देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

Submitted by किरण on 5 August, 2010 - 23:10

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)

दुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.

किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.

भाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय इन्टरेस्टिंग माहिती. मस्त. पुढच्या भागाची वाट पहातोय.

किरण, हा लेख 'संगणक देवनागरी' गृपकरता मर्यादित आहे. तो सर्वांसाठी खुला कर.

अरे मी मुद्दामच ते सभासदांसाठी ठेवले होते म्हणजे ज्यांना खरोखरच Interest असेल त्यांना बघता येईल. पण आता असे वाटते की निदान हा लेख तरी सगळ्यांनी वाचावा. त्याप्रमाणे सुधारणा केली आहे.

ह्या लेखावरील काही प्रतिक्रिया लेख १ च्या शेवटी आहेत, कारण आधी मी सर्व एकाच लेखात लिहीत होतो पण तो लांबलचक होऊ लागला. आता अ‍ॅड्मिन साहेबांना त्या प्रतिक्रिया इकडे हलवायची विनंती केली आहे.

मस्त माहिती दिली आहेस रे किरण! ऋ आणि अ + रुकार ही अक्षरे टोपोलॉजिकली एकच येतात हे संशोधन फार भारी आहे!

किती सुंदर आहे हे. सावरकर लिपित लिहिलेली काहि पुस्तके मी बघितलेली आहेत. म्हणजे कधी काळी, निदान त्या अक्षरांचे खिळे तरी वापरात होते. जिथे सावरकरच विस्मृतीत गेले, तिथे ..

ज्ञ चा उच्चार द्+न्+य असा नाही का करायचा ? सध्या तोच तर वापरला जातोय. (इथे ज्ञ लिहिताना, मी तरी हिच तीन अक्षरे वापरतो. )

दिनेशः ज्ञ चा सध्या रुढ असलेला "द्‍न्य" हा उच्चार चुकीचाच आहे. ह्याला ठाम आक्षेप बहुधा सर्वांचाच असेल कारण इतके ते अंगवळणी पडलेले आहे.

मात्र असा उच्चार रुढ होण्याचे कारण ज्‌ञ हा उच्चार करता येणे जीभेला कठीण जाते म्हणून.

ह्याच कारणामुळे जिथे जमेल तसे त्याचे उच्चार केले जातात.

संस्कृत मध्ये ह्याचा उच्चार ज्‌ञ असाच अपेक्षित आहे
हिंदी भाषक त्याचा उच्चार "ग्य" असा करतात.

मिन्ग्लिश मुळे जुनी चूक तशीच पुढे चालू ठेवण्यास (नवीन चुका रुढ करण्याबरोबरच) ही अशीच मदत होते.

इंटरेस्टींग आहे माहिती ..

(मूळात एव्हढे subtle फरक असलेले कठिण उच्चार का रुढ झाले असावेत आणि जर ते रुढ झाले होते आणि आता लयाला जात आहेत तर ह्याला evolution म्हणायचं का? (माझी मराठी भाषा फार चांगली नाही ह्याचा ह्या बीबी वर लिहीताना खेद होतोय आणि विचित्रही वाटतंय) Happy

लेख छान आणि अभ्यासपुर्ण आहे. अजुनही संशोधन करावे. आपण ज्याला अपभ्रंश म्हणता त्याला अन्य काही म्हणावे असे वाटते. हे भाषासंवर्धन आहे असे वाटते.
माझ्या अल्पमतीने असे म्हणावेसे वाटते की मुळ शुध्द शब्द जेव्हा भाषाविषयक आडचणीमुळे किंवा भाषा विषयक कौशल्याअभावी चुकीचा उच्चारला जातो त्याला अपभ्रंश म्हणावे.

उदा. मुळचा संस्कृत शब्द ज्ञान मराठीत तसाच्या तसा आला कारण त्याला आवश्यक मुळाक्षरे मराठीत उपलब्ध होती. या उलट ती हिंदीत नव्हती म्हणुन ग्यान हा शब्द आला.

यावर विचार करावा.

पुनश्च अभिनंदन आणि पुढील संशोधनास शुभेच्छा

नितिनः शुभेच्छांबद्दल धन्यवाद

अपभ्रंश हा शब्द इथे चुकीचाच आहे ह्याची कल्पना आहे. फक्त अर्थाचे अवलोकन सहज व्हावे म्हणून तो शब्द वापरला आहे. सर्वसाधारणपणे बोलीभाषेवरच सर्व लोक भर देतात. त्यामुळे लिखीत खुणांच्या बदलासाठी असा काही शब्द असावा असे वाटत नाही.

ज्ञ हे अक्षर संस्कृत, हिंदी व मराठी ह्या तिन्ही भाषांमध्ये वापरले जाते, परंतु ते जोड अक्षर (जोडाक्षर) आहे हे मलाही पूर्वी माहित नव्हते. ते ज आणि ञ ह्यापासून बनलेले आहे.

तिच गोष्ट क्ष ह्या अक्षराबद्दल. मात्र त्याचा उच्चार आपण बर्‍यापैकी अचूक करतो. हे अक्षर क आणि ष ह्या मूळाक्षरांपासून बनलेले आहे.

हिन्दीमध्ये लिहिताना ज्ञान हा शब्द ग्यान असा लिहीत नाहीत (लिहीत असल्यास ती शुद्धलेखनाची चूक समजावी) मात्र त्याचा उच्चार ग्यान असा केला जातो तो वर उल्लेखलेल्या कारणामुळे.

sony ericsson mobile var marathi font che software kuthun uplabdha hoil ?

