चाफा बोले हा . . .

Submitted by जिप्सी on 5 August, 2010 - 00:37

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

गुलमोहर: 

पांढरा चाफा का हा?
मला आपला नेहेमीचा पिवळा चाफा माहितीये. Uhoh स्टेशनवर गजरेवाल्या बायका विकतात तो. माझा एक भा.प्र. - सोनचाफा म्हणजेच पिवळा चाफा का? Blush

लहानपणी आम्ही ह्याच्या फुलांची आंगठी करून बोटात घालायचो
>>>
मागे कुठल्यातरी बीबी वर वाचलं होतं की बुचाच्या फुलाची अंगठी करतात. मग या प्रचिं मधल्या चाफ्यालाच बुचाची फुलं म्हणतात का? :अजून एक भा.प्र.:

सुगंध दरवळला.....

आम्ही यालाच सोनचाफा म्हणतो, आमच्या अंगणात होते हे झाड...कसला घमघमाट असायचा फुलांचा

निंबुडा, हि बुचाची फुलं नाहीत इथे बघ - http://toptropicals.com/cgi-bin/garden_catalog/cat.cgi?uid=millingtonia_... बुचाची फुलं

सही !!!
मस्त दिसतायत सगळी फुले.
प्रत्यक्षाहुन प्रतिमा सुंदर असेच वाटते तुझे फोटोज बघुन.
निंबुडा, ही फुले बुचाची नाहीत. बुचाच्या फुलांचा मागे मनिषा लिमयेने दिला होता फोटो. त्याच्या माळा करतात.

सुंदर.
गावाला आमच्या घराच्या अंगणात हे झाड होत. आम्हि जायचो तेव्हा सुवासाने घमघमलेल असायचे.
आता अनेक वर्षांनी गेले तर ते नव्हत तिथे. Sad
त्या फुलांची आठवण झालि Happy

अनीशा, ते पान उघडत नाहिये.
सोनचाफा हा नाही? तू ंहण्तेयस त्य फुलांना सुगंध असतो का?

हा सोनचाफा नाही आणि बुचाची फुले सुद्धा नाहीत.

हा पांढरा चाफ White Frangipani

सोनचाफ्याचे झाड ह्याच्या पेक्षा मोठे वाढते. सोनचाफ्याची फुले रात्री उमलतात तेव्हा अक्षरशः त्याचा सुगंध लांब पर्यंत पसरतो. बाजारात ह्याची फुले विकत मिळतात.

याच फुलाचा एक फोटो जर (vertical) म्हणजे आपला पेला असतो ना तसा, घेतला असता तर अजुन एक सुन्दर प्रतिमा मिळाली असती. अर्थात हे माझ मत.. Happy बाकी फोटो सुन्दर......

तुमी कुनिकंडं कँपुटर्च्या क्षेत्रात घुसलासा? Uhoh
हे फोटोग्राफिचं मनावर घ्याच राव.. Happy

योगेश, आता माझे सगळे प्रतिसाद मूक व्हायला लागलेत हळू हळू..
किती निश:ब्द करणार आहेस? Happy

अत्युच्च फोटोज... खूप शुभेच्छा! तुझ्या हातात आणि जनरेत जादू आहे.

आहाहा देवचाफा हा. मी लहान होते तेंव्हा हे झाड आमच्या पडवितल्या पत्र्याला लागुन होत. मी ह्या झाडावरुन पत्र्यावर चढायचे आणि फुल काढायचे आजीसाठी देवाला वहायला.

मखमली पाकळ्यातले सौंदर्य तुझे
मनास वेडेपिसे करूनी गेले...

खूप खूप सुंदर.. माझ्या आवडत्या फुलांमधलं चाफा हे सर्वात आवडतं फूल आहे. कुणास ठाऊक का ?

योगेश, सरळ सेव्ह करून घेतले सगळे फोटू.

योगड्या आता तू मला फोटोग्राफी नै शिकवलीस तर बघ Angry
बाकी फोटु लै भारी
निंबे हा पांढरा चाफा आहे सोनचाफा वेगळा असतो त्याचा सुगंध वेडावणारा असतो. बुचाची झाड तर खुपच वेगळी असतात अगदी मनोर्‍यासारखी उंच असतात आणि त्यांच्या फुलांचा सडा पडतो. पुण्यातल्या प्रत्येक शाळेत एकतरी झाड असतेच बुचाचे Happy

खुरचाफ्याचे चांगले फोटो, पण नेहमीप्रमाणे व्हरायटी नाही.
या प्रकारातच लाल, गुलाबी आणि पिवळा रंग असतो.
शिवाय चाफ्याचे बाकिचे प्रकार, नागचाफा (यात लाल आणि गुलाबी ), सोनचाफा, (यात पांढरा, पिवळा आणि केशरी ) हिरवा चाफा, भुईचाफा, कवठी चाफा (यात पांढरा आणि पिवळा) कुठायत ?

मस्तच आहे ! सुंदर फोटो ! Happy

<<पण नेहमीप्रमाणे व्हरायटी < योगेश, बघ तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आता.... Happy

फोटो छानच आहेत.
आम्ही पण फुलाची अंगठी करायचो
अशी अप्रतीम फोटोग्राफी असल्यावर अपेक्षा तर वाढणारच ना ?
<<पण नेहमीप्रमाणे व्हरायटी--- अनुमोदन

पठ्ठे बापूराव............ अपेक्शा वाढ्ल्यात लोकान्च्या तुम्हाकडून....... Happy आता खरे ऊतरा.... Happy
म्हणजे आम्हाला अजून सरस प्रचि बघायला मिळ्तील........ Happy

नागचाफा (यात लाल आणि गुलाबी ), सोनचाफा, (यात पांढरा, पिवळा आणि केशरी ) हिरवा चाफा, भुईचाफा, कवठी चाफा (यात पांढरा आणि पिवळा) कुठायत ?>>>>> अरे बापरे!!!! Happy
यातील काही नावे तर मला आत्ताच समजली Sad मग फोटो कसे असणार Sad
पण अजुन काहि विविध फुलांचे फोटो आहेत Happy एक दोन दिवसात घेऊन येतो तुम्हा सगळ्यांसाठी Happy

गुब्बी
अगदी खरंय
पुण्यातल्या प्रत्येक शाळेत एकतरी झाड असतेच बुचाचे

आमच्या शाळेच्या पटांगणात पण होते.( 'पटांगण '............. शाळा सोडल्यानंतर किती दिवसांनी वापरला हा शब्द)

दिनेशदा,
पांढर्‍या चाफ्यालाच indian temple tree म्हणतात का?

मस्त फोटू नेहमीप्रमाणे! मला ह्या चाफ्याचा विरक्त भाव सर्वात मोहवतो. निष्पर्ण फांद्यांना असे मनोहारी पुष्पगुच्छ लगडलेले असतात, आपल्या मंद सुगंधाने आसमंत दरवळून सोडत असतात, पण तो वृक्ष जणू आलिप्तपणे त्या उत्सवात सामील असतो आणि नसतोही! Happy

Pages