच्चीच वापरावी लागते, कारण ती शिजवली
तर तिचा रंग बदलतो.

100_0959.JPG

या वरच्या डिशसाठी मी फ़्रेंच ब्रेड बगेत च्या पातळ स्लाईसेस, कापून त्या ऑलिव्ह ऑईल
मधे दोन्ही बाजूने सोनेरी करुन घेतल्या. मग सिमला मिरच्या (पिवळी, लाल व हिरवी, या क्रमाने) बारीक कापून, ऑलिव्ह ऑईल मधे परतून घेतली.

(या अश्या कापण्यासाठी मी ओरिजीनल जर्मन ब्लेड असणारे, व्ही स्लाईसर वापरले आहे.
हे अत्यंत धारदार असल्याने, फ़ार जपून वापरावे लागते. अन्य प्रकारेही बारिक तूकडे
करता येतील.) परतताना फ़क्त पाणी सुकेल एवढेच परतले आहे. मग त्यात थोडे मीठ
टाकले. आणि त्या स्लाईसेस वर अशी रचना केली. डिशच्या मधे, ब्री चीजचे तूकडे ठेवले आहेत. हे चीजचे तूकडे त्या स्लाईसेसवर पण ठेवता आले असते, पण त्यांने सजावट झाकली गेली असती. या ब्रेडच्या स्लाईसेसवरही एखादे चीजस्प्रेड लावता येईल. मोजक्या शिजवल्याने
मिरच्या फ़ार मऊ पडल्या नव्हत्या किंवा त्यांचा रंग बदलला नव्हता.

capsicum rosti.jpg

उरलेल्या मिर्च्यांची अशी रोष्टी केली. वरिलप्रमाणे परतलेल्या मिरच्यांमधे, भाजलेल्या
रताळ्याचा गर मिसळला. थोडीशी कणीक घालून, सगळे थापून असे रोष्ट केले.

याच मिरच्यांना इंग्लिशमधे कॅप्सिकम, पाप्रिका अशीही नावे आहेत. हिचे शास्त्रीय नाव
Capsicum annuum. यामधे क जीवनसत्व असतेच शिवाय, फॉस्फोरस, पोटॅशियम,
मॅग्नेशियम, कॅल्शियम. शिवाय थायमीन, रिबोफ्लेवीन, निआसिन आदी ब वर्गातील जीवनस्त्वेही
असतात.

विषय: 
प्रकार: 

खूप वापर होतो या मिरच्यांचा इथे !
चायनीज, इटलियन, मेक्सिकन तिन्ही प्रकारच्या cuisine मधे या मिरच्या सही लागतात.
देशी व्हेज BBQ रंगीत बेल पेपर्स शिवाय पूर्ण होत च नाही !
थोड्या छोट्या मिरच्या असतील तर स्टफ करून ग्रिल किंवा बेक केलेल्या पण सही लगतात. :).

डिजे, भारतीय पदार्थात घालायचे तर पनीर जाल्फ्रेझीमध्ये पनीर बरोबर रंगीबेरंगी बेल पेपर्स मस्तच दिसतात. भाज्या वगैरे काही करत नाही पण पोह्यांमध्ये घालते. कदाचित पुलावमध्येही छान लागतील.

खरोखर! भारतात असताना इतक्या खात नव्हते या मिरच्या. इथे आल्यावर खूप वापर होतो स्वैपाकात. इतकी अ‍ॅट्रॅक्टीव्ह दुसरी फळभाजी नसेल! मी अजून जांभळी मिरची पाहिली नाही पण.

हो, एग व्हाइट ऑम्लेट मधे मला पण आवडतात या मिरच्या, वर भरपूर ब्लॅक पेपर फ्रेश क्रश करून टाकायची..यम्मी !!

मी पण! वर दिलेल्या सर्व पदार्थात(पोहे,फ्राईड राईस्,चायनिज्,थाई स्टर फ्राय्ज,ऑम्लेट, जाल्फ्रेझी, पिझ्झा) वापरतेच बेल पेपर्स..
भारतीय स्वयपाकातील ढब्बू मिरचीची पीठ पेरून भाजी व पंचामृत तर फार आवडते!

परवाच फार्मर्स मार्केट मध्ये जांभळी बेल पेपर पण पाहिली..