ज्ञ च नवा उच्चार जिभेवर रुळवायचा प्रयत्न करतोय.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

विराट ज्ञानी

ज्ञानदेव बाळ माझा

ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव

सगळी गाणी गुणगुणून बघतोय. नाही जमत !!

छान

जाम इन्टरेस्टिंग आहे Happy ... असे अजून वाचायला आवडेल ....
तसेच 'ञ' चा उच्चार आणि 'ष' , 'श' यांचे उच्चार पण शिकायचे आहेत ....

माहिती अभ्यास पूर्ण आहे यात शन्काच नाही उभी रेघ असणारे / नसणारे व त्यान्च्या साठी र या अक्षराची कसरत कधी लक्षात आली नव्हती स्वा वीर सावरकर याना अपेक्शीत र मोडी लिपित आढळतो
पुढील लिखाणाबाबत उत्सुकता आहेच

याचं ऑडीओ प्रेझेंटेशन कराल का? अजुनही ज्ञ चा उच्चाराचा प्रश्नच आहे.
व्हिडीओ बनवला तर अधिक उत्तम. {तसं आम्हाला म्हणायला काय जाते Happy }

मस्त लेख.

उबंटू १४.०४ चे अपडेट घेतल्यावर क्र, त्र, वगैरे अक्षरे नीट दिसत नाहीत फायरफॉक्समध्ये. त्याचे काय करावे याचा शोध घेताना हा लेख सापडला. Happy

छान माहितीपूर्ण लेख! माझ्या आजोबा, बाबांच्या सगळ्या जुन्या लिखाणात / पत्रांमध्ये मी "अनेक अुत्तम आशिर्वाद", "अेकदा" असेच वाचले होते. पण बाबा अगदी लहानपणी गेले म्हणुन कधी विचारता नाही आले कि 'अु', 'अे' असे का लिहिता म्हणुन. पण आता कळले. धन्यवाद.

आज अक्षरशः बर्‍याच वर्षांनी इथे फिरकलो. हल्ली मायबोलीवर यायला अजिबात वेळ होत नाही अगदी मनात असूनही. अर्थात चूक माझीच आणि नुकसानही माझेच. अजूनही बरेच सभासद हा लेख आवडीने वाचतायत हे पाहून खूप छान वाटले.

अश्विनी..: माझेही बाबा अजूनही असेच लिहितात आणि तेच मला नैसर्गिक वाटते.
विजय देशमुखः मी ह्यातला तज्ञ नव्हे. लिपीचा अभ्यासक म्हणता येईल फारतर! उच्चाराच्या बाबतीत मलाही प्रश्नचिह्न आहेतच.

चारुदत्तः ष चा स्पष्ट उच्चार स्व्.बाबूजी म्हनजे सुधीर फडके बरोबर करायचे. त्यन्चे कोणतेही ष असलेले गाणे ऐकलेत तर तुम्हाला श आणि ष मधला फरक कळेल.

'र'चे 'र्‍" हे वळण फार प्राचीन आहे. जुन्या शिलालेखांत, हस्तलिखितांत हाच 'र्‍' दिसून येतो. इतकेच नव्हे तर 'चामुण्डराजें करवियलें' या श्रवणबेळगोळा येथील सुप्रसिद्ध आणि मराठीतील अलीकडेपर्यंत आद्य मानल्या गेलेल्या शिलालेखात 'र्‍' हाच 'र' वापरलेला आहे. थोडा तर्क केला तर असे लक्ष्यात येईल की 'र्‍' आणि त्याला काना देताना हळू हळू र्‍' ची आडवी रेघ जिथे कान्याच्या उभ्या रेघेला मिळत असे तिथे एक छोटीशी गाठ ('श'च्या डोक्यावर असते तशी)तयार झाली आणि मग या अक्षराला आजचे स्वरूप आले असावे.
तज्ज्ञ हा शब्द तज्ज्ञ असाच हवा, तज्ञ असा नाही, कारण तो तत् आणि ज्ञ या दोन शब्दांचा संधि आहे. तत् म्हणजे 'तें' आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. आणि पुढे म्हणजे ज्ञ हेच मुळात जोडाक्षर आहे, तेव्हा तत्+ज्+ञ= तत्+ज्ञ = तज्+ज्ञ=तज्ज्ञ. हे उद्+ज्वल = उज्ज्वल सारखे आहे.

मायबोली म्हणजे खजीना आहे स्मित>>>>

हो आणि ह्या खजिन्यात खुप छान छान रत्ने आहेत ज्यांनी बरेच काही चांगले लिखाण केलय.... Happy

धन्यवाद मित्रांनो,
हर्पेन, तळागाळातून शोधून पुन्हा वर काढल्या बद्दल धन्यवाद!!
हीरा: तज्ज्ञ चे स्पष्टीकरण पटले. धन्यवाद! त्याबद्दलचा उल्लेख लेखातून काढून टाकला आहे.

मायबोलीवर सारखे येणे होत नाही, तेव्हा काही प्रतिसाद पहिजे असल्यास कृपया welcome अ‍ॅट kiranfont.com ह्या पत्त्यावर जरुर अभिप्राय पाठवा. विपु सुद्धा हल्ली जन्क मध्ये जातात.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार