स्वाईन फ्लू ची लस द्यावी का ?

Submitted by स_च on 9 August, 2010 - 00:11

स्वाईन फ्लू ची लस मुलांना द्यावी का ?

लसीचा effectiveness कसा आहे, लसीच्या short term/long term रिआक्शन काय आहेत ?
संबधीत जाणकारांनी आपले प्रतिसाद द्यावेत -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी अमेरिकेत पहिल्यांदा स्वाईन फ्यु ची लस मार्केट मधे आली. त्यावेळी वयाचे सहा महिने पूर्ण असल्या शिवाय ही लस बाळांना देत नव्हते. माझी लेक सहा महिन्यांची झाल्यावर तिला देखील सीझनल फ्यु आणी स्वाईन फ्ल्यु अशा दोन्ही लसी दिल्या गेल्या. काहीही साईड ईफेक्ट्स नाही आले. नुकतंच तिच्या डॉक्टरला विचारलं असता लसीचा प्रभाव ६ महिने पर्यंत राहील असं सांगितलंय. बाळ लहान असल्यामुळे मी आणी माझ्या नवर्याने देखील ही लस घेतली होती. आम्हालाही कुठलेच साईड ईफेक्ट्स आले नाहीत.

मी प्रेग्नंट असताना ७ व्या महिन्यात स्वाईन फ्लु ची लस घेतली होती अमेरिकेत. बाळ झाल्यावर नवर्‍याने आणि आईने पण लस घेतली होती. काहीही साईड ईफेक्ट्स झालेले नाहीत.

मागच्या वर्षी मी स्वत: लस घेतली नव्हती, पण बायको तसेच मुलींनी घेतली होती. आमच्या कडे कुणालाही रिअ‍ॅक्शन आली नाही. फार थोड्यांना कच कच वाटते असे मी एकले आहे.

हाय रिस्क असेल तरच घ्यावी. उगाचच उठ सुठ नको घ्यायला.... मला असे नेहेमी वाटत असते कि कधी कधी तो मार्केटिंग चा भाग असतो. बायको दवाखन्यात काम करते त्यामुळे अनेक तर्‍हेच्या रुग्णांच्या संपर्कात येते म्हणुन त्यांना घ्यावी लागणार होती.

मी आणि नवर्याने पण ही लस घेतली. तसेच पाच वर्षाच्या मुलीला पण दिली. साईड ईफेक्टस जाणवले नाहीत. लहान मुलीला दिली नाही अजुन.

मी, नवरा आणि मुलगा नेसल (नाकात घालायचे ड्रॉप्स) ती घेऊ आज उद्या मधे असं ठरवलं आहे. पर्सिस्टंटमधे काम करणार्‍यांना ऑफिसतर्फे लस देण्याची सोय केली होती. रत्ना मेमो. हॉस्पिटलमधून लोक आले होते. त्यात एक ओळखीचे होते त्यांनाही काही साईड ईफेक्ट जाणवले नाहीयेत. बाकी पण काही जणांकडे चौकशी केली तर ती सेफ आहे असं कळलं.

इथे तर डॉक्टर तीन वर्षाच्या वरच्या लोकांनाच देताहेत ही लस. माझा भाचा दिड वर्षाचा आहे त्याला नाही देणार म्हणलेत.

प्रतिसादा बद्द्ल र्सवांना धन्यवाद.

मी, नवरा आणि मुलगा नेसल (नाकात घालायचे ड्रॉप्स) ती घेऊ आज उद्या मधे असं ठरवलं आहे >> ईन्जक्शन पण आहे ना मोठ्यांसाठी ....?

आम्ही पण घेतली ( नेजल ड्रॉप्स) गेल्या नोव्हेंबर मधे, काहीही साइड इफेक्ट नाही झाला.

माझ्या घरच्या सगळ्यांनी घेतली आहे नेसल स्प्रे ची लस.. कोणालाही काहीही प्रॉब्लेम आलेला नाही...

माझ्या मुलीला आणि बायकोला लस घेऊ नका असा सल्ला मिळाला आहे.. मुलगी ७ महिन्यांची आहे... त्यांच्यासाठी कदाचित साईड इफेक्टस होऊ शकतात...

आमच्या बिल्डींगमधे तर या चर्चेला ऊत आला आहे...
१) लस घ्यावी का घेऊ नये या विषयी उलट सुलट मते ऐकू येतायत. काही मुलांना लस घेऊन अजिबात त्रास झालेला नाहीये, मात्र काहींना १०३-१०४ डीग्री F. एवढा ताप चढला लस दिल्यानंतर.
२) काही डॉक्टर्स इन्सिस्ट करतायत लस घ्याच म्हणून, काही डॉक्टर्स सांगतायत, बघा, तुम्हाला घ्यायचीच असेल तर देतो.
३) आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती जेवढी चांगली तेवढा हा स्वाईन फ्लू आपल्या जवळ फिरकणार नाही.
गेल्या वर्षी ची स्वा.फ्लू ची लाट बघता या वर्षी प्रमाण कमी आहे, मग पॅनिक होऊन लस घेणं कितपत योग्य आहे? बरं, एकदा का शरीराला औषधाची सवय लागली की अगदी सर्दी-खोकला सुद्धा औषधांशिवाय बरा होत नाही.
४) शिवाय असंही कानावर आलंय की, आत्ता उपलब्ध असणारी लस ऑगस्ट अखेरीस एक्सपायर होत आहे. पुन्हा नविन लस थंडीच्या आधी बाजारात आणणार आहेत. (ही नुसती ऐकीव गोष्ट आहे, खात्रीलायक बातमी नाही) तर त्यामुळे आता एक्सपायरीच्या आधी सर्व शाळांमधून कँप लाऊन ती लस मुलांना देण्यासाठीची नोटीस शाळेकडून मिळाली आहे.
५) काहीच रिअ‍ॅक्शन नाही आली लशीची, असं कुठेच ऐकायला मिळालं नाही मात्र.... कुणाला २ दिवस सर्दी, घशात खवखव, कुणाला सणसणून ताप असंच कानावर आलं आहे...
आमच्या घरात अजून तरी कुणी लस घेतलेली नाहिये.... काय करावं हा आमच्यापुढे सुद्धा मोठा प्रश्न आहे.

मंजे अगदी अगदी, मी पण सध्या विचारातच आहे लस घ्यावी का नाही ती
आमच्या फॅमिली डॉ. ने महासुदर्शन काढा आणी २ त्रिभुवन किर्ती च्या गोळ्या रोज घ्यायला सांगीतल्या आहेत पावसाळ संपे पर्यंत, पण लस घ्यायला त्यांच्या दृष्टीने गरज नाही म्हणाले, पण तुम्हाला घ्यायचीच असेल तर देतो म्हणाले . परत त्याच्या बद्दल ही शंका कुशंका आहेतच, काही जण म्हणतायत, अंड्याची अ‍ॅलर्जी असेल तर घेउ नये, डायबेटीक आण अस्थमॅटीक लोकांनी घेऊ नये , इ इ इ , खर काय आहे ते अजुन कळायला मार्ग नाही,
बाकी शाळेत ही स्वच्छता राखायला आपण इन्सिस्ट करण गरजेच आहे,

आमच्या घरात अजून तरी कुणी लस घेतलेली नाहिये.... काय करावं हा आमच्यापुढे सुद्धा मोठा प्रश्न आहे >> मी पण खुप उलटी - सुलटी मते ऐकुन confuse आहे, म्हणुनच बाफ चालु केला ...

आम्ही पण सहकुटुंब घेऊन आलो नाकातली लस. २ दिवसात काहीही साईड इफेक्ट जाणवले नाहीत. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असे म्हणुन घ्यायला काहीच हरकत नाही.

आम्ही पण सगळ्यांनी नोसव्हॅक ( सिरम ची) नाकात ड्रॉप टाकायची लस घेतली.. ८-१० दिवस होवुन गेले, मलाच एकदोन दिवसानी घशात थोडे खवखवल्यासारखे झाले.. बाकी काही नाही..
आइला नाही देता आली वय ६५ आहे.. ( त्यांना देत नाहीत ..:-()

आम्ही पण घरातल्या पाची जणांनी कालच घेतले नेसल स्प्रे, काहीही साईड इफेक्ट्स नाहीत.
फक्त ३ वर्षाच्या आतील मुलांना देत नाहीत.