रंगीत सिमला मिरच्या सॅलेड मधेही सही लागतात..!!
( Looks like अजुन एका फॅन क्लब ची गरज आहे पाककृति बीबी वर Happy )

दिनेशदा, मस्त दिसतोय तो शेवटचा फोटो.
ते सगळं तव्यावर थापून भाजायचं का थालिपिठा सारखं? त्यात चिज पण घातलंय का, रंगावरून वाटलं तसं.

माझी फेव्हरेट रेसिपी : सिमला मिरच्या देठा कडून चकती कापून आतून साफ करून त्यात उकडलेल्या बटाट्याची भाजी स्टफ(आवडी प्रमाणे सिझनिंग करायचं, साधी भाजी पण चालेल किंवा कांदा , स्वीट कॉर्न, पनीर असे हवे तसे आवडी प्रमाणे काँबो.) करायची. वरून श्रेडेड चीज भुरभुरवायचं. मिरचीला बाहेरून पुसटसा तेलाचा हात लावायचा. आणी मायक्रोवेव्ह ओव्हन मधे थोडा वेळ बेक करायच्या. मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल तर स्टफ केलेल्या मिरचीला वरून कापून घेतलेली चकती टूथपिकने टोचून घ्यायची. आणी चमचाभर तेलावर पॅनमधे सगळीकडून नीट हलवून शिजवून घ्यायची. वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या एकत्र अशा स्टफ करून दिसतातही छान. पार्टी मधे एकदम हिट डिश.

खरंतर जास्त शिजवल्यामुळे यांचे रंग निस्तेज होतात. पण तुम्ही केलेली ती starters झक्कासच कि! रंगसंगती किती छान दिसतेय.... पूर्ण न्याय!

ती शेवटची डिश डायरेक्ट फोटोतून उचलून खावी वाटतेय Happy त्याची कॄती प्लीज सविस्तर लिहाल का ?
आमच्याकडे भोपळी मिरची गॅसवर भाजून त्याचं भरीतही करतात. दही, भाजलेली मिरची आणि दाण्याचं कूट घालून. मिरच्यांची पीठ पेरुन भाजी आणि स्टफ्ड मिरच्या एकदम प्रिय !

>>या लेखातील मिरचीचे सर्व उल्लेख म्हणजे ढब्बू मिरची. खरे तर आपली तिखट मिरची म्हणजे चिली व या मिरच्या एकाच कॅप्सिकम कूळातल्या आहेत. पण या मिरच्यात तिखटपणा उत्पन्न करणारे capsaicin, हे द्रव्य नसत>><<

कसं शक्य आहे? सिमला मिरची सुद्धा मला थोडीफार तिखट लागते.

अरे वा, सगळ्यांच्या आवडीच्या दिसताहेत या.
राखी, अगो, त्या नव्या धाग्यावर पुर्ण कृति लिहिलीय. चीज टाकलेले नाही, वरून थोडेसे ऑलिव्ह बटर टाकलेय.
अमि, आपल्या हिरव्या मिरच्या थोड्या तिखट असतात, पण बाकिच्या अजिबात तिखट नसतात.

मामी, हे रंग हि सगळी संशोधनाची किमया, आता मक्याच्या कणसात, चार्ड मधे, मूळ्यात, गाजरात, कोबीत हे रंग उपलब्ध आहेत.

मस्त! फोटो तर सह्हीच आहेत! Happy
मला दुर्दैवाने सिमला मिरची अजिबात सोसत नाही! कधी तरी खाते तरीही, पण लगेच त्रास होतो! कदाचित कमी तिखट वाल्या सिमला मिरचीला खाल्ल्यास सोसेल ती! Happy

दिनेशदा,
अहो मला आता कुठे भाज्यांचे प्रकार,त्याचे महत्व कळु लागलेय,त्यामुळे असल्या भाज्या खुप लांब आहेत अस म्हणावं लागेल ...
Happy

अनिल, बघून ठेव रे. या नव्या भाज्यांची लगवड झाली तर भरपूर ग्राहक मिळतील.
मामी, कधी कधी जीन्समधे झालेल्या बदलाने, मक्याचे काहि दाणे केशरी, वा जांभळे होतात. चवळी मधे पण तसे होते. पण मक्याच्या काही जाती, निव्वळ शोभेसाठी रंगीत केल्या आहेत. (हि कणसे खात नाहीत,)
जागू, माझे पाककलेवरचे सगळेच लेखन सर्वांसाठी खुले आहे.