जंगलचा राजा

Submitted by चिंगी on 5 August, 2010 - 20:47

दोनेक वर्षांपुर्वी जोहान्सबर्गला असताना लायन्स पार्क ला जाण्याचा योग आला. तिथे चार मोठ्या भागात थोडे मोठे झालेले नर-मादी ठेवले जातात, ज्या भागात गाडी घेउन जाता येते. आणि जंगलच्या राजाला अगदी पुर्णपणे नैसर्गिक वातावरणात नसले तरी किमान मोकळेपणी फ़िरताना तरी पाहता येते.

राणीसरकार Happy

पार्कच्या अजुन एका मोठ्या भागात बाकीचे प्राणी आहेत शहामॄग, हरिण, सांबर, हायना वै. (Hyna,मराठीत काय म्हणतात?) त्यापैकी काही..

जिराफ़ाला खाउ घालताना.

एका भागात सिंहाचे बछडे (छावा ना?) ठेवले आहेत व तुम्ही त्यांच्यासोबत खेळु पण शकता. Happy

इथेच एका विभागात प्रशिक्षक त्यांना काहीबाही शिकवत असतात आणि मग मायेने त्यांना भरवतात पण.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सहीच ग चिंगे..... असं डायरेक्ट बछड्यांबरोबर खेळायला कसं वाटतं??? Happy

मनापासुन धन्यवाद सर्वाना. Happy

असं डायरेक्ट बछड्यांबरोबर खेळायला कसं वाटतं???>>>>>> भिती! Wink
अगदी छोटी पिल्लं तर मांजरासारखीच वाटली पण तीक्ष्ण नखे तेव्हाही जाणवतात अगदी.
पण खरंच त्याचा पंजा हातात घेताना सॉलिड भारी वाटलेलं. Happy

Hyna,मराठीत काय म्हणतात?>>>>
तरस.> ओह अच्छा. धन्यवाद.

यात आता सिंहीणीचे काही फोटो वाढवले आहेत..

आईशपथ!!!

मी हाच पार्क १३-१४ वर्षांपूर्वी पाहीला होता. जोबर्गपासुन जवळच आहे. मला बछड्यांबरोबर खेळतांना एकाने हलकेच चावले होते. पार्क रेंजने बिनधास्त राहा म्हणुन सांगितले होते. आता चिरंजिवाला सांगितल्यावर त्याचा विश्वास बसत नाही.

खर्‍याखुर्‍या सफारीचा अनुभव मात्र अफलातुन होता...

मस्तच.

Hyna,मराठीत काय म्हणतात?>>>>
तरस.> आणि खोकड सुद्धा

Pages