डॉ म्हणत असतील तर घ्या रे बाबांनो..
मी आणि नवरा मागचा आठवडाभर फ्लॅट..

आता टॅमी फ्लू आणि हा आठवडाभरही रजा ... बोअर झालय Sad

ज्यांना रेस्पिटोरी प्रॉब्लेम्स आहेत त्यांना नेसल घेता येत नाही. इंजेक्षन घ्यावे लागते. आम्ही पण घेतली सगळ्यानी. काही त्रास झाला नाही. मुलाला थोडा ताप आला होता पण त्याला साध्या फ्लू वॅक्सीन ने पण येतो.

मी चौकशी केली ,तर नेसल स्प्रे साठी एकावेळी ५ लोक हवेत असं सांगीतलं ..
पण मुलगा नुकता ३ वर्षाचा झाला आहे,विचार करतोय
बाकी रामदेव बाबा म्हंटल्याप्रमाणे मोठ्यांना काही गरज पडेल अस ही वाटत नाही ..

मी सुद्धा ह्या रविवारी घेतली ती लस. काहीच साईड ईफेक्ट्स नाहीयेत. Happy पण तरीही डॉ. सल्यानेच घ्यावी, असे मला तरी वाटते.

<<बाकी रामदेव बाबा म्हंटल्याप्रमाणे मोठ्यांना काही गरज पडेल अस ही वाटत नाही <<>>
no offence to रामदेवबाबा , पण बर्‍याच तरुण, सशक्त लोकांना देखिल स्वाईन फ्लु झालेला आहे, तेव्हा हे विधान जरा धाडसाचेच वाटतेय.

पण बर्‍याच तरुण, सशक्त लोकांना देखिल स्वाईन फ्लु झालेला आहे,
---- जे ३५+ जास्त आहेत, त्यांच्या शरिरात या प्रकारच्या विषाणूं विरुद्ध लढायची प्रतिकार शक्ती (विविध प्रकारच्या फ्ल्यु चा सामना करुन म्हणा) तयार झालेली असते असा एक मत प्रवाह आहे. म्हणजे त्यांना पण होण्याची शक्यता असते पण तुलनेने शक्यता कमी... तरुण मंडळी प्रथमच अशा प्रकारच्या विषाणू ला सामोरी जाते आहे.

लहान मुले हे शाळेत जातात, गर्दित मिसळणे होते, स्वच्छतेची हेळसांड होतेच हे अजुन एक कारण. ५५ +, ६०+ लोकांचा वावर घरात जास्त असतो हे त्यांचे प्रमाण कमी असायचे कारण.

पण बर्‍याच तरुण, सशक्त लोकांना देखिल स्वाईन फ्लु झालेला आहे >> अगदी बरोबर, ३० - ४५ र्वष वय असलेल्यांचीच संख्या जास्त आहे ...

.

मागच्या आठव्ड्यात नेझल लस घेतली. आज थोडी सर्दी आहे, पण फार त्रास नाही. ५ जणांनी जाऊन घावी. कारण त्या लसीत दोन प्रकारची औषधे एकत्र करावयाची असतात. अन ती एकत्र केल्यावर आर्ध्या तासात ती द्यावी लागतात. एका डोसमध्ये पाच व्यक्तींना लस देता येते. म्हणून ५ जणांनी जावे. आम्हाला प्रती २५० रु. द्यावे लागले. यात १५० ते २५०-३०० अशी रेंज त्या त्या हॉस्पिटल/ डॉक्टर नुसार फरक आहे. लस घेतल्यावर आठवड्यानंतर थोडा ताप्/सर्दी/ खोकला येऊ शकतो. पण ते स्वाभावीक आहे. फार त्रास होत नाही. मुलांना अन मोठांनाही द्यावी ही लस. तिचा प्रभाव वर्षभर टिकतो.